लस्ट स्टोरीज

Submitted by कटप्पा on 19 June, 2018 - 18:22

नेटफ्लिक्स वर लस्ट स्टोरीज आला आहे. बॉम्बे टॉकीज प्रमाणेच 4 दिग्दर्शकांनी चार कथा सादर केल्या आहेत.
1. अनुराग कश्यप - राधिका आपटे आणि आकाश ठोसर.
2. झोया अख्तर - भूमी पेडणेकर
3. दिबाकर बॅनर्जी - मनीषा कोईराला, संजय कपूर
4.करण जोहर - कियारा अडवाणी,विकी कौशल आणि नेहा धुपिया.

यापैकी चौथ्या स्टोरी ची क्लिप व्हायरल झालेलीच आहे.

या कथा आणि त्यांच्या एंडिंग बद्धल चर्चा करायला हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीपापा वरचा रिप्लाय पेस्ट

परशा ठीक वाटला... अभिनयाला त्याला फार वावच न्हवता पण त्या रोल मध्ये फिट वाटला. जिभेचं गावठी वळणही खटकलं नाही, गावाकडून मुंबईत रहाणारा मुलगा असावा असं वाटलं. आधी आधी मजा येतेय असं वाटू लागलं पण बुवा म्हणतायत तशी गाडी पुढे सरकेना आणि जामच प्रेडिक्टेबल होत कंटाळा आला.
भूमी पेडणेकरचा आवडला. टिपिकल व्हायला चिक्कार वाव असुनही तसं काहीही केलं नाही. हाच सगळ्यात जास्त आवडला.
मनिशा कोईरालाचा पण ठीक होता. कॅन्सर सर्वायव्हल मुळे सॉफ्ट कॉर्नर झाला असेल कदाचित, पण अभिनय खोटा वाटला नाही.
विकी कौशलचा चांगला वाटत होता, त्या व्हायब्रेटर सीन मध्ये जाम हसू आलं पण शेवट एकदम घिसापिटा झाला. परंपरा इ. च्या एकदम विरुद्ध, पण तरी तेच होणार हे ठाम माहिती असल्या सारखा.
एकूण आवडला पिक्चर.
हा मुव्ही थेटर मध्ये रिलीज केला असता तर जो काही टिपिकल भारतीय गोंधळ घातला गेला असता तो नेटफ्लिक्स कृपेने टाळला हे फार बरं केलं.
असेच डायरेक्ट नेटफ्लिक्स वर रिलीज करा म्हणावं मूव्ही.
व्यावसायिक गणितं आणि मूर्ख जनता आणि त्यांची व्होट बँक पोळी भाजणार्‍यांना डिटोर करायची हे बेस्ट आयडिया आहे. पैसे कमवायला करा घिसेपिटे चित्रपट, चांगलं असं रिलिज करा.

भूमी पेडणेकर वाली सोडून बाकीच्या चांगल्या आहेत.भूमी वाली महाफलतु वाटली. मधेच संपवल्यासारखी.

आकाश ठोसर अजिबात आवडला नाही, "भावे " आडनाव घेऊन इतके अशुद्ध मराठी बोलणे खटकले.हिंदी अशुद्ध होई ते गावठी मुलगा वगैरे म्हणून खपून जाते.
राधिका आपटे ची मधली बडबड मनोरंजक

भूमी पेडणेकर ची गोष्ट सगळ्यात आवडली, कमीत कमी संवादात पूर्ण कथानक उभे केले आहे.शेवटच्या प्रसंगात तिला रियलाईझ होते ते पण छान घेतले आहे ,

मनीषा कोईराला बघायची आहे अजून

विकी कौशल च्या कथेत 1 महिन्या नंतर चा प्रसंग उगाच वाटतो, म्हणजे कथेचे तात्पर्य मुद्दाम वेगळे सांगायला ठेवल्यासारखा. आधीच्याच प्रसंगात ती आपला स्टॅन्ड क्लीअर करते आणि गोष्ट संपते असे दाखवले असते तर मला आवडले असते.

विकी आधी एकटाच आईस्क्रीम खात असतो.. 1 महिन्यानंतर दाखवलंय की आधी तिला आईस्क्रीम चारतो मग स्वतः खातो.
हे नोटीस केले का?

पहिली ठीकठाक. नावीन्य हेच की स्वतःला बुद्धिवंत, उच्चभ्रू वगैरे वगैरे समजणारे स्वतःवर वेळ आली की चारचौघासारखेच वागतात, वर त्याचे समर्थन करतात. आकाश ठोसर आवडला, फारसा वाव नाही पण मिसफीट वाटला नाही. भाषा सुधारायला हवीच. त्याशिवाय त्याला पर्याय नाही.

दुसरी अभिनयासाठी आवडली. बाकी शेवट काय होणार हे माहीत होते. भावना गुंतलेल्या असतानाही ती निग्रहाने ते मागे टाकून स्वतःला संभाळते हे खूप आवडले.

तिसरी फारशी कळली नाही. पण दुसऱ्यात स्वतःचे सुख शोधणाऱ्या कथेतल्या स्त्रीला दुसरा भेटतो तो तिच्या आधीच्या नाण्याचीच दुसरी बाजू असा असावा याचे वाईट वाटले.

चौथी खूप आवडली. करण जोहरने ती करावी याचे आश्चर्य वाटले. सुरवातीला कथा वेगळ्याच वाटेने जाते असे वाटले होते पण नंतर सुखद धक्का बसला. स्त्रीचीही गरज हा विषय खूप चांगल्या तर्हेने, अजिबात लाऊड न होता मांडला.

शेवटीं तो तिला आईस्क्रिम भरवतो. चित्रपटात सुरवातीपासून आईस्क्रिम खूपच सुचकतेने वापरलेय Happy :).

हा मुव्ही थेटर मध्ये रिलीज केला असता तर जो काही टिपिकल भारतीय गोंधळ घातला गेला असता तो नेटफ्लिक्स कृपेने टाळला हे फार बरं केलं.>>>>>

इथे भारतात राहून तरी मला असे अजिबात वाटले नाही. विरेदी वेडिंग मध्येही स्त्रीची गरज हा विषय थोडाफार मांडलाय, त्याची या चित्रपटांशी झालेली तुलना काही रिव्ह्यू मध्ये वाचलीय. तो चित्रपट चांगला चाललाय.

बाकी चित्रपटांवर गोंधळ घालणारे खरेच विचार पटला नाही म्हणून गोंधळ घालतात की त्यांचा खिसा कुणी जड करून चित्रपटाची हवा करतात हा प्रश्न आहेच.

विकी कौशल च्या कथेत 1 महिन्या नंतर चा प्रसंग उगाच वाटतो, म्हणजे कथेचे तात्पर्य मुद्दाम वेगळे सांगायला ठेवल्यासारखा. >> हेच म्हणायचं होतं. कथा समजाउन सांगितल्यासारखी झाली. ते टाळायला हवं होतं.

ह्म्म.. ओके साधना.

हे नेटफ्लिक्स काय प्रकरण आहे? Uhoh मला सुविधा हवी असेल तर काय करावे लागेल?
कृपया सविस्तर माहिती द्यावी ही विनंती.

1 महिन्यानंतरच्या सीनमध्ये प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलेय पण नवऱ्याला मांडवळी करायचीय हे कळते.. इतरांसारखे त्याला तिचीच चूक आहे असे वाटतेय पण ती हवीयसुद्धा, त्यासाठी तिला आईस्क्रिम भरवावे लागत असेल तर त्याची तयारी त्याने दाखवली.

नाही,
ते आईस्क्रिम हे लैंगिक सुख/ एक्सपेरिमेन्टेशन चे प्रतीक वाटले मला,
आधी ती आई ला म्हणते ,मी ऑल गर्ल्स शाळेत शिकले, मला कुठे मुलांबरोबर आईस्क्रिम खायला संधी मिळाली. मी कसे सांगू कुठला मुलगा चांगला आहे
असेच काहीसे त्या मुलीची तक्रार करणारी आई म्हणते, मुलगी आईस्क्रीम खात फिरते आहे,
नवरा स्वतः आईस्क्रिम खात असतो, प्रत्यक्षात तिच्या सुखाचा विचार न करता .
तो इनसिडेन्स घडून गेल्यावर आणि तिने तिच्या अपेक्षा स्पष्ट सांगितल्यावर ते दोघे मिळून आईस्क्रिम खातात.

पण तरी, शेवटचा प्रसंग नसता तर कथा जास्त टोकदार झाली असती असे मला वाटते.

दक्षे भारतात महिन्याला $7.99 भरून याची वर्गणी घ्यायची. अँप डाउन लोड करायचे. म्हणजे डिश किंवा टाटा स्काय सारखे हे तुला शोज, मुविज, सिरियल्स व व भरपूर काही दाखवते. टाटा स्काय जसे एकाच टीव्हीवर वापरता येते तसे इथेही एका वेळी किती लोक अँपवर नेटफलिक्स बघणार यावर बंधन आहे.

आईस्क्रिम हे लैंगिक सुख/ एक्सपेरिमेन्टेशन चे प्रतीक वाटले मला,>>>>

हो, ते तसेच आहे. शेवटी तो आता पुढे काय म्हणतो, तिला उत्तर सुचत नाही कारण मी चुकले नाही यावर ती ठाम असते.
काहीच न सुचल्यामुळे ती म्हणते की मला आईस्क्रिम खायचे, तेव्हा तो तिच्या हातातून चमचा घेऊन स्वतःच तिला भरवायला पुढे सरसावतो. त्या प्रसंगात घरात घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलेय हे संवादातून सांगितले. तो प्रसंग घडून गेल्यावर 1 महिन्यांनी हे भेटतात.

राधिका आपटे महा बोअर झाली. किती बडबडते आकाश ठोसर तेजस भावे दिसत नाही. आजी बरोबर घेतली आहे.
मुळात खूप चुकीचे दाखवले आहे. २० २१ वर्शाची मुले मुली असे टीचरने स्टॉकिंग केले, सेक्सची मागणी केली तर डिरेक्ट कंप्लेंट करतील. असले भिकार बिहेविअर चालवून घेणार नाहीत. अनलेस क्विड प्रो ... त्या नताशाला ती जसे बोलते ना तसे बोलले तर प्रत्य क्षात कमीटी बसवून तिला हाकलू न देतील. राधिकाची एक त्रास दायक स्टीरीओ टाइप बाई झाली आहे.

बाकी तीन नाही बघितल्या अजून. भुमी वाली चालू होती पण बाई येते जाते येते जाते ह्यापलीकडे बोअर झाले.
पहिले दृश्य उगीचच घेतले आहे.

अमा ,
भूमी वाली खूप स्लो आहे, पण पेशन्स ठेऊन पहा,
खूप कमी संवाद वापरून खुप काही सांगीतले आहे
दुसरी मला सगळ्यात आवडली

,दक्षिणा बालिके. पहिल्यान्दा अध्यात्मिक आय डी घेतल्याबद्दल तुझे कौतुक. नेट्फ्लिक्स हे यु टुब सारखे पण पेड चॅनेल हे. ते ईन्टर्नेट बेस्ड आहे. त्यात त्यांचा कन्टेन्ट लोड केलेला असतो. हिन्दि , अमेरिकन, ब्रिटीश वगैरे सिरिजेस. जुने नवे चित्रपट. त्याचे अ‍ॅप असावे लागते. अ‍ॅपवरून नेटच्या साह्याने ह्या सर्व गोष्टी पहता येतात . त्यासाठी त्यांची मासिक वर्गणी भरावी लागते.व रिन्यूही करावी लागते. शिवाय नेट पॅकचा खर्च. हे स्मार्ट टीव्हीवर वाय्फाय च्या माध्यमातून घेउन पहाता येते. मी स्वतः इन्टर्नेट्चे हॅथ्वे चे ब्रॉडब्याण्ड कनेक्शनच्या साह्याने व अमेझॉन फायर स्टिकच्या साह्याने वायर्लेसली टीव्हीवर बघतो. नवीन स्मार्ट टीव्ही डायरेक्ट इन्तेर्नेट कनेकशन घेतात. त्याद्वारेही नेट्फ्लिक्सच्या अ‍ॅपवरून लॉग इन करून बघता येते. मोबाइलवर चित्रपट पहणार्‍यांचे कुठेही आणि कधीही पाय धरण्याची या बाबाची तयारी आहे. चाण्गले चित्रपट असतात. मी नुकताच जुना शम्मी कपूरचा सिंगापूर (१९५९) पाहिला. अमेझॉन फायर स्टिक हे कमालीचे गॅजेट आहे. त्यावर यू टुब सह हॉट स्टार , व्हिमिओ, गाना , असे असंख्य अ‍ॅपस आहेत त्यातले काही पेड आहेत काही फ्री. आम्ही तर रेग्युलर टीव्ही तर जवळ जवळ पहातच नाही. मात्र डेटा प्लान सॉलीड हवा. मी मोबाइलवरून वोडाफोनचा प्लान टॅथरिन्ग करतो . माझ्या घरात २५-३० एम्बीपीएसचा स्पीड मिळतो. जिओ आणि वोडा;ला. मज्जानी लाइफ ना?

मी रिटायर कधी होणार इकडे डोळे लावून।बसलेय.. मग अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, यु ट्यूब.. जे मिळेल ते. साध्य पैसे भरतेय पण बघायला वेळ नाही असे आहे.

मनिषा कोईराला ची कशी आहे स्टोरी... तिच एक बघायची राहिलीये.
नेहा धुपियाचा कोणि उल्लेख केला नाही Wink

14lust-stories38.jpg

चौथी खूप आवडली. करण जोहरने ती करावी याचे आश्चर्य वाटले. सुरवातीला कथा वेगळ्याच वाटेने जाते असे वाटले होते पण नंतर सुखद धक्का बसला. स्त्रीचीही गरज हा विषय खूप चांगल्या तर्हेने, अजिबात लाऊड न होता मांडला.>>>>>>>> सहमत

कियारा अडवाणी सॉल्लिड सुन्दर दिसलेय साडीत !

मनिष कोइराला ची कथा चांगली आहे. मला आव डली. म्हणजे एक शॉर्ट फिल्म ह्या अर्थाने. कोणतेच कॅरेक्टर फारसे आवड ण्या सारखे नाही. पण माण से अशीच असतात. गौरी देशपांडे ह्यांचे स्वतःशी इमानदारी ठेवायची दर दुसृयांशी बेइमानी करावी लागते कधी कधी हे वाक्य व एकत्र राह ण्यातला व्हायलंस हे दोन आठवले. कामे सर्वांची चांगली आहेत. तिच्या बॉयफ्रेंडच्या चेहर्‍यावर फार एक्स्प्रेशन्स नाहीत. ती तिथेच असते व नवृयाचा मित्राला फोन येतो. मी मेलो तरी ही फोन उचलणार नाही. तो सीन अगदी अंगावर आला. खरंच असे होउ शकते.

तिचे अ‍ॅक्टिंग तिच्या लेव्हलचे आहे. हा रोल कोणी ही जसे शेफाली ( दिल धड कने दो मधली आई) किरण खेर,
माधुरी दीक्षित, श्रीदेवी, रेखा करू शकल्या च असत्या एव्हरी वुमन चा रोल आहे. तो नवरा आय अ‍ॅम अला उईंग यू म्हणतो तिथेच रिलेशन शिप संपली आहे. आता फक्त स्वार्थासाठी एकत्र राहणे आहे. हे तिच्या चेह र्‍यावर दिसते

तिचे प्रश्न, भावना गरजा ह्यांचे खरे तर दोघांनाही काही देणे घेणे नाही. नवृयासाठी ती ट्रॉफी आहे तर बॉफ्रे साठी टाइम पास व खरी नोक झोक ह्या दोघांच्या इगो मधली आहे. म्हणून फिल्म खर्‍या अर्थाने सेक्सिस्टच आहे.
ते बीच हाउस चांगले आहे.

चौथी खूप आवडली. करण जोहरने ती करावी याचे आश्चर्य वाटले
>>> जोहर टॅलेंटेड माणूस आहे. कुछ कुछ होता है मध्ये त्याचे डायरेक्शन लाजवाब होते.

भुमी पेडणेकरची सर्वात जास्त आवडली.
मनिशा आवडते म्हणून ती पाहिली.
जोहर साहेबांनी शेवटचा प्रसंग आणला नसता तर ठिक ठिक.
अनुराग कश्यप फारच सपक

हा दिवस येईल असे वाटले नव्हते जेव्हा जोहरची फिल्म बरी आणी कश्यपांची डावी म्हणावे लागेल

Pages