ब्युटी पार्लर- भाग 1

Submitted by द्वादशांगुला on 22 March, 2018 - 09:02

●○ काही सत्यं अर्धसत्य असतात ; हे जग मायावी आहे आणि त्यात काही सत्यं लपलेली आहेत.... नकळत. आणि हेच सत्य आहे. ○●

●●●●●●●●●●●●●●●●●●●

•23ऑगस्ट 2017•

आज मुंबई पोलिसस्टेशनने मरगळ झटकली होती. वातावरणात तणाव होता. याला कुठल्याही वरच्या अधिकार्याची आकस्मिक भेट वा तत्सम कारण नव्हते, तर याला कारण होतं एक जगावेगळी केस.
पोलिस स्टेशनातल्या म. गांधींच्या हसर्या फोटोबाजूचं लाकडी घड्याळ दहाची वेळ दाखवत होतं. इतक्यात इन्सपेक्टर नाईकांच्या बाईकचा ओळखीचा कर्कश आवाज आला नि बरेच जण जागे झाले . इन्सपेक्टर नाईकांना बघून बाहेर गेटजवळ थांबलेले दोन-तीन पत्रकार या केससंबंधी माहीती काढायला आले, तर त्यांनी या लोकांना खड्या शब्दात , सभ्य भाषेत सुनावलंच. चिडलेले, अस्वस्थ ,चिंताग्रस्त वाटत होते चेहर्यावरून. ते नुकतेच क्राईम साईटवरून परत आले होते. परत तपास करूनही खुन्याचा कसलाच सुगावा लागत नव्हता. खून झालेल्या त्या चमत्कारिक मुलीची - मीनाची फोन काॅल हिस्ट्री, आसपासचे लोक याचा सगळा तपास झाला, तरी काही सापडत नव्हतं. फक्त जवळच्या कुंडीत एक अगम्य व्हॉईस रेकाॅर्डर सापडलं होतं, ज्यात भूतांचे भितीदायक आवाज रेकाॅर्ड केले होते. पण त्याने मृत्यू झालेला नव्हता, कारण खूनाच्या दिवशी ते प्ले झाल्याचे त्यात कोणतेच रेकाॅर्ड सापडले नव्हते. मीनाचा खूनही झाला होता तो तिच्याच मालकीच्या गाळ्यात. काहीतरी गोम होतं. कुठेतरी पाणी नक्की मुरत होतं. वरवर सोपी वाटणारी ही केस आतून केसांच्या गुंत्याएवढीच किचकट होती.

"साहेबांना परवाचं ग्रहण मानवलं नसावं. म्हणून हे नसतं लचांड मागे लागलंय." असं शिंदेंनी म्हणायला नि इन्सपेक्टर नाईकांनी आत यायला बोला-फुलाची गाठ पडली, आणि शिंदेंवर इन्सपेक्टर नाईकांच्या रागाचा भडका उडाला. डोकं भणभणून गेलेल्या, वैतागलेल्या इन्सपेक्टर नाईकांना चहाची नितांत गरज होती. रघूला एक चहा सांगून त्यांनी आपल्या खुर्चीत बसून फायली चाळल्या, पण विचार होता याच केसचा. राजकीय दबाव होता. वरच्या अधिकार्यांकडून प्रेशर वाढत होतं. पत्रकारही मागे लागले होते. याचं कारण म्हणजे अशा केसेस आजकाल देशात वारंवार घडत होत्या. अगदी भारताच्या प्रत्येक दिशेतून. पण याच प्रकरणातली खुनाची ही पहिलीच केस होती, तीही एका अजब मुलीच्या - मीनाच्या खूनाची. हे जरा आश्चर्यकारक होतं. त्यामुळे वरवर निरूपद्रवी वाटणार्या या केसबद्दल खातं खडबडून जागं झालं होतं. जनतेत एक प्रकारची घबराट होती. कारण यात विनाकारण निरूपद्रवी सामान्य माणसांना टार्गेट केलं जात होतं.

हे प्रकरण होतं 'चोटी गॅग' चं. देशभर गाजलेलं. सर्वांमध्ये, खासकरून स्त्रियांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. देशभर स्त्रियांचे केस चमत्कारिकरित्या कापले जात होते. समाजसेवकांकडून अंधश्रद्धानिर्मूलनाचा ढोलही यामागे बडवला जात होता. खेड्यापाड्यापासून शहरांमध्येही ही प्रकरणं घडू लागली होती. सर्वच स्त्रिया एकट्या असताना त्यांचे केस विस्मयजनकरित्या कापले जात होते. त्यांची शुद्ध हरपून बेशुद्धावस्थेत केस कापले जाऊन ते बाजूलाच पडलेले दिसत होते. कित्येक केसेसमध्ये तर कोणा दुसर्या व्यक्तीच्या घरात वा तत्सम जागेत शिरण्याचाही मौका नव्हता. हे कसं ते अद्याप प्रशासनाला कळलं नव्हतं. मात्र ही केस निरूपद्रवी असल्याने याकडे दुर्लक्ष केलं गेलं, मुंबईतली ही अजब खूनाची केस घडेपर्यंत... |द्वादशांगुला|

●●●●●●●●●●●●●●●●●●●

•24 ऑगस्ट 2017•

मीनाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला होता. त्यात कोणतीही हातापायी, मारामारी झाल्याचं निशाण नव्हतं. फक्त जबरदस्त भीतीने, मानसिक धक्क्याने मृत्यू हेच कारण होतं. इन्सपेक्टर नाईक याचाच विचार करत होते. हा नैसर्गिक मृत्यू नक्कीच नव्हता. तिचे ते केस कैचीने एका झटक्यात कापल्यासारखे बाजूलाच पडून होते. पण ती कैची तिथे नव्हती, हे आधीच सिद्ध झालं होतं, फोरेन्सिक लॅबच्या चाचण्यांवरून.

"साहेब!" शिंदेंच्या आवाजानं इन्सपेक्टर नाईकांची तंद्री भंग पावली. समोर खून झालेल्या मुलीचे- मीनाचे आई, वडील, ज्या गाळ्यात तिचा खून झाला त्याच्या शेजारच्या गाळ्यातले दुकानदार आले होते. "सावत्र असली तरी सख्ख्या मुलीसारखी जपली हो मी तिला.... " मीनाची आई तोंडाला पदर लावून हंबरडा फोडत होती. लेडी कॅन्स्टेबलने तिला सावरले. इ. नाईकांनी पाण्याचा ग्लास पुढे केला.

नाईक म्हणाले, " तुमचं दुःख आम्ही जाणतो. तिच्या खून्याला शिक्षा व्हावी, म्हणूनच आमचे प्रयत्न सुरू आहेत."

नि त्यांनी एकेकाची कसून चौकशी केली, पण हातात काय आलं, काही नाही. मीना तिचं ते वेगळेपण वगळता साधी सुशील मुलगी होती. तेवीस चोवीस वर्षांची मुलगी. तिचं कोणाशी वाकडं नव्हतं. शेजार्यांशी, शेजारच्या गाळ्यांतल्यांशी तिचे चांगले संबंध होते. तिच्या जन्मापासूनच ती मुंबईत राहत होती. त्यामुळे इतर कोणी शत्रू असण्याचा प्रश्नच नव्हता.

" साहेब..." शिंदे त्यांच्या जवळ घुटमळत होते.
" बोला शिंदे", इन्सपेक्टर नाईक बोलले.
"साहेब , मीना आई-बाबांसोबत राहायची. ही तिची सावत्र आई आहे. मी साध्या वेशात जाऊन शेजार्यांकडे चौकशी केली तेव्हा काहीतरी वेगळंच समोर आलं..."
"काय शिंदे?"
"तिच्या बोलण्यावर जाऊ नका साहेब, बदमाश बाई आहे ती..... मीनाला कायम छळायची. तिला तिच्या या वेगळेपणावरून हिणवायची. आणि मीनाला तर तिने तिचं ब्युटी पार्लर खोलायला एक पैही दिला नाही, ना तिच्या बाबांना देऊन दिला."
"अच्छा..?" इन्सपेक्टर नाईक आश्चर्याने उद्गारले.
"हो साहेब . मीनानेच मग स्वतः पैसे जमवून हे ब्युटी पार्लर खोललं होतं आणि मीनाला एकच जिवश्चकंठश्च मैत्रिण होती. पूजा. ती काहीच दिवसांपूर्वी दिल्लीला सेन्ट्रल एक्झाम द्यायला गेलीय. खूनाच्या वेळीही ती इथे नव्हती."
"हम्म.. तिला लवकरात लवकर बोलवा".
"हो साहेब." शिंदेंनी मान हलवली.
"आणि हो..... शिंदे, त्या कचरावाल्याला, ज्याने तिला खून झाल्यावर पहिले बघितलं, त्याला परत बोलवा ."
"बरं साहेब." असं म्हणून शिंदे गेले. गुंता अजून वाढला होता, तेल न लावलेल्या केसांसारखा.

●●●●●●●●●●●●●●●●●●●

"साहब, आपने बुलाया?" मीनाचा खून झाल्यावर ज्याने सर्वात आधी पाहिलं होतं, तो कचरेवाला आला होता.
"हां.... मुझको सब डिटेल मै बताव." इ. नाईकांनी ऑर्डर सोडली, तसा तो बोलू लागला.

"साहब, तब शामके आठ बजे होंगे। मुझे मॅडम ने बोला था की रोज शामको आकर कूडा लेकर जा। वो पार्लर के बालों का कूडा जादा होता है ना। वैसे मै उस दिन भी गया। शुक्रवार को उस इलाक़े की कई दुकाने बंद रहती है ना, तो भीड नहींथी जादा। मै गया तो शटर नीचे खींचा हुआ था। मै अंदर गया तो देखा की मैडम नीचे गिरी हुई थी। उन के मुँह पर घबराहट थी। और उन के बाल कटे हुवे थे और नीचे गिरे हुए थे।
उनके ही थे वो...... वो कैसे भूल सकता हूं मै। "

कचरावाला एकंदर या घटनांना घाबरला होता. नाईकांनी त्याला जायला सांगितलं. अजब केस होती ही. त्यांनी परत केसशी संबंधित घटना, बाबी, माहिती आठवायला सुरूवात केली. छे! काहीतरी होतं नक्कीच जे सापडत नव्हतं. मीनाचे कापलेले केस पाहता हे प्रकरण देशभर गाजलेल्या चोटी गॅग अंतर्गत वाटत होतं. इतर सर्व बाबी; जसे : कैचीने एका झटक्यात कापल्यासारखे मीनाचे शेजारीच पडलेले केस, बाहेरच्या सिसिटीव्ही कॅमेर्यात खूनाच्या अंदाजे वेळेत कोणीही तिथे आलेलं-गेलेलं नसणं, मीनाचा घाबरून मृत्यू झालेला असला तरी तिचा आवाज शेजारच्या गाळ्यांतल्या कोणालाच ऐकू न येणं यावरून चोटी गॅग प्रकरण व या खूनाचा एकच कर्ता असल्याचं लक्षात येत होतं. मात्र हे खूनाचं पहिलंच प्रकरण होतं.

●●●●●●●●●●●●●●●●●●●

आज नाईकांची मिरवणूकीवर ड्युटी होती. खूप दगदगीचा दिवस होता तो. त्यांनी मनगटावरच्या घडाळ्यात पाहिलं, साडेनऊ वाजले होते. अगदी शीण आला होता त्यांना. कंटाळून ते विचार करत होते, मस्तपैकी आराम करायचा आज घरी जाऊन. या विचारातच त्यांनी खिशातून चावी बाहेर काढली. बाईक स्टार्ट केली. रस्त्यावर सामसुम झाली होती. बाईक चालवताना त्यांचा मेंदू मात्र याच केसचा विचार करत होता.
'खाकी वर्दी चढवून सहा वर्षं झालीत आपल्याला, पण अशी गूढ केस पहिलीच. काहीच कशाचाच थांगपत्ता लागू न देणारी. ती गूढ मुलगी... तिचा रहस्यमय खून... खून्यानं कुठेही धागेदोरे सोडले नाहीयेत. यावरून तरी हा पक्का मुरलेला गडी असावा, असं दिसतंय. मेंदूचा भुगा झालाय अगदी.... अरे...'

त्यांची विचारमालिका अचानक तुटली. विचार करता करता ते घरी न जाता चक्क पोलिसठाण्यातच आले होते. काय योगायोग, आणि ठाण्याच्या गेटसमोरच त्यांची गाडी बंद पडली. 'आता आतच जावं लागणार, शिंदे असले तर बरं, त्यांना गाडीचं काहीतरी करायला सांगून त्यांची गाडी घेऊन जायला हवं, पाकीटही विसरलोय ना आज आपण वेंधळ्यासारखे...' नाईक मनातून चरफडले. बाईक ढकलत आत पार्किंगमध्ये आणली. आत जाणार तोच त्यांना शिंदेच बाहेर येताना दिसले.
"शिंदे-" नाईक काही बोलणार इतक्यात शिंदे घाईघाईत बोलू लागले," साहेब ती आलीय... मीनाची मैत्रिण. तुमचा फोन लागत नव्हता केव्हापासून... तुमच्याच घरी निघालो होतो...."
"माझा फोन..." त्यांनी खिशातून फोन काढून पाहिलं, फोनची बॅटरी संपून तो बंद पडला होता. शिंदे अस्वस्थ वाटत होते. नाईक झटकन आत गेले.

त्यांनी पाहिलं, आत भिंतीलगतच्या लाकडी बाकड्यावर एक चोवीशीची मुलगी बसली होती. ती तिच्या देहबोलीवरून खूपच अस्वस्थ वाटत होती. तिच्या चेहर्यावर एक प्रकारचं भीतीचं सावट पसरलं होतं. हीच ती पूजा. नाईकांनी ओळखलं. तिला पाहून नाईक चमकले...... हीसुद्धा?

●●●●●●●●●●●●●●●●●●●

'मी पूजा. मीना, माझी मैत्रीण. आम्ही नर्सरीपासून अगदी ब्युटी पार्लरच्या कोर्सपर्यंतच्या क्लोज फ्रेण्डस्. मजेमजेत मी करायचा म्हणून हा कोर्स केला,पुढे काही महिने मीनासोबत एका पार्लरमध्ये कामही केलं, नि नंतर नाद सोडला, पण मीनाने नाही. तो दिवस मला अजूनही आठवतोय. मीना खूप हॅप्पी होती. असणारच, हा दिवस दिसावा म्हणूनच तिने इतर कोणाचीही , कशाचीही पर्वा न करता आपल्या स्किल्सच्या जोरावर तिचं स्वप्न पूर्ण केलं होतं, स्वतःचं ब्युटी पार्लर थाटण्याचं. खूप गट्स आहेत- आय मीन होते तिच्यात. आता म्हणाल, ब्युटी पार्लर थाटण्यात कसलं आलंय नवल? पण हे नवलच होतं तिच्यासाठी. हे का ते कळायला तुम्हाला तिच्या आयुष्यातली खूप आधीपासूनची पानं उलटायला लागतील.

मीना तिची आई फोर्टी प्लस असताना एका लहानशा खेड्यातल्या छोटुशा हाॅस्पिटलमध्ये जन्मलेली. तिची आई तिच्या जन्माच्याच वेळी वारली अन् हिला देऊन गेली हे विचित्र गिफ्ट.
' मीना जन्मली तेव्हा त्या गावातल्या सर्वच अडाणी लोकांनी आश्चर्याने नि भीतीने तोंडात बोटं घातली. म्हातारी लोकं 'हे वेगळंच प्रकरण ' समजून भगताच्या शोधाला लागले. याला कारणही तसंच होतं. कारण मीनाचं जावळ जन्मतःच होतं लालजर्द रंगाचं. बोटाला सुई टोचली की ज्या रंगाचा रक्ताचा थेंब टचकन उमटतो ना, तसला रंग. तिला चेटकीण , हडळ कसलीकसली नावं त्या लोकांनी ठेवली. गावावरचं संकट टाळायला तिला मारून टाकण्याचे अजब सल्लेही दिले गेले. पण मुळात शहरात शिकलेल्या अंकलना- मीनाच्या पप्पांना हे पटलं नाही. फक्त मीनाच्या भवितव्यासाठी त्यांनी गावाशी असलेली नाळ पूर्णपणे तोडण्याचा निर्णय घेतला नि मुंबईला येऊन राहीले.' अस्सं सेम एकदा अंकलनी मला सांगितलेलं. मग तिला नर्सरीत घातलं नि आमची ओळख झाली.

तिला बघून मीही थक्क झाले होते. पण आम्ही कशा रूळलो हे कळलंच नाही. मला आठवतंय , वर्गातल्या मुलांनी तिला कायकाय नावं ठेवली होती. एकदा तर एक मुलगी तिला 'वॅम्पायर' बोलली होती. अस्सा राग आला होता मला.... मी तिला मारायला धावले तर मीनाने मला थांबवलं.... ती बोलली," कितींना मारणारेस, मला सवय झालीय हे ऐकायची. राहू दे..."
तिच्याशी मी सोडून क्लासमधल्या कुणीही फ्रेण्डशीप केली नाही. सर्वजण तिला घाबरायचे. आम्हाला सेपरेट करायला बघायचे. पण माझी ती बेस्ट फ्रेण्ड होती.
मीना लहानपणी केस अगदी छोटे ठेवायची, कोणाच्याही सहज नजरेत येऊ नयेत म्हणून. बाॅयकटच करायची ती. कारण तिचे केस नॅचरली असेच आहेत, हे कोणालाही लगेच समजायचं. तिने कोणतीही कॅप घातली, तरीही तिचे लाल केस दिसायचेच हमखास.

याचा तिला खूप कंटाळा आला होता. ती कंटाळली होती, या अशा आयुष्याला, समाजाला. वर तिची आईही तिला छळायची. तिला खूप बोलायची. कधी कधी तर अंकल नसताना तिला उपाशीही ठेवायची. वर आजुबाजूची लोकंही तिच्याकडे कुतूहलपूर्ण नजरेने बघायची. ती बाजूनी जात असली, की खुसपुसायची. यामुळे तिचा स्वतःवर कधीच आत्मविश्वास नव्हता.. कधीच. तिला लोकांसमोर यायला भीती वाटायची. तिने शाळा, काॅलेज कुठेही कधी गॅदरिंगमध्ये भाग घेतला नव्हता. कधी मजामस्ती केली नाही तिने. तेव्हा खूप वाईट वाटायचं मला तिच्याबद्दल.

नेमकं काय झालं माहीत नाही,पण तिने ठरवलं, की ब्युटी पार्लर उघडायचं. समाजाला खर्या सौदर्याची जाणीव करून द्यायची. समाजाला कुरूप वाटणार्यांनाही सौंदर्याने नटवून याच समाजापुढे ठेवायचं. असं तिने सांगितलं होतं. तेव्हाच तिनं आयुष्यात पहिल्यांदा केस वाढवले, बर्यापैकी लांब अन् हेअरकलर न करण्याचा निर्णय तिने घेतला तो तेव्हाच. तिने कॅप घालणं सोडून दिलं होतं. ती लोकांकडे दुर्लक्ष करायला लागली होती. खरं आयुष्य जगायला लागली होती. तिच्यातला हा पाॅझिटिव्ह बदल बघून मी मनात आनंदी झाले होते. पण मला तिचे केस खूप आवडायचे. ती गर्दीतही उठून दिसायची त्यामुळे. आता तर ती नैरेश्यातून बाहेर आली होती. तिनं ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला सुरूवात केली होती.

त्यानंतर आम्ही खूप गप्पा मारायचो. ती म्हणायची, की आपण दोघी मिळून ब्युटी पार्लर काढू, मिळेल तो पैसा अर्धा अर्धा वाटून घेऊ. तिने दाखवलेल्या पुढच्या आयुष्याच्या स्वप्नांत मी गुंतून पडले नसते तर नवल. ते वयच अल्लड होतं. माझ्यासारख्या ध्येय न बाळगणार्या व्यक्तीला स्वप्नांचं आभासी जग दाखवून तिनं वेडं केलं होतं. मग तिने यासाठीच्या कोर्ससाठी अॅडमिशन घेतलं. अन् मीही. तिच्याच पाठोपाठ. तिच्या स्वप्नांच्या आशेवर जगत नि त्यांचाच आधार घेत. कोर्स पूर्ण झाला. खरंतर मीनाला तिची आई पैसे देणार नव्हती. मग आम्ही दोघींनी ही एका ब्युटी पार्लरमध्ये जाॅब पकडला. आम्ही दोघी बरेच पैसे वाचवायचो. मी माझे पैसे तिच्याकडे ठेवायला द्यायचे, मी तशी खूप उधळपट्टी करते म्हणून.

पण मीनाने मला दगा दिला. धोका दिला. माझी स्वप्नं धुळीला मिळवली. माझेच पैसे वापरून गाळा स्वतःच्या नावावर करून घेतला. तरीही सर्वजण तिचीच वाहवा करत होते. मी माझ्याबद्दल विचारलं, तर तिने धुडकावून लावलं. माझ्या पैशांबद्दल विचारलं तर तिने टाळाटाळ केली. तिने माझा वापर करून घेतला होता. मग मी बदला घ्यायचं ठरवलं. तिला तो गाळा सोडायला लावायचा. तिची स्वप्नं मातीत मिसळायची , हेच माझं ध्येय बनलं. मला माहीत होतं, ती भूत, आत्मे वगैरेंना घाबरायची. मी एक व्हाॅईस प्लेयर तिथल्या फुलदाणीत लपवून ठेवलं. त्यात भूतांचे आवाज टाकलेले होते. माझा त्याचवेळी लाईट बंद करण्याचा पण प्लॅन होता. पण आयत्यावर माझी सेंट्रल एक्झाम कडमडली नि मी गेले दिल्लीला त्याच संध्याकाळी. माझा प्लॅन फिस्कटला.

माझा तिला मारायचा प्लॅन अजिबात नव्हता हो.... कशीही असली तरी ती माझी एके काळची मैत्रिण होती. फक्त तिला घाबरवून तो गाळा सोडायला भाग पाडायचं होतं. पण ते झालंच नाही मी दिल्लीला होते तेव्हा. तिचे लाल केस कोणी कापले, ती कशी मेली, हे मला काहीच माहीत नाही. मी तर तिथे नव्हतेच.

मी इथे येणार नव्हतेच. माझा खरं सांगायचं तर लपून राहण्याचा विचार होता. पण काहीतरी अदृश्य मला जगून देत नाहीय... हे माझे केस... आधी काळे होते, पण आठवड्या भरातच ते मीनासारखे झालेत........ रक्तासारखे लाल...!..
ती भस्म फासलेली, जटाधारी भयानक लोकं.......!आधी ती लोकं ती लोकं रोज माझ्या स्वप्नात यायची..... परवापासून माझ्या आसपासही दिसायला लागलीत... ते म्हणतात......'तुझी मैत्रिण आलीय इथे, आता ये तूही ते त्या कालभैरवाच्या सेवेला!! ती रूधिरमोदिनी तुझ्या रक्ताची वाट बघतेय........................'

त्या.... त्यांना माझा जीव हवाय..... मला वाचवा हो.......'

एवढं बोलून पूजा ओक्साबोक्शी रडू लागली. कसंबसं तिला सावरलं नाईकांनी.
गुंता आणखीनच वाढला होता, कित्येक वर्षं तेलपाणी न केलेल्या सोनेरी झालेल्या केसांसारखा.

इन्सपेक्टर नाईक तिला म्हणाले, "जा घरी. आराम कर. तु कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नकोस. शहराबाहेर जायचा प्रयत्नही करू नकोस. "

मान हलवून पूजा निघून गेली.

नाईकांना आता याचा थोडा थांगपत्ता लागत होता. आपला संशय खरा असावा, असं मनोमन वाटत होतं. त्यांच्या सुप्त मनाने त्यांना आधीच दिलेली पुर्वसूचना खरी असल्याची दाट शंका आता बळावली होती. ते परत परत आपण बांधलेल्या आड्याख्यांचा विचार करत होते.

तेवढ्यात पूजाला गेटबाहेर सोडून परत आलेले शिंदे इन्स्पेक्टर नाईकांच्या जवळ आले नि म्हणाले,"साहेब, मला वाटतं हिनेच मारलं असावं मीनाला. आता स्वतःवर गदा यायला नको म्हणून साळसूदपणाचा, वेडेपणाचा आव आणतेय. चाल आहे तिची ती. ती दिल्लीला जरी गेल्याचे रेकाॅर्डस् आहेत तरी तिनं कोणालातरी मदतीला घेतलं असणार. बहुधा मीनाच्या सावत्र आईलाच...."

इ. नाईक विचार करता करता म्हणाले, "नाही शिंदे. तिच्या डोळ्यांत मला सच्चाई दिसली. तिचे केसही कलर केल्यासारखे वाटत नाहीयेत. ती बोलतेय त्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. "

मग शिंदेंच्या 'साहेब, तुम्ही आराम करा' या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून इ. नाईक आपल्या भूतकाळाच्या गर्तेत शिरले, ज्यात शिरणं त्यांनी कित्येक वर्षं टाळलं होतं, नव्हे त्या विचित्र भूतकाळातील आठवणींना मुद्दाम वाईट स्वप्न नाव देऊन ते आयुष्याच्या टप्प्यात पुढे सरकले होते ; पण भूतकाळाच्या जखमेची खपली कधीतरी निघायचीच होती....... जे आता गरजेचं होतं.....

क्रमशः

●●●●●●●●●●●●●●●●●●●

तळटीप-
ही कथा पूर्णपणे लेखिकेच्या (पक्षी : माझ्याच) मेंदूवरच्या सुरकुत्यांतून बाहेर पडली असून याचा वास्तविकतेशी काडीमात्र संबंध नाही Happy ... नसावा. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा पसरवण्याचा दूरदूरपर्यंत हेतू नाही. (चुकून) सत्यता आढळल्यास डोळे चोळून परत नीट तपासून पहावे नि येथे नमूद करावे कारण-
काही सत्यं अर्धसत्यं असतात; हे जग मायावी आहे आणि त्यात काही सत्यं लपली आहेत.... नकळत. आणि हेच सत्य आहे................

-द्वादशांगुला

Group content visibility: 
Use group defaults

अर्रे !!
मी वापरलेल्या 'पोरकं' शब्दाचा अर्थ वेगळा होता.. Lol>>>>>>> बापरे... स्वतःच्या लेकरांना (लिखाणाला) वार्यावर सोडता की काय..... शोधा हो आपली चिल्लिपिल्ली!पालक लक्ष देत नाहीत म्हणून भलत्या मार्गाला लागायची!!!! Happy Wink

किडनॅप झालेली " बिर्यानी" सापडल्याच्या सेलिब्रेशनसाठी बिर्यानी का?>>>>>> हो अगदीच..... Happy ये खायला (मीही खातेय आता)

लवकरात लवकर शोधा त्यांना.चुकून नवीन पालकांचा लळा लागला तर कान धरून परत आणायच काम अवघड होईल बरं का!

आमचा मसालेभात खाऊन झाला मगाशी.आईस्क्रीम खातेय आता.ये पार्टी करूया केस सोडवून आपापली पोर खर्या आई वडीलांना परत केल्याबद्दल तुला.

आमचा मसालेभात खाऊन झाला मगाशी.आईस्क्रीम खातेय आता.ये पार्टी करूया केस सोडवून आपापली पोर खर्या आई वडीलांना परत केल्याबद्दल तुला.>>>>>>> ही बघ आलेच...

त्यांचे सगळेच लेख आणि कविता उडवल्या बहुतेक त्यांनी अॅपवरून.पण चुकून त्यांनी स्वतःच्या मनाने लिहून एखादा लेख टाकला असेल तर तोही काढून टाकला असेल.खर तर याची शक्यता निग्लीजीबल आहे.तरीही तसं असेल तर मात्र त्यांनी स्वतःच्या पायावर दगड घातलाय एका चुकीमुळे.

गोष्टीची सुरुवात चांगली झाली आहे. पुढचे भागही लवकर पोस्ट करा.

द्वादशांगुला आणि आदिसिद्धी- मायबोलीवर विचारपूस नावाची जागा आहे प्रत्येकाच्या प्रोफाईलला. जिकडे तुम्हांला पर्सनल गप्पा मारता येतात.

, विपूचा प्रोब्लेम झालाय. अपवाद सोडून आलेल्या मेसेजवर प्रतिसाद देता येत नाहीत. प्रतिसाद द्यायला गेल की वेगळीच लिंक ओपन होते माबोवरची.
काही चुकलं असल्यास माफ करा. पुढच्या वेळी काळजी घेऊ... Sad

हो विपुवर प्रतिसाद द्यायला गेल की वेगळीच लिंक ओपन होते.अॅडमीन सरांना सांगून झाले आहे.चुकल्याबद्दल माफ करा.

१०३ प्रतिसाद ते ही कथेवर दिसल्याने बाफ उघडला . कथा छान आहे .इंटेरेंस्टिंग वाटतेय .पुढचा भाग लवकर टाक

मात्र प्रतिसाद वेगळेच आहेत . सायो म्हणाली त्याला अनुमोदन. वाचण्याऱ्याचा रसभंग होतो अश्याने .

पुढच्या लेखनाला शुभेच्छा

ईंटरेस्टीण्ग आहे कथा !

वेलकम ब्याक द्वादशांगुला जुई

लेखनचोरीचे सुरुवातीला वाईट वाटतेच. मलाही वाटलेलेच. कालांतराने दृष्टीआड सृष्टी म्हणत त्याचा शोध घेणे थांबवणे हेच उत्तम.

अवांतर - माझे संस्कृत कच्चे आहे पण द्वादशांगुला म्हणजे बारा बोटे का? हृतिकला जसे एका हाताला सहा बोटे तसे दोन्ही हातांना सहा सहा बोटे का? आणि हा अर्थ योग्य असल्यास तुम्हाला आहेत का खरेच की काही रुपक अर्थ आहे?

हो.आम्हाला आठवीत एका श्लोकात हा शब्द होता. त्याचा संधी/समासाचा विग्रह केल्यावर त्याचा अर्थ "बारा बोटे असणारा असा तो./बारा बोटे असणारी व्यक्ती" असा होता.

अवांतर प्रतिसादांमुळे ज्या वाचकांचा रसभंग झाला त्यांची मनापासून माफी मागते.दोघींच्याही विपुचा प्राॅब्लेम झाल्याने इथल्या धाग्यावर चर्चा करावी लागली.शेवटी हे चौर्यकर्म उघडकीस आणणे हाच हेतू होता.वाचकांचा रसभंग झाल्याबद्दल साॅरी.

तुझ्या मायबोलीवरच्या नावाचा अर्थ काय आहे?>>>>> वत्सलाजी ऋन्मेष यांनी दिलेला अर्थ 100 टक्के खराय.

आणि हा अर्थ योग्य असल्यास तुम्हाला आहेत का खरेच की काही रुपक अर्थ आहे?>>>>>>>>> हो..... खरंय. मला दोन्ही हातांना मिळून बारा बोटं आहेत... डाव्या हाताला ह्रितिक रोशनसारखं बोट आहे, उजव्या हाताला अंगठ्यालाच एक सरळ बोट आहे. माझी दीदी ह्रितिकची मोठी फॅन असल्याने तिला हे गाॅड्स गिफ्ट वाटतं... Happy मायबोलीवर आयडी काढताना म्हणून हेच नाव टाकलं. मी जिथे जिथे जाते, तिथली छोटी पोरं मला सर्वात आधी ' तुला येवढी बोटं कशी आली?' म्हणून मागे लागतात... आई-बाबा माझं मी लहान असतानाच आॅपरेशन करणार होते... पण सगळ्यांनी विरोध केल्यावर विचार बदलला ...

आणि हो, मला एकेरी बोललेलं जास्त आवडतं नि मी लहान आहे तुमच्यापेक्षा.. अहो-जाहो ने अवघडायला होतं.. Happy

आणि हो, तसे या धाग्यावरचे प्रतिसाद अगदीच फुकट नाही गेलेत असं मला वाटतं, कारण जर उद्या दुसर्या कोणाबाबत असं चौर्यकर्म घडलं, तर बेसिक उपाय इथे नक्की सापडतील... Happy तरीही रसभंग झालेल्या वाचकांची मी जाहीर मनापासून क्षमा मागते ...

लोकांना कथेत नाही तर प्रतिसादात जास्त इंटरेस्ट असतो हे सिद्ध झाले. प्रतिसादात राजकारण नाही, रुंम्याला शिव्या नाहीत, मसाला नाही, चहाड्या चौकशा नाहीत ..रसभंग होणारच ☺️

च्रप्स, तुम्ही ऋण्म्याचा डुप्लिकेट आयडी आहात का? नसाल तर जिथे तिथे त्याला आणायची काय गरज आहे?

द्वादशांगुलाशी सहमत आहे.प्रतिसादांमुळे धागा वाया गेला नाही.भविष्यात कोणाला अशा प्रकारात कही मदत लागली तर इथले प्रतिसाद बेसिक लेव्हल वर उपयोगी असतील.अशावेळी या धाग्याची लिंक बहुधा देता येऊ शकेल.अर्थात जुईची परमीशन असेल तर. असा प्रकार हाताळायची ही पहिलीच वेळ होती.त्यामुळे आधी याला सामोरं गेलेल्या व्यक्तींनी काय केल होत याचा सल्ला घेणं आणि आपण जी कार्यवाही करतोय ते योग्य आहे ना पडताळणे यासाठीच इथे अवांतर चर्चा झाली.

अवांतर मोड आॅन:
प्लीज आता या धाग्यावर "ऋन्मेष" या विषयावर चर्चा नको.ती त्याच्या धाग्यावर करा.नाहीतर अजून काही वेळात धागा150चा टप्पा पार करेल.तीच तीच चर्चा बोअर झाली आता.कोणाला वाईट वाटल्यास माफी असावी.
(सदर पोस्ट ऋन्मेषदादासाठी नाही याची त्याने नोंद घ्यावी.)
अवांतर समाप्त.

सायो + १

रसभंगचा असा अर्थ काढला गेला तर ! लेखन वाचून लेखिकेला प्रोत्साहन देण्यासाठी पोस्ट लिहिले होते की तिने अवांतर पोस्ट मध्ये न गुंतता पुढचे लिखाण लवकर पोस्ट करावे .
जाऊ दे ! यापुढे पोस्ट करणार नाही लेखिकेच्या बाफवर !
चालू देत अवांतर

Pages