मुलाची शारीरिक वाढ

Submitted by मी _ सुषमा on 28 February, 2018 - 05:18

नमस्कार,

माझा मुलगा ७ वर्षांचा आहे. आम्ही राहतो तिथे त्याच्यासोबत खेळायला मित्र नाहीत आणि शाळेत पण मोठे ग्राउंड नाही. त्यामुळे त्याची चांगली शारीरिक वाढ कशी होईल याबद्दल विचार करतेय कारण मुलं मैदानी खेळ खेळतील तर त्यांची शारीरिक वाढ होण्यास मदत होईल असे मला वाटते.

यावर उपाय म्हणून मी मुलाला क्रिकेट नाहीतर फुटबॉल coaching classes लावायचं विचार करतेय. पण क्रिकेट कि फुटबॉल हे ठरवता येत नाही.

तरी मला प्लीझ मदत करा निर्णय घायला. तसेच अश्या स्पोर्ट्स COACHING व्यतिरिक्त इतर काही मार्ग असल्यास ते पण सुचवा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावर उपाय म्हणून मी मुलाला क्रिकेट नाहीतर फुटबॉल coaching classes लावायचं विचार करतेय. पण क्रिकेट कि फुटबॉल हे ठरवता येत नाही.>>> अजुन बरेच खेळ आहेत...badminton, tennis, swimming, gymnastics, basketball, biking, dance. त्याला कशात आवड आहे त्यानुसार ठरवा. नाहीतर त्याला classचे ओझे वाटेल.

मुलाची आवड आणि चांगला कोचिंग क्लास याचा मेळ बसला पाहिजे.. जर मुलाला पोहण्याविषयी कुतूहल असेल पण जवळ तरणतलाव नसेल तर... सात वर्ष अजून लहान आहे मुलाला आवड निर्माण व्हायला..

सुरवातीला मी माझ्या मुलांना उन्हाळाच्या सुटीत पोहण्याला पाठ्वलेले... हिवाळ्यात फुटबॉल आणि पावसाळ्यात इन्डोअर बॅड्मिंट्न... आता १०
वर्षाचा झाल्यावर त्याला आवडीनुसार फुटबॉल कोचिंग क्लासला पाठवितो.. बाकिचे खेल तो सोसायटीत खेळतो...

मुलगा मस्तीखोर/ चंचल असेल तर फुटबॉलला पाठवा.. क्रिकेट किट्साठी खर्च जास्त येतो... आणि सगळ्यांना खेळण्यासाठी वेळ कमी मिळ्तो..क्षेत्ररक्षणांत मग वेळ जातो...

सोनाली, देवकी आणि राजू प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद !!!

सोनाली जी तुमच्या मार्गदर्शनामुळे, मला अजून नवीन पर्याय मिळाले.
खरेतर मी ठाणे जिल्हातील अंबरनाथ येथे राहते , त्यामुळे बॅडमिंटन, टेनिस, जिम्नॅस्टिकस, बास्केटबॉल साठी चांगले classes शोधावे लागतील कारण अंबरनाथ मध्ये असे classes नाही.

राजुजी तुम्ही बोलता तसे, मुलाच्या आवडी बद्दल बोलणार तर त्याला अजून एकाद्या खेळाची खास अशी आवड नाही. तुम्ही बोललात "सुरवातीला मी माझ्या मुलांना उन्हाळाच्या सुटीत पोहण्याला पाठ्वलेले... हिवाळ्यात फुटबॉल आणि पावसाळ्यात इन्डोअर बॅड्मिंट्न." मी पण असेच काही करून बघते.

माझा मुलगा मस्तीखोर आणि चंचल आहे, म्हणून क्रिकेट व्यतिरिक्त बॅडमिंटन, टेनिस, जिम्नॅस्टिकस, बास्केटबॉल माहिती काढते.

कृपया, कोणाला अंबरनाथ जवळील बॅडमिंटन, टेनिस, जिम्नॅस्टिकस, बास्केटबॉल कलास ची माहिती असलास share करा

या वयात कुठला खेळ शिकायला मिळतोय यापेक्षा शारीरिक क्षमता वाढण्यासाठी चांगला व्यायाम कोण करून घेतंय हे बघणं जास्त महत्त्वाचं ठरेल असं मला वाटतं.