संभाजी : येत आहेत

Submitted by मी - सागर on 7 September, 2017 - 02:50

संभाजी : येत आहेत

झी मराठी वर लवकरच वेळ आजून माहीत नाही पण कुठलीतरी शिरेल बंद होणार असा दिसतंय.

Upcoming Sambhaji Maharaj serial teaser

https://www.youtube.com/watch?v=AjKvkh1Qweo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहाते ही मालिका अधुनमधुन.मला उलट शिवाजीराजे नंतर चा जो काळ दाखवतील, जी ९ वर्ष संघर्षाची दाखवतील, औरंगजेब कोणाला दाखवतील ह्याची जास्त उत्सुकता आहे. अर्थात ह्या शिरेलीचा शेवट मी पाहणार नाही हे मी आताच ठरवल आहे. Sad

हिंदी मधला प्रसिध्द नट अमित बहेल औरंगझेब चे काम करतोय. कोणाला दूरदर्शन वरची शांती सिरीयल आठवते का? त्यात तो होता.

मित, मिर्झा राजेंच्या आठवणी बद्दल धन्यवाद. तो विकी मल्होत्रा चे काम करणारा होता? आता आठवले. पण उलट यात दाढी, मिशां मुळे फार रुबाबदार दिसला. मला जाम आवडले त्याचे काम. तो यात पेहेरवात खूप दिलदार आणी सात्विक वाटला.

जनरली ज्या मालिका चांगल्या आहेत त्यावर जास्त कमेंट येत नाही. >>>> सहमत.

महाराज गेल्यावर तर अजीबात बघवणार नाही, त्यामुळे बघणेच सोडलेय. Sad
Submitted by रश्मी.. on 18 April, 2018 - 18:18 >>>> रश्मी.ताई, खरय तुमचे म्हणणे . मी शभु राजे आग्र्याहुन सुट्ले इतपतच बघु शकले.

शिवाजीचा रोल ज्याने केलाय.. मस्त केलाय... एकदम बेस्ट >> हो खरच.. आणि या पुर्ण वाटणीच्या नाट्यामधला सोयराबाई चा रोल पण अप्रतिम वाटला मला.

शिवाजी महाराज स्वतः का नाही सांगत संभाजी महाराजांना दक्षीण मोहिमेवर न येण्याबद्दल्?खर कारण सांगित्ल तर संभाजी महाराजांना नक्कीच पटेल/ पटलं असतं. आता उगाच परत समज-गैरसमज यात ४ एपी घालवणार.
आणि संभाजी महराज मोहिमेवर जाऊन शिवाजी महारज स्वतः इथे थांबणे असं ही करता आलं असतं.

झी मराठी कथा कशीही असो ऐतिहासिक, पौराणिक, त्या कथेला आपल्या ठराविक साच्यात घालूनच दाखवतात. उघड उघड न बोलणे, त्यातुन गैरसमज होणे ही त्या साच्याची व्यवच्छेदक लक्षणे आहेत.

हो, मस्त सुरू आहे मालिका
सोयराबाई थोड्या वेडसर दिसतात काही प्रसंगात... त्यांचा मेकअप ही विचित्र आहे..

महाराज आणि युवराज यांच्यात तेव्हा नीटसा संवादच होऊ शकला नाही हे पुस्तक वाचताना तसंच आता मालिका पाहताना ( दोन पात्रांमधे स्पष्ट संवाद होऊ न देऊन गैरसमज होत अनेक एपिसोड्स खाणे ही झी मराठीची ही खासियत असली तरी) जाणवतं.
एकदा नीट भेट झाली असती दोघांची तर सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे स्पष्ट होऊन, युवराजांनी दिलेरखानाला सामील होण्याचा आततायी निर्णय घेतला नसता आणि पुढच्या दुर्दैवी घटना घडल्याच नसत्या कदाचित Sad

एकदा आजारी असल्यामुळे व एक्दा पवसामुमधे साकव वाहुन गेल्यामुळे शिवजी महाराज जाऊ शकले नाहीत शृंगार्पुरी..
पण नंतर जाऊ शकले असते.. संभाजी महराजांना रायगडा वर परत बोलवुन घेता घेता एक्दम शेवट्च्या क्षणी सोयराबाईंच्या बोलण्याने सगळं बद्दल.
त्यांना शिवथर्घळी पाठवण्याआधी महाराजांनी एक्दा प्रत्यक्ष त्यांची भेट घेतली असती तर?

( दोन पात्रांमधे स्पष्ट संवाद होऊ न देऊन गैरसमज होत अनेक एपिसोड्स खाणे ही झी मराठीची ही खासियत असली तरी) >>> झी मराठीला का दोष द्या. हे तर सर्वच channels मध्ये चालत. Proud

संभाजी महाराज काल बहादुरगडावर देविचा गोंधळ घालत असताना बहाद्दुर खान गोंधळात विघ्न आणन्याचा प्रयत्न करतो तेंव्हा गद्दार पांढरे सरदाराची आई (सविता मालपेकर) बहाद्दुर खानाला आडवते. तो त्या म्हातारीला ढकलुन देतो तेव्हा संभाजी महाराज तिला सावरतात. आज बहुतेक बहाद्दुर खानाचं मुंडकं धडावेगळं होणार बहुतेक.
मस्त सिरियल आहे ही.. सर्वच पात्रं अभिनंदनास पात्र आहेत..!!

छान आहे सिरीयल. पण डोके फिरलयं माझे, पहावत नाही ही सिरीयल. ती दोन माकडं ( अनाजी पंत आणी तो मोरोबा) आणी सोयराबाई या तिघांनी मिळुन बाप लेकांचा छ्ळ केला. Angry सोयराबाईला तर त्या लहानग्या राजारामला राजगादीवर बसवण्याची नुसती घाई झालीय. औरंगजेब तर बाहेरचा होता, हे घरभेदी तर म्हणायलाच घरचे होते.

ही सिरीयल एंडला जाईल तेव्हा तर अर्धा तास घरातुन कुठेतरी पळुनच जाईन, कारण घरचे ही सिरीयल बघतात. मला नाही तो अंत बघवणार. Sad

पण हे सोयरबाईना कळालं असतं तर इतिहास काहि वेगळाच घडला असता. तरिही राहुन राहुन वाटतंच कि छ. शंभुराजांचा इतिहास आपल्या पिढीला कळु दिलाच नाहि. केवढा मोठा त्याग केला संभाजी राजांनी परंतु स्वरज्यातील भ्रष्ट लोकांच्या संततींनी राजांची सतत निंदा-नालस्ती केली.. ही सिरियल चालु झाल्यापासुन लहान मुलेदेखिल आवडिने ती पहातात आणि संभाजी राजान्बद्दल असंख्य प्रश्न विचारतात. बहुदा यातच सिरियल काढण्यामागचा हेतु सफल झाला असे वाटते...!!

कालचा भाग अप्रतिम झाला! संवाद तर उत्क्रुष्ट आहेतच, अभिनय ही तोडीस तोड...
तो भवानीबाईंचा प्रसंग सोडल्यास बाकी सर्व किती सुंदर मांडलं होतं

विश्वास पाटलांचं 'संभाजी' हल्लीच पुन्हा एकदा वाचलं असल्याने, बरेचदा मालिकेत येत असलेले प्रसंग पटत नाहीत.
तरीही मालिका आवडते आणि नियमित पणे पाहिली जाते.

हा पूर्ण आठवडा खूप मस्तं होता. मला नाही वाटत की राणूअक्का दिलेरखानाच्या तावडीत सापडल्या असतील. मेण्याबरोबरचे सैनिक न लढता पळून गेले जे पटत नाहिये. त्यांनी जीव दिला असता पण महाराजांच्या कन्येला असा मोगलांच्या तावडीत सहजासहजी सोडला नसता

हा पूर्ण आठवडा खूप मस्तं होता. मला नाही वाटत की राणूअक्का दिलेरखानाच्या तावडीत सापडल्या असतील. मेण्याबरोबरचे सैनिक न लढता पळून गेले जे पटत नाहिये. >> बरोबर..हा कदाचित दिलेरखान ला चकवण्यासाठी चा ट्रॅप असु शकतो....असच असावं ...

Pages