macOS आणि iOS-5 (AirDrop)

Submitted by हरिहर. on 19 June, 2018 - 02:46

Android आणि ईतर OS वर फाईल शेअरींगसाठी अनेक पर्याय ऊपलब्ध आहेत. शेअरइट सारखी ॲप्सही आहेत. पण त्यांना अनेक मर्यादा येतात. पण macOS आणि iOS मध्ये फाईल शेअरींगसाठी AirDrop ही सुविधा आहे. ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या फाईल सहजतेने Apple Devices मध्ये शेअर करु शकता. तर या लेखात AirDrop कसे वापरायचे ते पाहूयात.

1. प्रथम Mac वर Finder window मधुन "AirDrop" वर क्लिक करा. (या ⇧+⌘+R हा किबोर्ड शॉर्टकट वापरता येईल.)

2. AirDrop ची Window ओपन झाल्यावर ‘Allow me to be discovered by:’ चेक करा. येथे “Everyone” किंवा “Contacts Only” निवडा.
pic 1
airdrop.jpg

3. आता iPhone किंवा iPad वर जा. मी येथे iPad वापरला आहे.

4. तुम्हाला जी फाईल शेअर करायची आहे ती ओपन करा. मी येथे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो आहे.

5. फोटो ओपन केल्यावर वरती डाव्या बाजुला शेअर बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
pic 2
AirDrop1.jpg

6. अनेक Share Option दिसतील. आता जरा वेळ वाट पहा.

7. तुमच्या जवळपास AirDrop enabled असनारी डिव्हायसेसची लिस्ट तुम्हाला दिसेल. (येथे फक्त माझा MacBook enable आहे.)
pic 3
airdrop2.jpg

त्यातल्या कोणाबरोबर फाईल शेअर करायची आहे त्याच्या आयकॉनवर क्किक करा.तुमची फाईल शेअर झालेली असेल.

8. शेअर केलेल्या फाईल्स मॅकवर Download Folder मध्ये सेव्ह झाल्या असतील. जर तुम्ही iPhone किंवा iPad वर शेअर केल्या असतील तर Photos आणि Videos कॅमेरा रोल मध्ये सेव्ह झालेले असेल.

9. हिच पद्धत Mac वर अशाच पद्धतीने वापरा. Mac वर AirDrop window खालील प्रमाणे दिसेल. (येथे माझा iPad enable आहे.)
pic 4
AirDrop3.jpg
तुमची फाईल रिसीव्ह झाल्याचे नोटिफीकेशन तुम्हाला डेस्कटॉपवर ऊजव्या बाजुला दिसेल.
pic 5
airdrop4.jpg

AirDrop वापरण्यासाठी तुमच्या सगळ्या डिव्हायसेसचे Bluetooth ऑन असायला हवेत.

पुढच्या लेखात AirDrop डॉकवर कसे place करायचे ते पाहू.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाली, तुमचे macOS बद्दलचे धागे माझ्या काहीही कामाचे नाहीत, पण तुमचा चाहता असल्याने हे सगळे धागे मला सगळ्यात वरती दिसत रहातात. मी तुमच्या कथांसाठी तुमचा चाहता झालेलो. दुर्दैवाने macOS बद्दल च्या धाग्यांमुळे तुमचा चाहता होणे थांबवत आहे.

एयरड्रॉप वाय-फाय कनेक्शन वरहि करता येते. अशा बर्‍याच लहान-सहान गोष्टी आहेत मॅकोएस आणि आयोएस मधे ज्या लाइफसेवर पासुन नाइस-टु-हॅव कॅटगोरीत बसतात. पटकन उदाहरणंच द्यायचं झालं तर - १. गाडि चालवताना आय्फोन्+अ‍ॅपलवॉच आपोआप डु-नॉट-डिस्टर्ब मोडमध्ये जाणे. २. आय्फोन अन्लॉक केला कि अ‍ॅपलवॉच आपोआप अन्लॉक होणे आणि मनगटावर अ‍ॅपलवॉच असेल तर मॅक्बुक आपोआप अन्लॉक होणे. ३. किचेन पास्वर्ड्स आणि इतर डिवाय्सेस अंतर्गत होणारा सीमलेस हँडऑफ; अशा खूप गोष्टी आहेत...

अ‍ॅपल इकोसिस्टम वर काय बोलणार, एक अख्या लेखा एव्हढा व्यापक विषय आहे तो...

@राज, हो. अनेक सुंदर फिचर्स आहेत ॲप्पलचे. एक एक देतो आहे येथे.

@व्यत्यय, हरकत नाही. पण जेंव्हा जेंव्हा कथा पोस्ट करेन तेंव्हा प्रतिसाद द्यायला विसर नका. धन्यवाद!