असेही ओठ तू ओलाव माझे

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 May, 2018 - 20:27

तुझ्या ओठात यावे नाव माझे
असेही ओठ तू ओलाव माझे

जिथे तू गोंदलेले नाव माझे
तिथे निर्माण केले गाव माझे

विसावा घेतल्याविण ट्रेन जावी
तसे आयुष्य हे भरधाव माझे

नव्याने मी तुझ्यामध्ये गवसले
जगा लागो न लागो ठाव माझे

विखारी घालतो आहेस फुंकर
चिघळतिल तू दिलेले घाव माझे

प्युअर सिक्वेन्स होता आणि जोकर
उधळले मी तरीही डाव माझे

मला विजयाकडे घेऊन गेले
तुम्हाला वाटले पाडाव माझे

तुझी नाही खरोखर पात्रता ती
नको लावूस दुनिये भाव माझे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रथमच ... पण थोडंस स्पष्ट बोलतो..
खूपच सुंदर कविता...
यमकाची जागा योग्य .. भावपूर्ण... उत्तम मांडणी
पण शेवटचे 3 अंतरे .... थोडी मेहनत घ्यावी...