मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - गोष्ट तशी छोटी - २८ फेब्रुवारी २०१८

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2018 - 22:08

गोष्ट तशी छोटी
कथा प्रकारातला हा प्रकार सर्वाना माहीत झालाय. अतिशय छोटी कथा काहीजण ह्याला सुक्ष्मकथा म्हणतात इंग्रजीमध्ये टेन वर्ड्स स्टोरी, हंड्रेड वर्ड्स स्टोरी अश्या नावांनी ओळखलं जातं.
नेहमीच्या कथाप्रकरापेक्षा ह्या कथाप्रकारचं स्वरूप वेगळं असतं. नेहमीच्या कथा ह्या सुरवात, गाभा, शेवट ह्या प्रकारात असतात पण ह्या प्रकारात वरवर पाहता कथा जरी वाटत असली तरी ते एखादं वाक्य असू शकेल, बातमी असेल, संवाद असतील, बोधकथा असेल किंवा अजून काही. मोजक्याच शब्दामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त कथा लपलेल्या असतात. थोडा विचार केल्यास काही शब्दांमागे कथा समोर येईल. अश्याच शब्दांमागे लपलेल्या कथा तुम्हाला लिहायचीय.
खेळाचे नियम -
१) आम्ही एक शब्दसंच देऊ, त्यातले सगळे शब्द तुमच्या कथेत आले पाहीजेत.
२) कथेसाठी शब्दमर्यादा - कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त १०० शब्द
३) एक आयडी एकापेक्षा जास्त कथा लिहू शकतो.
शब्दसंच -
कॉलेज, कट्टा, पुस्तक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकरांनो, मोठ्या संख्येने खेळात सहभागी व्हा आणि खेळाचा आनंद लुटा Happy

आज कॉलेजमध्ये रियुनियन होतं. पाच सहा वर्षात पहिल्यांदाच आलेलो इकडे. सगळं जसच्या तसं होतं सगळं. एकेक पाऊल पुढे टाकताना त्या जागेवरच्या प्रत्येक गोष्टी आठवत होत्या. ह्या बाजूच्या पायऱ्या म्हणजे आमचा कट्टा होता. एकदा तिथे कोण बसायचं याच्यावर वाद झाला असता आम्ही तिथे दगडाने नावं कोरुन जागा आमची करून घेतलेली. कट्टा म्हणजे आमचं दुसरं घरच होतं. कोलेजतला बऱ्यापैकी वेळ इथेच घालवायचा. एक दिवशी अश्याच मजा मस्ती चालू असताना ती आलेली. उंच, काळेभोर लांबडे केस, गोरी, डोक्यावरती चौकोनी गॉगल आणि हातात निळ्या कवरचं जाड पुस्तक पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडलेलो. पुढली दोन वर्षे तिला बघण्यातच गेली पण प्रेम व्यक्त करायची हिम्मत झाली नाही. आज आली असेल का ती??

कॉलेजमध्ये आम्हा काही मैत्रिणींचा ग्रुप होता. सर्व लेक्चर्सना हजेरी आमची. मला नुसती पुस्तकं वाचून कधी काही समजलं नाही. मला आमचे सर, मॅम शिकवायच्या आणि नोटस द्यायच्या तेव्हाच कळायचं. मला आवडायचं त्यामुळे मी फार क्वचित कट्यावर असायचे, कधी लेक्चर नसेल तेव्हा. माझ्या मैत्रिणीपण सेम. त्यामुळे आम्हाला चिडवायचे काही जण, दप्तर घेऊन येतात, सर्व वह्या आणतात. पुस्तकातले किडे पण मी नव्हते पुस्तकातला किडाही आणि हुशारही. तशी सामान्यच. पण हे चिडवणारे काहीजण परीक्षा जवळ आली की आमच्याकडे नोटस मागायचे. आम्ही उदारहस्ते द्यायचो. अजूनही मला माझं कॉलेज आणि ते दिवस आठवतात.

खरं तर काॅलेजचा आणि माझा प्रॅक्टिकल्स सोडले तर फारसा संबंध येत नाही.पण मी आणि आमच्या ग्रुपने आमच्या कट्ट्यावर वेगळा उपक्रम सुरू केला होता. ग्रुपमधल्या कोणाच्याही वाढदिवसाला आम्ही एक पुस्तक भेट देतो.ही गोष्ट शिक्षकांना माहीत असेल अस स्वप्नातही वाटल नव्हत.9 सप्टेंबरला मैत्रीणीच्या वाढदिवशी तिला भेट देताना कट्ट्यावर आमच्या मुख्याध्यापिका आणि चार शिक्षीका तिथे आल्या .मुख्याध्यापिकानी माझ्या खांदायावर हात ठेवला.मी दचकून मागे बघीतल तर त्यांनी मला प्रेमाने जवळ घेवून पाठीवरून हात फिरवला.न बोलताही त्यांचा स्पर्श खूप काही सांगून गेला.त्याच्या मायेचा स्पर्श मला पवित्र आणि आश्वासक वाटला.तिथेच मी सुरू केलेल्या उपक्रमाच यश मला मिळालं.