खुला मार्ग नाही तुला गाठण्याचा

Submitted by सुप्रिया जाधव. on 3 March, 2018 - 12:41

नको अर्थ काढू खुळ्या वागण्याचा
खटाटोप चाले तुला जाणण्याचा

अताशा अताशाच धरतेय खपली
नको घाट घालू पुन्हा डागण्याचा

तुझे ओठ वेचू कि डोळ्यात पाहू ?
नवा छंद जडला तुला वाचण्याचा

जखम आग व्हावी अशी घाल फुंकर
नको घाट घालू मलम लावण्याचा

तुझी नोकरी अन उपद्व्याप सारे
बहाणा पुरे हा मला टाळण्याचा

दबावामुळे 'वेस्ट' कंपोस्ट होते
नको घोळ घालू मला गाडण्याचा

तुझ्या आर्त उत्स्फूर्त मिस-यात भेटू
खुला मार्ग नाही तुला गाठण्याचा

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली.

फक्त खालच्या ओळी अनाठायी वाटल्या. हे मा वै म.

दबावामुळे 'वेस्ट' कंपोस्ट होते
नको घोळ घालू मला गाडण्याचा

खुप छान, आवडली .

फक्त खालच्या ओळी अनाठायी वाटल्या. हे मा वै म.

दबावामुळे 'वेस्ट' कंपोस्ट होते
नको घोळ घालू मला गाडण्याचा >>>>> +१