संभाजी : येत आहेत

Submitted by मी - सागर on 7 September, 2017 - 02:50

संभाजी : येत आहेत

झी मराठी वर लवकरच वेळ आजून माहीत नाही पण कुठलीतरी शिरेल बंद होणार असा दिसतंय.

Upcoming Sambhaji Maharaj serial teaser

https://www.youtube.com/watch?v=AjKvkh1Qweo

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्कीच.. लेखक्/निर्माते खोट्या इतिहासकारांकडुन नक्किच लिहुन घेणार नाहित अशी आशा करुया..!!

ईतकी वर्षं दाबुन ठेवलेली हरआमखोर लोकांची हरआमी चव्हाट्यावर येते आहे हे काय कमी आहे का..?

कोणी दाबून ठेवलेली, अनाजी, निराजी आणि खंडो बल्लाळच्या वडीलांना कट कारस्थान केल्याबद्दल संभाजी राजांनी हत्तीच्या पायी दिले हा इतिहास आम्ही शाळेत शिकलो. त्यालाही आता २० वर्षे झाली. या लोकांची गद्दारी सगळ्यांनाच माहीती आहे, आता काहीतरी आपण विलक्षण सत्य सांगतो आहोत जे यापूर्वी लोकांना माहीतीच नव्हते असा कुठला समज आहे मला कळत नाहीये

नाही आषुतोश, माझे वाचन खरच कमी आहे. खुद्द छत्रपती शिवराय यांच्या विरुद्ध इतकी कारस्थाने केली होती हे मी वाचलेच नव्हते. संभाजी महाराजांबद्दल देखील माहीत नव्हते. खा. अमोल कोल्हे यांचे आभार मानायला हवे की या निमीत्ताने तरी महाराज व त्यांची थोरवी, पराक्रम आम्हाला कळला. पण या मालिकेत अनाजीला केंद्र स्थानी ठेऊन, महाराजांचा पराक्रम, कारकिर्द का मागे टाकली जातेय ते कळत नाही.

शासन कर्ता कुठला का असेना, संभाजी महाराजांबद्दल नीट लिहीले गेलेच नाही. महाराज, औरंगजेबाची कन्या झेबुन्निसाच्या प्रेमात पडले असे काही बाही लिहुन लोकांची मने कलुषीत केली गेली.

अहो हे आठवी ते दहावी मधल्या धड्यात येऊन गेले आहे
शहाजीराजे पासून ते छत्रपती शाहू आणि नंतर पेशवे अन शिंदे होळकर आणि मग इंग्रज

तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत नव्हता का? कारण इंग्रजी माध्यमात होते का नव्हते सांगू शकत नाही पण खंडो बल्लाळ ची स्वामीनिष्ठा यावर एक धडाही होता, मराठी विषयात बहुदा

शासन कर्ता कुठला का असेना, संभाजी महाराजांबद्दल नीट लिहीले गेलेच नाही. महाराज, औरंगजेबाची कन्या झेबुन्निसाच्या प्रेमात पडले असे काही बाही लिहुन लोकांची मने कलुषीत केली गेली.>> अगदी अगदी रश्मी.. माझं पण सेम मत आहे..!

मला ही सिरिअल आवडण्यामागे हेच कारण आहे की संभाजी महाराजांबद्दल कितिही घाणेरडे विचार कुजबुज मोहिमेद्वारे पसरवले गेले असले तरी त्यांची प्रतिमा किती वेगळी आणि भव्य आहे हे या मालिकेच्या अनुषंगाने समोर आले.

मालिकेतील सर्वच पात्रे, संवाद वाखाणण्याजोगे आहेत.

संभाजी महाराजांबद्दल नीट लिहिलेच गेले नाही>> अनुमोदन.

संभाजी राज्यांबद्दल लिहिली गेलेली पहिली बखर ही बाळाजी पंत यांच्या वंशातील कोणीतरी लिहिली होती. त्या बखर मध्ये संभाजी महाराजांची बरीच निंदानालस्ती केली गेली आहे.(पुस्तकातील संदर्भ नीटसे आठवत नाहियेत. Sad )
[पुस्तक संदर्भ - संभाजी (विश्वास पाटील)]

ते एक टोक झाले आणि आता जे सुरु आहे ते दुसरे टोक > अगदी ! तेनालीराम, बिरबल इ. सर्व ऐकलेल्या गोष्टी पाहिल्या या मालिकेत. पण येवढा पराक्रमी, शूर योद्धा पण ते कुठेच दाखवल नाही :(.

सॉरी, मी आशिष च्या ऐवजी आशुतोष लिहीले. मी मराठी मध्यमातच होते. शिवाजी महाराज, होळकर, पेशवे, पानीपत वगैरे बरेच होते, पण हे आठवत नव्हते. आता पुस्तके आणुन वाचलीच पाहीजे आणी आपल्या पुढच्या पिढीला पण दिलीच पाहीजे.

संभाजी राज्यांबद्दल लिहिली गेलेली पहिली बखर ही बाळाजी पंत यांच्या वंशातील कोणीतरी लिहिली होती. त्या बखर मध्ये संभाजी महाराजांची बरीच निंदानालस्ती केली गेली आहे

मल्हार रामरावाची बखर, अजून एक खोटारडा म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद

या दोघांनी पहिल्यांदा संभाजीराजांविषयी वावड्या उडवून त्यांना काळ्या रंगात रंगवले. नंतर रियासतकार सरदेसाई आणि जदुनाथ सरकार यांनीही थोड्याफार प्रमाणात संभाजी राजांच्या बेतालपणाबद्दल लिहीले आहे. आणि त्याबद्दल या लोकांची निर्भत्सना करावी तितकी थोडीच आहे

संभाजी राजे ज्यावेळी छत्रपती होते तेव्हा खुद्द मोगल बादशहा अतिप्रचंड सैन्य घेऊन दक्षिणेत उतरला होता. इतके भयंकर संकट स्वराज्यावर चालून आले होते. त्यांना यशस्वीरित्या तोंड देणे, गोव्याच्या पोर्तुगिज आणि जंजीऱ्याच्या सिद्दीला जरब बसवणे ही कामगिरी त्यांची शिवाजी महाराजांचे कार्य पुढे योग्य दिशेला चालल्याची पावती देतात.

इतकेच नव्हे तर औरंगजेबाने विजापूरला वेढा घालून अदिलशाही बुडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा संभाजी राजांनी धरणगावला मराठा सैन्य पाठवून अदिलशाहीला मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तोच प्रकार कुतुबशाहीच्या बाबतीत. आज ही राज्ये बुडली तर नंतर मुघल सैन्य एकवटून स्वराज्यावर घसरेल हे संभाजी राजांनी जाणले होते. आणि त्यांनी जितके शक्य होईल तितके त्यांना मदत केली. हे काम अतिशय दूरदर्शिपणाचे होते आणि त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
राजे नुसतेच शूर नव्हते तर अत्यंत चलाख राजकारणी देखील होते. नवव्या वर्षी ते पाच हजारी मनसबदार होते ते राजकारणाच्या सोयीसाठी पण ते १४ वर्षाचे होते त्यावेळी १० हजारी सैन्य त्यांच्या मुख्त्यारीत होते आणि लष्करी डावपेचात राजे अत्यंत पारंगत होते. गोव्याला वेढा दिला असताना मुअज्जम कोकणात उतरल्याने या दोन सैन्यात आपली सेना भरडली जाईल म्हणून राजांनी चपळाईने माघार घेऊन सैन्य बाहेर काढले आणि छोट्या छोट्या तुकड्यांनी मुघलांवर छापे मारायला सुरुवात केली. या माऱ्यामुळे, आजार, रोगराई, उपासमार आणि थकावट यामुळे मुघलांचे अर्धेअधिक सैन्य नष्ट झाले आणि तो परत कधीही चालून आला नाही

ते तुमचे अनाजी प्रकरण उरकले तर आम्हाला हे प्रत्यक्ष पडद्यावर बघण्यात जास्त रस आहे. पण कट कारस्थान असल्याशिवाय मालिकावाल्यांच्या घशाखाली घास उतरत नाही. इथे तर काय रेडीमेड तयार आहेत तीच आता रंगवून रंगवून माथी मारली जात आहेत.

काल कावेरीबाईंची तगमग अक्षरशः अंगावर आली. समोर नवरा जिवंत असतानाही त्यांनी ज्या निग्रहाने स्वतःचे कुंकु स्वतःच्या हाताने पुसले तो क्षण अक्षरशः स्तब्ध करणारा होता. ज्या कावेरीबाईंनी स्वतःच्या नालायक पतीला साथ न देता स्वराज्याच्या हिताला प्राधान्य दिले तर त्यांच्या लफंग्या-कारस्थानी-घरबुडव्या पती-अनाजीची वकिली कोणी करुच नये.

चालू द्या तुमचं, एकंदरीत सिलेक्टिव्ह वाचणे आणि शिव्या देणे एवढेच करायचं आहे तुम्हाला इथे येऊन

उगाच पोस्ट लिहीत बसलो, पालथा घडा गॅंग आहे आधीच लक्षात यायला हवे होते

अहो आशुचँप, हे तुम्हाला उद्देशुन नव्हतं.. जे फुटपट्ट्या घेऊन मोजमाप करायला येतात त्यांच्यासाठी होतं.

@ आशुचँम्प. बखरी लिहिणार्याचीं नाव लक्षात नव्हती. परत वाचवी म्हणतीये आता पुस्तकं.. Happy

>>कुठल्याही ब्राहमणांस्/पुरोहितांस शास्त्रशुद्ध राज्याभिषेक विधी ठावुक च नव्हता !!<<
>>मग इथल्या कुठल्याही ब्राहमणांस्/पुरोहितांस शास्त्रशुद्ध राज्याभिषेक विधी कसा ठावुक असेल ?<<
प्रयत्न चांगला होता. यालाच कदाचित बुद्धिभेद करणे असं म्हणत असावेत... Wink

त्यावेळेस महाराष्ट्रात एकहि लायक ब्राह्मण न्हवता असं म्हणणे हा पैठण इ. ज्ञानपिठांचा अपमान आहे. शिवाय, या मखलाशीतुन खालील मुद्दे उद्भवतात :
१. गागाभट्ट काशीत रहाणारे होते, जिथे मोगलांचं राज्य असल्याने हिंदू राज्याभिषेक (मांडलिक) असे किती झाले असतील जेणेकरुन तो त्यांचा फोर्टे होता. गागाभट्टांना द्याल तसा बेनिफिट ऑफ डाउट, महाराष्ट्राच्या ब्राह्मणांना का नाहि?
२. राज्याभिषेकाचे सोपस्कार हे असे काय विशेष सोपस्कार आहेत जे केल्यानेच पुढे भविष्यात ते परत करण्याची मुभा मिळते (सॉर्ट ऑफ सर्टिफिकेशन, यु नो Wink ), अन्यथा नाहि. हे म्हणजे असं झालं - विदाउट फायटिंग ए वॉर, यु कॅनॉट बिकम ए जेनरल...
३. ६००-७०० वर्ष गुलामीत काढल्यामुळेच महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा सत्यनारायण इ. फुटकळ पूजा-अर्चा इतपतच मर्यादित ठेवल्या. काशीला जाउन एखाद्या महाशास्त्री/महामहोपाध्याय कडे उमेदवारी/इंटर्नशिप करुन सर्वविद्यासंपन्न होण्याचे कष्ट घेतले नाहि, हा निष्कर्ष निष्पन्न होतो. हा माझ्यामते एक (बेसलेस) गंभीर आरोप आहे.

अरे, महाराजांच्या राज्याभिषेकांला ब्राह्मणांनी विरोध केला, ठिक आहे असतील त्यांच्या काहि अडचणी त्यावेळेला. तर मग आता त्याचं जस्टिफिकेशन कशाला? स्वराज्याचं त्यावेळेला त्यावाचून काहि अडलं नाहि आणि संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला गागाभट्ट आले नाहि, म्हणुनहि काहि अडलं नाहि तर उगाच या गोष्टिंना महत्व का?..

या मालिकेत अनाजी पंतांना त्यांच्या लायकिपेक्षा जास्त फुटेज मिळतंय या मुद्द्याशी सहमत. पण त्यावरुन हि मालिका ब्राह्मणद्वेष पसरवते आहे अशी समजुत करुन घेणं हे रिडिक्युलस्ली फारफेच्ड आहे...

>>प्रयत्न चांगला होता. यालाच कदाचित बुद्धिभेद करणे असं म्हणत असावेत<< अरेच्च्या !! काही ही हा तावडे साहेब Wink
>>त्यावेळेस महाराष्ट्रात एकहि लायक ब्राह्मण न्हवता असं म्हणणे हा पैठण इ. ज्ञानपिठांचा अपमान आहे<< हो का ?? बरं !!! मग ह्याच पैठण इ. ज्ञानपिठांच्या ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांच्या वेळी काय काय दिवे लावले होते हे आपण जाणतच असाल !!
>>१. गागाभट्ट काशीत रहाणारे होते, जिथे मोगलांचं राज्य असल्याने हिंदू राज्याभिषेक (मांडलिक) असे किती झाले असतील जेणेकरुन तो त्यांचा फोर्टे होता. गागाभट्टांना द्याल तसा बेनिफिट ऑफ डाउट, महाराष्ट्राच्या ब्राह्मणांना का नाहि?२. राज्याभिषेकाचे सोपस्कार हे असे काय विशेष सोपस्कार आहेत जे केल्यानेच पुढे भविष्यात ते परत करण्याची मुभा मिळते (सॉर्ट ऑफ सर्टिफिकेशन, यु नो Wink ), अन्यथा नाहि. हे म्हणजे असं झालं - विदाउट फायटिंग ए वॉर, यु कॅनॉट बिकम ए जेनरल<< अहो उसगावांत राहुन फार इन्ग्रजी फाडु नका हो !!! Wink आणि तुम्हीच वर नमुद केल्याप्रमाणे पैठण इ. ज्ञानपिठांच्या ब्राह्मणांनी केली आहे का अशी so called internship ??? आलं आहे का कधी वाचनात ? राज्याभिषेकाचे असे काय वेगळे सोपस्कार असतात ?????? अहो प्रत्येक गोष्टिचे स्वतः चे असे वेगळे सोपस्कार असतात की, म्हणुन तर सत्यनारायण सांगायचे गुरुजी वेगळे असतात आणि घाटावर ची कार्ये करणारी किरवंत मंडळी वेगळी असतात.
मालिका अतिशय चांगली आहे, आणि अधिक उठावदार होउ शकते, कारण कलाकार अतिशय उत्तम काम करताहेत, या मालिकेत अनाजी पंतांना त्यांच्या लायकिपेक्षा जास्त फुटेज मिळतंय आणि त्याच बरोबर हि मालिका ब्राह्मणद्वेष पसरवते आहे हेच खरे !...

भित्रा विखार आला का बाहेर..? याच भित्र्या विखारामुळे अनाजीला संभाजी महाराजांऐवजी राजाराम महाराज गादीवर हवे होते..!

असो.. या मालिकेत, कावेरीबाई, खंडोजी, गोदावरी, बाळाजी, कलश यांच्या सारख्या कितितरी ब्राम्हण पात्रांचा राबता असतानाही फक्त अनाजीच्या हलकटपणाचा कांगावा करुन मालिका ब्राम्हणद्वेश पसरवते असे म्हणणे म्हणजे आपली निष्ठा कोणाच्या पायावर वाहिली आहे याचे प्रदर्शन करण्या सारखेच आहे. अहो करा ना थेट विरोध.. का उगी अनाजीच्या मागे लपुन वार करण्यापेक्षा कावेरीबाईंच्या पदराचे टोक धरुन म्हणा ना की किती उदात्त विचारांचा वारसा दाखवला जातोय..!!

अण्णाजीला खाली झोपावलाय, अण्णाजी प्रचंड घाबरलाय आणि त्याच्यावर हत्तीची सावली आणि जोडीला आवाज.

डिजे, आता हसू यायला लागलयं. अनाजी पंतांचा हलकटपणा कोणालाही रुचणार नाही आणी रुचलेला पण नाही. ज्यांनी ज्यांनी कर्मठपणा केला, त्यांना परमेश्वराने त्यांची जागा दाखवुन दिली हा इतिहास आहे. एक सांगते, अनाजी पंत असो वा पैठणचे ब्राह्मण असो वा त्या काळचे कोणीही कर्मठ साधु-मुनी असो, त्यांच्या या लाजिरवाण्या वर्तनातुन आजच्या ब्राह्मण समाजाने योग्य तो बोध घेतला, आपल्या चूका सुधारल्या म्हणूनच आज हा समाज पुढे आहे. स्वबळावर, कर्तुत्वावर आपले स्थान मिळवले आहे. वेळेवर चूका सुधारल्या गेल्या नाहीत तर समाज पुढे जात नाही.

बाकी समाज अजूनही त्याच गोष्टीत अडकुन पडलाय. तो कोणत्या का जातीचा असेना. खरे तर आज जात- धर्म या पलीकडे जायला हवे. शिवरायांनी हेच शिकवले होते. पण अनाजी पंत काय किंवा शिर्के काय, दोघांनीही वै महत्वाकांक्षे पुढे स्वराज्याची माती केली.

हा भित्रा विखार नाहीये, जो तुम्ही वारंवार समजताय. जाता जाता.. आमच्या इथला सफाई कामगार परवा चटकन बोलुन गेला की १२ मतीकरांनी जाती जातीत भांडणे लावली. आता तो सफाई कामगार काय ब्राह्मण नाहीये उग्गाच १२ मतीकरांना बोल लावायला.

हो आणी एकटे १२ मतीकर अख्ख्या समाजाचे नेतृत्व करत नाहीत, त्यांच्यापेक्षा पृथीराज चव्हाण, देशमुख, निंबाळकर मंडळी भारी आहेत. वेळेवर पाणी पाजले त्यांनी.

असो, मालिका वळणावर येऊ द्या. अनाजी पंतांपर्यंत संपलेली बरी नाही.

१२ मती आणि मालिकेचा काहि संबंध आहे का..? असल्यास सांगावे... आणि नसल्यास मालिके संदर्भात विचार मांडावेत.

मोठ्या लढाया दाखवण्याइतके मालिकेचे बजेट नाही. कोल्हे यांनी स्वतःचे नवीन घर विकले मालिकेसाठी हे वाचले होते. यावरून आठवले की विनय आपटे यांनाही शिवाजी महाराजांवर मोठी भव्य दिव्य मालिका काढायची होती आणि त्यावेळच्या सत्तेवर असलेल्या नेत्याने त्यांना तसे आश्वासनही दिले होते, पण शेवटी आपटे कर्जबाजारी झाले आणि मालिका काही बनली नाही. हिंदीमध्ये मालिका काढली असती तर कदाचित निर्माते मिळाले असते.

मराठी मालिकांना/चित्रपटांना तसेही बजेट कमीच असते. निर्माते तर परराज्यातील/अमराठी असतात. शिवाय ऐतिहासिक मालिका काढायची तर ते अमराठी निर्माते देखिल फिरकत नाहीत. हे कमी की काय म्हणुन चॅनेलचा दबाव. या सर्वांवर कडी म्हणजे अनाजी प्रभुणेकराचे वैचारीक वंशज आजही मालिका बंद व्हावी म्हणुन सर्वप्रकारे प्रयत्न करत आहेत. डॉ. कोल्हे आणि दिग्दर्शकांना धमकाहुन झाले, झीम ला दबाव आणुन मालिका बंद करायला सांगितले, मालिकेसाठी स्पॉन्सर्स येऊ नयेत म्हणुन काड्या करुन झाल्या तरिही या प्रोजेक्ट मधिल सर्व टीम बधली नाही. डॉ. कोल्हे ज्या पक्षात होते त्या पक्षाने देखील ही मालिका बंद व्हावी अशीच तजवीज करुन ठेवलेली.

एवढ्या वाईट परिस्थितीतही मालिका चालवुन दाखवणे आणि ती टीआरपीच्या गणितात तिला सतत वरचढ ठेवण्याचे शिवधनुष्य डॉ. कोल्हे आणि समस्त टीमने लिलया पेलले आहे हे मान्यच करावे लागेल.

या सर्वांवर कडी म्हणजे अनाजी प्रभुणेकराचे वैचारीक वंशज आजही मालिका बंद व्हावी म्हणुन सर्वप्रकारे प्रयत्न करत आहेत. >>>>> डिजे, हे कुठे वाचलेत तुम्ही? आम्ही दररोज पेपर वाचतो, यात तरी हे आल्याचे दिसले नाही. मालिकेसाठी घर विकले हे मात्र वाचलेय.

आमच्या घरचे लोक आधूनीक विचारांचे आहेत. आम्ही घरी फक्त तीनच सिरीयल प्रामुख्याने बघतो, त्यात ही सिरीयल आघाडीवर आहे. काही कारणाने वेळ मिळाला नाही तर रेकॉर्ड करुन ठेवतो, पण बघतोच. मग केवळ त्या अनाजीला शिक्षा झाली म्हणून उरलेला ब्राह्मण समाज उर बडवतोय हे कुठे दिसले नाही मला तरी. आणी आमच्या कॉलनीतले व माझ्या ओळखीतल्या कुठल्याही मराठा कुटुंबाने मला किंवा ब्राह्मण समाजाला शिव्या घातलेल्या नाहीत, जे तुम्ही इथे निव्वळ गैरसमजापोटी करताय.

बरं, अनाजीने बरेच उद्योग केले. मग नंतर जेव्हा संभाजी महाराज गेले तेव्हा महाराणी येसुबाईंना औरंगजेबाने २० ते ३० वर्षे कैदेत ठेवले. येसुबाईंना राजारामच्या पत्नी ताराराणी सोडवु शकल्या असत्या, पण त्यांनी ते अजीबात केले नाही. उलट बाळाजी विश्वनाथ यांनी येसुबाईंना सोडवुन आणले. बाळाजी विश्वनाथ कोण तर पेशवे ( ब्राह्मण ) . इतिहास वाचा जरा. विकी पिडीयावर शोधा बाळाजी विश्वनाथ कोण ते.

ते ब्रिगेडी विचार सोडा. ब्रिगेडवाले कोणालाच मानत नाहीत. त्यामुळे इतिहासापासुन त्यांची फारकतच आहे.

आणी १२ मतीकरांविषयी विचारताय ना? त्यांचा संबंध पगडी पासुन फेट्यांपर्यंत कुठेही पोहोचु शकतो. दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक कशी ठेवायची किंवा पाहुण्याच्या काठीने साप कसा मारायचा हे ते शिकवतात. पण त्यांचा एक बोलका विद्यार्थी नापास झाला म्हणे.

रश्मी.. धन्य आहे तुमची.. Proud

ब्रिगेडी काय.. १२ मती काय.. बादरायण संबंध कसे जोडावेत हे तुमच्या कडुन शिकावे.

तुम्ही अनाजीला दिलेली दुषणे स्वतःवर का ओढुन घेताय हे कळत नाही.. ब्राम्हणांना शिव्या घालायच्या असत्या तर कावेरीबाई,बाळाजी, गोदावरी, खंडोजी, कलश यांचे गोडवे गायले नसते.. पण ते तुम्हाला दिसलेच नाहीत आणि याचं खरं कारण काय हे तुम्हीच शोधा.. Wink

बाकी सिरियल बंद करा हे सांगण्यासाठी कोणी-कोणी आणि कसे प्रयत्न केले हे वेळोवेळी समाजमाध्यमात प्रसारीत झालेले आहे.. आता तुम्ही कोणत्या चाळण्या लावुन वाचन्/श्रवण्/निरिक्षण करता यावर ते अवलंबुन आहे.

संघोटे विचार सोडा.. कदाचीत त्यामुळेच अनाजीची छुपी वकिली करण्यासाठी अमरावती पासुन १२ मती पर्यंत कुणावरही नको ते आरोप करावे लागतात..!

अनाजीची छुपी वकिली करण्यासाठी >>>>>> Proud look who is talking . आता तुम्हीच सतत आरोप करत आलाय की ब्राह्मण समाज अनाजी साठी अश्रु ढाळतोय म्हणून. मग आरोप खोडायला गेले तरी फिर वही मुर्गी की एक टांग.

बाकी तुम्ही पेपर की राजकारण वरवर चाळताय हे माहीत आहे. संघाबद्दल मी बोलणार नाही, कारण त्यांचे अतीरेकी विचार मी मान्य करत नाही. माझ्या वडिलांच्या वेळचा संघ हा फार वेगळा होता. आता संघच काय प्रत्येक पक्षात, संस्थेत भारुडभरती आहे.

>>मालिकेत अनाजी पंतांना त्यांच्या लायकिपेक्षा जास्त फुटेज मिळतंय आणि त्याच बरोबर हि मालिका ब्राह्मणद्वेष पसरवते आहे हेच खरे !...<<
प्रसन्न - डोंट गेट मी राँग. माझी कामेंट थोडी सार्कॅस्टिक्/रुड होती आणि त्याला कारण हि तसंच आहे. भारतात हल्ली सगळीकडेच लोकांची सहनशक्ती पणाला लागलेली आहे. याची/याला पार्श्वभूमी काय/कारणं काय यांत मी शिरत नाहि, पण क्षुल्लक कारणांवरुन चर्चेचा रोख जातीयवादाकडे फिरवण्याचा कल सोशल मिडियावर सतत जाणवतो; माबो याला अपवाद नाहि. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, थांबवता आलं पाहिजे या दृष्टिकोनातुन मी केलेला तो एक प्रयत्न होता. सध्यातरी अयशस्वी झालेला आहे असं वाटतंय...

Pages