गझल - नको लिहूस...!

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on 29 March, 2018 - 07:00

नको लिहूस तू रे भावा माझ्या, कुठे तरी थांबशील का !
सांगून सांगून थकलो रे, काही नवीन लिहिशील का !

पळस फुलांचा रंग लाल, येतो कसा ते समजेल का !
शब्दांची दाट गर्दी अशी, उगाच ती आवडेल का !

शब्दांचे खेळ नवे रोज, कसे वेडेवाकडे ते बघशील का !
धापा टाकतात, मानही टाकतात, शब्दांना तू छळशील का !

बुडबुडे ते नाव त्याचे फुगे, टाचणी त्याला लावशील का !
रक्त आटवून लिहितोस तू हेमोग्लोबीन चेक करशील का !

राधा, मीरा, भजनात दंग मी, जरासा हळवा होशील का !
मैत्रीण म्हणते अरे राजा, तुकाराम नामदेव चाळशील का !

सांग सखे जीव लावतो कमी कुठे तू पडशील का !
चाफा, मोगरा, केवडा , गझल म्हणून माळशील का !

कसं काय सुचतं देवा यांना, प्रतिभा यांची फुलवशील का !
नको लिहूस तू 'दिलीप' काही, रसिक म्हणून राहशील का !

Group content visibility: 
Use group defaults

बुडबुडे ते नाव त्याचे फुगे, टाचणी त्याला लावशील का !
रक्त आटवून लिहितोस तू हेमोग्लोबीन चेक करशील का !

=)) =))

स्वतंत्र दाद आवडल्या गेली आहे. पण मुळ गझलही तितकीच अप्रतिम आहे.
रच्याकने, तुम्हाला डब्बल बॅरलची बंदुक हे नाव का पडले असावे हे आत्ता कळाले.

'बेफीकीरपणे' लिहिलेल्या रचनेस प्रतिसाद लिहिणारे किसन शिंदे, प्रचारक दोनहजार दोन, आपले मनःपूर्वक आभार.
सर्व मायबोलीकर आणि सदस्य नसलेले वाचकांचेही मनःपूर्वक आभार. असाच लोभ असू द्या. Happy

अधे मधे येऊन लेखनाची खाज मिटवतच राहू. Happy

-दिलीप बिरुटे
(आज्ञाधारक मायबोलीकर)