knee replacement surgery विषयी

Submitted by स्वप्ना_तुषार on 31 October, 2017 - 07:34

माझ्या आईचे knee replacement चे operation डॉ. नरेंद्र वैद्यांकडे रोबोटिक पद्धतीने करावयाचे ठरले आहे. ते निगडी आणि मित्रमंडळ दोन्ही ठिकाणच्या 'लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ' ही सर्जरी करतात. या दोन्हींपैकी कोणते हॉस्पिटल जास्त चांगले (म्हणजे सुविधा , खाण्याची सोय इ.च्या दृष्टिकोनातून ) आहे? कोणाला काही अनुभव असल्यास प्लीज सांगा . निर्णय घेण्यास सोपे जाईल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. तुम्ही डॉक्टर निवडला आहे व त्याला तुमचा पाय कापायची परवानगी दिलेली आहे.
याचा अर्थ असा, की तुमचा त्या माणसावर बर्‍यापैकी भरवसा आहे.

२. तुम्ही मायबोलीवर क्राऊड विस्डम कॉल करून तुमचा निर्णय योग्य की अयोग्य हे विचारत नसून त्या डॉ.नी सांगितलेल्यापैकी कोणते हॉस्पिटल निवडू असे विचारत आहात.

३. हॉस्पिटलबद्दल तुम्हाला फक्त : (म्हणजे सुविधा , खाण्याची सोय इ.च्या दृष्टिकोनातून ) इतकीच फडतूस माहिती हवी आहे.

**
आता सल्ला.

ऑपरेशन ज्या खोलीत होते, ती खोली, तिची निर्जंतुकीकरणाची सुविधा, लॅमेलर एयर फ्लो, रोबॉटिक काँप्य्युटरचे वर्जन क्रमांक व दर्जा, उपलब्ध परिचारिकांची लायकी (क्वालिफिकेशन्स), उपलब्ध फिजिओथेरपिस्ट उर्फ व्यायाम देणारे (तथाकथित) "डॉक्टर" व त्यांचा दर्जा व लायकी, त्या इस्पितळात आजवर झालेल्या गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या यशस्वितेची टक्केवारी, वापरात आणल्या जाणार्‍या कृत्रीम सांध्याच्या दर्जा, कंपनी, इ. बद्दलचे आजवरचे 'पियर रिव्ह्यूड' अनुभव,

तुमच्या पेशंटचे वय, त्यांच्या हाडांची सद्यस्थिती, प्रतिकारशक्ती, डायबेटीस बीपी इ. रिस्क फॅक्टर्स, त्यांची इच्छाशक्ती, इ.

तुमचा खिसा पाकीट, तुमच्या कंपनीने दिलेले इन्शुरन्स पॅकेज Wink

व अल्टिमेटली, नशीब Wink

या (काही बाबीं) वर शल्यक्रियेचे निष्पन्न अवलंबून आहे.

सही करण्याआधी कन्सेन्ट फॉर्म नीट वाचा, अन सगळ्यात महत्वाचे, माबोला विचारण्याऐवजी त्या डॉक्टरांना विचारा, की कुठे रिझल्ट जास्त चांगला येईल? : इतकेच सुचवितो.

आ.रा.रा याच्यांशी सहमत.
तुमच्या पेशंटचे वय, त्यांच्या हाडांची सद्यस्थिती, प्रतिकारशक्ती, डायबेटीस बीपी इ. रिस्क फॅक्टर्स, त्यांची इच्छाशक्ती, इ.
वरील गोष्टी खुप महत्वाच्या आहेत. माझ्या पाहण्यातिल जवळचे नातेवाईक ज्यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे त्यांची अवस्था पुर्वीपेक्षाही अधिक खराब झालेली आहे तेही नावाजलेल्या हॉस्पिटल मधून चांगले डॉक्टर निवडून सुध्धा. खुप जणांना ऑपरेशन आधीचे दुखणे बरे असे होते ऑपरेशन नंतर. तुम्हाला घाबरवण्याचा हेतू नाही. फक्त काही अनुभव बघितले आहेत. त्यांच्या मते दुखणे बरे ऑपरेशन नको असे होते.

माझ्या पाहण्यातिल जवळचे नातेवाईक ज्यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे त्यांची अवस्था पुर्वीपेक्षाही अधिक खराब झालेली आहे तेही नावाजलेल्या हॉस्पिटल मधून चांगले डॉक्टर निवडून सुध्धा. >>>>> आईच्या अनुभवावरुन असहमत.

आईच्या ७८ व्या वर्षी ही शस्त्रक्रिया झाली.त्याअगोदर माझी आईच त्यासाठी तयार नव्हती.कारण बेडरिडन झाले तर दुसर्‍याला त्रास नको म्हणून.
२०११ साली चिंचवडला असताना ,दोनवेळा तिचे बोनलॉक झाले.(हाडावर हाड चढले.. डॉ.चे म्हणणे) ते फार वेदनादायी होते.शेवटी डॉ.नी सांगितले की असे होत राहिले तर ५-६ महिन्यात तू बेडरिडन होशील.त्याला घाबरुन, तसेच माझे एक डॉ. नातलग, निरामय हॉस्पिटलशी संलग्न असल्याने(आईचा त्यांच्यावर विश्वास आहे.) डॉ.निर्मलकुमार ढुमणे यांनी दोन्ही पायांची knee replacement surgery केली. ३-४ दिवसात डिस्चार्ज मिळतो.पण आईच्या बाबतीत थोडी कॉप्म्लिकेशन झाल्याने (थ्रॉम्बॉसिस) आठवडा लागला.आईला १ पायरी चढता येत नव्हती/खूप त्रास होत होता.पण त्यानंतर १ जिना चढू शकत होती.

तुमच्या आईची ही शस्त्रक्रिया करायची असेल तर खाण्यापिण्याच्या सोयीपेक्षा , आ.रा.रा.नी सांगितल्यानुसार करा.तसेच सर्जरी झाल्यानंतर १/२ माणसांव्यतिरिक्त पेशंटकडे कोणालाही येऊ देऊ नका.भले कोणालाही उर्मट्पणा वाटो किंवा काहीही.डॉ.च्या म्हणण्यानुसार अशावेळी इन्फेक्शन व्हायची भिती असते.पेशंटच्या चादरी/ कपडे हे दरवेळी फ्युमिगेट केलेले आहेत याकडे लक्ष द्या.
बेस्ट लक.