लस्ट स्टोरीज

Submitted by कटप्पा on 19 June, 2018 - 18:22

नेटफ्लिक्स वर लस्ट स्टोरीज आला आहे. बॉम्बे टॉकीज प्रमाणेच 4 दिग्दर्शकांनी चार कथा सादर केल्या आहेत.
1. अनुराग कश्यप - राधिका आपटे आणि आकाश ठोसर.
2. झोया अख्तर - भूमी पेडणेकर
3. दिबाकर बॅनर्जी - मनीषा कोईराला, संजय कपूर
4.करण जोहर - कियारा अडवाणी,विकी कौशल आणि नेहा धुपिया.

यापैकी चौथ्या स्टोरी ची क्लिप व्हायरल झालेलीच आहे.

या कथा आणि त्यांच्या एंडिंग बद्धल चर्चा करायला हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिली गोष्ट कंटाळवाणी झाली - राधिका आपटेचं काम आवडलं, तरीही.
तिसरी मनिषा कोइरालाच्या सुमार अ‍ॅक्टिंगमुळे फसली. मित्र 'तुम्ही सेपरेट झाल्यावर तुझा नवरा आपल्याला एकत्र का बघेल?' असं विचारतो तिथे तिला अचानक गोष्टी लख्ख दिसायला लागतात आणि मग त्यातून ती लीस्ट डॅमॅजिंग सोल्यूशन काढते. तिला ते काही दाखवताच आलेलं नाही. लस्टला वय नसतं इतकाच काय तो बोध. संजय कपूरला चांगलं अ‍ॅक्टिंग करता येतं हा आणखी एक.

दुसरी आणि चौथी या दोन्ही गोष्टी आवडल्या. भूमी पेडणेकर भारी! त्या मुलाच्या आईने तिला मिठाई ऑफर केल्यावर ती त्या मनःस्थितीतही त्यातली नखभर चाखून पाहते त्या एका मोमेन्टमध्ये गोष्ट सुफळ संपूर्ण होते

चौथीही मस्त स्टोरीटेलिंग. नेमक्या वेळी 'कभी खुशी...'मधली क्लिप येते ते बघून केजोचं कौतुकच वाटलं.
शेवटच्या प्रसंगात मुलगी ठामपणे 'जे झालं ती मला चूक वाटत नाही' हे सांगते ते आवडलं. ते 'मोठ्या मनाने तिला क्षमा करायला आलेल्या' नवर्‍यासाठीही आवश्यक होतं आणि बहुधा प्रेक्षकांसाठीही.
एकूण प्रयोग आवडला - फ्रेश!

चौथ्या गोष्टीत रिमोटचा प्रसंग थोडा लाउड झाला - शेवटी दिग्दर्शक केजो आहे, चालायचंच. आइस्क्रिमच्या रुपका करता तो भडकपणा माफ...

बॉम्बे टॉकीजमधे मला करणची फिल्मच सगळ्यात जास्त आवडली होती. बाकी तिन्ही ठिकठाकच वाटलेल्या.

लस्ट स्टोरीज अजून पाहिला नाही.

>> चौथ्या गोष्टीत रिमोटचा प्रसंग थोडा लाउड झाला
तो लाऊड करणं कथेची गरज होती ना नाहीतर सगळा मामला सबड्युड च राहिला असता की.

आईस्क्रीम चं रूपक माझ्या नजरेतून सुटलं होतं. पण मग इकडची चर्चा वाचून असं वाटतंय की शेवटचा सीन हवाच होता , आईस्क्रीम हे रूपक म्हणून अन्डर लाईन करण्याकरता. कारण तेव्हाही तीच सांगते ना मला आईसस्क्रीम हवं असं?

समहाऊ ह्या लस्ट स्टोरीज् आवडल्याही नाहीत आणि नावडल्याही नाहीत. त्यातल्या त्यात पहिलीच स्टोरी वियर्ड वाटली. भूमी पेडणेकरचा अभिनय बेस्ट.

बाबा कामदेव धन्यवाद एकदम व्यवस्थित माहिती दिलीत त्याबद्दल.
आणि माझा आयडी म्हणजे माझे नावच आहे दुसरे Happy

असो एकूण हे नेटफ्लिक्स प्रकरण खर्चिक दिसतेय. माझ्या घरात वायफाय आहे पण मोबाईल कंपनीचा असल्याने डेटाच्या बाबतीत अत्यंत गरिब आहे. सो घरातच पहावे लागेल. Sad
एरवी मी विविध चित्रपट पाहणे, वेब सिरिज पाहणे याची शौकिन नाही, पण लस्ट स्टोरिज ची जाहिरात पाहून उगिचच हुक्की आली होती पहायची, पण तेव्हढ्यासाठी हे घ्यावं हे पटत नाहीये. त्यामुळे फक्त इथली चर्चा वाचेन.
घरचा टिव्हिच मुळात फार पाहणं होतं नाही Sad

Dusri ani chauthi aavdli. Tisariche dialogue kalale nahit. Dusrit end la dress cha rupakasarkha vapar vatla. Ki honarya baykola vaparlela navra milnar aani ti te jhakun lagn mhanun miravnar asa bhumi la janavlyavar ti purn mithai khate. Aadhi dukkhat fakt chav baghate. Kinva garibimule kitihi dukkhat aasli tari mithai sodavat nahi.

नेटफ्लिक्स (आणि बर्‍याचश्या) स्ट्रीमिंग सर्विसेस प्रत्येक स्ट्रीमचे वेगवेगळ्या रिझोल्युशन नुसार स्ट्रीम साठवून ठेवतात. आणि युजरकडे किती वेगाचे कनेक्शन आहे त्या प्रमाणे (आणि इतर अनेक प्रकारे) रिअल टाईम मध्ये स्ट्रीम बदलतात. सो तुमचे कनेक्शन कमी वेगाचे असले तरी थोडे कमी क्वालिटीचे स्ट्रीम मिळेल पण मूव्ही बर्‍यपैकी व्यवस्थित चालेल.

Chautit mala open end vatla nakki kay honar te prekshakavar sodalay. To, to ani te asa sukhani sansar karnar.

आत्ताच हे रसग्रहण वाचलं. भरपूर स्पॉइलर्स आहेत

http://www.bigul.co.in/bigul/2613/sec/17/lust%20stories

त्यात लिपस्टिक अंडर बुरखाचा उल्लेख आलाय; पण मलातर लेख वाचून मिर्च आठवला; धमाल होता!!

राजसी, ड्रेस चा मुद्दा पटला. तो प्रसंग का दाखवला हा विचार करत होते पण लक्षात येत नव्हते.

चौथ्यात शेवटचा सिन गरजेचा होता असे मला वाटते.

तिसरीचे संवाद ऐकू आले नाही नीट, त्यामुळे काहीच कळले नाही. पण दोघेही सारखेच वागले, कदाचित म्हणून ते बेस्ट फ्रेंड्स होते बहुतेक. Happy

लिपस्टिक अंडर.... खास वाटला नाही, तो खास आहे याचेच जास्त मार्केटिंग किंवा हाईप झाले हेमावैम.

भूमी पेडणेकर ची स्टोरी एंगेजिंग होती. त्यातली त्या अजय ची आई चा रोल केलेली कोण आहे? तसेच त्याच्या बापाचा रोल केलेला अभिनेता आहे तो ही छोट्या रोल्स मधे अधूनमधून दिसतो. 'भेजा फ्राय' मधे विनय पाठक बस मधे ज्याला बोअर करतो तो तोच बहुधा. मनीषा कोईराला वाली थोडी पाहिली. ती ही इण्टरेस्टिंग वाटते.

>>त्या अजय ची आई चा रोल केलेली कोण आहे?>> फा, त्याची आई ‘हम लोग‘ मधली छुटकी होती. लवलीन मिश्रा म्हणून सर्च कर.

हायला! ती छूटकी!!!!
भुमी पेडणेकरने न बोलता फार छान अभिनय केला आहे...तिला संपूर्ण चित्रपटात जेमतेम 4-5 शब्द आहेत बोलायला.

यस सायो थॅन्क्स.

मनीषा कोईराला ची कथाही चांगली होती. सीन्स मधले टेन्शन जाणवते सतत. संजय कपूर बर्‍याच दिवसांनी दिसला. त्यानेही चांगले काम केले आहे. भेजा फ्राय ची सिरीयस व्हर्जन वाटते ती कथा :). शेवटचा "लूज एन्ड" एकदम इन्टरेस्टिंग.

वरती अनेकांनी लिहील्याप्रमाणे मलाही करण जोहरची कथा सर्वात आवडली. अत्यंत रिफ्रेशिंग आहे. कियारा अडवाणी दिसतेही छान आणि तिने कामही मस्त केले आहे. मला तो शेवटचा सीन परफेक्ट वाटला. स्वातीने लिहील्याप्रमाणे अगदी मोठ्या मनाने माफ वगैरे करायच्या आधीच तिचे पुढे बोलणे परफेक्ट, आणि मग तिने स्वतः आइसक्रीम खायच्या आधी तिला रोखून त्याने ते देणे, हे ही तितकेच परफेक्ट.

तो विकी कौशल म्हणजे मसान मधला हीरोच का? इथे फारच घळ्या वाटतो तो. पण सर्वात लेट डाउन आहे परश्या. त्याचा रोलही बोअर आहे आणि त्याचे कामही. कोठे सैराट मधला परश्या आणि कोठे हा.

पहिली जरा स्लो असली तरी राधिका मस्त दिसते . कामपण छान केलयं.
दुसरी मध्ये जेव्हा भुमीची मैत्रिण तिला ड्रेस दाखवू पर्यंत ती सॅड दाखविली आहे, पण जेव्हा तिला लक्षात येत कि मैत्रिण वापरलेला ड्रेस मिळवून इतकी खुश आहे, आपण तर कुणाचा तरी होणारा नवरा वापरून दिलाय. जेव्हा ती जाणीव होते तेव्हा आपण एकदम सुपीरियर,पॉवरफुल असल्याचे भाव भुमी च्या चेहर्‍यावर उमटतात. मस्त अभिनय केलाय तिने तिथे.
त्यावरुन खुप पुर्वी पाहिलेली एक टिव्ही वरची गोष्ट आठवली. दोन चुलत बहिणी असतात. गरीब बहिणीला , श्रीमंत बहिणीचे सगळे वापरलेले कपडे, चप्पल वापरावे लागत असतात आणि तिची सतत बोलणी ऐकून घ्यावी लागत असतात. शेवटी ती गरीब बहीन त्याचा बदला घेते. श्रीमंत बहिणीला सांगते, लग्न करुन ज्याच्याबरोबर चालली आहेस त्याला मी ऑलरेडी वापरलयं.

>> दोन चुलत बहिणी असतात. गरीब बहिणीला , श्रीमंत बहिणीचे सगळे वापरलेले कपडे, चप्पल वापरावे लागत असतात आणि तिची सतत बोलणी ऐकून घ्यावी लागत असतात. शेवटी ती गरीब बहीन त्याचा बदला घेते. श्रीमंत बहिणीला सांगते, लग्न करुन ज्याच्याबरोबर चालली आहेस त्याला मी ऑलरेडी वापरलयं.
मला तर आईना पिक्चर आठवतो. फरक एव्हढाच की त्यात जुही चावला (म्हणजे गरीब बिच्चारी बहीण) कधीच बदले की आग में दाखवलेली नाही.

त्यावरुन खुप पुर्वी पाहिलेली एक टिव्ही वरची गोष्ट आठवली. >>> "उतरन" नावाची गोष्ट होती मला वाटते ती. कशात दाखवली होती ते आठवत नाही. आत्ता आता त्यावर एक सिरियल आली होती असे ऐकले पण ती भरपूर भरकटली असेही कळले.

माहित नाही सिरिअल च नाव. एवढ आठवतय कि एकाच एपिसोडची गोष्ट होती आणि राजस्थानी सेट अप होता. लग्नाच्या रात्री (म्हणजे लग्न लागण्यापुर्वी कारण मारवाड्यांच्यात लग्न मध्यरात्री लागतात) ती बहिणीला सांगते कि इतके दिवस मी तुझी प्रत्येक वापरलेली गोष्ट वापरली. आता यावेळेस मी वापरलेला तुझा नवरा तुला वापरायला घे.
बघते गुगल करून काही सापडतय का.
नाही नाही आईना थीम खुप वेगळी होईल. त्यातल लॉजिक खुप वेगळ होईल.

सध्या ही सिरीज बघतेय, म्हणून या धाग्यावर आले. तीन गोष्टी पाहून झाल्यात, चौथी राहिली आहे.
पहिली बोअर झाली. अर्धवट सोडून दिली.
दुसरी आवडली.
तिसरा प्लॉटही आवडला. पण डायलॉग फार तोंडातल्या तोंडात होते. संजय कपूर, जयदीप अहलावत दोघंही आवडले. मनीषा कोईराला नाही आवडली.

ती 'उतरन' कथा दूरदर्शनवर 'कथासागर'मध्ये दाखवली होती.

Pages