पेपर क्विलिंग- 4 (गुलाब)

Submitted by jui.k on 2 February, 2018 - 00:00

पेपर क्विलिंग रोझ
maxresdefault_1.jpg
लेखमालिकेच्या भागास थोडा उशीर झाला. वेळात वेळ काढून जमेल तसे भाग टाकते तुम्हाला आवडेल अशी आशा आहे..
पेपर क्विलिंग रोज बनवताना तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात नीटसे जमणार नाही पण 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर नक्कीच छानसं गुलाब बनवता येईल..
1. 10mm क्विलिंग स्ट्रिप घ्या आणि त्याचे टोक स्लोट्टेड निडल मध्ये इन्सर्ट करा.. पेपर 2-3 राऊंड रोल करा.
2. आता कागद 90 ° खालच्या दिशेने वळवा जेणेकरुन तो निडल ला समांतर असेल.
3. रोल करणे सुरू ठेवा मात्र हे करताना काळजी घ्या की कागदाचा बेस खालून घट्ट पाने गुंडाळला जाईल व वरील भाग खुला राहील.
4. 2-3 रोल करून झाल्यावर (स्टेप 2 मध्ये) पेपर पुन्हा टूलला लंब असावा. कागद पुन्हा 90 ° गुंडाळा.
5. हे सर्व करताना काळजी घ्या की पेपर चा बेस घट्टपणे गुंडाळला जाईल व वरील भाग लूज राहील.
6. कागद संपेपर्यंत फोल्ड आणि रोल या स्टेप रिपीट करत राहा.
7. तयार झालेला गुलाब टूल वरून काढा न गरज वाटल्यास फोल्ड रिअडजस्ट करा. शेवटचे लूज टोक गुलाबाच्या तळाशी चिकटवा.
quillingHowtoRose.jpg
(पुढील भागात कशावर tutorial बघायला आवडेल नक्की सजेस्ट करा) Happy
( मी हे सर्व क्विलिंग बनवताना स्टेप बाय स्टेप फोटो काढणे राहूनच जाते तर कधी काढणे शक्य होत नाही त्यामुळे फोटो गूगल वरून घेतले आहेत)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर.

किती गोड !!! मधलं तर कुडी सारखं कानात घालावसं वाटतयं .

Submitted by भुईकमळ on 3 February, 2018 - 12:59>>>>>>>> थँक्स भुईकमळ Happy याचे कानातले बनवू शकतो आपण..

आहा !!!अगदी सुंदर कर्णफुले ...तुझे हात जादूगार आहेत.

नवीन Submitted by भुईकमळ on 3 February, 2018 - 17:01>>>>>> अहो ते कानातले मी नाही बनवले आंतरजालावरून घेतला आहे फोटो.. Happy