स्ट्रोक उपचारान्विषयी माहिती

Submitted by नानबा on 12 December, 2017 - 00:35

माझ्या शेजारच्या मुलाला साधारण दोन वर्षापूर्वी स्ट्रोक आला. वय ३५ / ४० च्या आसपास.
त्यांचे वेगवेगळे उपचार चालू आहेतच. इतर औषधोपचारांबरोबर योगा आणि फिजिओ ची मदतही घेतायतच.
तो सध्या घरातल्या घरात चालतो मदतीने. पण मुख्य दिसण्याचा प्रश्न आहे. विजन ब्लर असल्याने कॉन्फिडन्स वर देखील परिणाम होतोय. अजून
घराबाहेर पडत नाहिये.
कुणाला ह्या संदर्भातील उपचारकेंद्राची माहिती आहे का?
कुठले रिलायेबल रिहॅबिलेशन सेंटरस आणि स्पेसिफिकली दृष्टीसाठी काही मदत मिळू शकेल का? (हे इन्टरनेटवर आणि इतर ठिकाणी बघत आहोतच) कुणाला अनुभव असल्यास सांगा.

महाराष्ट्रात (पुणे/मुंबई असल्यास अधिकच छान) असल्यास जास्त सोईचे होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hi please call up l.v. prasad eye institute hyderabad. They have some very fine eye surgeons specialised to do micro blood vessel repair work. Notably diabetic retinopathy. A couple was part of our Rotary club . That is how i knew them.

नानबा, मी कोणत्याही पॅथीची वैद्यकीय तज्ज्ञ नाही किंवा वैद्यकीय व्यवसायाला पूरक ( नर्सिंग, पॅथोलॉजी, फिजिओथेरपी इ) अशा व्यवसायातही नाही. स्ट्रोक आणि पार्किन्सन्स असलेल्या पेशंटला जवळून अनुभवलेले आहे. त्यावरून लिहितेय. तुमच्या केसमध्ये काय लागू पडतेय ते बघा --

(१) तुम्हाला हे माहीतच असेल की मेंदूला रक्तपुरवठा करणार्‍या नसांमध्ये रक्ताची गुठळी होणे किंवा रक्तदाब फार वाढल्याने नसा फाटून रक्तस्त्राव होणे यामुळे स्ट्रोक उद्भवतो. असे झाल्याने मेंदूच्या विशिष्ट भागाचा रक्तपुरवठा खंडित /अनियमित झाल्याने तो भाग काही काळाकरता / काही प्रमाणात / कायमचा निकामी होतो (हे केसगणिक वेगळे असते) आणि त्या भागाकडून नियंत्रित केली जाणारी शरीराची हालचाल / कार्ये पूर्वीप्रमाणे सक्षमतेने होत नाहीत किंवा पूर्ण थांबतात.

(२) स्ट्रोक आल्यापासून जितका लौकर ईलाज सुरू होईल, तितके नुकसान कमी होते व रिकव्हरी लौकर होते. शरीराच्या डाव्या बाजूला झालेले नुकसान पूर्वपदावर यायला जास्त काळ लागू शकतो. तुमच्या केसमध्ये काय झाले हे ते बघा... त्यानुसार वेळ लागेल.

(३) पेशंटची मानसिक स्थिती खंबीर असेल तर कुठलेही उपचार लौकर लागू पडतात. लहान वयात हे झाल्याने त्यांची उमेद हरवली असेल तर त्यांना मानसिक बळही द्यावे लागेल. कधीकधी आपण खुरडत, धडपडत चालतोय आणि आजूबाजूचे पुढे जातायत याचेही शल्य तरूण पेशंटला वाटू शकते. घरात आई / आजी / इतर वगैरे.... काय रे बाबा या वयात याच्या नशिबी आले, म्हणून टिपे गाळत, उसासे सोडत असतील तर ते वातावरण बदलावे लागेल.

(४) पेशंट स्वतः किंवा घरातील कोणी किंवा तुमच्यासारखे हितचिंतक यापैकी कोणीतरी नेमके काय झालेय ते अभ्यासून / समजून घ्या. डॉक्टर वेळेअभावी फार खोलात समजून सांगत नाहीत. सीटी/एम आर आय च्या प्लेट्स आपल्याला कळत नाहीत. पण टेक्स्ट रिपोर्ट नेट / गुगलच्या मदतीने अभ्यासला तर मेंदूला नेमकी कुठे आणि किती इजा झालीये, त्याचे परिणाम काय-काय होतात, हे कळेल.
त्यातली आपल्याला काय लक्षणे जाणवतात, जो त्रास किंवा दुर्बलता शरीरात आहे ती का आहे व किती काळ रहाणार आहे याचा परस्पर संबंध कळला की परिस्थिती स्वीकारणे शक्य होते. गोळी / औषध घेऊन ताप / डोकेदुखी जाते तसे हे दुखणे चुटकीसरशी जाणार नाही आणि काही त्रुटी कायमस्वरूपी सुद्धा राहतील हे वास्तव स्वीकारण्याची मनाची तयारी होऊ शकते. मात्र पेशंटचा स्वभाव आणि वृत्ती तशी असेल तर.

(५) या गोष्टीला २ वर्षे झालीत. जर तुम्हाला मॉडर्न मेडिसीन मधील निदान / उपचार याविषयी सेकंड ओपिनिअन घ्यायचा असेल तर मुंबईत डॉ पाटणकर चेंबूर येथे आहेत. बहुतेक वांद्रे येथे रहेजा हॉस्पीटलला सुद्धा ते व्हिजीटिंग कन्सल्टंट म्हणून येतात. जाताना २ वर्षांचे महिन्यागणिक तब्येतीचे टप्पे आणि बदलत्या औषधोपचाराची माहिती (क्रोनोलॉजी) व्यवस्थित लिहून नेली तर त्यांना अनुभवाने एका नजरेत केस टिपून घेता येते. तोंडी सांगताना काही महत्त्वाचे निसटू शकते, वेळ जास्त जातो.

(६) अय्यंगार योगाचे लोअर परेल मुंबई येथे क्लासेस आहेत. तिथे विशिष्ट आजारपणासाठी वेगळे क्लास घेतले जातात. तिथे किंवा तुमच्या शहरात त्यांचे असे क्लास / घरी येउन शिकवणारे आहेत का बघा. केसची माहिती / रिपोर्ट घेऊन आधी भेटल्यास पेशंटला घेऊन यातायात करावी लागणार नाही.

(७) तुमचा विश्वास / इच्छा असेल तर, --- आयुर्वेदात नस्य (नाकात औषधी तेल/ तूप घालून मेंदूवर इलाज केले जातात) , शिरोधारा ( औषधी तेल / काढा याची धार कपाळावर सोडतात) , विरेचन (डिटॉक्स करणे), अभ्यंग (मसाज) असे प्रकार पंचकर्म चिकीत्सेत येतात. त्याचा विचार करणार तर बघा. कुठल्याही गल्लीबोळातल्या पंचकर्म चिकीत्सा केंद्रात न जाता, योग्य तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
तुमच्या शहरात बघा किंवा मुंबईत वैद्य प्रकाश ताथेड वरळी इथे खासगी प्रॅक्टीस करतात. पूर्वी ते पोद्दार आयुर्वेदिक हॉस्पीटल / कॉलेज इथे होते. त्यांना रिपोर्ट घेऊन भेटल्यास ते मार्गदर्शन करतील. पेशंटलाही नेणे शक्य आहे का बघा. ते उत्तम. नाहीतर २ फेर्‍या होतील. उपचार पद्धत ठरवून (लाईन ऑफ ट्रीटमेंट) व्यवस्थित कुठे होऊ शकेल ते त्यांना विचारून / तुमच्या सोयीनुसार, मग कुठे करायचे ते ठरवता येईल.

सद्ध्या सुचले ते लिहीले आहे. तुम्हाला किती उपयोगी पडते ते बघा.
शुभेच्छांसह,

अमा, मे धा आणि कारवी खूप खूप धन्यवाद. काकुन्पर्य.त ही माहिती पोचवेन.
ईतर डॉक्टर्स, रिहॅब से.टर्स शी पण बोलतेय.

ही माहितीपोहोचवली. काही कारणांनी त्यांनी पुढे फक्त रेग्युलर ट्रीटमेंटच कन्टिन्यू केली.