मराठी उद्योगधंद्याला मराठी नाव सुचवा - मराठी तरुणांना मदत करा

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 January, 2018 - 10:36

तीन मराठी मित्र एकत्र येऊन बूक माय हॉटेलच्या धर्तीवर महाराष्ट्रात फिरायला जाणार्‍यांसाठी छोट्यामोठ्या छानश्या घरगुती हॉटेलची व्यवस्था करून देण्याचा व्यवसाय सुरु करत आहेत.
मला त्यांनी अत्यंत घाईघाईत ईतकीच रूपरेषा सांगितली आहे.
पण त्यांना माझ्याकडून पटकन एखादे छानसे मराठी नाव हवे आहे.
आता माझ्याकडूनच का? तर आहेत काही गैरसमज..
पण मला दिवसभरात फार फार तर "विसावा" असेच एखादे हलकेफुलके पण जुनेपुराणे नाव सुचले.
प्लीज तुम्हाला कोणाला या प्रकारच्या उद्योगाला आणखी काही छानसे नावीन्यपुर्ण पण चटकन आवडणारे नाव सुचत असेल तर प्लीज प्लीज लवकरात लवकर सुचवा...
आपल्याकडे वेळ फक्त ४८ तास आहे...
धन्यवाद .!!!!! _/\_

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाफा, हो नक्की. त्यांच्या व्यवसायाला याचा फायदा होणार असेल तर का नाही. सध्या मलाही जास्त डिटेल आज जाणून घेता आले नाहीत. आणि सध्या तो जाहीरातीचा हेतू या धाग्यावर नकोच.
बाकी तिघांच्या आद्याक्षरावरून नाव नको, म्हणजे त्यांना ही कल्पना रुचणार नाही असा माझा अंदाज. बहुधा त्यांना मराठी भाषेचा गोडवा असलेले नाव हवे आहे. म्हणून ते माझ्याकडे आले. असं काही ठेवायचे असते तर त्यांचे त्यांनीच ठेवले असते Happy

दे धक्का, हे नाव टूर्स ट्रॅवल्स वाल्यांना मस्त आहे... चल उतर आणि दे धक्का .. पण आपले तर हॉटेलव्यवस्था आहे.. लै धाबा वगैरे चालले असते कदाचित. पण ते हिंदाळलेले वाटते.

Pepperfry आणि फर्निचर चा काही संबंध नाही पण फक्त catchy weird नाव हा usp आहे. आता किती1 मोठं पोर्टल आहे.
मला हमतुम सुचलं पण मराठी नाही. दुसरं मामाच गावं

Jivhalaa

अतिथी
स्वागत
सावली
विश्रांती
सोबत Lol
विसावा पण छानच आहे.

लय भारी,
फक्कड,
मेजवानी,
निवांत,
पाहुणचार,
सुट्टी

असे काही नाहीये. उगीच काढलेला आहे बाफ. इतक्या कमी वेळात वेबसाइट व मागचे काही ही गो लाइव्ह होउ शकत नाही. मराठी लोके बुकिन्ग .कॉम, ट्रिप अ‍ॅड्वायझर वापरू शकतात की. ओयो रूम्स एअर बी एन बी पण आहे.

बिझनेस प्लॅन ची जरा माहिती द्या. लायसेन्स अ‍ॅप्लाय केले आहे का रूम अ‍ॅग्रिगेटर साइट आहे का होम स्टे आहे.

काही छान नावे आली आहेत. पण अर्थात ती माझी वा ईथे नाव देणार्‍यांची आवड झाली. ज्यांना ठेवायचे आहे त्यांना पोचवतो, आणि त्यांना काय आवडते ते बघतो. यातले ठेवले गेले तर धागा सार्थकी लागल्याचे समाधान आपल्या सर्वांनाच.

Why the business is limited to Marathi people. It should be global with Marathi flavor.
>>>>
अ‍ॅग्री !
पण नाव मराठी म्हणून बिजनेस मराठी लोकांपुरताच असेल असे नाही. महाराष्ट्रात भटकंती करणारी अमराठी लोकंही असतातच की. जर महाराष्ट्रातीलच भटकंती का म्हणत असाल तर कदाचित महाराष्ट्राबाहेरही जावे आणि मोठ्या स्केलवर व्यवसाय सुरू करावा ईतकी उडी घेण्याची त्यांची सध्या हिंमत नसावी. वा तसे कॉन्टॅक्टसही हवेतच ना.

>>>>>>>> असे काही नाहीये. उगीच काढलेला आहे बाफ....... >>>>>> अमा, माझी येथील फेकू ईमेज आणि आपला स्पष्टवक्तेपणा पाहता आपल्याकडून अशीच पोस्ट अपेक्षित होती. मला ना वाईट वाटले ना राग आला. तुर्तास विश्वास ठेवा. ते कठीण गेल्यास डोक्याला एक खाद्य म्हणून या धाग्याकडे बघा Happy

प्रत्यक्षात मी ईथे फारच जुजबी पोस्ट लिहिली आहे हे कबूल. याचे कारण मलाच काल ऑफिस कामात त्याच्याशी फार बोलता आले नाही. किंबहुना काहीच बोलता आले नाही. आणि जरी थोडेफार बोलता आले असते तरी एखादा व्यवसाय सुरु करायला काय करावे लागते याची मला स्वत:लाच अक्कल नसल्याने त्याला काय प्रश्न विचारायचे ते ही समजले नसते. आणि आज तर मी कालच्यापेक्षा बेक्कार बिजी असल्याने हा विषय डोक्यातनाही निघून गेला होता.

असो, आता हे नाव तो कुठे रजिस्टर करणार आहे की वेबसाईट काढणार आहे माहीत नाही. पण दोन दिवसात कळव असे म्हणाला. खरे तर ईथे मदत करणार्‍यांना मदत म्हणून आठवणीने मला ते जास्तीचे डिटेल्स आज त्याला विचारून लिहायला हवे होते. ती चूक झाली. पण पुढे छोट्या मोठ्या स्केलवर त्यांचे जे काही सुरू होईल ते तुम्हाला आणि ईथे या धाग्यावर नक्की कळवेन Happy

असो,
लोकहो, अजून एखाद दिवस वेळ आहे, काही सुचल्यास नेकी कर और सोच मत या हिशोबाने कृपया कळवा Happy

माझी येथील फेकू ईमेज आणि आपला स्पष्टवक्तेपणा पाहता आपल्याकडून अशीच पोस्ट अपेक्षित होती. मला ना वाईट वाटले ना राग आला.
>>>लोल ..शालजोडी तुन मारलीत.. आज झोप येणार नाही त्यांना.

भ्रमण मंडळ
क्लब भटक्या
भटक्यांची भ्रमंती
हायवे ते पायवाट
महाराष्ट्र माझा
गावातले घर ( जर होम स्टे असणार असतील तर)

धन्यवाद, आभार सर्वांचे
उद्या ईथली नावं कळवेन...

च्रप्स, अहो उगाच काही अर्थ काढू नका. माझा तसा काही हेतू नव्हता.

चटकदार

खादाडगल्ली..

आपल्या बापाचं हाॅटेल..

खुशमशीत..

चटणी भाकर आणि बरंच काही ..

Pages