ती सध्या काय करते

Submitted by विठ्ठल_यादव on 25 June, 2018 - 15:18

पावसाचा ओलावा प्रेमाचे बीज रोवून जातो
तिच्या आठवणींच्या कळ्या मनात तो फुलवतो
फुललेली ती कळी नेहमीच मला प्रश्न विचारते
ती सध्या काय करते , ती सध्या काय करते ।।

खूप दिवस झाले आता तिची बडबड ऐकून
स्वप्नातील काल्पनिक भेट सत्त्यात उतरवून
जेव्हा तिच्या वरच्या कवितांची वही नजरेत पडते
धूळ खात पडलेली ती वही नेहमीच मला प्रश्न विचारते
ती सध्या काय करते , ती सध्या काय करते ।।

आयुष्यात आता दोघे ही खूप पुढे आलोय
एकमेकांवाचून राहायला आता चांगलच शिकलोय
पण रात्रीच्या एकांतात जेव्हा तिच्या आठवणींची लाट येते
भरलेलं माझं मन मलाच विचारते
ती सध्या काय करते , ती सध्या काय करते ।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users