--पाखरे--

Submitted by Nilesh Patil on 19 May, 2018 - 23:14

--स्पर्धेसाठी कविता--

-शिर्षक-->पाखरे-

भिरभिरत उंच आकाशी निघतील पाखरे,
घालतील आकाशा गवसणी करतील स्वप्न पुरे..।
भान ना त्यांस,ना तमाही संकटांची
सोडून जातील त्यांची ती चिमुकली घरे..।

केविलवाणी पिले बघतील त्यांची वाट,
येतील परत मायबाप हीच आशा उरे..।
चित्त पाखरांचे असे आपल्या पिलांपाशी,
कशी राहतील आपल्याशिवाय ही गोजिरी पोरे..।

हळूहळू उघडतील आपले नाजूक पंख,
जातील शोधात आता,मारतील सूर सारे..।
उडता-उडता ते सारे जातील दूरदूर,
त्यांचे कोडकौतुक करतील सुर्य-चंद्र-तारे..।

अशी ही पाखरे,येतील पुन्हा धरणीला,
येऊनी परत पुन्हा,गजबजतील त्यांची घरे..।
येईल त्यांच्या हिम्मतीस आता नवा हुरूप,
आकाशही कौतुकाने उघडेल नवी दारे..।

उंच उडून दमून असे घेतील जरा विसावा,
भिरभिरत उंच आकाशी निघतील पुन्हा पाखरे..।
पुन्हा भरारी घेण्यास मारतील नवा सूर,
घालतील आकाशा गवसणी करतील स्वप्न पुरे..।

-रचना-->निलेश पाटील--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-9503374833--

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users