Submitted by सुप्रिया जाधव. on 12 December, 2017 - 12:24
ओळीसाठी बेफिजींचे आभार मानून ...
उगवणारा रवी आहेस बहुधा
जगाला तू हवी आहेस बहुधा
किती देशील हिसडे दावणीला ?
सवय कर ना ... नवी आहेस बहुधा
समर्पक शब्द जो सुचवून जातो
निसर्गा तू कवी आहेस बहुधा
मनाची खिळखिळी करतोस पाने
विचारा, वाळवी आहेस बहुधा !
लुटारून्ना जुमानेना जराही
कफल्लक-नागवी आहेस बहुधा
उतारी राखतो हातात अपुल्या
भिडू तू अनुभवी आहेस बहुधा
म्हणेना जग तुला बाजारबसवी
निरामय जान्हवी आहेस बहुधा
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फेबू वर वाचली. खूप आवडली.
फेबू वर वाचली. खूप आवडली.
कसं सुचतं गं तुम्हाला इतकं छान लिहायला?
फारच अप्रतिम!
फारच अप्रतिम!
छान ! दावणीचा आणि वाळवीचा शेर
छान ! दावणीचा आणि वाळवीचा शेर विशेष आवडला.
अप्रतिम
अप्रतिम
छानच लिहिली आहे गझल
छानच लिहिली आहे गझल
चुकून ऊघडला हा धागा, पण एक
चुकून ऊघडला हा धागा, पण एक सुंदर गझल वाचायला मिळाली
मालवणी लोणचे
.
खूप छान ! अप्रतिम !
खूप छान ! अप्रतिम !
चुकून ऊघडला हा धागा, पण एक
चुकून ऊघडला हा धागा, पण एक सुंदर गझल वाचायला मिळाली>> +१२३४५६७८९
मनापासून आभार सगळ्यांचे
मनापासून आभार सगळ्यांचे