गर्ल्स हॉस्टेल मधलं भूत

Submitted by रुतु.. on 22 February, 2018 - 00:56

गर्ल्स हॉस्टेल मधलं भूत
"आई ते बघ जागो-जागी होस्टेलची दिशा दाखवणारे बाण, हॉस्टेल जवळ आलं वाटतं " .आनंदाने नेहा बोलली .गाडी हॉस्टेल चा दिशेने धावू लागली .पुण्याचा यशश्री नगर मध्ये जुने प्रख्यात इंजिनीरिंग कॉलेज आणि गर्ल्स हॉस्टेल होतं .एका प्रशस्त फाटकात गाडी शिरली .हिंदी सिनेमामधे असते ना तसंच अवाढव्य कॅम्पस ..मुली पण शॉर्ट पँट्स ,मिनीज मध्ये किती बिंदास वावरत होत्या ."सही यार मी पण असेच कपडे घालीन इथे "नेहा आपल्याला सोडायला आलेल्या मैत्रिणीचा प्रियाचा कानात कुजबुजली .तिने हि नेहाचा आईचं लक्ष नाही याची खात्री करून आपला अंगठा दाखवून त्यांचा व्हॉटसअँप भाषेत तिची सहमती दर्शवली .
नेहाचा घरचं वातावरण म्हणजे सनातनी आणि औपचारिक होते ;बारावी पास झाल्यावर नेहाने इंजिनीरिंगलाच ऍडमिशन घ्यायचे असे तिचा कुटुंबीयांनी ठरवले होते .पुणे आणि नगर अशा दोन ठिकाणचा इंजिनीरिंग कॉलेज मधे नेहाचॆ नाव आले होते . नेहाला या दोन्ही पैकी एका कॉलेजची निवड करणं भागच होतं . मुळात मुंबई ची राहणारी असल्या मुळे मुंबई पासून पुणे जवळ आहे म्हणून पुण्याले सर्वात नामांकित कॉलेज निवडून कुटुंबीयांनी ऍडमिशन चा शिक्का मोर्तब केला .नेहाचे वडील चकित्सक आणि भयंकर रागीट स्वभावाचे होते .घरचांचा रागाचा उद्रेकाला नामणाऱ्या कित्येक मुली असतीलही पण, जे कडक शिस्तीचा विरुद्ध जाऊन अजूनच वाहियात मित्रमैत्रिणी करून मजा मारायचा प्रयत्न करतात त्यातली नेहा एक होती .घरचे वातावरण इतके कडक शिस्तीचे ठेवूनही शाळा, कॉलेज,शेजार-पाजार सगळी कडून तिचा वागण्याचा तक्रारी घर गाठायचा . तिचा बेलगाम स्वभावाला घाबरून तिची आई सतत तिचा मागावर असायची .नेहा आता मोठी होत होती तिला स्वतःची " सो कॉल्ड space हवी होती". आपण पुण्याला घरा पासून लांब राहणार हे ऐकून तिचं आकाशच ठेंगणं झालं .

हॉस्टेलचा मेन कार्यालयामध्ये दाखल होताच तिकडची अपूर्वाई नेहा पाहताच राहिली. बाबा रूम ची किल्ली घेऊन सर्व ऍडमिशन फॉर्मॅलिटी करून नेहाची बॅग ओढत पहिल्या मजल्यावर तिचा हॉस्टेलचा खोली कडे निघाले .नेहा ला खोली मधे स्थायिक करून काही वेळा नंतर सर्व मुंबई ला रवाना झाले .

नेहाने त्यांची गाडी कॅम्पसचा बाहेर जाताना पहिली आणि ओरडली "ए ...हिप हिप हुर्ऱ्हा ..गेले ...आज में उपर अस्मा नीचे ..आज मे आगे ...SSSSS " तिचा STYLE मध्ये आनंदीआनंद व्यक्त करून थोडा आराम करून ती रात्री आठ वाजता जेवायला हॉस्टेलचा मेस कडे निघाली.कुणी मैत्रिणी झाल्या नव्हत्या कुणी रूम मेटहि आलं नव्हतं ..बाबांची अडवणूक नाही नातेवाईकांचे फुकटचे सल्ले नाहीत आई चा नजरेचा पहारा नाही मस्त मोकळा श्वास घेता येत होता. .मेस मधल्या जेवणाला आईचा हातचा जेवणाची सर नव्हती तेव्ही तिला थोडीशी घरची आठवण आली खरी , तरीही रमत गंमत जेवण पूर्ण करून ती रूम वर निघाली .

"रूम नंबर :३०२" तिने ऐटीत वाचमेंनला सांगितलं आणि उगीचच रूमची चावी गोल फिरवत पहिल्या मजल्यावर दाखल झाली."अरे पहिल्या मजल्यावर किर्रर्र शांतता ..संपूर्ण अंधार मगाशी मागे असलेल्या मुलीही आता मागे नव्हत्या .तिला भीती वाटायला लागली पूर्वी X ZONE ,अह्ट सारख्या भुतांचा मालिकां मध्ये असेच हॉस्टेल असायचे . ती मनात पुटपुटली भीतीने सावधानपूर्वक पावले टाकत ती तिचा खोलीचा दिशेने निघाली .स्वतःचाच टाचांच्या सॅन्डलचा आवाजाने तिला अजूनच भीती वाटू लागली .दिवसा उजेडी जिन्यापासून ५ मिनिटे अंतरावर असलेला खोलीचा दरवाजा तिला खूप लांब वाटत होता.कसं -बस मोबाईल चा उजेडात ती कुलूप उघडायला वाकली तर दरवाजा नुसताच लोटलेला होता .आपण कुलूप लावायला कसे काय विसरलो? किल्ली तर हातात आहे म्हणजे मी कुलूप लावलंच होतं .कदाचित मावशी खोली साफ करायला आल्या असतील असा मनाला बजावत ती जीव मुठीत घेऊन खोलीत शिरली .
हाशहुश करत कपाळा वरचा घाम पुसत ती पलंगावर पंख्याखाली बसली .खोलीभर संशयपूर्ण नजरेने पहिलं सर्व सामान जसे चा तसेच होते ,खोलीत कुणीच दिसत नव्हते .थोडावेळा नंतर हिम्मत एकवट्न फ्रेश होण्यासाठी म्हणून बाथरूममधे गेली .चेहेरा धुता धुता तिचे कान सतर्कतेने आपल्या रूम मधला कानोस घेत होते ..तिला जवळच हालचालींचा आवाज आला ती मनातून पूर्णतः घाबरली तिचं काळीज कापू लागलं..खोलीत येताच तिच्या सर्व वस्तू पलंगावर विखुरलेले दिसल्या हे पाहून तिचा तोंडचे पाणीच पळाले तिला दरदरून घाम फुटला हाथ पाय
लटपटायला लागले आणि ती भूत भूत ओरडत दारापाशी जाणार तोच ती धाडदिशी जमिनीवर घसरून पडली ..ती तिथून उठायचा आत तिचा समोर एक मदतीचा हाथ देत एक मुलगी जोरजोरात हसत बोलली " hi मी पल्लवी ..तुझी रूम mate "असा म्हणत एका झटक्यात तिने नेहाला उभे केले " तू जेवायला गेलीस तेव्हा वॉर्डन ने मला रूम उघडून दिला तुझी थोडी मस्करी केली तू तर जाम घाबरलीस यार.सॉरी डिअर "असे बोलुन दोघीहि मनमुराद हसल्या .

पल्लवी अप्पासाहेब सारंजामे ,दिसायला देखणी ,सोलापूर मधल्या सर्वात श्रीमंत घराण्यातली एकुलती एक मुलगी.आई वडिलांचे एका विमान अपघातात निधन झाल्यानंतर तिचा काकाने तिची जवाबदारी घेतली. आपल्या अवाढव्य व्यवसायात दिवस रात्र गुरफटल्यामुळे त्याने तिला लहानपणा पासूनच हॉस्टेल मधे ठेवलं होतं.केवळ सुट्टीत तिला तो घरी आणत असे .आई वडिलांची मायेची उब मुकलेली पल्लवी अभ्यासात कुशाग्र होती खूप संवेदनशील होती त्याच बरोबर नेहा सारखीच मस्तीखोर होती .दोघींची चांगलीच गट्टी जमली .'नेहा थोडी बेलगाम ,बेशिस्त आहे पण, मनाने खूप चांगली आहे "हे पल्लवीचा कधीच लक्षात आलं होतं .एकमेकींचा खूप जवळ आल्यावर नेहाने आपल्या आईवडिलांचा दुस्वास करणे किती चुकीचे आहे हे तिने तिला नीट पटवून दिले .आईवडिलांपासून दुरावणे काय असतं याची समज तिच्यापेक्षा जास्त नेहाला कोण देऊ शकत होतं ?

आईवडिलांचा अति -संरक्षक कवच तोडून पहिल्यांदाच पिल्लू एकटं भरारी मारत होतं . हॉस्टेल मधे निरनिराळ्या लोकांसोबत राहतांना आलेल्या बरे वाईट अनुभवांनी नेहा परिपक्व होत होती.फेसबुक ,ट्विटर सारख्या virtual वर्ल्ड किती बेगडी आणि निरूपयोगी आहे हे पल्लवी नेहा ला वारंवार बजावत असायची .पल्लवी सारख्या अजूनही चांगल्या मैत्रिणींनी नेहाच्या वागण्या बोलण्यातला बऱ्याच वाईट सवयीन बद्दल तिचे कान पिळायचा .हॉस्टेल चा मोकळ्या वातावरणात आणि पल्लवीसारखा मैत्रिणीचा सुसंगती मुळे नेहाचा स्वभाव बदलत होता .घरचांशी मनमोकळ न बोलू शकल्या मुळे भवतीक जगात रमणाऱ्या नेहा ला मन मोकळं करण्या साठी ,तिची मतं,तिचे विचार ऐकणारी हक्काची मैत्रीण भेटली होती .अभ्यासहि अपेक्षे प्रमाणे छान चालला होता .

काही दिवसांनी हॉस्टेल चा मुलींची एका अनाथश्रमाला भेट ठरली होती .अनाथाश्रमाचे नाव होतं " माउली" .तिकडचा मुख्याध्यापिका त्यांना आश्रम दाखवत होत्या .नेहा पहिल्यांदाच अशा ठिकाणी आली होती १५० ते २०० अनाथ मुले तिकडे वास्तव्य करत होती ;इतक्या साऱ्या अनाथ मुलांना पाहून नेहाचे मन विषण्ण होत होतं .काही जन्मदाते त्यांचा पोटचा मुलांना जीवघेणे आजार असल्यामुळे स्वतःची जवाबदारी झटकत त्यांना मृत्यूशी झुंज करायला एकटं रस्त्यावर सोडून निघून गेले होतें तर काही नवजात मुलांना मंदिर ,मस्जिद ,चर्च ,कुणी कचरापेटीतही बेवारस म्हणून टाकून गेले होतें .परमेश्वराने त्या मुलांचा भाळी असे नशीब का दिले असावे कि त्यांचा जन्मदात्यांनी त्याना नासक्या अवयवा सारखे स्वतः पासून कापून मरणा साठी फेकून दिलं होतं .."शी किती घृणास्पद आहे हे विकृत शी ..ssss " .

नेहाचा मनाला हे सर्व असह्य होत होते चटकन नेहा चा डोळ्यासमोर तिचा आई वडिलांची प्रेमळ छवी उभी राहिली .तिला वाटलं आपण किती भाग्यवान आहोत कि आपल्याला आपल्या पालकांचे मायेचे उबदार छत्र लाभले .तिला आई बाबांचा ओरडण्यात ,बजावण्यात,नेहा विषयी घेतलेल्या निर्णयाची डोळसपणे पडताळणी करण्यात प्रेम ,ममता,काळजी जवाबदारी दिसायला लागली .आपण आपल्या आई वडिलांना किती त्रास दिला आहे ,कितीदा त्याचाशी खोटं बोललो आहे कितीदा आपल्यामुळे संस्काराचा नावावर लोकांनी त्यांचा वर बोटे उचलली आहेत ..शी ...किती नालायक आहोत आपण .आपल्याला वेळोवेळी घरचांशी नीट वागायला सांगून दटावणाऱ्या ;आई वडीलांचा मृत्यू पश्चात पोरक्या झालेल्या पल्लवीला पाहून तिला आपण किती चुकिचे वागत होतो याची अजूनच तीव्रतेने जाणीव झाली तिला स्वतःची लाज वाटली.तिचा कंठ दाटून आला उर भरून आले..ती पल्लवी चा दिशेने झपाझप पावले टाकत गेली आणि पल्लवीला घट्ट बिलगली .पल्लवीने एकही शब्द न उच्चारता तिला आपल्या कवेत सामावून घेतला आणि मनसोक्त रडू दिलं. त्या क्षणी शब्दांची गरज नव्हतीच ...

दिवाळी ची सुट्टी लागली होती .नेहा ६ महिन्यांनी ८ दिवसाचा सुटीवर घरी आली.तिच्यातील झालेल्या सर्वांगीण बदलामुळे नेहाचे आई बाबा आश्चर्यचकित झाले ,आनंदाने भरून पावले .त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती अति कडकपणाने आणि अति संरक्षक प्रवृत्ती मुळे आपण तिचा स्वतंत्र जीवावर अतिक्रमण करू पाहत होतो .आपल्या बद्दल आदरयुक्त भीती घालण्या पेक्षा आपण तिचा मतांवर मालकी हक्क गाजवू पाहत होतो ;म्हणूनच कदाचित ती आपल्यापासून लांब जात होती .तिचा स्वभाव दुसऱ्या मुलींपेक्षा खोडकर मस्तीखोर असेलही परंतु तिला रागाने दाबण्या ऎवैजी तिचं संगोपन वेळोवेळी प्रेमाने हळुवारपणे करणे जास्त गरजेचे होते. आपण तिचा मतांना,भावनांना कायम दुय्यम महत्व दिलं .तिचे पालक तर बनलो पण तिचे मित्र होऊ शकलो नाही .हे त्यांना प्रकर्षाने जाणवले आणि त्यांनीही बदललेल्या नेहाचे बदललेले आई बाबा बनायचे मनोमनी ठासले.

मुलांवर मारून- मुटकून पालकत्व गाजवण्या पेक्षा त्यांना त्यांचं व्यक्तिस्वातंत्र्य बहाल करा तरच ते जागातील चड-उताराला सक्षमतेने ,सामोरे जातील ,शिस्त ,संस्कार रुजवावे पण हळुवारपणे कुठेही त्यांचा अतिरेक नसावा ,सक्ती नसावी .बंधनांचा कडक पहाऱ्या पासून लांब करताच त्यांचीच नेहा त्यांना वेगळ्यारूपात गवसली होती.आणि हो ,पल्लवीचे ते शत शत आभारी होते .

नेहाला, "तू एवढी कशी बदललीस ? "असे हसून कोणी विचारलं तर ती मोठ्या गमतीने बोलायची "आमचा हॉस्टेल मध्ये पल्लवी नावाचे भुत आहेत ना भुत तिचा मुळे बदलली ....." आणि एकच हशा पिकायचा..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगले लिहिले आहे. वास्तव जीवनात असेच घडते. घर नातेवाईक सोडून बाहेर एकटे राहिल्यानंतर व्यक्तीमत्व किती प्रगल्भ होते हे थोडक्यात सांगितलेत. अनेकांनी अनुभवलेय देखील. पुढील लेखनास शुभेच्छा Happy

ता.क. : शीर्षक वाचून भूतकथा असेल असे वाटले होते

छान आहे कथा.
घरापासुन दुर राहिल्यावर समजुतदारपणा येतो.
शीर्षक वाचून भूतकथा असेल असे वाटले होते>>> >> मला तर पल्लवी भूत असेल असं सारखं वाटत होतं. Happy

>> मला तर पल्लवी भूत असेल असं सारखं वाटत होतं.

हा हा हा... अगदी अगदी.. आधी तिथे राहत होती वगैरे Happy

खूप छान कथा ..
गम्मत म्हणजे माझं नाव पल्लवी आणि माझ्या बहिणीचं नाव नेहा आहे ... दोन्ही भूतं आहेत Proud

चांगली लिहीलेय
धारपांची गोष्ट समजून वाचायला जाव आणि ती साने गुरूजींची निघावी तस काहीस वाटताय

धारपांची गोष्ट समजून वाचायला जाव आणि ती साने गुरूजींची निघावी तस काहीस वाटताय >>> हा हा.. अगदी अगदी.. जोक्स द अपार्ट, काही पार्ट आवडले. नव लेखक असाल तर लिहीत राहा, लिखाणशैली सुधारत जाते, मी तेच करतो, पुलेशु Happy

काही खास नाही आवडली
पण चांगला प्रयत्न आहे
पुढच्या लेखना साठी शुभेच्छा
पल्लवी