ज़िण्याला हेलाकावे देत आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 23 March, 2018 - 13:10

हवा नेईल तिकडे नेत आहे
ज़िण्याला हेलाकावे देत आहे

कसा मी घाट घालू पेरणीचा ?
तणांनी माजलेले शेत आहे

ज़िथे हे विश्व आभासात रमते
तुला सच्चेपणा अभिप्रेत आहे ?

कशाला चाचणी घेते विषाची
कशाला निर्णयाशी येत आहे ?

पुन्हा चुकवून आले खाचखळगे
पुन्हा गाडी रुळावर घेत आहे

कशाला मारते गावास वळसा ?
तुझी कळशी तुझ्या काखेत आहे

तिचे सामान आहे बांधलेले
कळेना काय त्याचा बेत आहे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कशाला चाचणी घेते विषाची
कशाला निर्णयाशी येत आहे ? >> हा शेर सगळ्यात जास्त आवडला.
सर्वच शेर एकदम साधे पण खूप अर्थपूर्ण आहेत.

गझल आवडली ताई. Happy

तुमचे नाव बघून लगेच हा दुवा उघडला.
<<<
हवा नेईल तिकडे नेत आहे
ज़िण्याला हेलाकावे देत आहे

कसा मी घाट घालू पेरणीचा ?
तणांनी माजलेले शेत आहे
>>>
हे वाचून पुन्हा एकदा दमदार वाचायला मिळणार याची खात्री पटली.

<<<
तिचे सामान आहे बांधलेले
कळेना काय त्याचा बेत आहे >>>
राग नसावा, पण यावेळी शेवट अगदीच तडकाफडकी केला आहे, असे वाटले. नेहमीची लय त्यात वाटली नाही.
पुढील लेखनाला शुभेच्छा.

Hee Kavita Nahiy... Gazhaleteel pratyeek sher hee swatantr Kavita asate... Ekach Jaminit aalya Kamitkamee 5 sheranchee eek gazal bante...

Aksharganvruttatil gazhal meter madhye asalyane tichya layibaddal Shanka utpann Hou shakat nahee
Bakee aaplya matanncha Purn aadar aahe.

Dhanywad

Thank you Dakshina