मुंबईत आयटी करिअर काउन्सेलरची सर्व्हिस कोणी वापरली आहे का?

Submitted by स्वप्ना_राज on 8 January, 2018 - 03:39

नमस्कार, कोणी मुंबईत आयटी करियर काउन्सेलरची सर्व्हिस (एक्सपिरिअन्स्ड प्रोफाईल साठी) वापरली आहे का? तुम्हाला चांगला अनुभव असेल तर डिटेल्स शेअर करता का प्लीज? धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की कशा प्रकारची सर्विस अपेक्षित आहे? मी पण सध्या पुढे काय? अशा क्रॉस रोडवर आहे, म्हणून विचारले.

करिअरच्या पुढल्या टप्प्याबाबत मार्गदर्शन हवंय. विशेषतः नव्या टेक्नॉलॉजीमध्ये चंचुप्रवेश कसा करता येईल ह्याबाबत. सध्या तरी त्यात एक्स्पिरियन्स नाही म्हणून शिरकाव करता येत नाही. आणि शिरकाव करता येत नाही म्हणून एक्स्पिरियन्स मिळत नाही अशी 'मुर्गी पहले या अंडा' असली गत झालेय.

आयटी क्षेत्रात , नवीन तंत्रात चंचूप्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग आहेत (इतर क्षेत्रातही आहेत पण तुलनेने कमी).
१. ओपनसोर्स : प्रत्येक आयटी तंत्रज्ञानात , ओपन सोर्स मधे जाऊन काम करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यासाठी तुमची फावला वेळ द्यायची, स्वतःच धडपडायची आणि यातून लगेच काही पैसे मिळणार नाहीत याची मनाची तयारी हवी. सध्या चर्चेत असणारी अनेक तंत्रज्ञाने (Cloud, AI, Machine learning, IoT, Big Data, Mobile Apps) ओपनसोर्स मधूनच पुढे विकसीत झाली आहेत आणि त्या प्रत्येकात अनेक ओपनसोर्स प्रोजे़क्ट्स आहेत.
आज जगभरातले भारतीय ओपनसोर्स तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर करतात. पण त्या प्रमाणात ओपनसोर्स ला मदत करणारे भारतीय अगदीच नगण्य आहेत. ज्यांच्या कडे भरपूर वेळ आहे, नोकरी नाही असे नवशिके सॉफ्टवेअर इंजिनियरही , कधी नोकरी मिळेल याची वाट पाहतात पण त्यांना त्या त्या क्षेत्रात अनुभव मिळवण्याची संधी असतानाही , त्यातून पैसे मिळणार नाहीत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. एखादा कवी , त्याच्या कवितांना पैसे मिळत नाही म्हणून कविता करायचे थांबत नाही. एखादा चित्रकार, पैसे मिळाले नाही तरी नवीन चित्रावर काम करून, चांगला चित्रकार होण्याची धडपड करतो. पण आपण (विशेषतः भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियर) दररोज हजारो वेळा ओपनसोर्स तंत्रज्ञान वापरूनही , त्या तंत्रज्ञानात भर घालून आपल्याला अनुभव मिळेल याचा विचारच करत नाही. कुणीतरी पैसे देऊन शिकवतील याची वाट पाहतात . (तुम्ही व्यक्तिश: हा विचार केला असेल पण मी एक सर्वसाधारण निरिक्षण नोंदवतो आहे).
हे मी "लोका सांगे ब्रम्हज्ञान" असे सांगत नाही. काही वर्षांपूर्वी मी एका ओपनसोर्स तंत्रज्ञानाच्या प्रेमात पडलो. त्यात मला काहीच माहिती नव्हती आणि ते माझ्या कामाशीही अजिबातच निगडीत नव्हते. मी सुरुवातीला त्या तंत्रज्ञाना बद्दल माझ्यासारख्या नवीन लोकाना सोपे व्हावे म्हणून डॉक्यूमेंटेशन अद्ययावत करण्यापासून सुरुवात केली. अगदी Readme File अपडेट करण्यापासून. नंतर चाचण्या करण्यात मदत करणे, नवीन त्रूटी शोधून काढणे, त्याबद्दल Bug Report लिहिणे, सोपे प्रश्न सोडवणे, पॅचेस दाखल करणे, युजर ग्रूप अटेंड करणे, त्यात भाषणे देऊन लोकांना माहिती देणे, हळूहळू कोडींग करणे असे टप्प्याटप्प्याने त्यात जास्त गुंतत गेलो. त्यातून मला काहीच पैसे मिळाले नाही. पण एका O' Reilly च्या पुस्तकावर Technical Reviewer म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातून त्या तंत्रज्ञानातल्या नोकरीच्या संधीही उपलब्ध झाल्या. आज मायबोलीही त्याच तंत्रज्ञानाच्या पायावर उभी आहे. मी अजिबात हुशार नाही, अनेक विषय दोनदा दिले आहेत, कसाबसा सेंकंड क्लास मधे ग्रॅजुएट झालो. ज्याने सॉफ्टवेअरचे कुठलेच अधिकृत शिक्षण घेतले नाही, कुठलेही सर्टिफिकेशन नाही, हे करू शकतो तर, इतर कुणीही नक्कीच करून शकेल. मायबोलीचे सुरुवातीचे फाँट ज्यांनी तयार केले , ते पाटील आजोबा , कुठलीही संगणकाची माहीती नसताना , वयाच्या ६५वर्षांनंतर पहिल्यांदा प्रोग्रामिंग शिकले आणि नंतर फाँट प्रोग्रामिंग सारख्या अत्यंत किचकट विषयात घुसले. त्यामुळे प्रोग्रामिंग येत नसले तर ते शिकण्यासाठी, वयाची तक्रार करायला आपल्याला जागा नाही.

बर्‍याच कंपन्या ओपन सोर्स मधे मदत करणार्‍या उमेदवारांना प्राधान्य देऊ लागल्या आहेत.

A new Way to hire.
कंपन्या कशा विचार करत आहेत, नविन उमेदवारात ते काय पाहतात याबद्दलचा हा उत्तम लेख आहे.

ओपन सोर्स मधे सुरुवात कशी करता येईल, तुम्ही सुरुवात केल्यावर त्याचा तुम्हाला कसा फायदा करून घेता येईल याबद्दलचे हे आणखी काही लेख.
14 Ways to Contribute to Open Source without Being a Programming Genius or a Rock Star

How to Contribute to Open Source

How to add open source experience to your resume

Your Open-Source Work Will Get You a Job

२. यू ट्यूब
यू ट्यूब वर शिकण्यासाठी असंख्य व्हिडीयो आहेत. त्यामुळे अनुभव दाखवता येणार नाही, पण वर लिहल्याप्रमाणे ओपनसोर्स ला मदत करण्यासाठी , आधी शिकायची सोय आहे. अनेक फुकट आणि अनेक स्वस्तात ई कोर्सेस उपलब्ध आहेत. काही कोर्सेस सर्टीफिकेशनही देतात.

३. ई बूक्स
हजारो विषयांवर फुकट अनेक ई बूक्स आहेत. काही स्वस्तात उपलब्ध आहेत.

४. युजर ग्रूप/मीटअप्स
हे ग्रूप प्रत्यक्ष अटेंड करण्याचे दोन मोठे फायदे आहेत. एक म्हणजे तुमच्यासारख्या व्यवसाय स्थित्यंतरातून जे अगोदर गेले आहेत त्यांच्या प्रत्यक्ष भेटी होतात, ओळखी होतात आणि काही सोपे मार्ग असतील तर त्यांची माहीती होते . दुसरा फायदा असा की बर्‍याचदा त्या त्या व्यवसायातल्या संधी , इतरांना माहीती होण्याअगोदर तुम्हाला आधी कळू शकतात. मला O' Reilly च्या प्रकाशकांनी अशाच एका युजर ग्रूप नंतर संपर्क केला होता. ग्रूप प्रत्यक्ष अटेंड करण्यात बराच वेळ जातो, पण जर चांगला ग्रूप मिळाला तर तो नक्कीच उपयुक्त ठरतो.

५. इंटरनेट फोरम, मायबोली
इंटरनेटवर हजारो विषयांचे फोरम आहेत. मायबोलीवरही मधून मधून वेगवेगळ्या विषयांवर देवाणघेवाण होत असतेच. तुम्ही जर मोघम लिहण्यापेक्षा , नक्की कोणत्या तंत्रज्ञानात तुम्हाला रस आहे हे लिहिलेत तर त्या विषयावरची माहितगार व्यक्ती कदाचित तुम्हाला इथेच मायबोलीवर सापडेलही.

First of all sorry for typing in english....Ajay very nice post and info. I have experience in manual QA but its 10 years of gap now. Tried for job but didnt get it. Now this seems intresting to gain experience .i want to volunteer for open source projects in QA .

But basic questions..how to find good project for testing ?

I have googled for open source project ..links are like top 10 best open source project . Mostly they are recommending Apache and ubuntu projects.but after reading i didnt understand it much as may be its more technical language.

Please can anybody guide me on this ?

अजय, पोस्टबद्दल खूप धन्यवाद! सध्या मी बिग डेटा आणि मशिन लर्निंग बद्दल वाचत आहे. कोर्स करुन झाला आहे. त्यामुळे इ-बुक्स जसं In Action किंवा o'reilly ची पुस्तकं वाचत आहे. तुम्ही दिलेल्या ओपन सोर्स वर काम करायच्या लिंक्स पाहेनच. पण युजर ग्रुप्स/मीटअप्स बद्दल थोडी माहिती द्याल का? मी डेव्हलपर नाही. प्रोजेक्ट मॅनेजर आहे. त्यामुळे hands-on नाहिये. पण कोड वाचून समजतंय अजूनतरी Happy

@स्वप्ना, मी गेले काही वर्ष meetup.com वापरतो. यावर वेगवेगळ्या विषयाबददल चे तुमच्या भागातील ग्रुप शोधून join होउ शकता. मि काही meetups अटेंड केले आहेत, अनुभव चांगला आहे. यातले काही meetup recruitment कंपन्याच आयोजित करत असतात, त्यामुळे नेटवर्किंग आणि पुढील संधी मिळवण्यासाठी उपयोगी आहेत.

@स्वप्ना_राज
14 Ways to Contribute to Open Source without Being a Programming Genius or a Rock Star
हा लेख पहा . तुम्ही डेवलपर नसला तरी ओपन सोर्स मधे भाग घेऊ शकता. अनेक ओपन सोर्स प्रोजेक्ट्ला , प्रोजेक्ट मॅनेजर लागतात.
हे पहा
https://www.indeed.com/q-Open-Source-Project-Manager-jobs.html
मी ही hands-on नव्हतो. मी तेंव्हा VP Of Engineering होतो. पण नवीन शिकायचेच हा चंग बांधून, मी डॉक्यूमेंटेशन पासून सुरुवात केली. कारण त्या तंत्रज्ञानात मला तितकेच येत होते. नंतर दुसर्‍या एका सेवाभावी संस्थेसाठी मार्केटींग चे काम फुकट केले. त्यातून मला एक CMO चे ही ( पैसे देणारे) काम मिळाले. फक्त कामाच्या अनुभवावरून VP Of Engineering किंवा CTO ला कुणी CMO चे काम देत नाही. पण आपणच आपल्याला "माझी प्रोफाईल अशी आहे आणि माझे करीअर असेच पुढे गेले तरच मी यशस्वी" अशा पिंजर्‍यात अडकवतो. उलट Open Source मुळे, तुमचा इतिहास काहीही असला तरी हव्या त्या विषयात घुसायचे स्वातंत्र्य मिळते त्याचा फायदा करून घ्या.

@अपर्णा_कुलकर्णी
मी असे सुचवेन की मला परत Testing मधेच जायचे आहे असे ठरवण्यापेक्षा मला हे शिकायचे आहे आणि हवे ते काम करायची तयारी आहे असे ठरवून घुसलात तर काही दिवसांनी तुम्हाला तुमची दिशा समजेल (जी कदाचित Testing नसेलही. ती Project Management असू शकेल.

कशात घुसायचे हे ठरवणे मात्र खूप वैयक्तिक आहे. Top 10 trends in Technology in 2018 या विषयावरचे हजारो लेख नेटवर आहेत त्यात कॉमन असलेले तंत्र ज्ञान पाहून त्या बद्दल सर्च केला तर त्या विषयावरचे Open Source Project सापडतील . नंतर https://trends.google.com/trends/ इथे जाऊन कुठले विषय सध्या लोक शोधत आहेत हे पाहू शकता आणि जे विषय चढत्या क्रमाने आहेत त्याला मागणी आहे असा ढोबळ अंदाज करता येऊ शकतो. पण त्यापेक्षाही तुम्हाला तो विषय आवडतो आहे का हे ही मनाशी तपासून पहा.

@महेश
भारतात meetups आहेत. बर्‍याच शहरात वेगवेगळे User Groups आहेत. तिथेही भेट देता येईल.

https://www.coursera.org/ आणि यासारख्या इतर साईट्स वर तुम्ही फुकटात नविन स्किल शिकु शकता. त्यांची फी भरली तर तुम्हाला तुमच्या नावे सर्टिफिकेटही मिळेल. माझी सध्याची कंपनी एंप्लॉयी ने केलेले coursera चे कोर्स प्रमोशन्/इन्क्रिमेन्ट मधल्या "सेल्फ डेव्हलपमेंट" या सेक्शन साठी ग्राह्य धरते. बाहेरुन जॉईन करणार्‍याबद्दल विचारुन बघतो.