Vel janyasathi Upay..

Submitted by Asawari D on 26 June, 2018 - 02:21

Namaskar...Me atta 4th month pregnancy madhe ahe ( after 10yrs of marriage with successful IVF treatment )
Mala 5 month complete bed rest ahe, ani nantar fakta gharat firne allowed ahe till delivery( almost 9 month rest)
Before pregnancy me eka namakit pharma companyt job la hoti, pan sadhya to pan sodava lagalay.
Gharat basun ajibat vel jat nahi...pregnancy enjoy karnya evaji depression yayla lagala ahe.
PS: Vachan ani internet vaprun dole dukhayla lagle ahet. Sadhya TV, FM ani thoda Vinkam asa shedule ahe. ya shivay kahi upay aslyas suchvave...

Group content visibility: 
Use group defaults

Ekda nau mahine sample ki

Ekda nau mahine sample ki tumhala kitihi zopaychya asla tari zopayla milnar nahiye. So without thinking much enjoy this personal me time.
If you are in India
1. Call beautician home for twice a week once for facial /pedi etc. One visit one service
2. Put old household things on olx for sale and lot of time pass on chat haggling.
3. Window or actual shopping online (Amazon verified ) buy and return
4. Go to various investments sites and learn basics and plan for your future
5. If you have multiple maids ask them to come on separately and get thorough work done without offending them
6. Once you are allowed to move in the home try cooking one new item daily
7. Make your home 5s and drive others crazy. Making home 5s is big project Happy it almost never gets completed Happy
8. I am not into stitching, knitting etc but I am sure it's big part of motherhood from what I have seen in indian movies Happy

चित्रांचं पुस्तक आणा ज्यात फक्त रंग आपण भरायचे अस्तात. त्याने वेळ छान जातो.
स्केच पेन, खडू, वॉटर कलर सर्व प्रकारचे आणा आणि मन रमवा.

पेपरात जाहिरात देऊन एखादी व्यक्ती तासावर घरी व्हिजिट करू शकेल अशा अंदाजाने हायर करा, वाचन त्यांच्याकडून करून घ्यायचे मोठ्याने. यात गीता रामायण महाभारत. सर्वांनाच फायदा होइल, तुम्ही बाळ आणि वाचणारा.

Watch these if you are interested,

Mahabharat
Ramayan
Sarabhai vs Sarabhai
Game of Thrones
Breaking Bad
Narcos
Prison Break
Friends
House of Cards

राजसी यांनी सुचवलेला चौथा उपाय आवडला.

ब्लॉगिंगचा विचार करू शकता.
वाचलेल्या पुस्तकाबद्दल, एखाद्या सिनेमाबद्दल लिहिण्यापासून सुरुवात करा.

नेटफ्लिक्स/ हॉटस्टार वगैरे वर चांगले चित्रपट पहा. रोज १ असे.
दक्षिणा+१ . कलरिंग बुक्स छान मिळतात हल्ली मोठ्यांसाठी.
हस्तकलेची DIY किट्स मिळत असतील तर पहा.

. Make your home 5s and drive others crazy. Making home 5s is big project Happy it almost never gets completed Happy >>>> हे सहीये.

पण बेडरेस्ट वर आहेत त्या तर हे कसे शक्य होईल हा विचार कर्तीये. कि फक्त प्लॅनींग त्यांची ईम्पलीमेंट घरच्यांनी करायचे Uhoh

तुमच्या करिअरला उपयोगी असा काही अभ्यास करा. पोस्टल कोर्स करता येत असेल तर चांगले. काहीतरी टार्गेट असेल.

तुमचा वेळ जावा म्हणून एक गंमत - तुमच्या नावावरून why this kolavari kolavari D आठवले. Happy

maayboli वर अजून एक id काढा, आणि २ id च्या गप्पा रंगवा Happy>>>> नको नको. सिम्बा, मेंटल प्रॉब्लेम create होईल असे उपाय सुचवू नको Lol

चित्र रंगवणे बेस्ट. छोटे फ्रॉक/झबली/बाबासुट/दुपटी/टोपरी ह्याची designs/patterns काढा कागदावर. नंतर त्यातलेच जे आवडतील ते नंतर शिवून घ्या कुणाकडून तरी.

दिवसाचे ४-५ तास तब्बेतीला झेपतील अश्या चांगल्या activities प्लान करा रोज वेगवेगळ्या timetable आखून. दोन activities च्या मध्ये १ तास rest म्हणजे झोपा काढा.

VB, once she is allowed to move in and around home, she could do 5s project; a drawer/a shelf daily (I think I have written that above also) Happy

Vikramsinh hyancha online abhyaskram paryay chhan aahe. Mala kasa nahi suchala!? Mi swata symbiosis ch distance learning MBA pregnant astana suru karun shevatchya 2 semester balantpana nantar purn kelya aahet Happy sadhya shikshanala ramram thoklyacha Parinam!

भाषा शिकणे.

बंगाली,कानडी,मलयालम,तमिळ या भारतीय आणि जपानी, फ्रेंच, जर्मन या परदेशी भाषांचे भरपूर विडिओ युट्युबवर आहेत ते ओफलाइनसाठी डाउनलोड करता येतात.

तुम्हाला पुस्तकं वाचायची आवड असेल आणि लायब्ररी जवळ असेल तर खूप फायदा होईल...

कोलाज वर्क, हॅन्डिक्राफ्ट, याशिवाय अजून काही प्रकार पणत्या, कॅनव्हास इ रंगकाम यातही वेळ जाईल

डिस्टंट लर्निंग चा एखादा कोर्स करता येऊ शकेल... नोकरी वर स्किलसॉफ्ट पोर्टल चे ही काही चांगले कोर्सेस आहेत.

स्वयंपाकघरात रस असेल तर निरनिराळे प्रकार करता येतील (जरा जपून, उचलखाचल करायला मनाई असेल तर नका करू)

शिकवण्याची आवड असेल तर यूट्यूब विडिओ बनवून पोस्ट करू शकता... कुणाची विशेष अशी मदत लागणार नाही या कामाकरता... कॅमेरा आणि मिध्यम आकाराचा व्हाईट-बोर्ड सेट केला की झालं

खाणं, दुपारचा आराम आणि स्वतः आनंदी राहाणं यावर वॉच ठेवून कटाक्षानं पाळा...
साधं पण पोटभरीचं खाणं हे दोन्हीवेळेला व्हायलाच हवं

स्तोत्रपठण - पोथीवाचन आवडत असेल तर जरा मोठ्यानं पण शांतचित्तानं सकाळ-संध्याकाळ जरूर करा

फोनवर गेम्स खेळायला आवडत असतील तर त्यात काहीवेळ रमता येईल

सगळ्यात आधी हा वेळ घालवायचाय आता असा विचार बाजूला करुन "हा वेळ एन्जॉय करायचाय" अशा अर्थाने या कालावधीकडे बघा.
ट्रस्ट मी, असा विचार अंगात मुरवाल तर अर्ध्याहून अधीक काम सोपं होईल तुमचं. ही ट्राईड & टेस्टेड मेथड आहे जी माझ्या बाबतीत वर्क झाली.

मला फर्स्ट ट्रायमेस्टर संपायच्या आतच बेडरेस्ट सुरू झाली होती ती पार ९ वा लागेपर्यंत होती. अंघोळ एक दिवसा आड करायच बंधन होतं जेणकरुन तितकही उठणं कमी व्हावं.

मी बरीच पुस्तकं वाचली (अगदी बालगोष्टींपासून ते मोठ्यांपर्यंत आवडतील ती सगळीच), गाणी ऐकली, टॉम & जेरी सिडी लावून बघितल्या, सिनेमे पाहिले, रोज पेपरमधलं कोडं सोडवत थोडा वेळ घालवायचे. बाकी अधूनमधून गप्पा मारायला यायच कोणी ना कोणी आणि हक्काची झोपही होतीच पहिले काही महिने वेळ घालवायला. रोज तेच तेच न करता कधी पुस्तक, कधी गाणी, कधी सिनेमा असं करत वेळ मजेत गेला. आणि हे सगळं करताना पोटातल्या बाळासोबत गप्पाही मारायचे. त्यावेळी मोबाईल नव्हते, मायबोली माहिती नव्हती, फेसबुक ऑर्कुट असं काही जगच माझ्या आसपास नव्हतं. बेडरुममधे टिव्हीही नव्हता. पण तरी मजेत गेला की वेळ. तसाच तुमचाही जाईल. एखाद दिवस कंटाळा येणं तसही ऑफीस असतं तरी झालच असतं. तर जो वेळ मिळतोय त्यात आराम करा, बाळाशी गप्पा मारा, आवडेल ते सिनेमे बघा, गाणी ऐका, झोप काढा आणि मुख्य म्हणजे असा रिलॅक्स वेळ नंतर कितीही हवासा वाटला तरी मिळणार नाहीये हे समजून मिळालाय तो काळ एन्जॉय करा. ऑल द वेरी बेस्ट

अभिनंदन!
फोनवर गप्पा मारा मैत्रिणींशी!
मला तुमचा फोन नंबर कळवलात तर मी तुम्हाला अधूनमधून फोन करु शकते!

अभिनंदन.
वाचन करा. आहारशास्त्राचे, बाल आहारशास्त्राचे ऑनलाइन कोर्सेस करा.

सगळ्यात आधी हा वेळ घालवायचाय आता असा विचार बाजूला करुन "हा वेळ एन्जॉय करायचाय" अशा अर्थाने या कालावधीकडे बघा.
>>>>

कवीन यांच्याशी सहमत.
मला आयुष्य जगायला वेळ पुरत नाहीये. तुम्ही नशीबवान आहात. एंजॉय करा. हे दिवस पुन्हा येणार नाहीत.

बाकी बिगबॉस बघत असालच.
जोडीने मायबोलीही बघत जा..
लिहायची आवड असेल तर बेस्टच.. नसेल तर लावा आणि उतरवून काढा मनातले सारे..

अवांतर - वर कोणीतरी म्हटलेच आहे. तसेच मलाही कोलावरी डी गाणे आठवले. पुर्ण गाऊनच मग हा धागा वाचायला घेतला.

आपल्या तब्येतीसाठी आणि घरात येणारया आनंदासाठी शुभेच्छा...

अरे हो, त्या येणारया बाळासाठी काही करता येईल का बघा..