Inguinal Lymph Node च्या Histopath Report संदर्भात अधिक माहिती हविय.

Submitted by यक्ष on 3 December, 2017 - 11:18

माझ्या निकटच्या friend ची नुकतिच हर्नियाची सर्जरी झाली.
त्यादरम्यान 'Cytology' नामक करावयास सांगितली होती जी की दुसर्‍या ठिकाणाहून करवून आणली.
त्याच्या Histopath रिपोर्ट मध्ये 'Reactive lymph node' अशी नोंद आहे. व त्यासंदर्भात मी अजून कुठे उल्लेख केलेला नाहिय.
माझ्या अगदीच मर्यादित माहितिप्रमाणे ही टेस्ट 'कॅन्सर डिटेक्शन' साठी आहे असे वाटते ते बरोबर आहे कां? अधिक माहिती व सुचना मिळाल्यास मदत होईल.
डॉक्टरचा सल्ला घेणार आहोतच. तत्पुर्वी हे कितपत काळजी करण्यासारखे आहे ह्याचा अंदाज आल्यास त्याप्रमाणे पुढील activity advance मधे plan करता येइल.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आरारा वा कुमार१ यांना विपु करा.ते डॉक्टर आहेत.सातींनी लगेच सल्ला दिला असता पण त्या इथे नाहीत आता.

Cytology हा माझा प्रांत नसला तरी जुजबी माहिती देतो
Reactive चा अर्थ असा की त्यात inflammatory cells भरपूर असतात
tumor metastatic lymph nodes & reactive lymph nodes हे दोन भिन्न प्रकार आहेत.

मान्य.
डॉ़क्टरांचा सल्ला घेतोच आहे.
मनःपूर्वक धन्यवाद!

डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी रिपोर्ट बघून वेग़ळ्या ट्रिटमेंट ची गरज नाही व काळजी करण्यासारखे काही नाही. हे 'reactive' प्रकरण हर्नियासंदर्भातलेच आहे आणी त्यासाठी वेगळ्या काही उपचारांची गरज नाही असे म्हणाले.
त्यामुळे काळजी मिटली. पेशंट मजेत आहे आणी तो रिपोर्ट आता त्याला दाखवून त्याला उगाच शंका नको म्हणून 'file close' करत आहे!.
अक्कलशून्य , कुमार१ व आ.रा.रा ह्याना प्रतिसादबद्दल धन्यवाद!