कुकिंग गॅस सिलिंडर लॉक करायचा (कोणी वापरू नये म्हणून) काही उपाय आहे का?

Submitted by स्वप्ना_राज on 8 February, 2018 - 09:49

नमस्कार,

माझ्या एका मित्राचं सेकन्ड होम आहे. तिथे नेहमी कोणी रहात नाही. महिन्या-दोन महिन्यातून जातात. तिथला केअरटेकर कुकिंग गॅस वापरतो असं वाटतं कारण सिलिंडर हलका लागतोय. विचारलं तर नाही म्हणतो. अजून तिथे कॅमेरा लावलेला नाही. तो लावेस्तोवर सिलिंडर वापरता येऊ नये यासाठी काही लॉक मिळतं का ते पहातोय. सिलिंडर काढून दुसर्‍या रुममध्ये बंद करून ठेवणं हा पर्याय आहे पण लिकेजच्या भीतीने ते करायचं नाहिये. काही माहिती असेल तर प्लीज कळवा.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंतर सिलेंडर डिस्कनेक्ट करून खोलित बंद करून ठेवणे हा सगळ्यात सोपा ,सेफ आणि फुलप्रूफ उपाय आहे.

दुसरा उपाय हणजे गॅस शेगाडीला वर झाकण असते (काही शेगद्याना असते) तिकडे छोटे कुलूप लावायची व्यवस्था करणे

सियलेंडर च्या नॉब ला साध्या धाग्याने बांधून ठेवा आणि विशिष्ठ प्रकारची गाठ मारा. फोटो काढून ठेवा.
जर त्याला गॅस लावायचा असेल तर आयदर गाठ सोडावी लागेल किंवा तोडावा लागेल धागा.
चोर पकडला जाईल.

सिलेंडर ओट्याच्या ज्या भागात ठेवला असेल तितक्या पुरते लोखंडी जाळीचा दरवाजा बसवून त्याला मोठे कुलूप ठोकणें.
जाळी बारीक असू दे
आणि सिलेंडर थोडा आतच सरकवून ठेवणे.

आणि सर्वात महत्वाचे किल्ली केअर टेकर कडे देऊ नये Lol

तिथे गेले की गॅस भरपूर वापरतात का ? नाहीतर सरळ परत करायचा(सिलिंडर, कनेक्शन नाही रद्द करायचं) आणि Induction cooktop घ्यायचा चहा-पाण्यासाठी. रिकाम्या घरांत भरलेला आणि कड्याकुलपात सिलिंडर नको.

केअरटेकर ने गरजेपुरता वापरणे अपेक्षित आहे का? तसे असेल तर जेव्हा नवीन लावाल तेव्हा तारीख लिहून ठेवा. महिन्यातून एखाद्या वीकेण्ड चा पूर्ण वापर व केअरटेकर चा अधूनमधून वापर असे धरले तर किती दिवस जाईल याचा अंदाज घेउन त्यापेक्षा खूप लौकर संपला तर लक्षात येइल.

एक वजनाचा काटा घ्या. सिलेंडर कायमच त्या वजनाच्या काट्यावर ठेवा. आणि मग आधीचे वजन वजा नवीन वजन चेक करत रहा.

माझे आईवडील,सुटीतल्या घरातून परत यायचे त्यावेळी सिलिंडर(बंद करून),शेगडी दुसर्‍या खोलीत ठेवायचे.हे बरीच वर्षे चालू होते.घफोडी झाली तर जायला नको एवढाच हेतू होता.

गरजेपुरते वापरले जात असेल, आणि आर्थिक दृष्टीने झेपणारे असेल तर दुर्लक्ष करणे. आपण हॉटेलात गेल्यावर दिमाखात टिप दिली असे समजायचे. Happy

"गरजेपुरते वापरले जात असेल, आणि आर्थिक दृष्टीने झेपणारे असेल तर दुर्लक्ष करणे. आपण हॉटेलात गेल्यावर दिमाखात टिप दिली असे समजायचे. "

सहमत.मलाही असंच काही लिहायचं होतं पण यातून 'सिलींडर गावात ब्लॅक मध्ये विकणे आणि संपला म्हणून सांगून परत रिफिल करुन घेणे' वगैरे विचार डॉक्यात येऊन कंट्रोल केले.

भिती दुसर्‍याकडून सिलींडर वापरला जाणे,खर्च होणे यापेक्षा तो नीट वापरला न जाणे, वार्‍याने गॅस विझून अपघात, गॅस नळी जवळ गरम भांडी याची वाटते.

"गरजेपुरते वापरले जात असेल, आणि आर्थिक दृष्टीने झेपणारे असेल तर दुर्लक्ष करणे. आपण हॉटेलात गेल्यावर दिमाखात टिप दिली असे समजायचे. " >> +१

केअरटेकरचं गावात घर आहे. त्यामुळे त्याने तो सिलिंडर वापरणं अजिबात अपेक्षित नाही. इलेक्ट्रिसिटी वर चालणारा स्टोव्ह् आधी होता पण बर्‍याचदा लाईट्स जातात....विशेषतः उन्हाळ्यात. म्हणून सिलिंडर-शेगडी ही घ्यावे लागले. हे लोक तिथे गेल्यावर स्वयंपाकाला सिलिंडर लागतो तेव्हा तो न ठेवणे हा पर्यायच नाहिये. सिलिंडरच्या नॉबला धागा बान्धून गाठ मारली तरी ती सोडून तो वापरू शकतो कारण गॅस वापरला का म्हणून विचारलं तर तो नाकबूल करतोय. लोखंडी जाळी बसवायचा पर्याय नाही कारण जवळच्या लहान गावात कुठलीही कामं करायला कारागीर उपलब्ध नाहीत.

ह्या कुटूंबाचं सेकंड होम आहे त्यामुळे आर्थिक दृष्ट्या न झेपण्याचा प्रश्नच नाहिये. पण त्याने वापरून वापरून संपवला तर हे लोक तिथे गेल्यावर त्यांना स्वयंपाक करता येणार नाही हे एक. आणि दुसरं आपल्या मालकीची वस्तू हक्क नसताना दुसर्याकडून वापरली जात आहे हा मनस्ताप होतोय हे दुसरं.

सध्या तरी घर लॉक करून ठेवणे हा एकच पर्याय समोर दिसतोय. अ‍ॅट लिस्ट जोवर कॅमेरा लावत नाही तोवर.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!

विजेचा प्रॉब्लेम नसेल तर सरळ इंडक्शन कुकटॉप घेऊन ठेवा. गॅसच्या बदल्यात. तो कुकटॉप कपाटात ठेवून कुलूप लावू शकता

हल्ली 3किलोचा उचलून नेती येईल असा सिलेंडर मिळत त्यात स्टोव्ह देखील अटॅच असतो
जेव्हा सुट्टीला जाणार तेव्हा जाताना घेऊन जा. येताना पुन्हा आणायचा किमान 7-15 दिवस तरी चालेलच

स्वप्ना - हा प्रॉब्लेम सिलींडर पेक्षाही केअरटेकर विश्वासार्ह नाही हा वाटतोय. नॉर्मल केस मधे त्याला तो तेथे असताना चहा व थोडेफार काही करून घेण्याइतका वापर चालेल पण त्यापेक्षा जास्त नाही असे सांगणे आणि अपेक्षेपेक्षा खूपच लौकर गॅस संपला तर त्याला जबाबदार धरणे असे करू शकतात ते. केअरटेकर म्हणून त्याची जी काही जबाबदारी असेल त्यात हे ही आलेच ना.

नाहीतर गॅस चा हा प्रॉब्लेम असेल तर पाणी, वीज वगैरेही बद्दल असू शकेल.

दुसरा केअरटेकर मिळत नसेल तर यालाच बेसिक कंडिशन घालून द्या - म्हणजे जेव्हा ते घर वापरायचे असेल तेव्हा तो संपला नाही पाहिजे वगैरे वगैरे. वर्षातून हे मालक कुटंब अगदी दहा बारा वेळा पूर्ण वीकेण्ड वापरत असेल तरी गॅस वर्षभर पुरायला पाहिजे. त्यामुळे एक ढोबळ अंदाज लावून हे करता येइल.

इथे एक गॅस प्रेशर लॉक देखील आहे, गॅस सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पार्ट वाटतोय हा.

https://www.indiamart.com/rukminicreation/lpg-gas-cylinder-pressure-lock...

https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=8&cad=rj...

वरदा, विजेचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे इलेक्ट्रिसिटीवर चालणारा कुकटॉप आणून फायदा नाहिये. दत्तू, मेघपाल....आधी पोर्टेबल सिलिन्डर + स्टोव्हच आणला होता. पण तो संपत आल्याचं एकदा लक्षात राहिलं नाही आणि हे लोक तिथे असतानाच तो संपला. म्हणून मुंबईच्या घरची जुनी शेगडी तिथे नेऊन ठेवली. तर आता हा प्रॉब्लेम सुरु झालाय.

फारएन्ड, सगळ्या बेडरूम्स लॉक केलेल्या असतात. तो फार तर किचन आणि हॉल वापरू शकतो. त्यामुळे वीज, पाणी वापरण्यात मर्यादा आहेत. तू म्हणतोस तसा विश्वासार्हतेचा प्रश्न आहेच. पण तिथे दुसरा केअरटेकर मिळणं कठिण आहे. त्यामुळे सध्या ह्याला काढणं जमणार नाही. आणि तसं केलं तर तो रागाने प्रॉपर्टीला काही नुकसान करेल ही भीती आहेच. थोडक्यात काय तर....धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. कबाली......बेडरूम्स लॉक्ड असतात. नुसत्या हॉलमध्ये झोपायला कोण तयार होईल असं वाटत नाही.

अनिरुध्द.....लिंक्सबद्दल धन्यवाद! पण ते सिलिंडर लॉक आहे त्याची मिनिमम ८० पिसेस ची ऑर्डर आहे.

सिलिंडर ची किंमत कळली...
समजा त्याने वर्षभरात सिलेंडर संपवला .. वर्षाचे 800 नुकसान.. मंथली 65 धरू आपण.
65 महिना वाचवण्यासाठी किती लोकांचा वेळ वाया जातोय या धाग्यावर...

खरं आहे, पण विषय पैशाचा नाही, कँविनियन्स चा आहे, आपलंच सिलिंडर आपल्या कामात येत नसेल तर ते किती रुपयाचं आहे याने फरक पडत नाही
असो

>>समजा त्याने वर्षभरात

>>समजा त्याने वर्षभरात सिलिंडर संपवला

तुम्ही वापरलाय का कधी सिलिंडर? एक सिलिंडर वर्षभर पुरतो का? तुम्ही पुरवत असाल तर महान आहात. आणि तुम्ही लोकांच्या वेळाची कशाला काळजी करताय? ते करतील ना. तुमचा वेळ वाया जात असेल तर इथे न येण्याचा पर्याय खुला आहे की.

मेघपाल...अगदी बरोबर.
अ‍ॅडमिन....प्लीज हा धागा बंद करता येत असेल तर कराल का? धन्यवाद!

गॅस शेगडीचे बर्नर इसिली वेगळे होतात, ते काढून कपाटात ठेवणे

हा सिम्बा यांनी सुचविलेला पर्याय विनाखर्च अंमलात आणता येईल. अजून कशाला चर्चा हवी?

अहो सेकंड होम आहे ना.. तुम्ही महिन्या दोन महिन्यातून जाताय.. म्हणून म्हणालो 1 सिलेंडर वर्षभर संपेल..
आता तो केयरतेकर हुशार असेल तर हळूहळू संपवत असेल ना म्हणजे तुमच्या मित्राला कळू नये म्हणून.
बादवे - दोन महिन्यातून किती दिवस स्टे असतो.. करण असे पण असू शकेल की तुम्हीच जेवण वगैरे बनवताना गॅस जो वापरला जातोय नेक्स्ट टाईम तो वजा करून हलका लागत असेल.

च्रप्स, तुम्ही डेव्हलपर असाल तर बरोबर रोल मध्ये आहात. टेस्टर कसा मूर्ख आहे आणि सेटपच कसा बरोबर नाही असा रिस्पोन्स झालाय तुमचा. कस्टमर सपोर्ट मध्ये मात्र अजिबात काम करू नका. Light 1

is it not possible for your well-off friend to share his resources with the care taker? have a calm talk with the ct and understand his needs. Give him additional responsibilities in lieu of use of gas. Think of it like protection assurance towards the property. Your friend is having trouble letting go. but gas saath leke toh nahi ja sakta?!

८१-८२ ते २००९ पर्यंत माझे आई वडील ,गॅस सिलिंडर आणि शेगडी बेडरूममधे आणून ठेवत असत.घरात कोणीही केअरटेकर नव्हता तरी अति सावधानी म्हणून.पण दोनदा घरफोडी झाली त्यावेळी हे उपयोगी पडले.

तुमच्या मित्राकडे केअरटेकर आहे,त्यामुळे वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे रेग्युलेटर काढून ठेवणे बेस्ट आहे.

रेग्युलेटर काढुन घ्यावे. मग एक अशा व्यासाचे भांडे / गोल डबा घ्यावा जे वरच्या गोल तबकडीतून आत जाईल आणि बाजूने आडवे बाहेर काढता येणार नाही. मग वरच्या गोल तबकडीला प्रवासात सामानाला लावायला साखळी वापरतात तशी साखळी वापरुन गुंडाळुन तिला कुलुप ठोकावे जेणे करुन ते भांडे / डबा वरुन बाहेर काढता येणार नाही.

ज्यांनी प्रॅक्टीकल उपाय सुचवलेत त्यांचे मनापासून आभार. केअरटेकरसोबत रिसोर्सेस शेअर करणे किंवा त्याचा पगार वाढवणे असले उपाय ज्यांनी सुचवले आहेत त्यांना एव्हढंच सांगणं आहे की ताब्यात असलेल्या गोष्टीचा गैरफायदा घेणे ही एक प्रवृत्ती असते, त्यावर असले 'गांधीवादी' उपाय करून काही उपयोग होत नाही. चोरून एखादी गोष्ट करणे आणि ती नाकबूल करणे हे वाईट आहे. त्याचं कुठल्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही.

असो. ही माझी इथली शेवटची पोस्ट. पुन्हा एकदा सर्वांचे आभार!

स्वप्ना_राज, रिसोर्सेस शेअर करणे आणि पगार वाढवणे असले उपाय सुचवणे मूर्खपणा आहे हे मान्यच. पण रणकंदन होण्याआधी ते वादी वाक्य समाजवादी/ साम्यवादी करा प्लीज. Happy

hmm. Things sure look different from the caretaker's viewpoint. someday. maybe.

तळे राखी तो पाणी चाखी हा रुल मान्य करुनच अशा ठिकाणच्या केअरटेकरचे पगार ठरवलेले असतात. विकेंड होमच्या थोड्या फॅसिलिटिज आणि उपलब्ध गोष्टींचा थोडा उपभोग केअरटेकर घेतातच आणि घेणारच. त्यावर कंट्रोल करणं खरच अवघड आहे. ही प्रवृती चुकीची हे मान्य, पण मग हे त्याच्या पर्कस मधे अ‍ॅड करुन पगार किंचित कमी करावा. आणि खेडेगावातली लोक इतकी भोळसट असतात कि त्यांच्यासाठी चोरी किंवा गैरफायदा घेणं नसतंच. जसं आपलं घर म्हणतात तसाच त्याचा उपभोगही तेवढ्याच हक्काने घेतात. स्वानुभवाने सांगते कि फार्म हाउसमधल्या भाज्या, फळं, लिम्बु, अंडी इ इ केअरटेकर वापरतातच. त्यावर किती आणि कसं लक्ष ठेवणार? आपण गेल्यावर चांगली सर्विस मिळते, आपल्याकडच्या भाज्या फळं आपल्याला आणि आपल्या मित्रमंडळींना देण्या इतपत शिल्लक ठेवत असेल तर फार मनाला लावुन न घेणंच योग्य.

मनिमाऊ शी काही प्रमाणात सहमत. आमच्या गावीही एक कुटुंब आमच्या घराची देखभाल करते.
वर्षातुन एक्दोनदा आम्ही जातो. आठवडा पंधरा दिवसांसाठी .
मे मधे गेलो आणि सिलेंडर घेतला तर दिसेंबर मधे गेल्यावर वापरायला नसतो.
मे मधे दरवर्षी जातो तेव्हा कुंटुंबातली बाई मदतीला असते.
आणि सगळं कुटुंब जेवायला पुर्ण वेळ आमच्याकडेच. Sad
काही वर्षापुर्वी तर एकुण ८ जण असायचे. ती जरी मदतीला असली तरी एवढ्या माणसांच्या जेवण्याचा खुपच लोड पडायाचा.
आर्थिकही आणि आम्हाला कामाचाही. शिवाय आम्ही गेल्यावर बहिणीला तिच्या मुलांना घेउन बोलाव वेगेरे पण करतात.
मग तिची ४ मुलं आई भाउ मुंबईला आलीत.
साबांना त्यांना नाही म्हणवत नाही.
गेल्यावर्षी आम्हाला साबांच्या तब्येतीमुळे मे मधे जायला जमलं नाही.
मी माझा नवरा दोन मुलांना घेउन जुनच्या पहिल्या आठवड्यात गेलो.
आम्ही पोचलो त्याच दिवशी तिची मुलं मुंबईसाठी निघालेली. तर अगदी २ डझन आंबे मावतात तशा ७-८ पेट्या त्यांनी पॅक करुन ठेवल्या होत्या.
आमच्याच आंब्याच्या. Sad
आम्ही सगळ बघितलं म्हणून अगदी कानकोंडं झालेलं त्यांना.
आम्हाला एका टोपलीय २० एक आंबे ठेवले होते. हे तुमच्या झाडाचे म्हणून.
माझा नवरा किंवा मी एक शव्द ही बोललो नाहीत.
कारण हेच की आपल्या मागे घराची देखभाल करते.
पण नारळ उतरवुन विकायचे. कैरी आंबे घ्यायचे असं करतात.
पाहुणे आले तर बिनधास्त त्यांना घर मोठं म्हणुन रहायला देतात. फॅन लाईट वापरतात.

सस्मित, नाही नाही, तुझे केअर टेकर चुकीचं वागताहेत आणि तुम्ही दोघं शांत का बरं राहिलात? तुम्ही त्यांना गैरफायदा घेताहेत याची जाणीव करुन द्यायला हवी. आमचे केअरटेकर्स कुठे मेथीची भाजी घे, लिंबु / अंडी वापर इतपतच हक्क दाखवतात. अर्थात ही पुण्यातली प्रॉपर्टी असल्यामुळे ते आठवड्यातुन येवुन भाज्या वगैरे देवुन जाऊ शकतात. तुमची जागा गावाला असेल तर तुम्हाला फार लक्ष ठेवणं किंवा तुमच्या वस्तु उपभोगणं सुद्धा अवघडच आहे. तिथे पिकलेल्या केळीचे घड मागवुन घेण्याऐवजी पुण्यात केळी घेणं परवडेल. Lol