बळवंतगड

Submitted by शुभम एडेकर on 28 January, 2018 - 08:19

बळवंतगड
कसारा घाटाचा राखणदार
जिथे निसर्ग सौंदर्य नाही, काही वेळेला कमी उंचीचे म्हणून, काही वेळेला किल्ल्याचे अवशेष नाहीत म्हणून सुद्धा काही किल्ले दुर्लक्षित राहतात. एकीकडे कलावंतीण किंवा कळसुबाई सारख्या ठिकाणी लोक गर्दी करतात आणि एकीकडे काही किल्ल्यांच्या आजूबाजूला पण कोण फिरकत नाही. खूप कमी भटके इथे जाऊन आलेत आणि काही आपला आकडा वाढविण्यासाठी...
कसाऱ्याहुन जवळच आसलेले विहिगाव तिथे असलेल्या अशोका धबधब्यामुळे प्रसिद्ध आहे. विहिगावात प्रवेश करण्यापूर्वी डावीकडे एक फाटा फुटतो. ह्या रास्ता वळणावळणाने वर चढतो. वरती चढल्यावर एक पायवाट डावीकडच्या टेकाडावर जाताना दिसते. हीच पायवाट थेट गडावर जाते. १० मिनिटातच आपण उध्वस्त तटबंदीतून गडावर प्रवेश करतो. माथ्यावर पोचल्या पोचल्या आपल्या दृष्टीत पडतो तो कसारा घाट आणि कसारा घाटाचे सौंदर्य वाढवणारा रेल्वे ट्रॅक चे भोगदे. त्या भोगद्यातून वळवळत येणारी ट्रेन गडावरून खूपच सुंदर दिसते.
गडावर किल्ल्याचे अवशेष फार काही नाहीत. चारी बाजूची तटबंदी मात्र आजतागायत शाबूत आहे. गडाच्या मधोमध नंदी, पिंड आणि देवीची मूर्ती आहे. ह्या मंदिराच्या खालच्याच बाजूला एक टाकं आहे पण तिथे जाण्यासाठी थोडं पुढे जाऊन मग खाली उतरावं लागत. टाक बऱ्यापैकी मोठं आहे पण यात खूप गाळ साचला आहे. गडाच्या शेवटी एक बुरुज मात्र अजून गडाची राखण करत उभा आहे. आणखी गडावर दोन चौथऱ्याचे अवशेष आहेत. बाकी गडावरून किल्ल्याचे काही अवशेष नाहीत.
गडावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य, खोल दऱ्या पाहण्यासारख्या आहेत.
- शुभम एडेकर
#आम्हीभटकेIMG-20180127-WA0013.jpgIMG-20180127-WA0008.jpgIMG-20180127-WA0006.jpgIMG-20180127-WA0009.jpgIMG-20180127-WA0012.jpgIMG-20180127-WA0010.jpgIMG-20180127-WA0007.jpgIMG-20180127-WA0011.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults