बापमाणूस - झी युवा नवीन मालिका

Submitted by संपदा on 20 December, 2017 - 09:02

आज झी युवावरील बापमाणूस ही सिरीअल बघायचा योग आला. रविंद्र मंकणी, सुयश टिळक हे दोघेच ओळखू आले. कोल्हापुरात घडणारी सिरिअल ईंटरेस्टिंग वाटतेय. त्याची चर्चा करण्यासाठी धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला जुना formula वाटला. आज नाही बघितली. अभिनय चांगला वाटतोय सर्वांचा पण पल्लवी आवडली जास्त मला. फार नाही बघू शकणार मी. घरात आणि बाहेर दोन्हीकडे राजकारण. ती सुयश कानातले देतो ती कोण, यांच्या घरात कशी. ती नायिका आहे का त्याची.

आतापर्यंतचे एपिसोडस पाहून 'सरकार' चित्रपटाच्या ट्रॅक वर जातेय असं वाटतंय ही सिरीयल,कमी भागांची असेल आणि थ्रिलर असेल तर चांगली होऊ शकेल.

काल लिहायचे राहिले, की मालिकेचे दिग्दर्शक भीमराव मुडे आहेत.
प्लॉट सरकार सारखा आहे, पण सुयशच्या चुलत बहिणीचा रोल छान आहे. आवाजात दादागिरी आहे आणि तिचे प्लॅन्स काकाच्या विरोधात आहेत, जे ईंटरेस्टींग वाटतेय.

सुयशच्या चुलत बहिणीचा रोल छान आहे >>> ती बेस्ट आहे. पल्लवी पाटील. रुंजीमध्ये पण सुंदर काम केलं होतं तिने, तिथे नायिका होती, माझी भाची त्यात काम करत होती काही महिने म्हणून अधूनमधून ती सिरीयल बघितली होती. संग्राम समेळ तिचा नवरा, तो ही आहे यात. हे मी झी युवा सिरियल्सच्या एकत्रित बाफ वर लिहिलं होतं परवा. पेजवर पण लिहून आले, पल्लवी मस्त करतेय ते.

भीमराव मुडे चं पण तिथेच लिहिलं होतं. कारण सेपरेट bb नंतर आला.

सुयशची नायिका आहे ती 'बनमस्का' मधे होती ना? >>> हो काय. ते दुसरं प्रेमी जोडपं वाली का. अति अल्प बघितली आहे ती मालिका.

पल्लवी चांगलं काम करते पण भाषा तिकडची नाही बोलता येत सगळ्यांना. विशेषत: आनि पानि. ज्यांना भेटायला जाते ते मीराचे बाबा आहेत का.

हो चंपा. तिकडची अशी काही वेगळी वाटत नाहीये भाषा.
बनमस्कामधे तो पुस्तकी भाषा बोलणारा मुलगा, आत्ताचा 'देवाशप्पथ'चा हिरो त्याची नायिका होती आत्ता जी सु.टि.ची नायिका आहे ती.
कालचा भाग थोडा interesting वाटला.

या शिरेलीतला पल्लवी पाटीलचा भाऊ दाखवलाय, आबासाहेब का बाबासाहेब का बापमाणुस त्यांचा पुतण्या; तो माझ्या दादाचा जिग्गी मित्र आहे.. आनंद प्रभु भुरचंडी..

रात्री बघितला एक एपिसोड. टिना तो तुझ्या दादाचा मित्र काम छान करतो पण, एकदम सहज. त्या हिरोपेक्षा हे बाकीचे सर्व जास्त छान काम करतात. त्याची बायको नम्रता आवटे पण काम छान करते पण थोराड वाटते त्यांच्यापुढे. पल्लवी, सुयश आणि रवींद्र मंकणी यांना जास्त काम असेल बहुतेक.

तो right hand दाखवलाय र मंकणीचा तो पण छान करतो, एका चहाच्या ऍड मध्ये बघितलंय आधी त्याला. अनिल कपुर चा एक मुवि होता तब्बु बरोबर तशी स्टोरी वाटते थोडी. परदेशातून महिन्यासाठी आलेला पण घडामोडी अशा घडतात की त्याला थांबावं लागतं आणि कारभार हातात घ्यावा लागतो, असं वाटतं. असो आता परत कधी बघेन माहिती नाही.

रात्री बघितला एक एपिसोड. टिना तो तुझ्या दादाचा मित्र काम छान करतो पण, एकदम सहज. त्या हिरोपेक्षा हे बाकीचे सर्व जास्त छान काम करतात. त्याची बायको नम्रता आवटे पण काम छान करते >>> अगदि अगदि . तो जो हिरो आहे त्याच्या आधीच्या मालिकेतहि तो आवडला नव्हता.

टीना तो पुतण्या झालाय तो म्हणालीस ना, नाव काय ते नाही माहीती मला. पण तो मस्त काम करतोय.>> हो अगं.. तो पल्लवी पाटील(?) का काय तिचा भाऊ दाखवलाय नं.. आणि आय गेस ती सेल्फी क्विन आणि कॉमेडी च्या कुठल्या तरी शो मधे होती ती त्याची बायको आहे असं ताई सांगत होती माझी.. ती पाहत असते वाटत अधुन मधुन... माझं आणि मराठी हिंदी शिरेलींच वाकडच आहे जरा म्हणुन मी बघत नाही..
शेवटची हिंदी शिरेल पाहिली होती ती म्हणजे लेफ्ट राईट लेफ्ट .. त्यानंतर आपल्या इंग्रजीच बर्‍या आणि त्यापन ठिक असल्या तरच पाहते मी नाही तर हुर्र...

टीना मग तोच, सांग बिनधास्त त्याला तो छान काम करतो, एकदम natural.

सुयश रवींद्र मंकणीचा मुलगा आहे. राधा म्हणजे ती गोरी लग्न ठरलेली मुलगी का, ती बहिण आहे त्याची.

जो तो सु.टि.ला तू कशाला घराच्या, गावाच्या भानगडीत पडतोस, तू जा परत अमेरिकेला म्हणतात. का बरं?कळू दे की त्याला त्याच्या घरात काय चाललय ते.त्याने काही विचारलं की लगेच सगळे सिरीयस होतात. विषय बदलतात.
ती मुलगी कोणे त्या वाड्यात राहणारी, ती तर सु.टि ने काही विचारलं की लगेच कावरी बावरी होते.तेवढ एकच काम दिलय तिला.

मालिका मागे जात आहेत, सुनांन्नी साडीच नेसायची, मुलीने ड्रेस घातला तरी चालतो (घाडगेमध्येही असेच आहे) आणि माॅडर्न म्हणजे अगदी तोकडे ड्रेस, उघडी पाठ वगैरे.

होना चैत्राली, ती गीता कोण आहे? तिचं आणि सुयशचं अफेअर आहे का?

चंपा सगळ्या सिरियलमधे लग्न झाल्यावर साडी नेसणं कंपल्सरी असतं. एखादी अपवाद असेल. गेली वीस ते पंचवीस वर्ष शहरात तरी मोस्टली ड्रेसेस घालतात. पण सिरीयल मुंबई, ठाण्यात जरी असेल तरी साडीच.

चंपा सगळ्या सिरियलमधे लग्न झाल्यावर साडी नेसणं कंपल्सरी असतं. एखादी अपवाद असेल. >> जुयेरेगा म्हणूनच आवडायची .

Pages