सिनेमा रिव्ह्यू - फुकरे रिटर्न्स!

Submitted by अजय चव्हाण on 10 December, 2017 - 00:10

"फुकरे रिटर्न्स" हा सिनेमा खर्या अर्थाने 2013 साली रिलीज झालेल्या "फुकरे"चा सिक्वेल आहे कारण जिथे फुकरे संपला होता तिथूनच एका वर्षाच्या गॅपने हा सिनेमा सुरू होतो..

ह्या सिनेमाच्या कथेमध्ये "अपने आप में अलग बात है" म्हणजे उगाच खपतयं म्हणून काहीही ओढून ताणून सिक्वेल न बनवता अगदी साजेशी, नीट डोक लावून जुन्याच साच्यात पण नव्या फ्लेवरची बनवलेली व घडवलेली कलाकृती म्हणजेच हा सिनेमा.

मुळ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे भोली पंजाबनला जेलमध्ये धाडल्यानंतर चार चौकडी म्हणजेच फुकरे (हनी,लाली,चुचा,झाफर) मस्त आपल्या आयुष्यात खुष आहेत. हनी प्रियाबरोबर रोमान्स करतोय आणि चुचाचीही दुसर्या मुलीबरोबर सेंटींग लावतोय इकडे झाफर नीतु बरोबर एकत्र राहण्याचा विचार करतोय आणि तिकडे बिचारा लाली अजुनही एक मुलगी पटत नाही आणि वडिलही मनासारखं जगू देत नाही म्हणून थोडासा नाखुष आहे पण त्यावरही तो उपाय काढतोच आणि सगळं ठीकठाक करतो.

तर असंच सारं काही आलबेल असताना भोली पंजाबन मंत्री बाबुलाल भाटीयाच्या मदतीने काही अटींवर सुटते आणि ह्या चौघांचही आयुष्य बदलत चुचाला हल्ली स्वप्नाबरोबर तत्काल भविष्यही दिसायला लागलं आहे आणि भोली पंजाबन त्याचा पुरेपुर फायदा घेण्याच ठरवते शिवाय तिला बदलाही घ्यायचा असतोच आणि परत एका वर्षाने पुन्हा त्याच वळणावर स्वतःला चौघे पाहत असतात पण ह्या वेळी वळण धोकादायक तर आहेच शिवाय वळणावर उंच उंच स्पीडब्रेकर देखिल आहेत आता ह्या वळणावर चौघ्यांच्या आयुष्याची गाडी वळणावर कशी गर्र वळते व स्पीडब्रेकरवर कशी गटांगळया खाते, पुढे त्यांच ते वळण संपत का? हे सारं सिनेमात पाहायला जास्त मजा येईल.

छोटे छोटे पण हसवणारे प्रसंग,नैसर्गिकरित्या पेरलेले विनोद,कमालीचा टाईमिंग सेन्स,अचाट व भन्नाट करेक्टर्स ह्यामुळे चित्रपट कुठेच बोअर होत नाहीच शिवाय कथा कुठेच भरकटत नाही की, पकडही कुठेच सैल होत नाही. काही काही सिन इतके अनकाॅमन आणि काॅमिक आहेत की,लेखक विपुल विग व सहलेखक आणि दिग्ददर्शक मृगदीप सिंग लांबा यांना दाद द्यावीशी वाटते.

अभिनयाच्याबाबतीत सार्यांनीच अगदी चोख काम केलय.वरूण शर्माने अख्खा सिनेमा खाल्ला आहे. त्याने साकरलेला चुचा क्षणोक्षणी आपल्याला हसवतो. त्याच्या गोंडसं दिसण्याच्या,वागण्याच्या, निरागसं बोलण्याच्या प्रेमात पडतो आपण. पुलकीत सम्राट,अली फजल,मनज्योत सिंग यांनी आपल्या भुमिकेला योग्य न्याय दिला आहे.पंकज त्रिपाठी ह्या माणसांबद्दल काय सांगावं हा माणूस कसलेही रोल सहज करू शकतो,सोप्या सोप्या संवादातदेखिल हा माणूस हसवू शकतो असं कौशल्य फार कमी लोकांकडे असतं बाकी रिचा चड्डा अॅज युज्वल ग्रेटच पण त्याहीपेक्षा तिच्या चेल्याचा रोल साकारणारा अॅफ्रीकन कलाकारदेखिल चांगलाच लक्षात राहतो इतक्या छोट्या रोलमध्येसुद्धा छाप सोडलीय त्याने. व्हिलनच्या रोलमध्ये राजीव गुप्ता फीट बसलाय. प्रिया आनंद आणि विशाखा सिंग ह्यांच्या वाटेला फारसे सीन आले नाहीत तरीही त्या दोघी जमून जातात.

पात्रे :

चुचा : वरूण शर्मा
हनी : पुलकीत सम्राट
लाली :मनज्योत सिंग
झाफर :अली फजल
भोली पंजाबन: रिचा चड्डा
पंडीतजी: पंकज त्रिपाठी
बाबुलाल भाटीया : राजीव गुप्ता
प्रिया : प्रिया आनंद
नीतु : विशाखा सिंग

का पाहावा :

सगळा ताण विसरून खळखळून हसण्यासाठी आणि तेच हसू घरात आणून हलकं हलकं वाटण्यासाठी.

मानांकंन : ****

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम रसग्रहण !
झकास रिव्हयू !
सिनेमा बघणार !

दक्षे,
फुकरे म्हणजे रिकामटेकडे / निकम्मे
उथळ अन उत्शृन्खल काय आहे त्यात?

फुकरे १ आवडला होता.
हा ही बघायचा आहे.
वरुण शर्मा चांगला अभिनय करतो.

फुकरे नावात उथळ आणि उत्शृन्खल काय आहे? Uhoh

दक्शिणाला फुकरे हे नाव उथळ वाटलेले नाही. फुकरे रिटर्न्स हे नाव उथळ आणि उच्छृण्खल वाटलेले आहे.
रच्याकने, गाण्यांबद्दल काहीच लिहिले नाही. मागच्या फुकरे मध्ये सोना महापात्राचे अंबरसरिया हे अत्युत्तम गाणे होते....

फुकरे हे नाव मलाही आधी वल्गर वाटायचे. .. मराठी चित्रपट एफ यु सारखे

असो,
पहिला भाग आवडलेला. असेच सहज अपेक्षा नसताना टीव्हीवर लागलेला पाहिला आणि त्यामुळे जास्त आवडला होता.. दुसर्‍याचा ट्रेलर पाहता तितकीच धमाल असेल असे वाटते. पण थिएटरात जाणार नाही. पण टीव्हीवर वा लॅपटॉपवर कधीतरी नक्की बघणार..

आंबरसारिया पेक्षा फुक फुक फुकरे फुक फुकरे, भागा भूत लंगोटी लेके चंददर तांके तू छुप रे जास्त भारी आहे.
असंख्य वेळा ऐकलंय..मस्त वाजते.

@बाबा कामदेव..

चित्रपटात मोजून दोनच गाणी लक्षात राहण्यासारखी आहेत.

त्यातल एक "मेहबुबा मेहबुबा ओ मेरी मेहबुबा" ह्या जुन्या गाण्याचं रिमीक्स गाणं

आणि दुसंर "पेह गया खलारा" हे गाणं ..त्याचीही धुन कुठेतरी आधी ऐकल्यासारखी वाटते..

बाकी राम संपथने बॅकग्राऊंड म्युझिक चांगल दिलयं.

फुकरे म्हणजे बाताडे, बड्या बड्या गोष्टी करणारे कामचोर, किवा निरुपद्रवी पण चकाट्या पिटणारे असा अर्थ होतो... मला पहिला भाग खुप आवडलेला , मस्त जमला होता. आजकाल एकदाच पाहायला बर्‍या वाटणार्‍या मुव्हिज मधे हा रिपिट पण बरा वाटतो.

पहिल्या पिक्चर मधली गाणी ओरिजिनल आणि चांगली होती. यातली कुठलीच आवडलेली नाहीत. सध्या जुन्याच गाण्यांना परत वापरायची खुप फॅशन आलेली आहे. हिंदी म्युझीक वाल्यांना चोरी पण करता येत नाहीये आजकाल नीट.