होम लोन घेण्या विषयी

Submitted by kalyanib on 2 April, 2018 - 06:03

मला होम लोन घ्यायचे आहे त्याकरिता नेमकी प्रोसेस आणि इतर माहिती हवी आहे. मासिक उत्पन्न ३०,०००/- आहे. कृपया योग्य ती माहिती द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

१. बँकांच्या कस्टमर केअरला फोन करून आपली एलिजिबिलिटी अमाऊंट जाणून घ्या. ते तुमची सॅलरी, वय प्रॉपर्टी अमाऊंट, अगोदर एखादे लोन चालू आहे का हे विचारून एलिजिबल लोन अमाऊंट सांगतील.
२. तुम्ही घेणार असलेल्या प्रॉपर्टीचे नाव त्यांच्या अप्रुव्हड लिस्ट मध्ये आहे का हे ते चेक करून सांगतील.
३. त्यांच्याकडून लोन प्रोसेसिंग फी( साधारण १०,००० -१२,००० असेल ), इंटरेस्ट रेट आणि लोन अप्लाय करण्यासाठीची डॉक्युमेंट लिस्ट मागवून घ्या. यामध्ये सॅलरी स्लिप, फॉर्म-१६, राहायचा पत्ता, कामाचा पत्ता, फोटो प्रूफ, ई.ई. गोष्टी येतात. ते सर्व डॉक्युमेंट आधी रेडी करा.
४.लोन सॅंक्शन झाल्यानंतर disbursementchya वेळेला लागणारी डॉकुमेंटची लिस्टसुद्धा मागवून घ्या. बँकांचे सेल्स एक्झेक्युटिव्ह बोलतील कि महिती नंतर पाठवू तरीही तुम्ही अप्लाय करण्याआधीच ती मागवून घ्या. यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर, NOC , तसेच अधिकचे लागणारे चार्जेस या गोष्टी येतात. हे सगळे डॉक्युमेंट जमवताना काही अडचण येणार आहे का ते आधी बघा.
५. २-३ बँकांकडून या सर्वांची चौकशी करून घ्या. त्याप्रमाणे आपल्या अपेक्षेप्रमाणे बँक निवडा. सगळे कागदपत्र जर व्यवस्थित रित्या मिळणार असतील तरच मग लोन साठी अप्लाय करा. सर्व कागदपत्र तयार असतील आणि लोन मिळण्याची घाई नसेल तर SBI हा उत्तम पर्याय आहे.

लोन अप्लाय केल्यानंतर बँकांचा फिल्ड एक्झेक्युटिव्ह घरी येऊन आपला राहायचा पत्ता, ऑफिसमध्ये जाऊन आपला कामाचा पत्ता व्हेरिफाय करतो. घेणार असलेली प्रॉपर्टी सुद्धा व्हेरिफाय करतात. आपण दिलेले डॉक्युमेंट व्हेरिफाय करून मगच लोन अप्रूव्ह केले जाते. त्यानंतर disbursementche डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. सगळे डॉक्युमेंट व्हेरिफाय झाल्यावर मग लोन disbursement होते.
घर घेण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !

तुम्हाला किती लोन हवे आहे त्यावर अवलंबून आहे. तुमचा कमीत कमी खर्च जाऊन उरलेल्यातून घराचा हफ्ता देऊ शकाल इतकीच अमाऊन्ट बॅन्क अप्रूव्ह करते. त्यामुळे पगारा प्रमाणे लोन ची एलिजिबिलिटी ठरते.

तुमचा प्रश्न नीट समजला नाही. कोणत्या बॅन्केत घ्यावे असं ही विचारायचं आहे का तुम्हाला?

बाकी होम लोन घेताना...
* बिल्डरचा तो प्रोजेक्ट त्या पर्टिक्युलर बॅन्केने अप्रुव्ह केलेला असावा लागतो. जनरली बिल्डर्स अशा बॅन्कांची लिस्ट देतात.
* बॅन्क एकूण घराच्या किंमतीच्या कमीत कमी ६५ ते जास्तीत जास्त ८०-८५% पर्यंत लोन देते.
* डाउन पेमेंट जितके जास्त तितके बॅन्केकडून लोन अप्रुव्ह होण्याचे चान्सेस जास्त.
* सिबिल स्कोर चांगला लागतो.
* डॉक्युमेंट्स भरपूर लागतात.
* प्लॅन ची कॉपी, तुमचे फोटो आयडी प्रुफ, एम्प्ल्यॉयमेन्ट लेटर, सध्या रहातो त्याचे अ‍ॅड्रेस प्रुफ, लोन मध्ये कोण आहे त्यांची सर्व कागद पत्रे (पॅन कार्ड, बॅन्क स्टेटमेंट्स इ.) रेशन कार्ड, आधार कार्ड् आणि बॅन्कवाले वाट्टेल ते मागु शकतात.
* बाई विवाहित असेल तर नवरा आणि नसेल तर वडिल हेच कॉ अ‍ॅप्लिकंट असू शकतात, बहिण किंवा भाऊ चालत नाहीत काही बॅन्कांमध्ये Uhoh
*

Dhanyawad.co operative society madhun gheu ka. >>>

बिल्कुल नको

एक तर त्यांचे इंटरेस्ट रेट जास्त असतात अन हिडेन चार्जेस पण असतात

मानिनी ला अनुमोदन. कॉपरेटिव्ह सोसायटी, पतसंस्था इ कडून कर्ज घेऊ नये. ऐनवेळी कसले कसले अधिक पैसे उकळणे, वसुलीसाठी त्रास देणे, इ होऊ शकते.

राजसी - एस बी आय चांगली बॅन्क आहे नक्की, पण ते लोक फार हिडिस फिडिस करतात ग्राहकांना. (दुर्दैवाने) Sad कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे. मला १२.५ लाखाचे लोन हवे होते, एलिजिबिलिटी तितकी नव्हती पण ९ पर्यंत मिळायला हरकत नव्हती. (माझ्या त्यावेळच्या पगाराप्रमाणे) पण त्यांनी ६ लाख देऊ त्यावर एक दमडी देणार नाही म्हटले. आय सी आय सी आय वाले म्हणाले ९ किंवा फारतर ९.५ लाख देऊ. पण एच डी एफ सी ने माझे ५ वर्षांचे बॅन्क्स स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रांचा अभ्यास करून मला सर्वच्या सर्व लोन देऊ केले.

HDFC >> अनुभव चांगला आहे.
kalyanib>> co operative society तुम्ही जिथे काम करता त्याकंपनीची आहे का तसे असेल तर हा पर्याय चांगला असु शकतो, बहुतेक कंपनीच्या को ओप्स कमी व्याज घेतात , तपासुन पाहा. बाहेरची को ओप्स असेल तर व्याज भरमसाठ घेतात १२-१४ % असु शकते कदाचित जास्तही..
३०के पगाराला १५ लाखापर्यंत मिळु शकेल असा एक अंदाज.

शक्यतो co operative सोसायटी मधून लोन घेऊ नका. घ्यायचेच असेल तर प्रॉपर्टी अधिकृत आहे का ते नीट तपासा. SBI फक्त अधिकृत प्रॉपर्टीवरच लोन देते. तिथून लोन मिळेपर्यंत थोडा त्रास सहन करावा लागतो(सरकारी कारभार) आणि संयम ठेवावा लागतो पण पुढे प्रॉपर्टी अनधिकृत ठरून पाडली जाण्याची रिस्क नसते. HDFC हा सुद्धा चांगला ऑप्शन आहे. लोन अप्रूव्ह झाल्यावर ऍडिशनल पेमेंट कोणते करावे लागेल का ते आधिच विचारून घ्या.

लोन कुठुनही घेण्यापुर्वी हे लक्षात ठेवा की आपल्या घराची सगळी ओरीजनल कागदपत्रे आपण तिकडे जमा करतो, म्हणुन शक्यतो ते बँकेतुनच घ्या मग ती सरकारी असो वा खाजगी

माझ्यामते DHFL, किंवा कुठल्याही को-ऑप सोसायटी किंवा को-ऑप बँकेतुन काही कर्ज घेणे टाळा
ICICI, AXIS, HDFC किंवा SBI, BOI बेस्ट ऑप्शन्स आहेत
शक्यतो सगळीकडे इन्क्वायरी करुन , निट सगळे तपासुन निर्णय घ्या

माझ्यामते DHFL, किंवा कुठल्याही को-ऑप सोसायटी किंवा को-ऑप बँकेतुन काही कर्ज घेणे टाळा >> मी माझ्या एका घराकरता डीएचएफेल कडून लोन घेतल होत किंवा फक्त तिथूनच मिळाल .( खूप ठिकाणी चौकशी करून ) काहीच प्रॉब्लेम आला नाही . आयसीआयसीआय पण चांगली आहे.माझ्यामते प्रत्येकाचे अनुभव वेगळे असावेत पण को-ऑप बँकेतुन कर्ज घेणं टाळलेलंच बर असं वाटत Happy

हो , DHFL अल्मोस्ट सर्व ग्रुह्कर्जे देतात, पण त्यांचे हिडेन चार्जेस खुप असतात.

HDFC बेस्ट आहे. >> अगदी नक्कीच. माझे लोन सुरू होऊन मार्च २०१८ ला बरोब्बर ८ वर्ष झाली. या सर्व वर्षात मला काडिचा त्रास नाही झालेला त्यांच्याकडून. लोन चा हफ्ता व्यवस्थित जातो. फक्त एकदा होम लोन च्या हफ्त्याचा एस एम एस आला होता तो दुप्पट रकमेचा होता तेव्हा दोन्ही कडे (होम लोन च्या बॅन्केत आणि माझ्या सेव्हिन्ग्ज अकाऊंट वाल्या बॅन्केत अशा दोन्ही कडे फेर्‍या झाल्या होत्या. ती सिस्टिमची चूक होती हे नन्तर कळलं.

फक्त मी जेव्हा टॉप अप लोन काढलं तेव्हा मात्रं त्याला प्रचंड उशिर लागला, के वाय सी, अनेक कागदपत्रं.
माझं जे मूळ होम लोन आहे त्यात माझे वडिल को अ‍ॅप्लिकंट आहेत. त्यामुळे टॉप अप लोन सुद्धा तसेच घ्यावे लागते (माझ्या एकटिच्या नावावर घेता येणार नाही म्हणाले) मग वडिल कोल्हापूरात मी पुण्यात. त्यातूनही सर्व कागदपत्रं गोळा केली, तरिही १५-२० दिवस त्यांना अनेक गोष्टी हव्याच होत्या. अखेर लोन पास झाले, पण डिस्बर्समेन्ट चा चेक दोघेही उपस्थित असल्याशिवाय देणार नाही म्हणाले. (मूळ लोन अप्रुव्ह झाल्यावर बिल्डर जशी जशी डिमांड लेटर्स पाठवतो तशी तशी बॅन्क बिल्डरला पैसे देते (डिडिने) बाबा पुण्याला यायला नाही म्हणाले. मग बॅन्केने सगळे कागद आणि डिडी कोल्हापूरला पाठवला. मि इथून गेले आणि तो चेक आणला. हुश्श!

गम्मत म्हणजे २०१० साली मला ज्या दिवशी लोन चं अ‍ॅप्लिकेशन द्यायला बॅन्केत जायचं होतं त्या दिवशी माझ्या आतेबहिणिचं लग्न होतं आणि मी नटून थटून हॉल मध्ये गेले होते, आणि तिथूनच तशी बॅन्केत गेले. तर तिथे ते मॅनेजर म्हणाले लोन घ्यायला इतकं नटून थटून येणारी तु पहिलीच Lol

गम्मत म्हणजे २०१० साली मला ज्या दिवशी लोन चं अ‍ॅप्लिकेशन द्यायला बॅन्केत जायचं होतं त्या दिवशी माझ्या आतेबहिणिचं लग्न होतं आणि मी नटून थटून हॉल मध्ये गेले होते, आणि तिथूनच तशी बॅन्केत गेले. तर तिथे ते मॅनेजर म्हणाले लोन घ्यायला इतकं नटून थटून येणारी तु पहिलीच Lol

नवीन Submitted by दक्षिणा on 3 April, 2018 - 17:41

सहीच Happy

होम लोन घ्यायचं असेल तर कितीही त्रास झाला तरी एस बी आय ला पर्याय नाही.
ते लोक हिडीस फिडीस करतात हे मान्य आहे पण तरी आपण जे घर घेणार आहोत त्याचा सगळा "ईतिहास भुगोल" खणून काढतात आणि मगच लोन देतात.
त्यामुळे वर कोणीतरी लिहिलय तसं अनधिकृत वगैरे प्रॉपर्टी असेल तर आपल्याला पुढे होणार्या त्रासापासुन सुटका होते.कारण सगळे पेपर क्लीअर असल्याशिवाय एस बी आय वाले अज्जिबात पुढे सरकत नाहित.

दुसरं म्हणजे त्यांच मॅक्स गेन अकाउंट आहे त्याचा पण खुप फायदा होतो रीपेमेंट/प्रीपेमेंट करताना.
प्रिन्सिपल अमाउंट खरच कमी झाल्याचं दिसायला लागतं. Happy आणि मनाला शांती मिळते Wink

गोल्डफिश आणि दक्षिणा यांच्या प्रतिक्रिया आवडल्या..

माझा स्वतःचा SBI चा अनुभव चांगला आहे. कदाचित NRI असल्याने असेल !!! Wink
भारताबाहेर बसून, वयस्कर वडिलांच्या नावाने POA करुन त्यांच्या आणि माझ्या बहिणीच्या मार्फत सगळ्या formalities कराव्या लागल्या होत्या. (ही ३-४ वर्षांपूर्वीची गोष्ट !) तरीही अजिबात त्रास झाला नाही (अर्थात त्यांना, कारण मी तर भारताबाहेरच होतो तेव्हा) . लोन disbursement चे पेपर्स स्वतः अरुंधती भट्टाचार्य यांच्या हस्ते बहिणीनी घेतले होते ! Happy

दुसरं म्हणजे त्यांच मॅक्स गेन अकाउंट आहे त्याचा पण खुप फायदा होतो रीपेमेंट/प्रीपेमेंट करताना.
प्रिन्सिपल अमाउंट खरच कमी झाल्याचं दिसायला लागतं. ..आणि मनाला शांती मिळते.. + १

कुणी मागील ६ महिने किंवा १ वर्षात ICICI मधून होम लोन घेतलं आहे का? कसा अनुभव आला?
HDFC vs ICICI कोणी तुलना केली आहे का?

Ok

असं काय अत्युत्तम आहे HDFC मध्ये जे ICICI मध्ये नाही?
व्याजदर कमी आहे का? आणखी काय फरक?

माझ्यामते ICICI बेस्ट आहे कारण HDFC मध्ये फार फार तर 80 ते 85% लोन मिळेल पण ICICI मधून फ्रोफाईल आणि प्रोजेक्ट चांगलं असेल तर 90% पण लोन घेता येतं..परत Insurance Option ठेऊन वरचे पैसे वाचवता येतात.. Latest Offer मध्ये Processing Fee पण कमी आहे..

लोन घेण्यासाठी खालील प्रोसेस आहे..

1. सर्वात आधी Sanction letter काढावं लागतं त्यासाठी तुम्हाला 6 months salary slip & Bank Statement, Adhar card, Pan Card, 2 वर्षाचे Form 16 ( हे employer कडून मिळेल, तुमच्या HR ला मेल टाका किंवा कंपनीच पोर्टल असेल तर स्वतः Download करू शकता)
Address proof इत्यादी Documents लागतील..

Sanction साठी Login करावं लागतं त्यासाठी Non Refundable fee आकारली जाते ( HDFC ची 6000 तर ICICI ची 5000 ते 5500 फी आहे)

Sanction letter यायला 4 ते 7 दिवस लागतात..

Sanction letter मध्ये तुम्हाला सगळी माहीती दिली जाते.

(Intrest rate, loan tenure, loan amount, processing fee etc )

प्राॅपटी फायनल केली नसेल तर आधी ही प्रोसेस करू शकता हे लेटर 6 months valid असतं..

प्राॅपटी फायनल असेल तर प्राॅपटीचे पेपर पण जोडले तर पुढची प्रोसेस लवकर होते.

Sanction आल्यानंतर प्रॉपटीचं verification आणि valuation होत आणि अंदाचे दहा ते पंधरा दिवसात लोन Disburse करता येतं..

प्राॉपटी रेरा रजिस्टर असेल तर sanction प्रमाणे तितकं लोन Disburse व्हायला काहीच प्रोब्लेम येत नाही.. पण नॉन रेरा असेल आणि रेट अज पर गव्हरमेंट नसेल तर मग लोन कमी Disburse होतं..इथे थोडं चाय पाणी देऊन पण अडजस्ट होत पण ते डिपेन्ड केस टू केस..

Disbursment च्या वेळी लोनच्या 1 ते 2% amount processing fee + टॅक्स इतकी रक्कम द्यावी लागते

Processing fee दोन्ही बॅकेत सारखीच आहे.. ऑफर असेल तर अर्धा किंवा एक % कमी पण होते.

राहीला प्रश्न Home Loan Affordability चा तर ते Intrest Rate and Age वर डिफेन्ड आहे..

उदा. जर वय 30 असेल तर तुम्हाला 30000 च्या Salary वर सध्याच्या 6.75% च्या हिशोबाने 20 वर्षासाठी कमीत कमी 19 ते 20.5 लाख लोन मिळू शकेल तर 30 वर्षासाठी 22 ते 25 लाखापर्यत मिळेल.. again इथे Bankeche rules Matter करतात काही bank सॅलरीच्या 45% EMI बसेल इतकेच लोन देतात तर काही 50ते 55% देतात HDFC ICICI च्या मानाने कमी लोन देते..

आणि लोन ग्रॉस सॅलरीवर देतात इथे नेट टाकली असेल तर लोन अमाऊट थोडी जास्त मिळेल..

Recently Advance PF काढला असेल, CIBIL Score कमी असेल, आधीच कुठल लोन असेल, रेंटवर राहत असाल, Dependent जास्त असतील तर लोन कमी होणार..

अजून माहीती हवी असल्यास सांगा.. ICICI आणि HDFC दोन्ही बॅकेचे अधिकारी ओळखीचे आहेत..

जर प्रॉपर्टी अनधिकृत कि अधिकृत असा concern नसेल तरी SBI कडे जावे का ? daily reduction vs monthly reduction ने खूप फरक पडतो का ?