मराठी भाषा दिन २०१८ - उपक्रम - आली लहर लावला पोस्टर

Submitted by मभा दिन संयोजक on 15 February, 2018 - 00:00

आली लहर लावला पोस्टर

एक आटपाट नगर होतं. नगरातल्या (कोणत्याही!) गल्लीमध्ये ह्या महिन्यात लावलेलं हे पाचवं पोस्टर होतं. एकाच खांबावर सोयीनुसार आधीचं पोस्टर उतरवून नवीन पोस्टर चढवायचं हा जणू कार्यकर्त्यांचा दिनक्रमच झालेला. आधी जाहिरात, आमदार, खासदार ह्यांच्या वाढदिवस वगैरेचे पोस्टर लागायचे आणि गल्लीतले नेते शुभेच्छूक असायचे. आता गल्लीतल्या नेत्यांचा पोस्टर असतो आणि चड्डीतली पोरं त्यावर शुभेच्छूक असतात. रोज तीच तीच पोस्टर बघून कंटाळा आला आहे.

म्हणून यंदाच्या मराठी भाषा दिन उपक्रमात घेऊन आलो आहोत - विनोदी पोस्टर्स बनवा उपक्रम.बड्डे, पुरस्कार, निवडणूक प्रचार तुम्हाला आवडेल त्या घटनेवर पोस्टर बनवा.

उपक्रमाचे नियम :

१) तुम्हाला एक पोस्टर बनवायचं आहे. त्यात ऑडिओ, व्हिडीओ चालणार नाही. फोटो, चित्रं चालू शकेल. मात्र ती तुम्ही काढलेली किंवा प्रताधिकारमुक्त असावीत.
२) एका प्रतिक्रियेत एकच पोस्टर असावे.
३) पोस्टर विनोदी असावे पण सभ्य भाषेचा वापर करावा.
४) पोस्टरला शब्दमर्यादा नाही.
५) प्रवेशिका देण्यासाठी मराठी भाषा दिन २०१८ ह्या ग्रुपाचे सदस्यत्त्व घेऊन, त्यात 'लेखनाचा धागा' काढावा.
६) धाग्याचे शीर्षक - आली लहर लावला पोस्टर - <<< घटना >>>> - <<< आयडी >>>> ह्या प्रमाणे द्यावे.
७) एका आयडीने कितीही पोस्टर्स देता येतील.
८) या उपक्रमातील धागे २७ फेब्रुवारी २०१८ ते २ मार्च २०१८ या दिवसांतच काढावेत.

चला तर मग. सरसावा आपल्या बाह्या. कळफलक तर तुमच्या हातात असेलच. मायबोलीने वसा घेतला आहे. ती उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, याची काळजी तुम्हालाच करायची आहे. तेव्हा करा सुरुवात लिहायला.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे.. ईथे टाईमपास होईल..

बाय द वे असे पोस्टर बनवतात कसे? कोणते ऑनलाईन सॉफ्टवेअर कामाला येते का? कोणी तांत्रिक बाबींची माहीती शेअर केली तर जास्तीत जास्त लोकं या उपक्रमात भाग घेऊ शकतील..

बाय द वे असे पोस्टर बनवतात कसे?
नाही बनवता येत
कोणते ऑनलाईन सॉफ्टवेअर कामाला येते का?
हो पण फार महाग येते अमेरिकामधून आयात करावे लागते
कोणी तांत्रिक बाबींची माहीती?
ही माहीती फार सििक्रेट असल्याने शेअर करत नाही

त्यापेक्षा ॠन्म्या भाग नकाोच घेऊस Wink