TED TALKS INDIA - नयी सोच - शाहरूख खान

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 December, 2017 - 12:30

TED TALKS INDIA - नयी सोच
चुकवू नये असा कार्यक्रम !

आमच्याकडे मालिकांचेच पेव फुटले असल्याने, आणि टीव्हीचा रिमोट फक्त क्रिकेट मॅचलाच माझ्या हातात (फक्त स्कोअर चेक करण्यापुरता) येत असल्याने सध्या मी हा कार्यक्रम ईथे बघतोय.
http://www.hotstar.com/tv/ted-talks-india-nayi-soch/15930

हा पहिला एपिसोड माझा बघून झालाय.. आवडला.
http://www.hotstar.com/tv/ted-talks-india-nayi-soch/15930/reimagining-in...

हा दुसरा एपिसोड, पॉवर ऑफ वर्डस ही थीम पाहता जास्त इंटरेस्टींग असावा - पण काही तांत्रिक कारणांनी कालपासून बघायला प्रॉब्लेम येत आहे.
http://www.hotstar.com/tv/ted-talks-india-nayi-soch/15930/power-of-words...

पण तुम्ही नक्की बघा.
बघत असाल तर आपले विचार शेअर करा.
डेलीसोप मालिकांसारखे यावर रोज चर्चा करावे असे काही नसेलही. नका करू चर्चा. पण आवडला तर नक्की सांगा.

या शो साठी शाहरूख हा एक पर्रफेक्ट कास्टींग आहे असे मला वाटते.
पहिले कारण म्हणजे तो आजघडीला भारतातील सर्वात मोठा ब्राण्ड सेलिब्रेटी आहे. त्याच्या नावाचा फायदा या शोच्या प्रसिद्धीला मिळेल. आणि ती गरजेची आहे, कारण असे शो चांगले दर्जेदार असले तरी त्यांना सहज लोकाश्रय मिळत नाही. लोकं बिग बॉसला थिल्लर बोलतील, रिअ‍ॅलिटी शोजना फेक बोलतील, डेलीसोपची तर लक्तरे काढतील, पण घरी जाऊन टीव्ही लाऊन तेच बघतील. आता यावर हसा किंवा रडा, पण फॅक्ट आहे !

तर, दुसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे शाहरूख खान हा स्वत: उत्तम टेड टॉल्कर आहे.
ईथे एक कॅनडा शो ची झलक बघू शकता -
Thoughts on humanity, fame and love | Shah Rukh Khan - https://www.youtube.com/watch?v=0NV1KdWRHck
नक्की बघा, पहिल्या दिड मिनिटातच पठ्ठ्याने गोरया लोकांची मने जिंकून घेतली Happy
मला चित्रपटांच्या पलीकडला शाहरूख का आवडतो याच्या अनेक कारणांपैकी हे एक आहे !
येनीवेज, शाखाकौतुकसोहळा आवरतो Happy

तळटीप - टेड टॉल्क या सदराखाली तुम्हाला यूट्यूबवर ईतर काही चांगल्या लिंक मिळाल्या तर ईथे झरूर शेअर करा. ईंग्लिशही चालतील Happy
धन्यवाद,
ऋन्मेष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणीतरी लिंक दिल्याने मध्यंतरी भूतान वर (विशेषतः त्याच्या निगेटिव्ह कार्बन फुटप्रिंटवर) एक टेड टॉक बघून खूप इम्प्रेस झाले होते.
यापुढे नेहमी टेड टॉक फॉलो करेन असं ठरवलं होतं पण झालं नाही Sad

स्वाती २ मस्त लिंक,
टेड टॉक ईंडिया शो मधील काही जणांचे टेड टॉक देखील त्यात सापडले, तसे वर शाहरूखचे कॅनडातील उल्लेखलेलेही सापडले. आवडीच्या विषयानुसार शोधायचीही सोय दिसतेय. धन्यवाद या लिंकबद्दल. विकेंडला यूट्यूबर विडिओ बघत रात्र जागवतोच, आता हे मेंदूला नवीन चांगले खाद्य मिळाले.