Confused...सल्ला हवा आहे..

Submitted by अजय चव्हाण on 18 December, 2017 - 15:18

मी mcom (Banking & Insurance) complete केलं आहे आणि गेल्या चार वर्षापासून शिपींग लाईनर क्षेत्रात कार्यरत आहे. खरंतरं माझं शिक्षण आणि सध्याच काम ह्यात काहीच संबंध नाहीये.

मी ज्या कंपनीत काम करतो ती कंपनी टाॅप थर्ड शिंपिंग क्षेत्रातली एमएनसी कंपनी आहे..
सगळ्या सुविधा आहेत पण job satisafaction अजिबात नाहीये आणि मी ज्या प्रोफाईलवर काम करतोत त्यातही फारशी माझी ग्रोथ होऊ शकेल असं वाटतं नाही (मॅनेजमेंटचे तळवे चाटणं पटतं नाही)

तर मी काहीतरी शाॅर्ट टर्म किंवा थोडासा लाॅग टर्म कोर्स करायचा विचार करतोय..जेणेकरून काहीतरी चॅलेंजिग जाॅब करता येईल.

सध्या तरी दोन ऑप्शन निवडले आहेत

1. SAP IN Material Management course
2.FORIGEN LANGUAGE शिकणं.(spanish,germen,french,portuguese )

ह्या पैकी काय कराव हे कळतं नाहीये..

SAP चे फायदे तोटे काय आहेत?
पुढे चांगली ग्रोथ मिळू शकते का?

आणि जर Language शिकायची झाली तर वरील पैकी
कुठली शिकू?

त्यात कुठले करिअर ऑप्शन available आहेत?

किंवा अजुन कुठले शाॅर्ट टर्म पण उपयुक्त कोर्स सांगितले तरी चालतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) सगळ्या सुविधा आहेत पण job satisafaction अजिबात नाहीये
२) SAP चे फायदे तोटे काय आहेत? पुढे चांगली ग्रोथ मिळू शकते का?

>>>>>

ग्रोथ, पैसा, पोजिशन की जॉब सॅटीसफॅक्शन हे फिक्स करायला हवे. SAP मध्ये ग्रोथ वगैरे असेल, पण तिथेही तुम्हाला जॉब सेटीसफॅक्शन नाही मिळाले तर...

सध्या मी जे काम करतोय त्यात मला फार ग्रोथ नाहीये, पण गंमत म्हणजे जॉब सॅटीसफॅक्शनही फार असे नाहीये. कारण माझ्यात टॅलेंट वेगळ्या प्रकारचे आहे आणि काम मी जरा वेगळे करतोय. पण एकच गोष्ट चांगली आहे की फॅमिली ( ईनक्ल्युडिंग गर्लफ्रेंड) आणि वैयक्तिक छंद (इन्क्ल्युडिंग मायबोली) यांना पुरेसा किंबहुना मनाजोगता वेळ देऊ शकतोय Happy

SAP IN Material Management course
>>

एकुणच इआरपी क्षेत्रात आता फारसा मलिदा राहिलेला नाही. सास (क्लाउड) बेस्ड ईआरपीने कन्सल्टंट लोकांची वॅल्यु कमी कमीच होत जाईल.

भाषा शिकण्याकडे जर कल असेल तर या पर्यायाचा नक्की विचार करा. सुरुवातीला कदाचित कमी पैसे मिळतील पण लाँग रनमध्ये हा पर्याय अधिक समाधानाचा ठरेल असे माझे मत आहे.

जेणेकरून काहीतरी चॅलेंजिग जाॅब करता येईल. >>>>>

मला वाटत हे थोडस रिव्हर्स होतय...
प्रथम काय जाॅब करायचा आहे ते ठरवा.... मग त्या साठी काय स्कील लागतात ते शिका..

प्रोग्रामर व्हायच आहे = संगणक भाषा शिका.
शि़क्षक व्हायच आहे = नेट, सेट पास करा.
शेतकरी व्हायच आहे = अ‍ॅग्रीचा कोर्स करा. इ.इ..

अगोदर काय व्हायच हे ठरवल तर मग त्या साठी कोणते कोर्स करता येईल , काय स्कील लागेल हे सुचवता येइल..

शिपिंग कंपनीत आहात तर लॉजिस्टिक्स शिकून घ्या. त्याचा उपयोग करून इंपोर्ट्/एक्स्पोर्ट क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करू शकाल. हा अजून एक पर्याय आहे. (मित्राच्या अनुभवावरून). जो तो उठसूट आय.टी. मध्ये जातो म्हणून तसे करायची गरज नाही. शिवाय आता SAP चा सुवर्णकाळ संपत आला आहे, अशी लक्षणे दिसत आहेत.

एकुणच इआरपी क्षेत्रात आता फारसा मलिदा राहिलेला नाही. सास (क्लाउड) बेस्ड ईआरपीने कन्सल्टंट लोकांची वॅल्यु कमी कमीच होत जाईल. >>> टण्या हे समजले नाही. एस ए पी च्या जागी दुसरे येइल, पण जोपर्यंत कंपन्या कस्टमाइज्ड प्रोसेसेस वापरत आहेत तोपर्यंत ते कस्टमाइज करणार्‍यांची गरज पडणारच ना? आज SAP तर उद्या NetSuite किंवा तिसरेच असेल पण मूळ प्रॉब्लेम तोच आहे.

अजय - तुम्ही जर शिपिंग शी संबंधित जे लॉजिस्टिक्स असते, ज्या प्रोसेसेस असतात त्यात काम करत असाल तर त्याच्याशी संबंधित सॉफ्टवेअर किंवा प्लॅनिंग टूल्स असतात त्याचे ट्रेनिंग कोठे आहे का बघा. तुम्हाला त्या क्षेत्रातील माहिती असल्याने ते एकमेकांना पूरक होईल. मटेरियल्स मॅनेजमेण्ट थोडे संबंधित असले, तरी शिपिंग क्षेत्रापेक्षा वेगळे आहे. मात्र मूळ सॉफ्टवेअर बॅकग्राउण्ड नसेल, तर थोडे सॉफ्टवेअर (कस्टमायझेशन) आणि बरेचसे बिझिनेस प्रोसेस असे ज्ञान्/कौशल्य असलेले रोल्स असतात ते योग्य होतील. बिझिनेस अ‍ॅनॅलिस्ट, बिझिनेस प्रोसेस कन्सल्टंट्स, फन्क्शनल कन्सल्टंट ई. SAP किंवा दुसर्‍या कोणत्याही अ‍ॅप्लिकेशन्/टूल मधे हे शिकायला खूप फी असेल आणि इण्टर्न्सशिप्/नोकरीची कसलीही हमी ते देत नसतील तर त्याचा फार फायदा होईल असे वाटत नाही.

दुसरे म्हणजे अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गूगल यांच्या "क्लाउड" वाल्या सर्विसेस, टूल्स पुढच्या ३-५ वर्षांत खूप वापरली जातील. त्याच्याशी संबंधित क्षेत्रात जाउ शकाल. पण त्याला एकतर सॉफ्टवेअर बॅकग्राउण्ड हवी, किंवा नव्याने ते शिकण्याची तयारी व तसे स्वातंत्र्य हवे. इथे स्वातंत्र्य म्हणजे एक दोन वर्षे तुम्ही यात पैसे न कमावता काही प्रयत्न करू शकता का, वगैरे.

टण्या हे समजले नाही. एस ए पी च्या जागी दुसरे येइल, पण जोपर्यंत कंपन्या कस्टमाइज्ड प्रोसेसेस वापरत आहेत तोपर्यंत ते कस्टमाइज करणार्‍यांची गरज पडणारच ना? आज SAP तर उद्या NetSuite किंवा तिसरेच असेल पण मूळ प्रॉब्लेम तोच आहे.>>

हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल. मी काही स्ट्रेतेजी कन्स्ल्टंट नाही. माझे प्रांजळ मत/अनुभवः मोठ्या कंपन्या ज्यांना हेवी कस्टमायझेशन लागतात (बरेचदा कॉम्प्लेक्स इन्टरकंपनी ट्रान्झॅक्शन्समुळे व जागतिक अंतर्गत सप्लाय अंतर्गत) त्यांचे इआरपी इम्प्लेमेन्टेशन्स मॅच्युअर झाले आहेत व तिथे नव्या धंद्याची शक्यता कमी झाली आहे. मध्यम आकाराच्या कंपन्यात (मी यात ५०० तो १बि. डॉलर्स एव्हडी रेन्ज धरतो) तसेच लोकलाइज्ड कंपन्यात इआरपी स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह राहिलेला नाही. कस्टमायझेशन वि. सास ऑफर्ड ऑफरिंग्स याचा कॉस्ट बेनेफिट रेशो बघता सास ऑफर्ड ऑफरिन्ग्ज वापरून व कमीत कमी कस्टमायझेशन्स वापरण्याकडे कल वाढत आहे.
हा माझा अनुभव गेल्या १ वर्षात मिड वेस्ट मधल्या औद्योगिक उत्पादनांचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांमधला आहे (शेतीसंबंधित औजारे, जॉन डिअरचे टिअर२ सप्लायर, वाल्व उत्पादक, ऑटो कॉम्पोनन्ट आफ्टर मार्केट, केबल बनवणार्‍या कंपन्या, मिडिअम साइझ वेअरहाउसिंग)

>2.FORIGEN LANGUAGE शिकणं.(spanish,germen,french,portuguese )
फक्त फॉरेन लँग्वेज शिकून नोकरी मिळवता इतपत येण्यासाठी ४-५ वर्षे तरी शिकावी लागेल. आणि त्यातून खूप पैसे मिळतीलच असे नाही. कुठल्या भाषेत सध्या उद्योग जोरात सुरु आहे त्यावर अवलंबून आहे.
मी असे सुचवेन कि परभाषा शिकायचीच असेल तर एक छंद म्हणून संध्याकाळी जशी जमेल तसे काही वर्षे शिकत रहा. नंतर तुमच्या मूळ व्यवसायाशी निगडीत एक आणखी भाषा येते म्हणून चांगली नोकरी मिळू शकेल.

तुम्हाला  (Banking & Insurance)  मध्ये interest नाहीये का? तुमचं शिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर जर यापैकी कोणत्याही क्षेत्रांत गेलात तर सहज Managerial level entry मिळू शकेल. ह्या क्षेत्रात भरपूर growth आहे, पैसा आहे. जर ह्या करिअरची आवड असेल तरच जॉब satisfaction मिळेल. अवांतर वेळ मात्र मिळणे तितके सोपे नाही.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद .

@राजसी - असं नाहीये ना ..माझी डीग्री झाल्यानंतर खुप प्रयत्न केला त्या क्षेत्रात जाण्याचा पण प्रत्येकवेळी CASA ( current and Saving account ) sales profile दिलं जायचं किंवा ईन्सुरन्स एजेंट व्हा असं तरी सांगितल जायचं..
IBPS परीक्षा पास केली होती पण नुसती परीक्षा पास होण्याने काहीच उपयोग होत नाही...
टेबलाखालून बंडले मांगितली गेली आणि हे पटलं नाही म्हणून
फिरून फिरून ह्या क्षेत्रात आलो.

टवणे सर ...SAP बद्दल सविस्तर सांगितल्याबद्दल धन्यवाद.

आज सकाळीच Atos च्या ऑफिसमध्ये चौकशी केली..
1 महीन्याची 4 लाख फी सांगितली.. कोर्सनंतर त्यांच्या स्वतःच्या किंवा दुसर्या कंपनीत प्लेसमेंट देतिल असं सांगण्यात आलं पण सुरूवातील् पॅकेज कमी मिळेल हे ही सांगितलं...

एकूणच असं वाटतयं SAP करणं थोडं जिकरीचं काम आहे..

@ ऋन्मेष - काहीतरी एक हव ना ग्रोथ किंवा job satisfaction ..दोन्ही नसेल तर मग frustration level वाढत जातं म्हणून आतापासूनच पर्याय शोधतोय. .

@अजय : प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
तुमच्या मताशीही सहमत.

प्रतिसाद थोडा फिलॉसाफिकल वाटेल पण प्रॅक्टीकल आहे, थोडा शांतपणे विचार करावा.

अजय, असे निर्णय घेण्यापूर्वी थोडं आत्मपरिक्षण करावं असं सुचवतो. आपल्याला नक्की काय हवंय व ते कशासाठी हवंय हे शोधून काढावं. बरेचदा वरवरच्या फीलींग्स सबकॉन्शसला फीड करायला लावून अशी मानसिकता बनवतात की आपल्याला एक जबरदस्त चेंज हवाय. हे चेंज हवाय वाले फीलींग 'आताच्या' जॉबच्या समाधानकारक नसल्यामुळे होत आहे. यात दोन उपाय आहेत, आताच्या जॉबमध्ये समाधानकारक नेमकं काय नाहीये ते शोधणे, दुसरा असा की समाधानकारक म्हणजे नेमकं काय याचा शोध घेणे. याने काय होईल की तुम्हाला समाधानकारक म्हणजे काय हे समजल्याने आपोआप अनेक ऑप्शन्स ओपन होतील

दुसरा भागः आपण चॅलेंजिगं असं काहीतरी करावं असे तुमच्या लिहिण्यातुन समजलं. बरेचदा रुटीन लाइफमुळे कंटाळा येतो. कंटाळा हा जॉबमुळे नव्हे तर एकसुरीपणामुळे आलेला असतो. नैसर्गिकरित्या आपण माणसे मशिनप्रमाणे काम करण्यासाठी नाही आहोत. आपल्या डोक्याला सतत चालना मिळेल असे काही केल्याशिवाय आयुष्यात रस राहत नाही. तेव्हा माझा सल्ला असा आहे की तुमची आत्ताची नोकरी तुम्हाला पोटापाण्यापुरते नीट देत असेल व त्यात काहीही धोका नसेल, केवळ कंटाळा असेल तर नोकरी सुरु राहू द्या. इतर वेळेत दुसरी काहीतरी कामे करा ज्यात पैशाची अपेक्षा नसेल पण तुम्हाला जेनुइन आवड असेल. चॅलेंजिंग ची तुमची नेमकी व्याख्या काय ह्याचाही शोध घ्या. त्यानुसारही तुमच्याकडे ऑप्शन्स क्लिअर होतील.

एकदा का समाधान आणि चॅलेंज याबद्दल तुमची भूमिका स्पष्ट झाली तर निर्णय घेणे सोपे होईल. नंतर तर काय, स्काय इज द ओन्ली लिमिट.

माझ्या प्रतिसादाला उत्तर लिहाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद!

नानाकळा यांच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत. मला हे हळूहळू कळत गेलं (the hard way). मी सुद्धा, काहीतरी वेगळं करायचंय म्हणून, मला एखादं आवडीचं वाटणारं (इथे वाटणारं हा फार महत्त्वाचा शब्द आहे) काम मिळतंय म्हणून, कंफर्ट झोन मधून बाहेर पडायचंय म्हणून, जास्त पैसे कमावण्याची त्या वेळची गरज म्हणून, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक गोष्टी केल्या, ३ वेगवेगळ्या देशात राहिले, खूप किंमत चुकवली हे सगळं करताना. आता जरा कळू लागलंय की आपल्याला नक्की कशानं समाधान मिळतं ते. पण हे सगळं पुढच्यास ठेच, मागचा शहाणा ह्यात बसत नाही ना! आपले आपले अनुभव घेतले की मगच डोक्यात दिवे पेटतात Happy

Casa sales आणि Insurance, third party products आजकाल सगळ्यांनाच करावी लागतात. Private बँकेत नॉन-सेल्स profile असं काही नसतं. Teller ला पण नोटा मोजता -मोजता हे वरचं सगळं करायचे टार्गेट असतात. सरकारी बँकेत पण आजकाल खूप काम असतात. माझे दोन नातेवाईक sbi मध्ये आहेत. एक central loan dept- शनि-रवि ऑफिस आणि सोमवारी सुट्टी. दुसरा रिमोट location सिंगल ऑफिसर ब्रँच सुट्टी घेता येत नाही. दुसऱ्या ब्रँच मधून reliever आल्याशिवाय.
Private बँक सेंट्रल ऑफिस मध्ये मैत्रीण आहे तिला काहीही growth options नाहीत. बाहेर दुसरीकडे नोकरी पटकन पण मिळणार नाही कारण अश्या पोस्टस खूप कमी 1 किंवा 2 असतात.
एक जण एकदम अट्टल सेल्समन होता. बघता- बघता दर दोन वर्षे नोकरी बदलत 4 का 5 वर्ष मध्ये ब्रँच manager झाला. कॉर्पोरेट salary मध्ये गेलात, एखाद्या चांगल्या business district तर दोन वर्षात ब्रँच मॅनेजर होता येईल.
सेल्स आवडायला हवा पण.

@नानाकळा : तुमच्या मताशी काही अंशी मी सहमत आहे..
तुम्ही लाखमोलाचं सांगितलंत.

पण काही इतरही बाबी असतात त्या अशा मी जाहीरपणे सांगू शकत नाही.

आत्मपरीक्षणाअंतीच मी ह्या निर्णयावर येऊन पोहचलो आहे की, सध्या मला खरंच हा जाॅब सोडायची गरज आहे..

आणि आहे त्या क्षेत्रात मी चांगलचं काम करतोय फक्त पुढच भविष्य मला तेच तेच रहाटगाडग्यासारखं दिसतयं..

आणि म्हणूनच मी असं काही शोधतोय जेणेकरून मी आहे त्या लेव्हलपेक्षा पुढे जाऊ शकतो किंवा ते करताना मानसिक समाधानही मिळेल ..एकसुरीपणा असला तरी चालेल मला..

@राजसी - इथेच गफलत आहे मला सेल्स करणं अजिबात आवडत नाही..

सेल्स करण्यासाठी खुपदा खोटं बोलावं लागत आणि ते मला सहसा जमत नाही आणि पटतही नाही.

त्यापेक्षा मला कॅशिअर व्हायला आवडलं असतं .माझं काम भलं नि मी भला...लागलच सेल्स करायला तर जितक खरं बोलून करता येईल तितकं करायला प्रोब्लेम नव्हता..

जेणेकरून काहीतरी चॅलेंजिग जाॅब करता येईल>> मला वाटतं काहीतरी म्हणजे नक्की काय करायचं हे शोधणे महत्त्वाचे आहे.. आणि हे आपल आपल्यालाच शोधायला हवं. अन्यथा पुन्हा नवीन क्षेत्रात जम बसवताना तुम्ही पुन्हा याच ठिकाणी परत येणार नाही याची काय खात्री?
नक्की काय करावे हे शोधण्यासाठी तुम्ही कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा अशा व्यक्ती ज्या तुम्हाला खुप काळापासून ओळखतात त्यांची मदत घेऊ शकता. एकदा हे कोडं सुटल की मग त्या त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांना तुम्ही मार्गदर्शनासाठी विचारू शकता. मायबोली वरही असे अनेक लोक आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात.शिवाय ईतर नेटवर्किंग साईटस् चा उपयोग करून घेता येईल.

तुम्ही शिपींग लाइन क्षेत्रात आहात असे म्हटलं आहे. तुमचा नक्की प्रोफाइल काय आहे ते कळत नाही. पण थोडे धाडस करायची तयारी असेल तर तुम्ही काही आणीक अनुभव घेऊन सी एच ए किंवा सी एंड एफ म्हणून काम करू शकता. सुरुवातीला त्रास होईल पण भविष्यात फायदा नक्की होईल. आणी स्वता: साठी काम केल्याचा आनंद होईल

जर तुम्हाला बैंकिंग क्षेत्रात करियर करायचे असेल आणि नोकरीच करायची असेल आणी तुम्हाला डॉक्यूमेंटेशन मध्ये गती असेल तर स्पेशलायजेशन म्हणुन तुम्ही एल सी एक्सपर्ट म्हणून काम करू शकता त्यासंबन्धी काही रेप्युटेड कोर्स शोधा. हा खुपच कमी जणांना माहीती असणारा कोर्स आहे आणि तुम्हाला बैंकिंग मध्ये फोरेक्स डिपार्टमेंट मध्ये चांगला प्रोफाइल आणि पगार देऊ शकतो. तुमच्यासाठी ग्लोबल मार्केट उपलब्ध होऊ शकते

पहा विचार करून

तुमच्या शिक्षणाशी सबंधीतच करा ना आता जर "तुम्हीच" ही संधी घ्यायचा विचार करताय की, बदल हवा आणि जॉब सॅटिसफॅक्षन हवेय तर
बँकेच्या परीक्षा द्या, बॅकेचे किंवा इन्शुरन्चे प्रॉडक्ट मॅनेजर होवु शकता. ह्यात, तुमचा फोकस, बी२बी असेल, बी२सी नाही.

एसएपी मध्ये असे आहे की , खूप तयारी ठेवावी लागेल, केला कोर्स कि मिळाला जॉब असे नाही( तसे सर्वच जॉब मध्ये आहे) पण काही मनाची आणि खर्चाची तयारी( कोर्सेस साठी) वगैरे. त्याचबरोबर, एखादी भाषाच शिकायची ईच्छा असेल तर होवु शकते दोन्ही समांतरी.

पण भाषा शिकायचा हा विचार हॉबी की पोटापाण्यासाठीए मार्ग असे असेल तर मग पक्का निर्णय घ्यावा लागेल.

काहीही झाले तरी, पोटापाण्याचा प्रश्ण आहेच तेव्हा हे करताना काय कसे करावे हा विचार केलाच असेल तुम्ही. शुभेच्छा.

>>>एकदा का समाधान आणि चॅलेंज याबद्दल तुमची भूमिका स्पष्ट झाली तर निर्णय घेणे सोपे होईल. नंतर तर काय, स्काय इज द ओन्ली लिमिट.<<

+१११

Teller वैगेरे एन्ट्री लेव्हल पोसिशन असतात. आता अनुभव आणि शिक्षण धरून तुम्ही middle management level ला जाऊ शकता. RM/ Product Manager इ.
तुमच्या अनुभवाशी संबंधित काही शोधलं तर त्याचा उपयोग होईल.

नाना छान प्रतिसाद.

मध्यमवयात असाल व घराचे कर्ज कारचे कर्ज लहान मूल असे प्रोफाइल असेल तर तत्वासा ठी नोकरी तिरीमिरीत सोडू नका. त्रास होतो. नोकरी धंदा म्हणजे संसार जन्य दुरितः त्यात पडले की ती फेज संपे परेन्त प्युअर सत्य बोलेन सदावचनी राहीन असे जमेलच असे नाही. जर तुमची ती गरज फं डामेंटल असेल. तर आर्थिक सुबत्ता सेकंड ग्रेड असे धरून, चरितार्था पुरती नोकरी करता येइल व छंद किंवा चॅलेंज जोपासता येइल.

सामाजिक कार्याची आवड असेल तर एन जीओ त नोकरी करता येइल. एस ए पी मटेरिअल मॅनेजमेंट मध्ये ओपनिंग किती आहेत माहीत नाही पण तेही एकसुरी कामच असते. एकदा अंगवळणी पडले की ऑटोपायलट वर करता येते. एस ए पी ट्रेनिन्ग व तर जर्मन शिकले तर ब्रेक जास्ति मिळतील नाहीतर मँडेरिन चायनीज चा विचार करा.

सेल्स नाहीतर मार्केटिंग, मार्केट रिसर्च, तुमच्या इन्शुअरन्स फील्ड मधला एक अ‍ॅक्चुअरीज कोर्स असतो तो, सी एफ ए फिनान्शिअल सेक्टर मध्ये इन्वेस्ट मेंट बँकिन्ग ( इथे पण मॉरल स्ट्रगल आहे. ) असे ओपनिन्ग बघा.

किमान सहा महिने घर चालेल इतके फंडिंग व इमर्जन्सी फंड जसे घरातील वृद्ध आजारी पडले तर लागतील असे असल्याशिवाय नोकरी सोडू नका. मॉरल स्ट्रगल असेल किंवा सहन होत नसेल तर वीकांताला किंवा वर्क डेला सुद्धा
ट्राय टू टेक स्मॉल ब्रेक्स व गेट अवे फ्रॉम द वर्क सिचुएशन. इट रिअली हेल्प्स. मेडिटेशन, वॉक ह्यावर विश्वास असेल तर ते करून असा ब्रेक घ्या. शुभेच्छा.

नानाकळा, छान प्रतिसाद.
मी ह्या सगळ्यातुन गेलेय त्यामुळे रीलेट झालं.
अजय, आपल्याला नक्की काय हवंय आणि ते कितपत परवडणारं / जमणारं आहे हे समजुन घेतलं की काही प्रश्न सोपे होतात.
तुम्ही कंफ्युज्ड सल्ला मागितलाय पण सगळ्यांनी छान सल्ले दिलेत Happy

मॅनेजमेंटशी जुळवून घेणे हे कुठेही गेलात तरी करावं लागणारच

इतरांनी सुचवलं आहे त्यावर विचार करा आणि तुमच्या प्रायॉरिटीज काय आहेत सध्या आणि भविष्यात ते ठरवा
आर्थिक गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण होत असतील सध्याच्या जॉब मध्ये, तर नोकरी टिकेल असे पहा

इतर ठिकाणी इतर प्रकारे मानसिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा. छंद जोपासणे, सामाजिक कार्य करणे, कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणॆ इत्यादी

तुमचा स्ट्रेस बस्टर काय आहे ते शोधा आणि त्याचा उपयोग करून घ्या

शुभेच्छा

नमस्कार.
फ़ॉरेन भाषा शिकणं इतकं सोपं नाही. त्यातुन पैसे कमवायचे असतील तर किमान २ वर्षं इन्वेस्ट करावे लागतील.
मी स्वत: जपानी शिकलो आहे हॉबी म्हणुन जवळपास ३ वर्षे. भरपुर डेडीकेशन लागतं जर करीयर करायचं असेल तर. जर एखादी भाषा खुप मस्त जमली तर मात्र पैसे कमावता येतात. शिवाय भाषा शिकायची असेल तर शक्यतो मात्रुभाषेवर प्रभुत्व असेल तर बारकावे नीट कळतात, especially व्याकरणाचे.

सर्व माबोकरांचे मार्गदर्शन व मागरदर्शपर सल्ल्यांसाठी मनापासून धन्यवाद

आधी मी खुपच confused होतो....आपल्या प्रतिसादाने बारकाईने विचार करायला भाग पाडलं मला..

इतकं छान कदाचित कुणी मला सांगितलचं नसतं.

सगळेच सल्ले पटण्यासारखे आहेत आणि म्हणूनच काही वेळ तरी मला नेमकं काय हवयं ह्याचा मी विचार करतोय..
आपल्या सार्यांच्याच सल्ल्याने माझ्या विचारांना एक नवी दिशा मिळाली.

सो ती दिशा दिल्याबद्दल सर्वाचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद

पुन्हा एकदा सर्वाचे मनापासून धन्यवाद