वाहतुक पोलिस आणि शूरवीर?

Submitted by यक्ष on 1 December, 2017 - 11:29

आजकाल बर्‍याच ठिकाणी वाहतुक पोलिस चौकांऐवजी आडवळणावर आणि तेही 'घोळक्याने' टपून असल्यासारखे दिसतात तेंव्हा प्रश्न पडतो कि ह्यांना वाहतूक नियंत्रणाऐवजी 'दुसर्‍याच' जबाबदार्‍या दिल्यात कि काय?

आज संध्याकाळचेच दॄश्य...बाणेर रोड नेहमिप्रमाणे तुडुंब भरून वाहत होता. लाल सिग्नल ला मी थांबलो होतो. माझ्या मागे उभ्या असलेल्या रिक्षावाल्याने टँ टँ वाजून हैराण केल्याने मला वाटले काही अर्जंट असेल म्हणून थोडा बाजूस सरकलो. तेव्हा तो व दोघे-तिघे शूरवीर पुणेकर त्यांची वाहने कडेकडेने दामटून सरळ दिशेने पसार झाले. थोडे पुढे गेल्यावर वाहतुक ४-५पोलिस दिसले. पकडलेल्या लोकांच्या घोळक्यात ते बिझी दिसले. एकजण यंत्रावर होता. एकजण मोबाइलवर. उरलेले दोघेजण साहेबसदॄश व्यक्तिसोबत चर्चेत होते!

जबाबदार्‍या आप्ल्यालाच का.? ह्यां सिग्नल तोडणार्‍यांन्ना नहित का? असा निरर्थक प्रश्न पडला. आणि काही लोकं कसे सटकु शकतात ह्याचे नवल वाटले. तसेच चौकांत एकतरी पोलिस उभे रहावयास काय हरकत आहे?

असो; आपल्याला पटतंय ना मग आपण सिग्नल पाळायचे 'ते' त्यांचे बघतील....असा विचार करून पुन्हा गर्दिचा भाग होउन त्या कलकलाटात शांतपणे चालता झालो.

चरैवती...चरैवती!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा हैद्राबादला भेट द्यावी.
कायनेटिक थिअरी ऑफ गसेसचे रस्त्या रस्त्यातून प्रत्यक्ष दर्शन घ्यावे.

यक्षप्रश्न सुटेल. पुण्याची रहदारी सुसह्य वाटु लागेल.

च्रप्स
"जबाबदार्‍या आप्ल्यालाच का.? ह्यांन्ना नह्हेत का" हे त्या सिग्नल तोडणार्‍या मुजोर लोकांसठी. माझ्या लिहिण्यात काहितर्र्र चुकलेले दिसतेय. दुरुस्तिचा प्रयत्न करतो. धन्यवाद.

शीर्षकात बदल करा
पुण्यातील वाहतुक पोलिसांच्या जबाबदार्‍या बदलल्यात कां?
प्रत्येक शहराची एक वाहतूक संस्कृती असते. आणि त्यानुसार त्यांना वाहतूक पोलिस मिळतात.

चरैवती...चरैवती!
<<
म्हणजे
चरायला चला चरायला चला,
कि
चारताहेत, चारताहेत...
असे?

शीर्षक बदलले आहे! धन्यवाद.
आ.रा.रा. जी 'चरैवती...चरैवती!' चा आपण लावलेला अर्थही एकप्रकारे बरोबर आहे. पण मी माझ्या बाबतित 'चालत रहा - चालत रहा (रस्त्यावर - आपण आपले) ' असा घेतोय.

(खात्रिसाठी गुगलून पाहिले...)
नानाश्रान्ताय श्रीरस्तीति रोहित शुश्रुम ।
पापो नृषद्वरो जन इन्द्र इच्चरतः सखा चरैवेति ॥
(ऐतरेय ब्राह्मण, अध्याय 3, खण्ड 3)
(रोहित, श्रान्ताय नाना श्रीः अस्ति इति शुश्रुम, नृषद्वरः जनः पापः, इन्द्रः इत् चरतः सखा, चर एव इति ।)

अर्थ – परिश्रम से थकने वाले व्यक्ति को भांति-भांति की श्री यानी वैभव/संपदा प्राप्त होती हैं ऐसा हमने ज्ञानी जनों से सुना है । एक ही स्थान पर निष्क्रिय बैठे रहने वाले विद्वान व्यक्ति तक को लोग तुच्छ मानते हैं । विचरण में लगे जन का इन्द्र यानी ईश्वर साथी होता है । अतः तुम चलते ही रहो (विचरण ही करते रहो, चर एव) ।
(गुगल वरून साभार..)

एकदा हैद्राबादला भेट द्यावी.
कायनेटिक थिअरी ऑफ गसेसचे रस्त्या रस्त्यातून प्रत्यक्ष दर्शन घ्यावे.

यक्षप्रश्न सुटेल. पुण्याची रहदारी सुसह्य वाटु लागेल.
>>>>

मानव+११११११

स्वतःचं काम सोपं करणे हा नॉर्मल स्वभाव आहे.
जिथे माणसं सोपे पणाने पकडता येतात ,त्यांच्याशी भांडताना वाहतूक कोंडी होत नाही, बाजूला घेता येते अश्या ठिकाणी पोलीस टपून बसतात.सगळीकडे सिग्नल तोडणार्याना पकडावे अशी इच्छा कितीही असली तरी ते अमलात आणणे कठीण असते.काही ठिकाणी वळायचा सिग्नल १५ सेकंद आणि वळणारी भरपूर वाहने असतात.काही ठिकाणी वाहने कमी आणि त्यांच्या बाजूचा सिग्नल दीड मिनिटांचा असतो. काही ठिकाणी सिग्नल अगदी योग्य असून चौकाची रुंदी मोठी आणि हेवी व्हेकल वेळ घेत असल्याने सिग्नल पुरत नाहीत.
काही ठिकाणी एकच पोलीस अडवत असेल तर लोक त्याला मुजोरी, मारहाण करून दडपून पुढे निघून जातात.गुंठामंत्री पकडले तर पोलिसाची नोकरी किंवा जीव धोक्यात येतो.

भारतात कडक नियम लावणं, ते पाळणं हे खूप कठीण आहे.त्यातल्या त्यात नियम पाळायला लावून रेव्हेन्यू टारगेट पूर्ण करणे हे सर्व खाती करत असतात.