आपल्यावर हिंदुत्व लादले गेले आहे काय?

Submitted by अविनाश जोशी on 21 November, 2017 - 06:26

आपल्यावर हिंदुत्व लादले गेले आहे काय?
आपण सतत आपण हिंदू आहोत असे ऐकत असतो पण आपण हिंदू आहोत हे कोणी ठरवले? आपण हिंदू केव्हा झालो? असे बरेच प्रश्न मला नेहमीच पडतात. त्याच बरोबर शीख, बुद्ध, जैन हे हिंदू नाहीत हे कोणी ठरविले? आपण या शब्दांच्या उगम स्थानांचा विचार करू.
१. वेदात देव आहेत ऋषी, राजे आहेत पण हिंदू हा शब्द कुठेही नाही.
२. ऋग्वेदात सप्तसिंधू चा उल्लेख आहे. या नद्या इंद्राने वृत्र राक्षसाच्या ताब्यातून सोडविल्या अशी कथा आहे. या नद्या गांधार ते करुक्षेत्र पसरल्याचाही उल्लेख आहे.
३. पर्शियन भाषेत लिहले गेलेल्या झेंद अवेस्ता मध्ये स चा ह होऊन हप्त हिंदू असा उल्लेख आहे. त्यावेळेला तो शब्द लोकदर्शक नसून जागादर्शक होता.
४. कुठल्याही परिस्थितीत झेंद अवेस्ता उगम ख्रिस्त पूर्व ८०० ते १००० वर्षापलीकडे जाणे अवघड होते. वेद हे ग्रीक आणि पर्शियन संस्कृतींचा परिणाम असे पाश्चात्य विद्वानांनी ठरविल्यामुळे वेदांचे उगम ख्रिस्त पूर्व १००० वर्षे असावे असे ठरविले. याच विविध विद्वानांनी कालगणनेच्या बाबतीत असंख्य घोटाळे करून ठेवले.
५. पाश्चात्य विद्वान ज्या मोहोंजो दारो आणि हरप्पा चे गुणगान गातात. त्याचे उत्खनन २० व्या शतकाच्या सुरवातीला झाले. त्या अगोदर हरप्पाच्या बऱ्याच विटा, लाहोर - मुलतान रेल्वे करिता खडी म्हणून वापरूनही झाल्या होत्या. ही संस्कृती इराण पासून गुजरात पर्यंत आणि उत्तरेकडे पसरली होती. या संस्कृतीचा कालखंड ख्रि.पू ३००० ते ख्रि.पू २२०० धरतात. याचा अर्थ ही संस्कृती वेदाच्या ही बरीच अगोदर झाली असे पाश्चात्य विद्वानांच्या कालगणने प्रमाणे दिसते. तरीही या संस्कृतीचा उल्लेख वेदात किंवा उपनिषिदांत नाही. तसेच हिंदू हे विशेषणही नाही.
६. पर्शियन डेरियस याने प्रांताबरोबरच त्या भागातील संस्कृतीला ख्रि पू ७व्या शतकात हिंदू म्हणायला सुरवात केली. तरी सुद्धा हिंदू हा धर्म त्याला अभिप्रेत नव्हता. ६ व्या शतकात सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्यांना भौगोलिकरित्या हिंदू मानले गेले पण अजूनही तो शब्द धर्माशी निगडित नव्हता.
७. त्याच काळचा अल हिंद हा अरेबिक शब्द सुद्धा भौगोलिकच होता. मुगलांच्या स्वारी नंतर त्यात फरक पडला.
८. त्याच काळात दक्षिणेकडे चौल, पांड्या, चेरा अशी बलाढ्य तामिळ राज्य होती. जर फक्त पंजाबात हिंदू म्हणायचे असेल तर हे तामिळ कोण होते?
९. ब्रिटिशांनी खरं म्हणजे हिंदू शब्द जास्त रूढ केला. भारतात राहणाऱ्या सर्व धर्माच्या लोकांना त्यांनी हिंदू धर्म बहाल केला. त्यांच्या दृष्टीने शीख, जैन, बुद्ध ही सर्व हिंदूच होत. त्यामुळेच हिंदू पर्सनल कायदा सर्वाना लागू झाला. मुस्लिमाना त्यांनी मुद्दामच वेगळे ठेवले.
१०. Indus Vally तील ते हिंदू ही २० व्या शतकातील धर्माची व्याख्या त्यांनी आपल्या गळ्यात बांधली.
११. आपले रामायण महाभारत ख्रि पू ३००० पूर्वीचे आहेत. मग कृष्णाचा आणि रामाचा धर्म काय होता?
१२. स्वातंत्र्यानंतर सुद्धा भारतीय संविधानाने सर्वाना कलम १६ नुसार जात, धर्म, लिंग यांच्यात भेदभाव न ठेवता समान मानले आहे. पण कलम न. ३० मुळे लोकांनी सर्वोच्च न्यायालयाला हिंदुत्वाची व्याख्या करायला सांगितली आहे. कलम ३० नुसार धर्म किंवा सम्पत्ती अल्प संख्याकांना काही सवलती मिळू शकतात. त्यामुळे आपण हिंदू नाही ही दाखवण्याची धडपड.
१३. या संदर्भात १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश गजेंद्रगडकर यांनी दिलेला निकाल फार बोलका आहे.
When we think of the Hindu religion, unlike other religions in the world, the Hindu religion does not claim any one prophet; it does not worship any one god; it does not subscribe to any one dogma; it does not believe in any one philosophic concept; it does not follow any one set of religious rites or performances; in fact, it does not appear to satisfy the narrow traditional features of any religion or creed. It may broadly be described as a way of life and nothing more..
१४. थोडक्यात हिंदू हा धर्म नव्हेच तर ती जगण्याची पद्धत आहे.
१५. अजून एक विचार करा. मुस्लिम धर्म १६००/ १७०० वर्ष पूर्वीचा, बुद्ध , जैन, शीख ही तर अलीकडले. ख्रिश्चन २००० वर्ष पूर्वीचे मग या सगळ्यांचा अगोदर धर्म काय होता? ४००० वर्षांपूर्वी काय धर्म होता? सिंधू संस्कृतीतील लोक स्वतःचा धर्म काय मनात होते? पांडव कौरव, देव राक्षस ही जरी पुराणातील असले तरी त्यांच्या धर्म काय होता?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची सनावळीत आणि तपशीलात फार गल्लत होते बोवा. पाश्चात्य विद्वानांनी संशोधनाने लावलेल्या आडाख्यांना/तारखांना थेट फाट्यावर मारता आणि तुम्ही मात्र साधे विकिपिडियावर उपलब्ध संदर्भसुद्धा चुकीचे देता. गजेंद्रगडकर (हे आडनाव आहे. गजेंद्र हे नाव व गडकर आडनाव नव्हे) १९६६ साली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. तुम्हाला हिंदुत्वा/हिंदु धर्माबद्दलचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा संदर्भ द्यायचा आहे तो निर्णय जे.एस.वर्मांनी १९९६साली दिला होता (https://en.wikipedia.org/wiki/J._S._Verma#Hindutva_Judgement). त्या निर्णयाचे इंटरप्रिटेशन हा पुन्हा एक स्वतंत्र विषय होईल. पण तो प्रत्येकाने हवा तसा वाकवला आहे हे खरे.

>>
आपले रामायण महाभारत ख्रि पू ३००० पूर्वीचे आहेत.
>>
याचा बेसिस काय?

>>>
पाश्चात्य विद्वान ज्या मोहोंजो दारो आणि हरप्पा चे गुणगान गातात. त्याचे उत्खनन २० व्या शतकाच्या सुरवातीला झाले. त्या अगोदर हरप्पाच्या बऱ्याच विटा, लाहोर - मुलतान रेल्वे करिता खडी म्हणून वापरूनही झाल्या होत्या. ही संस्कृती इराण पासून गुजरात पर्यंत आणि उत्तरेकडे पसरली होती. या संस्कृतीचा कालखंड ख्रि.पू ३००० ते ख्रि.पू २२०० धरतात. याचा अर्थ ही संस्कृती वेदाच्या ही बरीच अगोदर झाली असे पाश्चात्य विद्वानांच्या कालगणने प्रमाणे दिसते. तरीही या संस्कृतीचा उल्लेख वेदात किंवा उपनिषिदांत नाही. तसेच हिंदू हे विशेषणही नाही
>>>>
तसा मायन, इंका, पापुआ न्यु गिनीमधील संस्कृत्यांचाही येत नाही. मग त्या सर्व संस्कृती वेदांनंतरच्याच आहेत असे म्हणायचे का? वेद हे देवाने निर्माण (अपौरषेय) असल्याने व देव सर्वज्ञानी असल्याने असल्याने देवाला इंका, माया तसेच पॉलिनेशियातील / ऑस्ट्रेलेशियातील विविध संस्कृती नक्की माहिती असणार. त्यांचा उल्लेख का नाही?

>
मुस्लिम धर्म १६००/ १७०० वर्ष पूर्वीचा, बुद्ध , जैन, शीख ही तर अलीकडले. ख्रिश्चन २००० वर्ष पूर्वीचे मग या सगळ्यांचा अगोदर धर्म काय होता? ४००० वर्षांपूर्वी काय धर्म होता? सिंधू संस्कृतीतील लोक स्वतःचा धर्म काय मनात होते? पांडव कौरव, देव राक्षस ही जरी पुराणातील असले तरी त्यांच्या धर्म काय होता?
>>>
लै वेगवेगळे धर्म जगात होवून गेले, होत राहतील. एव्हडेच कशाला गोमांस आनंदाने खाणारे वैदिक धर्माचे लोक आता गोपूजक झाले. तेव्हा वेदातला धर्म व आत्ताचा धर्म एकच म्हणायचा का?

तुमच्या लेखातले मुद्दे पाहता एका अरब प्रवाश्याचे वचन आठवले. १०-१२व्या शतकातल्या भारतीय समाजाच्या वैज्ञानिक/गणिती प्रगतीबाबत 'चिखलात पसरलेली रत्ने' असा त्याने उल्लेख केला होता.

n 1995, Chief Justice P. B. Gajendragadkar was quoted in an Indian Supreme Court ruling:[47][48]
When we think of the Hindu religion, unlike other religions in the world, the Hindu religion does not claim any one prophet; it does not worship any one god; it does not subscribe to any one dogma; it does not believe in any one philosophic concept; it does not follow any one set of religious rites or performances; in fact, it does not appear to satisfy the narrow traditional features of any religion or creed. It may broadly be described as a way of life and nothing more.
https://web.archive.org/web/20061030015441/http://www.hinduismtoday.com/...
सरानी तरी पेपर नीट बघावेत. आशय सम्जुन घ्या .

तुमच्या लेखात >> या संदर्भात १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश गजेंद्रगडकर यांनी दिलेला निकाल फार बोलका आहे. >> असा उल्लेख आहे. तुम्ही गजेंद्रगडकर आडनाव बदललेत मात्र त्यांना मरणोत्तर सर्वोच्च न्यायाधीश बनवून ठेवले आहे.

मला तुमची एक स्टाइल आवडते. चुकीच्या संदर्भाकडे लक्ष वेधले की ते चुकीचे कसे नाहीत यावर तुम्ही ठाम राहता. तुमच्या समांतर विश्व निर्माण करण्याची ताकद आहे. तुम्ही हे निम्नऐतिहासिक लेख लिहिण्यापेक्षा अद्भुतरससंपन्न लेखन करावे. मराठीतील रोलिंग अथवा मार्टिन (जे आर आर) तर नक्कीच बनाल.

बुद्ध , जैन, शीख ही तर अलीकडले >> अलीकडले? Lol जैनांचे चोविसावे आणि शेवटचे तीर्थंकर महावीरांचा जन्म इ. पू ६०० साली झाला होता.. त्यांच्या आधी अजून २३ तीर्थंकर होउन गेले.. तेव्हा जरा नीट अभ्यास करून लेख लिहिला तर एखादी ओळ तरी पटेल..

सॉरी पण नाही पटला हा लेख.
>> ९. ब्रिटिशांनी खरं म्हणजे हिंदू शब्द जास्त रूढ केला. भारतात राहणाऱ्या सर्व धर्माच्या लोकांना त्यांनी हिंदू धर्म बहाल केला. त्यांच्या दृष्टीने शीख, जैन, बुद्ध ही सर्व हिंदूच होत. त्यामुळेच हिंदू पर्सनल कायदा सर्वाना लागू झाला. मुस्लिमाना त्यांनी मुद्दामच वेगळे ठेवले.>> माझ्या माहिती प्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांनी स्वतःच नमूद केल्याप्रमाणे सर्वांत अमूल्य काम म्हणजे हिंदू कोड बिल. त्यानुसारच हिंदू पर्सनल लॉ लागू झाला. तो लागू करतानाही सर्वांसाठी तो समानच लागू करायचा ठरला असूनही फक्त मुस्लीमांनी शरियापेक्षा महत्वाचा कायदा कोणताही नसल्याची घेतलेली भूमीका व घटनेमध्ये अल्पसंख्यांकांच्या हितसंबंधांचे रक्षण हे तत्व असल्यामुळे तो समान नागरी कायदा अजूनही होवू शकलेला नाही. यामध्ये ब्रिटीशांनी त्या कायद्यातून मुस्लीमांना वेगळे ठेवल्याची माहिती माझ्यातरी वाचनात नाही.

लेख नाही वाचला,
पण हिम्दुत्व लादले गेलेय म्हणजे काय? सारेच धर्म जन्माने आपल्यावर लादले गेले असतात. आपण ते स्वतः निवडतच नाही. आणि म्हणूनच मी स्वतःला कोणत्याही धर्माचा मानत नाही.

DS
u r correct but tref was wrong given above. Anyway article is about hindu and not abt PG
I know what i m doing and do not want any advice which are unwanted and ridiculous.

मला पडलेले काही प्रश्न
१. हिंदू धर्माची स्थापना कधी झाली हे कोणी सांगू शकेल काय?. याबद्दल इतिहास काय सांगतो?.
२. हिंदू धर्म जर स्थापन झाला नसेल तर ही संज्ञा प्रथम कुणी वापरली?.
तज्ञांनी यावर प्रकाश टाकावा.

मला तर वाटते धर्मच काय....माणुसपण ही आपल्यावर लादले गेले आहे....नाहीतर आपणही जैवीक उत्क्रांतीतली माकडे आहोत!

सगळा गोंधळच आहे म्हणायचा! स्थानदर्शक म्हणावे, तर आता जे सप्तसिंधू प्रदेशात राहत नाहीत ते हिंदू नव्हेत काय? जगण्याची पद्धत म्हणावी तर ती पिढ्यानुपिढ्या बदलत गेली आहे. माझ्या पूर्वजांची जी जगण्याची पद्धत होती, ती मी अजिबात पाळत नाही, मग त्या अर्थाने आत्ताचे बहुसंख्य 'हिंदुब्रव' हे हिंदू नाहीत.

शेवटच्या प्रश्नाचे उत्तर - महाभारत वगैरे काळात आत्ताची 'धर्म' ही संकल्पनाच नसल्याने हा प्रश्नच इन्व्हॅलिड ठरतो. हे म्हणजे 'पांडवांना शिक्षण पूर्ण झाल्यावर कुठली डिग्री मिळाली' हा प्रश्न विचारण्यासारखे आहे. तेव्हा असं काही लोकांना माहितच नव्हतं. (स्नातक वगैरे संकल्पना वेगळ्या आहेत, कृपया घोळ घालू नये).

लादले गेले आहे का? म्हणजे काय? मला लहानपणापासून आई वडीलांनी सांगितले की आपला धर्म असा असा आहे, त्याला हिंदू म्हणतात.

खरे तर आ़जकालच्या जगात धर्माच्या नावाखाली केवळ rituals ना महत्व आले आहे, त्याचा तत्वज्ञानात लिहिलेल्याशी काही संबंध नाही. उगीचच स्वतःला हिन्दू, ख्रिश्चन म्हणवून घ्यायचे नि मनाला येईल तसे वागायचे, कारण धर्माचे सांगायचे. हा ढोंगीपणा स्पष्ट दिसत असूनहि उगाच धर्माबद्दल बोलायचे कशाला?

समजा लादले गेले असले तरी तुम्हाला वाचायला शिकवले आहे ना? पुस्तके उपलब्ध आहेत ना? मग वाचा नि विचार करा. मग ठरवा की हिंदू रहायचे की दुसरा कुठलातरी धर्म स्वीकारायचा की निधार्मिक रहायचे.

पुस्तके उपलब्ध आहेत ना? मग वाचा नि विचार करा. मग ठरवा की हिंदू रहायचे की दुसरा कुठलातरी धर्म स्वीकारायचा की निधार्मिक रहायचे.
>>>>>

कुठल्या तरी धर्माला निवडणे वा कुठल्यातरी धर्माचे होणे हे ईतके गरजेचे आहे का की त्यासाठी अभ्यास करावा?

<<त्यासाठी अभ्यास करावा?>>

कुठल्याहि गोष्टीची गरज असणे किंवा नसणे हे त्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय ठरवू नये.
आणि विशेषतः जेंव्हा धर्म लादला आहे का वगैरे प्रश्न पडत असतील तर नक्कीच विचार करावा की असे का वाटते, नि नको असल्यास विचार केल्याशिवाय कसा निर्णय घेणार की काय करायचे?
जर काही प्रश्नच पडत नसतील, तर मग अभ्यास करायला नको.
पाळलेली जनावरे सुद्धा जबरदस्ती का होईना, अभ्यास करतात नि मग सांगू तसे वागतात. त्यांना जर विचार करता आला असता, तर कदाचित काही प्राणी मुळीच पाळल्या गेले नसते किंवा काही शिकले नसते.

फक्त मायबोलीवर धागे काढणे असे आहे की विचारच करायला नको, आले मनात की काढला धागा!

कुठल्याहि गोष्टीची गरज असणे किंवा नसणे हे त्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय ठरवू नये.
>>>>>

जगात अगणित गोष्टी आहेत.
कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करणार?
जी गोष्ट महत्वाची वाटते तिचाच करणार ना?
धर्माला ईतके महत्व द्यायची गरज आहे का? हा प्रश्न आहे.

आणि विशेषतः जेंव्हा धर्म लादला आहे का वगैरे प्रश्न पडत असतील तर नक्कीच विचार करावा की असे का वाटते,
>>>>

मुळात मला वाटतच नाही की माझ्यावर कोणी धर्म लादला आहे. कारण मी कुठलाही धर्म मानत नाही आणि याचा आजवर कोणाला काही फरक पडला नाही. मग यात लादणे कसले?

वैयक्तिक रीत्या कुणाला जर असे वाटत असेल की लादणे कसले, तर काही प्रश्नच नाही. पण कुणाला वाटते का? असा प्रश्न आहे. मला स्वतःला असे वाटले होते, म्हणून मी त्याबद्दल काय केले ते लिहीले नि लोकांना सांगितले, ऐकलेच पाहिजे असा आग्रह नाही.

जगात एव्हडे फ़ालतु प्रश्न फ़क्त मलाच पडतात असे मला पुर्वि वाटायचे................................................................
मग मि मायबोलि जोईन केलि........ पुढे मला हा जाणवणारा त्रास थाम्बला....

पी बी गजेन्द्रगडकर १९९५ ला चीफ़जस्टिस होते हे ऐकून सदेह वैकुंठास पोचलो. ए एम अहमदी बहुधा त्यांचे ड्रायवर असावेत...

पी बी गजेन्द्र गडकर असं लिहा 100 वेळा नैतर पेंडसे गुरुजी शिमट्या हाणतील बुडावर.

आणि अहमदींना गजेंद्र गडकरांच्या यादीत. छे छे कुठे फेडाल ही पापे.

सध्या कुठेतरी पोन्नियिन सेल्वन मुळे वाद सुरू झाला आहे असे ऐकले. चोल राजे मूळ हिंदू नव्हते तर शैव होते असे काही तरी वादाचे कारण होते. तुम्हाला तर हा प्रश्न आधीच पडला होता की.