रिकर्सिव्ह व्हेरिएशन ऑन अ थीम - इन्स्टंट पॉट - व्हाइट बीन चिकन चिली

Submitted by मेधा on 6 February, 2018 - 10:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

२ पाउंड चिकन ( मी बोनलेस स्किनलेस थाय पीसेस वापरते )
१ मध्यम कांदा बारीक चिरुन - पांढरा असल्यास उत्तम
१ कॅन किंवा साधारण दीड कप शिजवलेले काबुली चणे किंवा कॅनेलिनी बीन्स
तिखट हिरव्या मिरच्या २-३
दालचिनी १- १.५ इंच, लवंग ३-४, वेलदोडे ३-४, मिरी ७-८, तमालपत्र १,
तीळ १ टेबलस्पून
सुके खोबर २ टेबलस्पून
सुक्या मिरचीच्या बिया १- १.५ टेबलस्पून
दही एक टेबलस्पून
बारीक किसलेले आले किंवा आल्याची पेस्ट १ टेबलस्पून
नारळाचे दूध १ कॅन
तेल, मीठ
कोथिंबीर, लिंबू

क्रमवार पाककृती: 

चिकनला आले, दही आणि मीठ लावून मुरवत ठेवा. ३० मिनिटे तरी मॅरिनेशन करता आले तर बेस्ट.
खोबरे, तीळ , मिरचीच्या बिया आणि दोन वेलदोडे एकत्र वाटून घ्या. आधी कोरडेच अन मग थोडेसेच पाणी घालून नीट गंध वाटण करुन घ्या.
इंस्टंट पॉट मधे सॉटे मोड वर तेल तापवून त्यात लवंग, दालचिनी, तमालपत्र, मिरे आणि वेलची घाला. त्यावर लगेच कांदा घालून परतून घ्या. कांदा मऊ झाला की चिकनचे तुकडे घालून परतून घ्या . कांद्याच्या रंग बदामी होऊ देऊ नका.
२-३ मिनिटे चिकन परतून झाले की वाटण घाला. हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन घाला. एक वाटी भर पाणी घाला.
सॉटे मोड कॅंसल करुन झाकण लावा आणि पोल्ट्री ऑप्शन निवडून चिकन शिजवून घ्या.
इंस्टंट पॉटची वाफ निवली की झाकण उघडून चिकन्चे पीसेस श्रेड करुन घ्या. शिजवलेले बीन्स आणि नारळाचे दूध घालून नीट मिसळून घ्या. लागल्यास मीठ घाला. मॅन्युअल ऑप्शन निवडून ५ मिनिटे शि़जवून घ्या .
प्रेशर उतरले की चिली तयार. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून खायला घ्या

वाढणी/प्रमाण: 
सूप म्हणून ६-८ जणांसाठी
अधिक टिपा: 

लालूने कोल्हापुरी पांढरा रस्सा वर आधारित व्हाइट बीन चिकन चिली रेसिपी दिली होती एकदा. ते पहिलं व्हेरिएशन. अलिकडे मी तोच प्रकार इंस्टंट पॉट मधे करते. ते दुसरं व्हेरिएशन. म्हणून रिकर्सिव्ह .

मी पांढरा रस्सा कधी भारतात ट्राय केला नाही. इथे नेटवर वाचून घरी केलाय. त्यामुळे ही रेसिपी किती ऑथेंटिक आहे की नाही मला माहित नाही. एकदा केल्यावर घरच्यांना सगळ्यांना आवडला हा पदार्थ त्यामुळे याला घरी मायबोली चिकन चिली म्हणतात

माहितीचा स्रोत: 
लालूची व्हाइट बीन चिली रेसिपी आणि इंस्टंट पॉट मधले प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटते आहे.
रिकर्सिव्ह शब्द बघून कुठली स्टेप रिकर्सिव्ह लूप मध्ये टाकल्येय बघायला आलो. Happy आता रिकर्शनच्या पुढच्या लूप मध्ये करून बघतो. (म्हणजे चिकनला रिप्लेस करून करून बघतो Proud )

रिकर्सिव्ह शब्दाने मीही घाबरून सकाळपासून उघडली नाही रेसिपी.

लालू ची रेसिपी काही आठवत नाही तेव्हा सध्या हीच रेसिपी पहिल्यांदा बघून इंटरेस्टींग वाटत आहे. आयपी नाही. साध्या भांड्यात करून बघायला हवी ही चिली.
नेहेमीच्या चिलीवर कोथींबीर, कांदा, चीज घालून खातात ते मला फार आवडतं. ह्यावर काय टॉपिंग्ज् घालता येतील ह्याचा विचार करते आहे.

नेहेमीच्या चिलीवर कोथींबीर, कांदा, चीज घालून खातात ते मला फार आवडतं. ह्यावर काय टॉपिंग्ज् घालता येतील ह्याचा विचार करते आहे << ह्या वरही चालेल की, फक्त बीन चिकन चिली व्हाईट असली की झालं. Happy
फोटो प्लिज..
नक्की करुन बघणार

खोबरं, तीळ, खसखस इत्यादी पांढरा रस्सा मसाला) आणि चीज असं कॉम्बिनेशन थोडं वियर्ड वाटतंय मला.

इण्टरेस्टिंग सहज करून बघण्यासारखी दिसते. शिजवल्यावर चिकन श्रेड केल्याचे कधी पाहिले नाही.

रिकर्सिव्ह शब्दाने मीही घाबरून सकाळपासून उघडली नाही रेसिपी. >>> Lol

फा,सूप्स किंवा चिलीमधे टिपिकली असेच शिजवतात मीट. मसाल्यांचा फ्लेवर मीट मधे बरोबर मुरतो आणि मीट बरोबर अंगचे सूप असते तेही डायरेक्ट पदार्थात शिजते.

चिक बनवून ते परत छोल्यात घालायचे हा जरा उपद्व्याप नाही का होत. आमच्या इथे असे चिकन विथ रोटी व छोले विथ भटुरा खायची पद्धत आहे. मी नारळाच्या दुधाच्या ग्रेव्हीतले फर्मास चेट्टीनाड चिकन बनवते. ते नुसत्या गरम बासमती भाता बरोबर मस्त लागते.

आमचे एक जोगळेकर काका ब्लेस हिज सोल. पहिल्यांदा सुनेकडे अमेरि केत गेले तर सुनेने असेच ह्याव त्याव व्हेरिएशन्स करून खायला घातले एक महिन्याने काका म्हणे हे ठीकच आहे पण जेवायचं कधी? ते आठवले.

ते रिकर्सिव बघून मला पन चक्कर आलेली.

शिजवल्यावर चिकन श्रेड केल्याचे कधी पाहिले नाही. >> पुल्ड चिकन , चिकन सूप्स , टाको साठीचं चिकन, अशा प्रकारांसाठी कॉमन आहे.

पदार्थ केला तेंव्हा मायबोलीवर टाकायचा इरादा नव्हता म्हणुन फोटो काढला नाही. नंतर एका मैत्रिणीने रेसिपी विचारली म्हणून इथे पोस्ट करायचा प्रपंच. पुढच्या वेळेस केली की काढेन फोटो आणि इथे टाकेन.

टॉपिंग्स बद्दल - मला पण सावर क्रीम, कॉर्न ब्रेड , स्कॅलियन्स, चेडर चीझ हे टिपिकल चिलीचे सोबती या डिश बरोबर चालतील असे वाटत नाही. कोथिंबीर, आणि लिंबाचा रस हे परफेक्ट लागतात. अगदी कोणाला काही नवीन ट्राय करायचं असेल तर पुदिना बेस्ट .

अमा - परदेशात येणार्‍या मम साबुंची खासियत आहे की नवीन काही ट्राय करायचं नाही किंवा केलं तरी 'हॅ, यापेक्षा फोडणीची पोळी / सुधारस / साधं वरण भात कित्ती भारी' म्हणायचे. त्याकरता त्यांच्या सोल ला ब्लेस करुन काहीही होणार नाही. ब्लेस करायचंच असेल तर नवे नवे पदार्थ बनवणार्‍यांना करा !

नारळाच्या दुधाच्या ग्रेव्हीतले फर्मास चेट्टीनाड चिकन >>> अमा, रेसिपी टाका!!
यापेक्षा फोडणीची पोळी / सुधारस / साधं वरण भात कित्ती भारी' >>> Lol

फोटो तर टाका...
मला मांसाहारी फोटो बघायला आवडतात

परदेशात येणार्‍या मम साबुंची खासियत आहे की नवीन काही ट्राय करायचं नाही किंवा केलं तरी 'हॅ, यापेक्षा फोडणीची पोळी / सुधारस / साधं वरण भात कित्ती भारी' म्हणायचे. त्याकरता त्यांच्या सोल ला ब्लेस करुन काहीही होणार नाही. ब्लेस करायचंच असेल तर नवे नवे पदार्थ बनवणार्‍यांना करा !>>>च्यायला घरोघरी मातीच्या चुली!!! Happy