मराठी बोलताना तुम्ही कुठले ईंग्रजी शब्द सर्रास वापरता?

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अपलोड on 5 July, 2018 - 10:53

आपल्याकडे मराठी बोलताना मध्ये हिंदी शब्द वापरले की ते कानांना खड्यासारखे टोचतात. काय तर आपल्याला त्याची सवय नसते. पण तेच ईंग्रजी या परकीय भाषेतील शब्द वापरले तर ते कानांना गोड वाटतात. काय तर सर्वांनाच आता त्या भाषेची सवय झाली आहे.

पण पिढी दर पिढी आपल्या मराठीतील ईंग्रजी शब्दांची टक्केवारी वाढू लागली आहे. येत्या पिढीत जी मुलेही ईंग्रजी माध्यमात शिकली आहेत आणि ज्यांच्या गेल्या तीन पिढ्याही ईंग्रजी माध्यमातच शिकल्या आहेत अश्यांच्या मराठी शब्दकोषावर ईंग्रजीचे अतिक्रमण वाढतच जाणार.

तर कुठेतरी हे थांबवायला हवे. आणि ते थांबवायची पहिली पायरी म्हणजे आपण कोणते ईंग्रजी शब्द सर्रास वापरतो याची यादी तयार करणे. ती झाली की मग त्यांचे पर्यायी शब्द तोंडी रुळवणे हे ज्याचे त्यालाच करावे लागणार.

आता ईथे काही शब्द ईंग्रजीतच बरे वाटतात किंवा त्यांचे मराठी प्रतिशब्द अवघड असतात. जसे की बस, ट्रेन, क्रिकेट, फूटबॉल, मोबाईल, चार्जर, थॅंक्यू, सॉरी, प्लीज .. ईथे धन्यवाद, क्षमस्व, कृपया हे शब्द काही अवघड नाहीत, पण रोज कामकाजानिमित्त प्लीज थॅंक्यू हे ईंग्रजी भाषेत बोलणे सोयीचे पडते.

पण काही शब्द उगाचच आपण सवयीने ईंग्रजीत बोलतो, किंवा तशी सवय लाऊन घेतली आहे. जे मराठीत बदलता येऊ शकतात त्यांची ईकडे यादी करूया.

फॅन - पंखा - एसी ऑन कर - एसी चालू कर
टाईम काय झाला? वेळ काय झाली?
आज मी लेट आलो - आज उशीर झाला
माझी कॅप कुठे गेली - माझी टोपी कुठे गेली - या पेनाची कॅप कुठे गेली - या पेनाचे टोपण कुठे गेले?
खूप टाईट बसलाय - खूप घट्ट बसलेय,
आज नाश्त्याला ब्रेड चालेल का? - पाव चालेल का?
विंडोसीटवर कोण बसलेय - खिडकीजवळ कोण बसलेय
हॅंकी दे ना प्लीज - रुमाल बोलू शकतो, भले ब्रांडेड का असेना
आज ऑफिसला नाही गेलास? - आज कामावर नाही गेलास?
आज फुल धमाल आली - आज खूप धमाल आली, खूप मजा केली
टेंशन कशाला घेतोयस? जास्त लोड घेऊ नकोस - चिंता कश्याला करतोयस? जास्त काळजी करू नकोस?
बिग बॉस - म्हणे मराठीत बोला - रेशम तू आज सेफ आहेस.. सई तू अनसेफ आहेस - अरे सुरक्षित बोला..
एक एक्स्ट्रा प्लेट मिळेल का? - एक आणखी ताटली मिळेल का ...
ब्लू, ब्लॅक, ग्रीन - काळा, निळा, हिरवा..
संडे, मंडे - सोमवार मंगळवार ..
हाफ - अर्धा, फुल - पुर्ण ...

लिस्ट वाढतच जाईल... पुढचे प्रतिसादात लिहितो..

बरेचसे मराठी शब्द आपण हळूहळू वापरणे सोडून दिल्याने ते वापरणे आता जुनाट वाटू लागले आहेत, आपल्यालाच काही मराठी शब्दांची लाज वाटू लागली आहे. तर हे प्रामाणिकपणे कबूल करत अश्या शब्दांचीही लिस्ट काढूया. काही तोंडात रुळलेले ईंग्रजी शब्द सोडून पुन्हा जुनाट मराठी शब्द वापरणे आपल्याला सोयीचे जाणार नाही, जमणारही नाही. पण जे शक्य आहे ते बदलता येतीलच.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुळलेल्या इंग्रजी शब्दांना अट्टहासानं मराठी प्रतिशब्द न शोधता सुद्धा धेडगुजरी न बोलणं साधता येतं.

"फ्रेज - वाक्यप्रचार?" - वाक्यप्रचार नव्हे, वाक्प्रचार.

वाक्यप्रचार नव्हे, वाक्प्रचार.
>>>>
ओह ग्रेट !
मी लहानपणापासून वाक्यप्रचारच बोलत होतो. कर्रेक्ट केल्याबद्दल धन्यवाद Happy

रुळलेल्या इंग्रजी शब्दांना अट्टहासानं मराठी प्रतिशब्द न शोधता सुद्धा धेडगुजरी न बोलणं साधता येतं.
>>>

मराठी बोलताना ईंग्रजी शब्द वापरणे हे आपल्याकडे धेडगुजरी समजले जात नाही.
अवांतर - धेडगुजरी शब्द मराठी आहे का?

करेक्ट कशाला करायच?. सगळ्यांना कळल्याशी कारण.
>>>
हो पण तो चॉईस आपल्याकडे राहतो ना.

चॉईस - हा शब्दही बरेचदा वापरला जातो माझ्याकडून.
तसेच एक फ्लेवर - आईसक्रीमचा फ्लेवर याला काय बोलणार मराठीत ?

फ्लेवर>>> चव बोलता येईल! पण 'आईसक्रिमची चॉकलेट चव' बोलायला कसंतरीच वाटेल. >>>> +111

फ्लेवर बोलायला की फ्लेवर म्हणायला ? कुठल बरोबर ...

आईसक्रीम आणि चॉकलेट यांना पण मराठी प्रतिशब्द असतीलच.
बोलणार शब्द मराठीच आहे ना?
मग तो कशाला कानाला टोचेल?

पण त्या हुमायून नेचरचा अर्थ सगळ्यांना कळतो का?
नाही म्हणजे, अर्थ कळल्याशी कारण , हे आमचं ब्रीदवाक्य आहे.

"चव बोलता येईल" = चव म्हणता येईल.

"मराठी बोलताना ईंग्रजी शब्द वापरणे हे आपल्याकडे धेडगुजरी समजले जात नाही." - रुळलेले शब्द असतील तर नाही. पण प्रचलित मराठी शब्दांऐवजी अनावश्यक इंग्रजी शब्द वापरले तर ते धेडगुजरी होतं.

चव म्हणा किंवा फ्लेवर म्हणा. तसं पाहू जाता मुळात चव व स्वाद हे दोन वेगळे शब्द आहेत. फ्लेवर = स्वाद. चव = टेस्ट.
चव हा फक्त जिभेचा अनुभव आहे. फ्लेवर उर्फ स्वादात वास व चव दोन्ही येतात.

तर चव म्हणा, फ्लेवर म्हणा, की अजून काही म्हणा. पण म्हणा. "बोलू" नका.

इस्कू क्या बोल्ते? व याला काय म्हणतात?? यात फरक आहे.

यडछापपणे हिंदी चं भैय्या लोकांनी केलेलं मराठी भाषांतर मराठी म्हणून वापरायचं, वरतून हेच आमचं मराठी असं म्हणायचं, हा शुद्ध बावळटपणा आहे.

माझे 'म्हणणे' मी बोटांनी टंकूनही मांडू शकतो, तुम्ही डोळ्यांनी ते समजून घेता. बोलण्यासाठी मात्र माझे तोंड व तुमचे कान, एकत्र यावे लागतात.
आता भांडायला या, गाणं बोलायचं की म्हणायचं? Wink

ज्याला जशी जमते तशी जमते तशी बोलावी भाषा. हिंदीत क, ख , ग अशी वर्गवारी केली आहे हिंदी बोलणा-यांची. ग म्हणजे दक्षिणेकडची राज्ये, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडची राज्ये जिथे हिंदी अजिबात बोलली जात नाही. ख म्हणजे जिथे हिंदी बोलली जाते पण तिचे दुय्यम स्थान आहे. तर क म्हणजे हिंदी पट्टा. या राज्यात हिंदी ही अधिकृत राजभाषा आहे. राजभाषा वेगळी. बोलचाल की हिंदी वेगळी. केंद्र सरकारच्या कार्यालयात गेलं तर हिंदी मे काम करने के लिए रुकिए मत, बोलचाल की हिंदी का प्रयोग करे अशा पाट्या दिसतात. त्यामुळे पुण्यातला एखादा तमिळ अधिकारी दिल्लीच्या पंजाब्याशी बोलत असताना हा आपल्या पद्धतीच्य तमिळ छाप असलेल्या हिंदीत बोलतो तर तिकडून पंजाबी ढंगाचे हिंदी ऐकू येते. पण दोघांनाही कामाचे समजते.

मराठीला सनातन्यांच्या तावडीतून सोडवून वरीलप्रमाने धोरण स्विकारले तर मराठी किमान चार राज्यात पसरू शकते. हळू हळू हिंदी पट्ट्यात देखील तिचा प्रभाव जाणवेल.

याचे फायदे सांगण्याची आवश्यकता नाही. मराठी पुस्तके, संगीत, सिनेमा, नाटके यांचं क्षेत्र विस्तारेल.
त्यासाठी बोलचाल की मराठीचा स्विकार केला पाहीजे. तितका उदारमतवादी पणा आपल्याकडे नसेल तर मग राहीलं.

मराठी किमान चार राज्यात पसरू शकते. हळू हळू हिंदी पट्ट्यात देखील तिचा प्रभाव जाणवेल. Lol Lol

सर प्रभाव वाढण्यासाठी मराठी भाषिक लोक असले पाहिजेत असे नाही का वाटत तुम्हाला?

ह्यॅ:ऽ!

हिंदी हिंदू हिंदूस्थान मधे हिंदी ऐवजी मराठी लिवलं तर काही तरी चान्स आहे. नैतर हे बसतील नागपुरी संत्री चोखत.

प्रभाव वाढण्यासाठी मराठी भाषिक लोक असले पाहिजेत असे नाही का वाटत तुम्हाला? >> भारतात इंग्रजी भाषिक आणि महाराष्ट्रात हिंदी भाषिक पहिल्यापासून होते का सरजी ? ( कुणाला उद्देशून लिहीलाय हा प्रतिसाद.. माझं मलाच आश्चर्य वाटतंय )

छान धागा.
"एनीवे म्हणजे बहुधा "असो", "तर असो" जे मी लेखात बरेचदा वापरतो. तरी जाणकार प्रकाश टाकतील"
anyway - आपल्या बोलीभाषेत ' बर, ते जाउदे', शिक्षक वापरतात " असो"

"सिंबा, काय गलत आहे त्या विधानात? एवढे हसण्यासारखे?" गलत - वावगे

हिंदी शब्द खुप वापरु लागले लोक. जास्त करून मुंबईकर. माझ्या ननंदेला मुबंईला दिला आहे. ती बोलते तस. उदाहरण " त्याला आदत पदलिये", " केस करतिये - 'बाल बना रहि हु' चा मराठी"

Pages