सातारा - वाई - रायरेश्वर भटकंती

Submitted by जिप्सी on 17 December, 2017 - 09:18

सज्जनगड परिसर
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
ठोसेघर

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
रायरेश्वर

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२
सोनकी आणि मागे केंजळगड

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५
मेणवली घाट - वाई

प्रचि ३६

Group content visibility: 
Use group defaults

सज्जनगडावरून टीपलेले लँड्स्केप डोळ्यांना मेजवानी आहेत....खासकरून १ आणि ४. शेवटचे दोन फोटोही उत्तम.

अ प्र ती म फोटुज जीप्सी Happy ... रायरेश्वर पायथ्यावरुनच पुढे गेलात का? वरचे फोटु नाहि डकवले?

क्लासेस घ्या सर.
नेहमीप्रमाणे निव्वळ अप्रतिम रे मित्रा

बिगिनर लेवलचे फोटोग्राफ्स आहेत. त्यावेळेला तिथे हजर असलेला हातात कॅमेरा असलेला कोणीही असे फोटो काढू शकेल. ज्यासाठी फोटोग्राफर कलाकार म्हणून ओळखले जातात ती नजर या फोटोंत कुठेच दिसत नाही. कंपोझिशन नाही, मोमेंट नाही, जीव नाही. तुम्ही इतकी वर्षी फोटोग्राफी करत आहात, आतातरी शिकायला हवी की नाही?

बिगिनर लेवलचे फोटोग्राफ्स आहेत. त्यावेळेला तिथे हजर असलेला हातात कॅमेरा असलेला कोणीही असे फोटो काढू शकेल. ज्यासाठी फोटोग्राफर कलाकार म्हणून ओळखले जातात ती नजर या फोटोंत कुठेच दिसत नाही. कंपोझिशन नाही, मोमेंट नाही, जीव नाही. तुम्ही इतकी वर्षी फोटोग्राफी करत आहात, आतातरी शिकायला हवी की नाही?>>>>>>तुमच्या संपूर्ण प्रतिसादाबद्दल +१००००. खरंय तुमचं मी अजुनही शिकत आहे पण नीटस जमत नाही आहे. नक्की प्रयत्न करेन तुम्ही सांगितल्याप्रमाणे.

बिगिनर लेवलचे फोटोग्राफ्स आहेत. त्यावेळेला तिथे हजर असलेला हातात कॅमेरा असलेला कोणीही असे फोटो काढू शकेल. ज्यासाठी फोटोग्राफर कलाकार म्हणून ओळखले जातात ती नजर या फोटोंत कुठेच दिसत नाही. कंपोझिशन नाही, मोमेंट नाही, जीव नाही. तुम्ही इतकी वर्षी फोटोग्राफी करत आहात, आतातरी शिकायला हवी की नाही?>>>>>>

तुम्ही म्हणता ते काहीही नसेल, पण ते नसणे फक्त तुमच्या कसबी नजरेला दिसते. जिप्सीचे फोटो पाहणारे कित्येक मायबोलीकर जिप्सी भटकतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊ शकत नाहीत. त्याने इथे टाकलेले फोटो पाहून तिथे गेल्याचा फील येतो. फोटो डोळ्यांना सुखावतात, आनंद देतात. अजून काय हवे असते फोटोंमधून?

अबस्ट्रॅक्ट आर्ट ही सामान्याला कळत नाही पण चित्रकला जाणणाऱ्यांच्या दुनियेत तिला अग्रणी स्थान आहे. सामान्यांना राजा रवीवर्माची चित्रे कळतात, डोळ्यांना सुखावतात, आनंद देतात. सामान्यांच्या राज्यात रविवर्मा राजा आहे Happy Happy

वंदन प्लिज जरा अ‍ॅडव्हान्स लेवल चे फोटो टाकता का? म्हणजे ते कसे असतात ते कळेल. आम्ही आपल उगाच जे दिसत त्याला वा वा करतोय.
बाय द वे जिप्सी फोटो नेहमी प्रमाणे अप्रतिम...

जबरी !! एकसे एक फोटो आहेत !
सज्जनगड परिसरातले फोटो भारतातले आहेत असं वाटतच नाहीये. कुठल्यातरी ट्रॅव्हल कंपनीच्या जाहिरातीतले किंवा ब्रोशरमधले युरोप वगैरेचे वाटत आहेत. >>>>

सहमत... सुरवातीचे काही फोटो तर सतत पाहात बसावेसे वाटताहेत. कसली भन्नाट हिरवळ टिपलीय. छाया प्रकाशाचा खेळ अप्रतिम.

वॉव................ जिप्सी (गुर्जी), केवळ अप्रतीम फोटोत आहेत. तुमच्या सर्व फोटोत निसर्ग अचूक टिपलेला असतो. अगदी साध्या साध्या लोकेशन्स ही तुम्ही जिवंत आणि नयनरम्य करून टाकता...........तुमच्या फोटोग्राफीतल्या कसबामुळेच अर्थात!
विशेषतः हे फोटो बघून डोळे अगदी निवले!

वंदन, तुम्हाला गौतम राजाध्यक्ष माहीत असतीलच, आपले सुप्रसिद्ध दिवंगत फिल्मी पत्रकार. जिप्सीने काढलेले बरेचसे फोटो त्यांची आठवण करुन देतात. आणी तुम्ही या फोटोंना बिगीनर लेव्हलचे म्हणताय हे खरच हास्यास्पद वाटते बाकी काही नाही.

बिगिनर लेवलचे फोटोग्राफ्स आहेत. त्यावेळेला तिथे हजर असलेला हातात कॅमेरा असलेला कोणीही असे फोटो काढू शकेल. ज्यासाठी फोटोग्राफर कलाकार म्हणून ओळखले जातात ती नजर या फोटोंत कुठेच दिसत नाही. +++ नजर तपासुन घ्या वंदन..:)

जिप्सी,सर्वच फोटो सुंदर व नेत्रसुखद

(वंदन प्लिज जरा अ‍ॅडव्हान्स लेवल चे फोटो टाकता का? म्हणजे ते कसे असतात ते कळेल. आम्ही आपल उगाच जे दिसत त्याला वा वा करतोय.) आदितीच्या या विचारांशी सहमत.

जो निसर्गातील नजारा पाहताना आनंद मिळतो, नजरेसमोर दूरवरचा निसर्ग उभा राहतो असे फोटो आहेत हे जिप्सी तुझे. बाकी फोटोना तंत्र वगैरे इथे पहायला ही काही स्पर्धा नाही. आणि जिप्सीचे फोटो प्रदर्शनात ठेवले जातात ते मला वाटत तंत्रज्ञान पाहुनच सिलेक्ट होत असतील.

सफाई द्यायची स्पर्धा असल्यासारखे अहमहमिकेने प्रतिसाद आले आहेत. आजकाल भक्तांनाच टिका सहन होत नाही. काय जमाना आलाय देवा?

बादवे. जिप्सी, माझं मत सकारात्मकतेने घेतल्याबद्दल धन्यवाद.

कायेना, विरोधी पक्षात बरेच पी हळद नी हो गोरी किंवा प्यायलीस हळदीवाले दूध पण का नाही झालीस गोरी? अशा मनोवृत्तीचे लोकं असतात. तुम्ही आम्हाला भक्त म्हणा वा सशक्त वा अशक्त, काsssssही फरक पडत नाही, पण तुम्हाला तर साधे तुमच्या विरुद्ध मत दिलेले पण आवडले नाही. Proud

स्वतः तर काही सादर करायचे नाही पण टीका मात्र लगेच करायची. ये नॉ चॉलबे! तुमी बी फोटु टाका की तुमास्नी कोन नाय म्हनलयं, आँ!

मग टाकताय ना फोटो!

सफाई द्यायची स्पर्धा असल्यासारखे अहमहमिकेने प्रतिसाद आले आहेत>>>>>>>

सफाई कसली? कुणी कोणाला देतंय?

तुमचा पहिला प्रतिसाद वाचून तुम्ही खरेच जाणकार आहात असे वाटले होते. लोक ज्या फोटोंना डोक्यावर घेऊन नाचताहेत ते फोटो तुम्हाला बिगीनर लेव्हलचे वाटले. यात वावगे काहीच नाही. तुम्ही तुमच्या लेव्हलने पाहून प्रतिसाद दिला. तुमच्या प्रतिसादावर लोकांनी त्यांचा दृष्टिकोन विशद केला. त्यावर उत्तर म्हणून तुम्ही तुमचे दोन चार फोटो टाकून उत्तम फोटो कसे असतात याचे प्रात्यक्षिक दाखवले असते तर तुमच्या टीकेला काही अर्थ होता असे म्हटले असते.

तुम्ही मात्र थेट भक्तांवर घसरलात.

एनी वेज, ज्याच्या फोटोंवर तुम्हाला इतका आक्षेप आहे त्याने तुमची टीका स्वीकारली, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीय, त्यामुळे पुढे काही बोलायची आवश्यकता मला वाटत नाही.

जिप्सीभौ, शुभेच्छा द्यायच्या राहिल्या होत्या.
पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
फोटोग्राफीबद्दल काही मदत लागली तर संपर्कातून कळवा.
धन्यवाद

नेहेमीप्रमाणे अप्रतिम फोटोग्राफी...
कॅमेर्‍यामागील पारखी नजरेला, कलाकारीला सलाम.... Happy

बिगिनर लेवलचे फोटोग्राफ्स आहेत. त्यावेळेला तिथे हजर असलेला हातात कॅमेरा असलेला कोणीही असे फोटो काढू शकेल. ज्यासाठी फोटोग्राफर कलाकार म्हणून ओळखले जातात ती नजर या फोटोंत कुठेच दिसत नाही. >>>>>>>>> बिगिनर लेवलचा प्रतिसाद आहे. त्यावेळेला तिथे हजर असलेला हाताशी किबोर्ड असलेला कोणीही असे प्रतिसाद लिहु शकेल. ज्यासाठी टीकाकार समीक्षक म्हणून ओळखला जातो तो द्रुष्टीकोन या प्रतिसादात कुठेच दिसत नाही.

बादवे. जिप्सी, माझं मत सकारात्मकतेने घेतल्याबद्दल धन्यवाद >>>>>>>>>>>>> हा हा जिप्सी माफ कर ह्याना ! फोटोग्राफी राहुदेत उपरोध पण समजला नाही

Good

Pages