डिट्टो टिव्ही

Submitted by तनिष्का on 18 May, 2018 - 10:00

डिट्टो टिव्ही हे app कसे वापरायचे आहे.... चांगले आहे का.... टिव्ही पाहत नसल्याने अशा apps कधी वापरले नाहीत....dish tv सारखे monthly package असते कि कसे....याबाबत माहिती हवी आहे......ज्यांच्याकडे आहे त्यानी कृपया सांगा....

Group content visibility: 
Use group defaults

अमेरिकेत असताना वापरले होते, मराठी सिरियलचे महिन्याचे पॅकेज घेतले होते. जुन्या आणि नवीन अश्या सगळ्या मराठी सिरियल दिसत होत्या. महिना संपल्यावर काही दिवस गॅप घेउन परत एकदा महिन्याचे पेकेज घेतले होते. . एकदम चांगला अनुभव. महिन्याला $८ ...

भारतात आणि बाकीच्या देशात काय पॅकेज आहे ते माहित नाही.

भारतात 20 रू. महिना. Happy
Ditto TV ची अॅडच "बीस का TV" अशी आहे.

मी खूप महिने वापरलंय हे अॅप. पण आता एकही सिरियल बघत नसल्याने वापरत नाही.
मध्यंतरी ozee आणि ditto TV मर्ज झाले होते. आणि एकच zee5 अॅप लाँच केलं होतं. तेव्हापासून ditto TV हे अॅप बहुतेक सेपरेटली रन होत नाही. Ditto चे viewer पण zee5 ला जोडले गेले.
आताही ditto TV चालू आहे की कसं ते माहित नाही.

मी एकदा वापरले होते, तेव्हा एक महिन्याचे subscription घेतले होते. (रु. २०/-) मग त्यांची सेवा आवडल्याने थेट ३ महिन्यांचे subscription घेतले (रु. ५०/-) पण हे ३ महिने संपत आले तेव्हा त्यांनी मला फोन करून renew करायचे का विचारले. तेव्हा मी त्यांना खूप सुनावले की, माझा क्रमांक DND (Do Not Disturb) मध्ये नोंदणीकृत आहे, तुम्ही मला फोन करू शकत नाही. शिवाय याआधी मी एकदा स्वतःहून renew केले होते. असे असतांना तुम्ही मला फोन का करत आहात??? आणि मग त्यांनी मला माझ्या DND नोंदणी केलेल्या क्रमांकावर फोन केला म्हणून मी DittoTV वापरणे सोडून दिले.

आता ditto tv बंद झालाय, त्यांनी झी5 app सुरू केलंय नवीन. पण त्याचं subscription ditto पेक्षा बरंच महाग आहे. आम्ही 20 ₹ महिना असं घेतलं होतं ditto चं. त्याच पैशात आम्ही आपोआप zee5 वर migrate झालो. सर्विस चांगली आहे.