आता प्रत्येक भारतीयाला मिळणार २२.५ लाख रुपये !

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अपलोड on 30 June, 2018 - 05:35

स्विस बॅंकेतील काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होणार आहेत हे तुम्हाला माहीत असेलच. पण काही उतावीळ लोकांचा संयम सुटल्याने कुठे गेले १५ लाख म्हणून गेला काही काळ ओरडा होत होता. पण आता मात्र अश्या सर्वांना एक छान चपराक मिळेल अशी बातमी समोर आली आहे. आता प्रत्येकाला १५ नाही तर तब्बल साडेबावीस लाख रुपये मिळणार आहेत. गेला बाजार गब्बरसिंग टॅक्स कापून गेला तरी वीस लाख कुठे गेले नाहीत. नोटबंदीत एक हजाराची नोट बंद करत २ हजाराची नोट सुरू करणे हा मास्टरस्ट्रोक याचसाठी होता. आता फक्त १० बंडल आणि २० लाख रुपये. पावसाळा सुरू आहे, छोटीशी प्लास्टीक पिशवी घेऊन या आणि पैसे घेऊन घरी जा. प्लास्टीक पिशवीचा दंड ५००० आता काही जड नाही. आणि हो, ज्यांना पैसे थेट खात्यात जमा हवे असतील त्यांनी आपले आधार लिंक आहे का एकदा चेक करून घ्या. आणि यापुढे आधार कार्ड कश्याला जिथे तिथे म्हणून रडू नका...

सविस्तर बातमी ईथे वाचा -
स्विस बॅंकेतील भारतीयांचे धन २०१७ या एका वर्षात ५० टक्के वाढले
https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/money-of-...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ शरद पवार कशाला शाब्दिक दंगली घडवून आणताय. ते आशुचॅम्प सर बरोबर बोलतात प्रतिसाद मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाल तुम्ही.

बरोबर आहे,
स्विस बँकेत ठेवलेल्या भारतीय लोकांच्या पैशात 50%वाढ झाली,
यावर इतकि तिरकस टिप्पणी बरी नव्हे, मोदी भक्तांच्या जीवाला त्रास होतो, बंद करा हा थ्रेड

2 2 अर्थमंत्री असणाऱ्या देशाची ही स्थिती आहे,
देव करो एक अर्थमंत्री परत रजेवर जावो, आणि दुसरा थोडा कमी काम करो... कदाचित स्थिती आपोआप सुधारेल,

हो, त्या प्रधानमंत्र्याला अर्थमंत्रालयाच्या जवळ सुद्धा येऊ देऊ नका.

एक वाईट बातमी - वाढलेले ५० टक्के काळा पैसा नसून व्हाईट मनी आहे.
तर १५ लाखांवरच समाधान माना

पण तरी एकदा बातमी कन्फर्म करा...

जमा झालेला काळा पैसा करदात्यांचाच असेल ना?
मग तो कोणी का परत आणला तर त्यावर हक्क फक्त करदात्यांचाच असायला हवा ना?
करदाते बरेच कमी आहेत असे ऐकिवात आहे. कुणीतरी हिशेब लावून, कितीतरी जास्त पैसे मिळतील असे स्वप्न का रंगवत नाही?
स्वप्न बघायचीच तर त्यात आखडता हात कशाला?

देशात करदाते म्हणजे केवळ फक्त ओन्ली इन्कमटॅक्स भरणारे नोकरदारच असतात ह्या गोग्गोड गैरसमजातून हे पांढरपेशे नोकरदार ज्या दिवशी बाहेर येतील तो दिवस जागतिक महासत्तेकडे टाकलेले पहिले पाऊल असेल.

पण मोदींनी पंधरा लाखवाल्या भाषणात हरेक गरीब के खाते में असं म्हटलंय.
करदात्यांनाच मिळणार असं जेटलींनी स़ागितलं की गोयलनी?

एकमेकांशी (आधीपासून) सहमत / चटकन सहमत / (क्षणात) मान्य असा सगळा गोतावळा असल्यावर (मुद्द्यांवर !) चर्चा करून करून तरी किती करणार ना ?

चर्चा व्हावी म्हणून हा धागा बंद करा अशी मागणी केलेली का?
अडचणीच्या मुद्द्यावर चर्चा होऊच नये असा स्टॅन्ड असतो भक्तांचा

देशात करदाते म्हणजे केवळ फक्त ओन्ली इन्कमटॅक्स भरणारे नोकरदारच असतात ह्या गोग्गोड गैरसमजातून हे पांढरपेशे नोकरदार ज्या दिवशी बाहेर येतील
>>>>>

असा गैरसमज कोणाचा असू शकतो?
अर्थात मला आपला मुद्दा समजला नाही काय बोलायचेय. पण शाहरूख खानलाही टॅक्स भरावा लागतो जो पांढरपेशा नोकरदार नाही हे सर्वांना माहीत असतेच.

अरे १५ लाख रु. फुकट मिळण्याची वाट पाहणार्‍या फुकट्या भारतीयांनो, तुम्ही फक्त "फुकट" कसे मिळेल याचीच वाट पाहात राहा. तुमच्या करता मेहनत वगैरे फक्त सरकार करेल, तुम्ही आयते मिळेल ते फुकट खा.

खोटे बोलून फसवणार्‍या भामट्यांनो, तुम्हाला स्वतःला तर कसलीच लाज नाही हे आता चार वर्षात जगजाहिर झाले आहे.