हीच खरी समाजसेवा!

Submitted by शोभा१ on 28 December, 2017 - 01:23

नमस्कार! ही लिंक पहा. https://www.facebook.com/akshay.borhade.94043 इथले सगळे व्हिडिओ पहा.

एक मुलगा, अत्यंत निरपेक्ष वृत्तीने समाजसेवा करत असल्याचं कळलं आणि ते “पान” पाहिलं. खरचं आश्रर्य वाटलं. वय वर्ष फ़क्त २१/२२. सहसा या वयात मुलं, मित्रांबरोबर सहली, चित्रपट पहाणे, हॉटेलात मेजवान्या करणे, महागड्य़ा वस्तू खरेदी करणे यात वेळ घालवतात. आणि हा मुलगा, आपल्या सख्या, चुलत, मामे, आत्ये भावांबरोबर व काही मित्रांबरोबर, समाजातील निराधार, रस्त्यावर पडलेल्या, आजारी, मनोरुग्ण वगैरे लोकांच्या सेवेसाठी, सगळी कडे धावत असतो. इतक्या बेकार अवस्थेत ती लोकं जगत असतात, वर्षानुवर्ष अंघोळ नाही, स्वच्छता नाही. ज्यांच्या जवळपासही कोणी फ़िरकत नाही. तिथे जाऊन ही मुलं स्वत: त्या लोकांना गरजेप्रमाणे स्वच्छ करून, कपडे, जेवण, देऊन घरी घेऊन येतात व घरचे लोकही त्यांची सेवा करतात. हा परत दुसया लोकांसाठी पळतो. सातारा, सांगली, नगर, जिथली माहिती मिळेल तिथे जातो.

आपणही रस्त्याने जाताना कधी कधी अशी लोकं आपल्या नजरेला पडतात, पण आपण रस्ताच बदलतो, किंवा नाकाला रुमाल लावून दूर होतो. पण कधी जवळ जाऊन मदत करण्याच कार्य करत नाही.

तुम्हालाही अशी निराधार, आजारी, लोक दिसली तर अक्षयला कळवा.

महत्त्वाची सूचना: ह्या धाग्यावर राजकारण, जातीयवाद अशा प्रतिक्रिया येऊ नयेत. हा धागा फ़क्त आणि फ़क्त मदतीसाठी आहे.

(काही भाग मायबोलीच्या धोरणात बसत नसल्याने संपादीत केला आहे : वेब मास्तर)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म,चांगलं काम करतोय.
पण सगळ्यांना जमेल असे नाही.आमच्या इथे एक भिकारी बाई मरणपंथाला होती,रस्त्यावर.आम्ही जवळ विचारपूस करायला गेलो आणि इतका भयंकर दुर्गंध नाकात शिरला की चक्करच यायला लागली.सगळं मदतीचं अवसान गळून पडले आणि परत माघारी पडलो.ज्यांना जमते त्यांचा टोलरंस जबर आहे.

शोभा,
तुमच्या लेखनातला काही भाग मायबोलीच्या धोरणात बसत नसल्याने संपादित केला आहे.
मायबोलीवर आर्थिक मदतीचे आवाहन फक्त अधिकृत नोंदणी केलेल्या सेवाभावी संस्थांनाच करता येईल असे आपले धोरण आहे. वर दिलेल्या उपक्रमाचीच अधिकृत नोंदणी केलेली सेवाभावी संस्था असेल तर तुम्ही त्या संस्थेच्या नावाने ते परत लिहू शकाल.
वर दिलेली व्यक्ती चांगलेच काम करत असेल यात शंका नाही. पण सोशल मिडीयाचा उपयोग करून काही व्यक्तींनी लोकांच्या चांगूलपणाचा गैरफायदा घेतल्याची उदाहरणे आहेत. (आणि हे तसे नसणारही) पण प्रत्येक आवाहनामागची व्यक्ती तपासणे शक्य नाही. तसे इथे होऊ नये म्हणून व्यक्तीवर आधारित पैसे गोळा करण्याचे आवाहन आपण मायबोलीवर करत नाही.
संस्थेच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचे अजून काही फायदे आहेत. जर हे काम एका व्यक्तिमुळे होत असेल आणि ती आजारी पडली किंवा काही कारणामुळे काम करू शकली नाही तर असे चांगले उपक्रम बंद होतात. संस्थेच्या माध्यमातून ते काम एका व्यक्तीवर अवलंबून न रहाता चालू राहते. देणगीदाराना करसवलत मिळते. मुख्य म्हणजे नोंदणीकृत संस्था असल्यामुळे योग्य ते नियम पाळले जातात. याही गोष्टीचा आपण विचार करावा.

वा, किती छान काम करत आहे हा मुलगा व त्याचा ग्रुप! संस्थेच्या खात्याची माहिती दिली आहे त्यांनी, फक्त अधिकृत नोंदणी आहे का विचारावे लागेल.

संस्थेच्या खात्याची माहिती दिली आहे त्यांनी>>>>>>>>>>>सुनिधी हेच लिहायला आले होते.

"शिव ऋण युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य " हे नाव आहे त्याच्या संस्थेच.