मृत्यू एक सखा

Submitted by दत्तात्रय साळुंके on 2 November, 2017 - 02:03

मृत्यू एक सखा

मनाच्या कोपऱ्यात
दडून असतो मृत्यू
काहीच वैर नसतं
तरी भासतो शत्रू

कधीच न पाहीलेला
काळपुरुष दिसतो
शेजारचे दार ठोठावले
तरी मी टरकतो

मीच वैर जपतो
इथे तिथे लपतो
नेहमी झिडकारले
तरी तो जीव लावतो

जगणं जरी छळतं
तरी कुठं कळतं
मन याच्या भयानं
दूर दूर पळतं

देहाचा खुळखुळा
होतो जेव्हा नादहीन
वाट बघत असतो
एक मित्र नवीन

आवाज न करता
येतो मज जवळ
आश्वासक हात
घालतो कवळ

मीही गहिवरतो
उशीर का विचारतो ?
न सांगता आलो
माफ कर म्हणतो

काळजीने म्हणाला
तू फार थकलास
जरा हवापालट करु
मग येईल उल्हास

मीही मग गुपचूप
सोडतो जुने घर
जातो सख्या बरोबर
अज्ञात आनंदयात्रेवर

दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Use group defaults

>>>>कधीच न पाहीलेला
काळपुरुष दिसतो
शेजारचे दार ठोठावले
तरी मी टरकतो <<<<
खुप छान लिहिलि आहे. आवडली कविता.

आवडली...
मीही मग गुपचूप
सोडतो जुने घर
जातो सख्या बरोबर
अज्ञात आनंदयात्रेवर...
मस्तच ....

मीही मग गुपचूप
सोडतो जुने घर
जातो सख्या बरोबर
अज्ञात आनंदयात्रेवर >>>>>
बढिया..... Happy

असं सहज सख्य जमलं तर किती मजा येईल !!! Happy

पद्मजी, खूप धन्यवाद सुंदर प्रतिसादासाठी आणि गुलजारजींच्या कवितेची आठवण करुन देण्यासाठी. गुलजारजींची प्रतिभा अगाधच आहे . या कवितेचा English अनुवादही या लिंक वर आहे http://poetry.saavan.in/826-2/ जेव्हा एकाच विषयावर असे साहित्य मिळते तेव्हा अजून विचार परिपक्व होतात . पुनश्च धन्यवाद या सुंदर कवितेच्या आठवणीसाठी .

शशांकजी खूप धन्यवाद !
आपल्या प्रतिसादाच्या अनुरोधाने पुढील ओळी आठवल्या IMG_20171103_160041.jpg

पुनश्च धन्यवाद या सुंदर कवितेच्या आठवणीसाठी .>>> त्याच गुलजारजींच्या ओळींचा कोणीतरी मराठीत अनुवाद करण्याचा सुंदर प्रयत्न केलाय...

काळ नावाची एक कविता आहे
एका कवितेचा माझ्याशी वायदा आहे..
सृजनाला चौकट देण्याचा..

अडखळत्या ठोक्यांच्या नादात
जेव्हा वेदना विरू लागेल
ओशाळल्या चेह-याने चंद्र क्षितिजावर रेंगाळेल
उगवता दिवस अन मावळती रात
घुटमळतील उगाच एकमेकांना पाहात
कणभर अंधार की कणभर प्रकाश?
उजेड-काळोखाच्या अस्तित्त्वांचा आभास..
अन अशातच सुरू होइल
शून्यातून अथांगतेकडचा प्रवास......

....एका कवितेचा माझ्याशी वायदा आहे..
सृजनाला चौकट देण्याचा....

पद्मजी, हॅट्स ऑफ टू यु ! मराठी भाषांतर छान आहे पण इंग्रजी व मराठीत एक विसंगती जाणवली ती म्हणजे मराठीत चंद्राचा चेहरा ओशाळला लिहिले . इंग्रजीत And a yellowish (young) moon starts to rise and reach its zenith असे आहे .