काकांना पडलेले दुःखद स्वप्न

Submitted by नितीनचंद्र on 9 June, 2018 - 22:17

पहाटेचे नऊ वाजले आणि काकांना घाम फुटून जाग आली. सत्ता गेल्यापासून झोपेचा जनता पक्ष झालेला आहे. काका मनाशीच म्हणाले. "आता मिक्सरवर बारीक करायचा राहीलाय. " पण आपल्याला येवढा घाम का फुटला ?

काकांना आठवले , काल रात्री चिंतनाचा विषय होता नेहमी प्रमाणे मी पंतप्रधान झालो पाहीजे. कारण राजकुमार आणि राजमाता यांच्या पंतप्रधान होण्यावर दक्षिण स्वामींनी प्रश्न चिन्ह उभ केलय. अश्यावेळी अनेक पक्षांचे कडबोळे करून बहुमत नसताना पंतप्रधान होण्याची क्षमता फक्त आपल्या मधे आहे.

जे काम करताना आपल्याला पक्ष गमवावा लागला , राजमातेने आली हकालपट्टी केली ते काम दक्षिण स्वामी यांनी लिलया केले.

राजकारणात या स्वामींना दक्षिण दिशेचा स्वामी अर्थात राजकीय मृत्यू घडविणारा म्हणतात तो काय उगाच ?

हा स्वामी आता राजपुत्राच्या मागे लागलाय . तो भारतीय नागरीकच नाही असा दावा स्वामी करतोय. त्याने इटालियन पासपोर्ट शोधण्यासाठी हेर नेमलेत.

स्वामींच हेच चुकत. जरा जास्त बोलतात. सगळ पाणी पडल ना. आता राजकुमार सावध होणार आणि त्याला ऐन वेळेला झटका देता येणार नाही. जसा राजमातेने आपल्याला दिला.

पण आपल्याला घाम का फुटला ? मग आठवले की आपल्याला राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूक वेळेला सर्वात कमी मते मिळाली. आयुष्यात आपण राजकारणात ती एकमेव निवडणूक हरलो.

हे दुःखद स्वप्न आताच का पडावे ? ऐन मोक्याच्या वेळी हे असे का व्हावे ?

दादा आणि सर मरताना सल्ला देते झाले तो खरा आहे. सर म्हणाले होते की बेरजेचे राजकारण करा. कुणाचे पाय कापू नका. पण आता काय करणार ? महाराष्ट्रात आपण अनेकांचे पाय कापले. ही भुते जेंव्हा जिवंत होती तेंव्हा त्यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत मला पाडले.

आता ही भूते फेर धरून नाचतात. मला आजारपणातून उठवणारे लिमये गुरूजी सुध्दा हतबल आहेत.

काकांनी शांतपणे घाम पुसला . कॕलेंडर पाहीले. आज पुण्यात शक्ती प्रदर्शन आहे. त्यात काय बोलायचे यावर विचार करायला हवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

{{{ पहाटेचे नऊ वाजले आणि काकांना घाम फुटून जाग आली. }}}

हे काका खरोखरच पहाटे (म्हणजे भाप्रवे नुसार ०५:०० वा त्या आधी च ) जागे होतात अशी खात्रीलायक माहिती आहे.

>>हे काका खरोखरच पहाटे <<
शक्य आहे, मागे एका पुतण्याला सकाळी गजर लावुन उठण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आठवतोय... Happy

बाकि, या काकांचा राघोबादादा (सत्ताप्राप्ती या अर्थी) होउ नये असं वाटतं. राघोबादादांसारखेच हे सुद्धा पराक्रमी, महत्वाकांक्षी आणि नेतृत्वा साठी अगदि लायक उमेदवार आहेत; पण ऐनवेळेला दगाफटका होत आहे...

पाहा स्वतः पुतण्यानेच प्रतिसाद दिलाय तेव्हा खरंच आहे. उगाच नाही त्यांना घड्याळकाका म्हणत..

<< राघोबादादांसारखेच हे सुद्धा पराक्रमी, महत्वाकांक्षी आणि नेतृत्वा साठी अगदि लायक उमेदवार आहेत; पण ऐनवेळेला दगाफटका होत आहे... >>
--------- राघोबादादान्सारखे...

गंमत मैतीय का? काकांच्या जन्मपत्रिकेत ( कुंडली - Birthchart) ६ व्या स्थानी मेष राशीत ( शत्रु व रोग स्थान हो )गुरु + चंद्र युती आहे. सहाव्या स्थानी असणारा गुरु पडद्यामागचे राजकारण दाखवतो. म्हणूनच काका मध्ये मध्ये असला चावटपणा करत असतात हो. असं दुसर्‍याला खड्ड्यात त्यांनी वारंवार पाडल्याने त्यांच्यामागे ( पाठिशी ) कुणी उभे रहात नाही.