Keyboard Shortcut

Submitted by हरिहर. on 18 May, 2018 - 04:54

Mac वर भाषा बदलण्यासाठी कोणता Keyboard Shortcut वापरावा? control+\ चालत नाही. ⌘+\ आणि option+\ वापरुन पाहीला. पण
ऊपयोग नाही. प्रतिसाद देण्यासाठी पुर्ण पेज scroll करुन भाषा बदलावी लागते, जे खुपच कटकटीचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>प्रतिसाद देण्यासाठी पुर्ण

>प्रतिसाद देण्यासाठी पुर्ण पेज scroll करुन भाषा बदलावी लागते
ज्या खिडकीत लिहता, त्या वर जी बटने आहेत (बोल्ड, ईटालीक ) इत्यादी त्यातच एक म / E असे बटन आहे. त्यानेही भाषा बदलता येते.

भाषा प्रेफरंसच्या ड्रॉपडाउन मधे "मराठी" सिलेक्ट करुन ठेवलंत तर ते सेटिंग कायम रहातं; दर वेळेला/प्रतिसादाला बदलावं लागत नाहि...

मायबोली व्यतिरिक्त सगळीकडे, अ‍ॅक्रॉस द बोर्ड देवनागरी लिपी वापरायची असेल तर सिस्टम प्रेफरंस --> किबोर्ड --> इन्पुट सोर्सेस मध्ये देवनागरी किबोर्ड अ‍ॅड करुन ठेवा. "शो इन्पुट मेनु इन मेनु बार" हा ऑप्शन ऑन ठेवा. आता गरज लागेल तेंव्हा मेनुबार मधुन देवनागरी किबोर्ड सिलेक्ट करुन मराठीत लेखन करु शकाल...

"भाषा प्रेफरंसच्या ड्रॉपडाउन मधे" म्हणजे नक्की कुठे? मी जेंव्हा मायबोलीवर येतो तेंव्हा डिफॉल्ट' भाषा' मराठी असते. मी देवनागरी किबोर्ड ॲड केलेला आहे. पण मला मायबोलीवर लिहायचे असेल तेंव्हा देवनागरी किबोर्ड सिलेक्ट करुन माबोवर ' इंग्रजी सिलेक्ट करावी लागते, तरच लिहिता येते. पण किबोर्ड देवनागरी व माबोवरही मराठी असेल तर खालीलप्रमाणे टायपले जाते---
मम्नजे मलाकााय मम्णायचेअअआहे ते ततुमचलकालकल लकात ययेल.
("म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते तुमच्या लक्षात येईल." असे टाईप केल्यावर वरील लाईन आली.)

पण 'म/E' या बटनमुळे माझी अडचण दुर झाली. मी 'किबोर्ड शॉर्टकट' शोधत होतो त्या मुळे या बटनकडे लक्षच गेले नाही.

>>पण किबोर्ड देवनागरी व माबोवरही मराठी असेल तर खालीलप्रमाणे टायपले जाते---<<

कुठला किबोर्ड वापरता तुम्ही? मी "हिंदी ट्रांस्लिटरेशन (A->अ)" हा किबोर्ड वापरतो, तुम्ही लिहिलेला इशु मला येत नाहि...

मी Devanagari - QWERTY वापरतो. तो जास्त सोपा वाटतो हिंदी ट्रांस्लिटरेशन (A->अ) पेक्षा.