सावधगिरीचे इशारे जातातच कुठे…?

Submitted by Charudutt Ramti... on 13 June, 2018 - 09:41

“ सावधगिरीचे इशारे जातातच कुठे…? ”

देऊन वेदना गेलीस तू कुठे,
संवेदनेचा मागमोस ही उरला नाही,
मज सोसायाचे आहे आता तुला, पण…
आताशा तू आसपास असतेसच कुठे ?

आकाशीचे रंग गडद होत जातात माझ्या,
आठवणींच्या विश्वात एकटाच असतो हल्ली
सोबतिस असते मौन तुझे, पण…
विषय बोलण्याचे फारसे उरलेतच कुठे ?

आठवून अपराध कधी काळीचे,
वाहतो अथांग तलाव भावनेचा अताशा,
समजून तुला घ्यायची माझी तयारी होती, पण…
तशी, तुझी मानसिकता होतीच कुठे ?

भासले अद्रुश्य अतर्क्य काही,
त्या प्रतिमेच्या मागे धावलो मी
मान्य आहे ती वेळच घातकी होती, पण…
नेमके अशा वेळी तुझ्या, सावधगिरीचे इशारे जातात कुठे?

चारूदत्त रामतीर्थकर
१३ जुन १८ , पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह ! मुक्तछंदातील गझल !!!
शीर्षक सुद्धा अलिकडच्या गझलांना साजेसे आहे.
या आधी "पालिकेने खणलेल्या रस्त्याने येऊ नकोस " हे शीर्षक बेदम आवडले होते.
रूप तुझे हेमाडपंथी बांधकाम ही एक गझल आवडली होती. कुणाची ते आठवत नाही.
अभिनंदन

ही गझल नाही
कृपया अभ्यास वाढवा