हॅलोवीन...

Submitted by उडन खटोला on 5 November, 2017 - 01:51

कालपरवा हॅलोवीन बद्दल बरीच सगळीकडे चर्चा सुरु होती .आजकाल मुंबई पुण्यात काही कॉन्व्हेन्ट आणि इन्टरनॅशनल स्कूल्स मध्ये हालोवीन साजरा होवू लागला आहे...घोर कलयुग!

सकाळीच पोरांना विचारलं ( यंग जनरेशन ला इंग्रजी नावं असलेल्या रुढी जास्त छान आणि मॉडर्न वाटतात)
"अरे भुतं / पितरं यांच्याबाबत असतो तो " असं मोघम उत्तर आलं.. सोबत काय या जुन्या लोकांना का sssss ही माहीत नसतं असे भाव सुद्धा...

मलाही या हॅलोवीन बद्दल फार काही माहीत नाही, पण मी त्याची खिल्लीही उडवत नाही... कुठल्याही प्रकारे का असेना ते पुर्वजांचं या निमित्ताने स्मरण करतात एवढंच मी ग्रास्प केलं.

संताप येतो जेव्हा आमच्याकडे तथाकथीत विज्ञाननिष्ठ लोक्स, पितृपंधरवडा, श्राद्ध, पिंडदान, तर्पण... या आमच्या विधिंची खिल्ली उडवत हे थोतांड आहे वगैरे बकतात तेव्हा. जणु वैज्ञानिकतेचा ठेका हा फक्त इंग्रजी भाषीकांनीच घेतलाय. आपल्याकडचे लोक डोक्यात याच कारणांमुळे जातात. ते लोक पहा जे गेली अनेक वर्षं करतायत ते तस्संच कंटीन्यु करतात.

प्रभू येशू हा आभाळातल्या देवापासून, एका स्त्रीला कुठल्याही पुरुषाशी समागम न होता झाला.

चेहेरा लपवून गुन्हा फादर ला सांगीतला की माफी.

यावर ते श्रद्धेने विश्वास ठेवतात आणि शास्त्राच्या आभ्यासावर सुद्धा. आपल्याकडे मात्र कसं बसं बी ए मराठी झालेला,

कशावरुन रामाचा जन्म आयोध्येत झाला ?
अमेरीकेत का आमावस्या अशुभ नसते ?
वेस्टर्न कंट्रीज मध्ये का भुतं नसतात ?
ते लोक का करत नाही श्राद्ध ? त्रिपिंडी / कालसर्प वगैरे .... ??

असले तारे तोडत असतात.... संताप या गोष्टीचा येतो. जे मला पटत नाही ते मी न करण्यापर्यंत ठीक .. पण करणारे मुर्ख / बावळट / अंधश्रद्धा असलेले असं सिद्ध करु पाहतात त्यांची मात्र थोबाडं फोडावीशी वाटतात...

असो...

हॅपी बिलेटेड हॅलोवीन...

*** संपादित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे म्हणतात की इतर आक्रमकांनी नुसती भारतातली संपत्ति लुटली, किंवा भारतात येऊन राहिले. ब्रिटिशांनी मात्र भारतातील लोकांचे मनच नाहिसे केले. आता भारतातले जुने, नवे सगळेच भारतीयांना नकोसे झाले आहे, फक्त पाश्चिमात्य गोष्टीच खर्‍या आणि अनुकरणीय वाटतात. हे ब्रेन वशिंग तीन चार पिढ्या पूर्वीपासून करण्यात आलेले आहे.
गंमत म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यावर पुनः आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्याचे सोडून गेल्या १५-२० वर्षात जास्तच पाश्चिमात्य गोष्टी - भाषा, सण, भारतीय गोष्टींची टिंगल इ. यांचे प्रमाण वाढले आहे - इतके की इथे अमेरिकेत गेली पन्नास वर्षे रहाणार्‍या भारतीयांपेक्षा आजकालचे इथे येणारे भारतीय जास्तच पश्चिमात्य झालेले आहेत! इथले अनेक लोक अजूनहि घरी पूजा, सत्यनारायण, गणपती इ. करतात, नवीन येणार्‍या लोकांना त्याचे इथल्या अमेरिकन लोकांइतकेच कौतुक असते.

मी भारतात असेपर्यंत हॅलोवीनबद्दल माहीत नव्हतं. अमेरिकेत,त्यातही जास्तकरून जेव्हा तुमचं मूल लहान असतं तेव्हा हॅलोवीन एन्जॉय करायला मजा येते.

आता पितृपंधरवड्यात काय सेलिब्रेट करणार? तिथे पितरांसाठी स्वयंपाक घरच्या स्रीनेच केला पाहिजे, त्यातही मग सोवळं ओवळं. आता स्वयंपाक घरात खपणे ही सर्वच स्त्रियांची एन्जॉय करण्याची व्याख्या नसेल ना. शिवाय आमच्याकडे पितृपक्षातले रिच्युअल्स माझा भाऊच करतो, कारण मुलीला ते 'अधिकार' नाहीत म्हणे.
त्यातुलनेत हॅलोवीन ते ख्रिसमस सर्व इथले सण हे स्त्रियांना साजरे करता येतात. भोपळे कार्व करण्यापासून गंमतीदार कपडे घालून trick or treat करण्यापर्यंत सर्व स्त्रीपुरुष समानपणे करतात. लिंगभेद आणि जातीभेद कवटाळून बसणार्या प्रथा दूर होऊन भारतात जर नवे वारे वहात असतील तर उत्तमच आहे की.

सनव +१२३४५

भारतीय रूढी परंपरा थोड्या मोल्ड होऊ शकल्या (जसे आता मुली दहीहंडी फोडतात, मंगळागौरी काही हौशी बायका सुट्टी नसल्याने रविवारी पूजतात, डोहाळेजेवणाला बाळ नसलेल्या बायकांना सुद्धा आमंत्रण असते, हळदीकुंकू करताना सोसायटीमधल्या सर्व जातीधर्माच्या बायकांना बोलावतात), आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणारे पायंडे मोडू शकलो तर नक्की त्यांची लोकप्रियता वाढेल.

{जणु वैज्ञानिकतेचा ठेका हा फक्त इंग्रजी भाषीकांनीच घेतलाय. }
भाषेचा आणि विज्ञानवादी असण्याचा वा नसण्याचा काय संबंध?
पुढे बी ए मराठीवालापण तुमचे डोके फिरवणारे प्रश्न विचारतोय. एम ए इंग्लिशवाल्याचा तर तुम्ही जीवच घ्याल.

पण करणारे मुर्ख / बावळट / अंधश्रद्धा असलेले असं सिद्ध करु पाहतात त्यांची मात्र थोबाडं फोडावीशी वाटतात...
>>> आणि हिंदूत्ववादी सहिष्णु आहेत म्हणे..... Happy

असल्या हिंदुत्ववाद्यांना भारताची चर्चा-विनिमय, वादविवादाची हजारो वर्षं जुनी परंपरा माहिती नाही याबद्दल चाबकाने फोडून काढावे काय?
बी.ए.मराठी वाल्यांचा अपमान केल्याबद्दल तुमचा कोणता अवयव शेकून काढावा?

नाना, तुम्हीही मला एका धाग्यावर परवा माझ्या शिक्षणाबद्दल विचारत होतातच की. असे filters प्रत्येकाच्या डोक्यात असू शकतात.
विज्ञान विषयावर बीए मराठीने बोलावं पण जेएनयूबद्दल बोलण्याआधी तुम्हाला शिक्षणाचे डिटेल्स द्यावे, शेती असलेल्यांनीच, शहरातील नसलेल्या लोकांनीच शेतकरी आंदोलनाबद्दल बोलावं, काय नी काय!

असो, मूळ विषय हॅलोवीन आहे मला वाटतं.

बी.ए शी जोडलेला संबंध चुकिचा वाटला मलापण आणि लेखही अजुन मोठा हवा होता. बाकी पियु यांनी म्हटल्याप्रमाणे हिंदु धर्म् मोल्ड् केल्यास आपला धर्म् आपल्यासाठी खुप उत्तम्.

असल्या हिंदुत्ववाद्यांना भारताची चर्चा-विनिमय, वादविवादाची हजारो वर्षं जुनी परंपरा माहिती नाही याबद्दल चाबकाने फोडून काढावे काय? >> हसु आल नाना हा प्रतिसाद वाचुन तुम्हीच तुमच्या वाक्याशी प्रतारणा करताय्. धन्य् आहात Lol

नाना, तुम्हीही मला एका धाग्यावर परवा माझ्या शिक्षणाबद्दल विचारत होतातच की. असे filters प्रत्येकाच्या डोक्यात असू शकतात.
>> तुम्ही तिथे उत्तर का दिलं नाही? इथे का काढताय ते? माझ्या डोक्यात काही फिल्टर नाहीत. तुमच्या असतील ते तुम्हाला माहित, जनरलाइज करु नका धागाकर्त्यांसारखे.

विज्ञान विषयावर बीए मराठीने बोलावं पण जेएनयूबद्दल बोलण्याआधी तुम्हाला शिक्षणाचे डिटेल्स द्यावे, शेती असलेल्यांनीच, शहरातील नसलेल्या लोकांनीच शेतकरी आंदोलनाबद्दल बोलावं, काय नी काय!
> लावा वडाची साल पिंपळाला....

असो, मूळ विषय हॅलोवीन आहे मला वाटतं.
>> धाग्याकर्त्याने बी.ए.मराठी लिहिलंय धाग्यात, ते दिसलं नाही?

भुषण राव. काहीही दिमाग लावायची गरज असेल तर तुम्हाला आहे हां. मी नेमकं कोणतं वाक्य कोट केलंय ते बघा, दिमाग चालला तर ठिक नाही तर पोगो बघा आपलं.

नाना पोगो किंवा आस्था चैनेल् बघायच वय तुमच आहे किंवा झालय. कारण सांगतो तुम्ही एकिकडे भारताच्या चर्चा-विनिमय पर्ंपरेविषयी बोलता आणि इतर मुद्दे दुर्लक्षित करुन एखादा मुद्दा पकडुन हातघाईची भाषा करता. बघा काय करता. शुभरात्री जय श्रीराम Happy

तुम्ही तिथे उत्तर का दिलं नाही? इथे का काढताय ते?

तिथे इग्नोअर केलं होतं इथे तुम्ही बरोबबर उलटा स्टँड घेतलेला बघून गम्मत वाटली.
बाकी जर २०१२ नी २००९ चे केअरफुली प्रिझर्व केलेले सक्रीनशॉट्स २०१७ मध्ये आणून टाकलेले चालतात तर कालपरवाच्या धाग्यावरचा रेफरन्स चालत नाही का दुसरीकडे दिलेला? छान छान.

तिथे इग्नोअर करणे सगळ्यात मोठी चूक. सिलेक्टीव होऊन चालत नाही ना? तिथे उत्तर दिलं असतं तर इथला स्टँड आज कळला असता तुम्हाला. मगर ये हो न सका. अफसोस!

भुषण भौ, जाव खापिके सो जाओ तुम्हारे बस की बात नही.
थोडे बदाम पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर खा. बुद्धी तल्लख होते म्हणतात.

जुनी पोस्ट आठवली.

----
एक असतं डिश्कशन
एक असतं डिश्क्यांव

डिश्कशनवाले डिश्क्यांवला
डिश्कशन कर म्हणतात

डिश्क्यांववाले डिश्कशनवाल्याला
डिश्क्यांव करतात

डिश्क्यांववाल्यांना डिश्क्यांव
करायला आवडतं

डिश्क्यांववाल्यांना डिश्क्यांव
झालेलं आवडत नाही

मग ते डिश्कशनवाले होतात.
---

तुमचा स्टँड कळला आहेच!

असो- कमिंग बॅक टू डिस्कशन, पियू +१
सणाचं स्वरूप काळानुसार बदलणं आणि इंक्लुजिव्ह होणं गरजेचं आहे. पितृपक्ष आणि हॅलोवीन यापैकी लोकांना हॅलोवीन हवासा वाटतो कारण हॅलोवीन इज फन.
अलीकडच्या काळात भारतात ख्रिसमस मोठ्या प्रमाणात हिंदू लोकही साजरा करतात हेही छान आहे. ख्रिसमसच्या बाबतीत सवाष्ण महिलेनेच डेकोरेशन करावे, सँटाची टोपी फक्त मेल चाईल्डने घालावी,ज्या घरात मुलगा नाही मुलीच आहेत त्यांना ख्रिसमसच्या गिफ्ट्स घेण्याचा 'अधिकार' नाही वगैरे फालतू नियम नाहीयेत.

नाना वाईट वाटुन घेऊ नका हो कधी हिंसावादी कधी अहिंसावादी अस् इकडे तिकडे उड्या मारताना पाश्र्वभागावर पडण्याची दाट शक्यता असते मग तुम्हालाच शेक घ्यावा लागेल स्वत्:च्या हातांनी. तुर्तास फळे खा. . आणि नेमके ठरवा तुम्ही चर्चावादी आहात की हातघाईवादी.
उगाच तुम्हाला मल्टिपल पर्स्. डिसऒरर्डर् झाल्यासारखे वाटते.

भुषणभौ. चला हवा येउ द्या. प्रत्येक प्रतिसाद आपल्याला समजलाच पाहिजे असा बालहट्ट धरु नये. बालदिनाच्या शुभेच्छा, जवळ आलाय म्हणून. परत तुमी भेटणार, नाही भेटणार.

तुमचा स्टँड कळला आहेच!

>> असं आपल्या आपण कुणाबद्दल प्रिजुडाइस्ड कळून घेऊ नये. काहीही स्टेटमेंट ठोकण्याआधी समोरच्या व्यक्तीची नीट विचारपूस करावी. मी तरी करतो.

काही भुषणसारखे लोक तर कितीही समजावलं तरी आपला हेका धरुन बसतात. तसं होऊ नये.

आपल्या पूर्वजांची आठवण ही काढलीच पाहिजे.

फक्त त्या सोबत येणाऱ्या अंधश्रद्धा टाळायला हव्यात. एखाद्या प्रगत राष्ट्राचं इतकीही अनुकरण नको की त्यांच्या अंधश्रद्धाही चालतील. ते करतात ना मग आपण केलं तर काय वाईट.

पण ते सुद्धा कधी कधी चुकू शकतात. अंधश्रद्धेत सुख असावे, म्हणून त्या फोफावतात.

विज्ञान सकारण सगळं दाखवून देत आणि ते मनाला पटत सुद्धा, तस अंधश्रद्धेचं नाही ना?