पन्नास वर्षांआधी एम. एस्सी. अॅटॉमिक सायन्स कोणत्या विद्यापीठात होते?

Submitted by इनामदार on 6 January, 2018 - 01:17

सध्या सांगलीचे हिंदुत्ववादी नेते संभाजी उर्फ मनोहर भिडे चर्चेत आहेत. त्यांनी स्वत:विषयी जी माहिती माध्यमांमधून प्रसारित केली आहे त्यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे लक्ष वेधून घेतात:

वय: 85
शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist)
पूर्वाश्रमीचे काम: फर्ग्युसन महाविद्यालयात फिजिक्स चे प्राध्यापक

तर माहिती अशी हवी आहे कि:

१. जगातल्या कोणत्या विद्यापीठात अॅटॉमिक सायन्स हा विषय आहे/होता? असल्यास त्यात एम.एस्सी करण्याची सुविधा आहे का? विचारण्याचे कारण कि हि पदवी या मनुष्याव्यतिरिक्त अन्य कोणी धारण केल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही. "एम.एस्सी. Atomic Science" असे गुगल केले असता फक्त याच माणसाचे नाव दिसून येते. म्हणजे जगात फक्त या व्यक्तीलाच अशी पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली असावी याचे प्रचंड कुतूहल आहे.

त्यातही विशेष म्हणजे "शिवपाईक घडविण्याच्या कामात गेली ६ दशके पूर्णवेळकार्यरत" असे हे सांगतात. म्हणजे हि पदवी साठ वर्षापूर्वी त्यांना मिळाली. याचा अर्थ ज्या काळात खुद्द आईनस्टाईन सुद्धा अॅटॉमिक सायन्स मध्ये संशोधन करत होता त्याकाळात हे महाशय त्यात Gold Medalist होते.

२. मायबोलीवर फर्ग्युसन महाविद्यालयात शिकलेले अनेक सभासद असतील. त्यात फिजिक्स मधून पदवी घेतलेले सुद्धा बरेच असतील. त्यातल्या कोणीतरी सांगेल का कि हा मनुष्य खरोखर तिथे शिकवायला होता का? (आईनस्टाईन पेक्षा महान व्यक्ती ज्या कोलेजात शिकवायला होती त्या व्यक्तीचे नाव तिथे आजही आदराने घेतले जात असावे अशी माझी भाबडी समजूत आहे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

घ्या.... सोपे आहे, जिकडे "इंटायर पोलिटिकल सायन्स" मध्ये पदवी देतात, त्यांनीच दिली असेल ही पदवी,

झालंच तर आधी MA पार्ट 1 करून MCom पार्ट2 करायची सोय पण काही विद्यापीठे देतात म्हणे.

माझ्या माहितीप्रमाणे विषय atomic science नसून, न्यूक्लिअर फिजिक्स आहे. पुणे विद्यापीठात या विषयात एम.एस्सी करण्याची सोय होती. आता बहुतेक विषयाचं नाव बदललं आहे.

संभाजी भिडे यांचे जवळचे नातलग (बहुतेक ज्येष्ठ बंधू) प्रा. एम. आर. भिडे हे विद्यापीठातल्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. प्रा. मो. वा. चिपळूणकर या दुसर्‍या विभागप्रमुखांशीही माझ्या समजुतीप्रमाणे त्यांचा निकट संबंध होता.

The "High Sparrow" was the leader of the religious sect known as the Sparrows and the newly appointed High Septon. Under his tenure as High Septon, the Faith Militant was reestablished, and the Faith amasses considerable influence over the Iron Throne during the reign of King Tommen I. His real name is unknown. The High Sparrow was immensely serious, threatening, and only occasionally tender.

ह्या गृहस्थांचे नाव ब्राम्हणांत कधीही नसलेले संभाजी कसे? नगर जिल्ह्यातून काही दशकांपूर्वी मनोहर भिडे नावाचे एक प्राथमिक शिक्षक त्यांच्या ' अंगभूत ' "प्रतापांमुळे " गावकर्‍यानी चोप देऊन हाकलून दिले होते , त्यांचा कधीही तपास लागला नाही. असेल असेल एकाच नावाची अनेक माणसे असू शकतात. फेसबूक वर ३ आहेत Happy

ह्या गृहस्थांचे नाव ब्राम्हणांत कधीही नसलेले संभाजी कसे?>>> बाबा आपला गैरसमज होतोय, असल्या ष्टोर्या अफझुल्या बीग्रेड मध्ये पसरवतात. माझ्या ओळखीचे २ ब्राह्मण लोक आहेत 'संभाजी' नावाचे. नंतर नाव बदललेले नाही, जन्मापासून आहे. बाकी त्या भिडेंबद्दल काही माहिती नाही.

सहज धागा उघडला. पाहतो तो एक वर्ष झाले आज. आणि योगायोग म्हणजे हे भिडे यावर्षी सुद्धा आज बातम्यांत झळकत आहेत.

विचारांची लढाई आहे.
<<
Rofl

भिडेच्या अनुयायांनी हिंसक प्रकार केलेत तर ते चालते का? की मुख्यमंत्र्यांनी विनाचौकशी दिलेली क्लीनचिट पुरेशी असते?