"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सातवच्या मुलीची फारच थंड रिएक्शन दाखवली मामा गेल्याचं कळल्या नंतर ही. आई हमसुन हमसुन रडत होती त्यामानाने मुलगी अगदीच शांत होती. >> बॅक टू बॅक बसलेल्या मोठ्या धक्क्याने ती अशी झाली असावी

आता रागिणी जगताप ला डायरेक्ट भेटू शकणार नाही बहुतेक, ती त्या हवालदार थ्रू जगताप कडची माहिती करून घेईल नक्की काय झालं याची. आणि त्या व्हिडीओ रेकॉर्डिंग मध्ये सरपोतदार आधी जगतापला प्लॅन सांगतो,तेही रेकॉर्ड झालं असेल ते रागिणीला मिळेल.
असं वाटतंय तो हवालदार,नर्स,डॉक्टर हे सगळेजण रागिणीचं सत्य समजूनही तिला मदत करतील किंवा तिच्या विरुद्ध साक्ष देणार नाहीत आणि रागिणी सुटेल यातून.

कि क जिवंत राहील पण त्याची सगळी संपत्ती जी बिटकोईन इ मध्ये आहे ती सुहासचं स्किल वापरून रागिणी काढून घेईल असं व्हायला पाहिजे,कारण जरी त्याला अटक झाली तर पुढे फार काही घडणार नाही

ओहो, म्हणजे परदेशी आधीपासूनच इन्व्हाॅल्व्ह आहे का. ओके. मी ते मिसलंय बहुतेक. परत बघेन.

सातवची बायको म्हणते पण तिला की अचानकच मोठी झालीस वगैरे. होतात अशी मुलं समजूतदार अचानक.

कि क जिवंत राहील पण त्याची सगळी संपत्ती जी बिटकोईन इ मध्ये आहे>> माखिजाची संपत्ती बिटकाॅईन्समध्ये आहे??

ओहो, म्हणजे परदेशी आधीपासूनच इन्व्हाॅल्व्ह आहे का. >>> त्याला आधी दाखवलं नव्हतं.. पण तो माखिजाला भेटायला येतो तेव्हा त्यांच्या बोलण्यातून कळलं

ती त्या हवालदार थ्रू जगताप कडची माहिती करून घेईल नक्की काय झालं याची. आणि त्या व्हिडीओ रेकॉर्डिंग मध्ये सरपोतदार आधी जगतापला प्लॅन सांगतो,तेही रेकॉर्ड झालं असेल ते रागिणीला मिळेल. >> विनि नक्की कोणत्या रेकॉर्डिंग बद्दल बोलतेयस? रागिणीकडे जे रेकॉर्डीन्ग आहे ते शोभा माकन च्या पार्लर मध्ये धाड टाकतानाच आहे. जिथे धुरत चा खून झाला तिथलं नाही. (मी बरोबर बोलतेय ना? की माझं काही चुकतंय? :अओ:)

अष्टेकरांच्या घरून खेळणं चोरण्याचा प्लॅन फिस्क्टला.

जिथे धुरत चा खून झाला तिथलं नाही >> तिकडेही आहे रेकॉर्डिंग, तो सरपोतदार म्हणतो ना जगतापला पुढे ये पूर्ण चेहरा दिसू दे,वगैरे

अष्टेकरांना (किंवा त्याच्या बायकोला) हीच आईची डिमेनशियावाली स्टोरी (आईने स्वतःच्या हाताने बनवलेलं खेळणं, बाळाची शेवटची आठवण इत्यादी) सांगून इज्जतीत मागता येणार नाही का आबा? तिथे कश्याला फालतू चोरीचे प्लॅन्स किंवा नोकराकरवी पळवापळवी? रागिणीचा मार्ग खडतर आहे हे दाखवण्यासाठी उगाचच ही चोरी घुसडल्यासारखी वाटतेय. (असेही अष्टेकरांच्या बायकोला ते खेळणं बकवास वाटतं. आवडत नाही).

अवांतर: अष्टेकरांचा मुलगा झालेला छोटा मुलगा कसला क्यूटोबा आहे Happy

बाकी संदीप पाठक किक च्या घरी जाऊन काय बोलतो हे मला नीट कळलंच नाही. Uhoh

आजचा भाग जरा कमी इंटेरेस्टिंग होता ना?

कालच्या धक्कादायक भागानंतर आजचा एपि फारच सो सो होता.
रा ला धुरतचा खुनी शोधायची काही पडलेली नाहीये. तो विषय संपला. आता ती लागली आता त्या खेळण्याच्या मागे.
वं.गु बोलल्याच विग विषयी नर्सजवळ. (काल परवा लिहीलं होतं ईथे कोणीतरी,असं होईल म्हणुन).

तिकडेही आहे रेकॉर्डिंग, तो सरपोतदार म्हणतो ना जगतापला पुढे ये पूर्ण चेहरा दिसू दे,वगैरे > अहो मॅडम हो ना, तिथे आहे रेकॉर्डिंग पण ते रागिणीकडे कुठे आहे? Uhoh

त्या मुलाची आई (मुग्धा गोडबोले) काय बोलली channel समोर.? आज ८ तारीख त्यामुळे त्याला आज काही होणार नाही माहित होतं वगैरे!??

त्या मुलाची आई (मुग्धा गोडबोले) काय बोलली channel समोर.? आज ८ तारीख त्यामुळे त्याला आज काही होणार नाही माहित होतं वगैरे!??

>> दिग्दर्शकाला ते खूप अंधश्रद्ध पात्र दाखवायचं आहे (श्रीमंत लोक जरा superstitious असतात हे जनरलाईझेशन). त्यामुळे मुद्दाम ते वाक्य घुसडलं आहे की ८ हा त्याचा भाग्यांक का काहीतरी आहे. त्यामुळे त्या दिवशी त्याला काही होणार नाही याची मला खात्री होती. कदाचित या अंधश्रद्धाळूपणाचा पुढे काही रेफ असेल. म्हणजे रागिणी मुग्धा गोडबोलच्या मनात काहीबाही भरवून (करणी वगैरे) ते खेळणं फेकून देण्यास उद्युक्त करेल.

अष्टेकरांना (किंवा त्याच्या बायकोला) हीच आईची डिमेनशियावाली स्टोरी (आईने स्वतःच्या हाताने बनवलेलं खेळणं, बाळाची शेवटची आठवण इत्यादी) सांगून इज्जतीत मागता येणार नाही का आबा? तिथे कश्याला फालतू चोरीचे प्लॅन्स किंवा नोकराकरवी पळवापळवी? रागिणीचा मार्ग खडतर आहे हे दाखवण्यासाठी उगाचच ही चोरी घुसडल्यासारखी वाटतेय. (असेही अष्टेकरांच्या बायकोला ते खेळणं बकवास वाटतं. आवडत नाही).°>>>>>>>>>
+11111 किती मूर्खपणा करावा रागिणीने त्यासाठी.

ते 8 ती मुद्दाम म्हणाली असे पुढचा तिचा सिन पाहून मला वाटले. तिच्या लेखी पत्रकार ही जमात मूर्ख आहे बहुधा.

अग ते लकी नबर वैगरे टाइप आहे ८ आकडा वैगरे! फार काय सिरियस नाही ( अष्टेकर मधला ८ ही असेल हे आपल उगाच)
रा फार इम्पल्सिव्ह आहे हे कितव्यादा तरी सिद्ध झाल , अष्टेकर कडे जाते पण सयम ठेवत नाही, तिने सान्गितलेला प्लॅन कुणालाही न पटेल असाच होता पण तो सान्गताना सुधा तिने धिराने घेतल नाही , चला चला अस करु अशी घाई ! अस कुणि बिझनेस पर्सन आपल घर दाखवेल का? तेही कॅमेरासमोर?
आइच्या अल्झायमरच कारण सान्गुन ते खेळण मागता आल असत कदाचित इमोशनल कारणासाठी कुणि कन्सिडरही केल अस्त द्यायला..
सन्दिप ने किरण गेल्यव्र जे फोटो काढले ते तो माखिजा विरुद्ध म्हणुन असु देत जवळ अस म्हणून ठेवले असावे , तिथे लपल्याने त्याला आपल्या बॉसचा बॉस कोण हे कळत , त्यालाच काम देण कस योग्य आहे हे पटवायला तो गेला होता.
परदेशी आणि माखिजा मधला सवान्द एक्दम फनी, जितका परदेशी कन्फ्युज होत होता तेवढी माखिजाला अजुन मजा येत होती.

कदाचित या अंधश्रद्धाळूपणाचा पुढे काही रेफ असेल. म्हणजे रागिणी मुग्धा गोडबोलच्या मनात काहीबाही भरवून (करणी वगैरे) ते खेळणं फेकून देण्यास उद्युक्त करेल.>> येस असं होऊ शकत. रागिणी नेमका त्या आठ आकड्याचा रेफरंस देऊन तुम्ही ते खेळणं जिथून मुलाला दत्तक घेतलं तिथेच परत द्या असं म्हणेल आणि ते नेमक मुग्धा गोडबोलेला पटेलही

पण पुढिल भागात म्हणून जे दाखवलं त्यात रागिणी संदिप डावाकडे जाताना जो वेष करून गेली होती तोच वेष करून एका मोलकरीण वजा बाईला पैसे देऊन अष्टेकरांच्या घरून काही टेन्डर चे कागद चोरायचेत असं सांगतेय.
तिचा नक्की काय प्लॅन आहे कळत नाहिये. असो पाहण्यात जास्त मजा आहे.

, तिथे आहे रेकॉर्डिंग पण ते रागिणीकडे कुठे आहे>>तेच लिहिलंय की रागिणी ते रेकॉर्डिंग मिळवू शकते त्या हवालदारा मार्फत ,पोलिसांकडे असेलच ते

प्राजक्ता ती डावाकडे नाही गेली. डावाकडे जो वेष करुन गेली होती त्याच वेषात ती आता दुसर्या बाईला भेटणारे.

सन्दिप डावा कडे गेली परत???? >> नाही ग डावा कडे नाही गेली . डावा कडे जाताना जो वेष करून गेली होती तोच वेष करून ( गावरान बाईचा वेष ) बिल्डरच्या घरातल्या एका मोलकरणीला गाठलं आणि तिला पैसे देऊन काही टेंडर्स चे कागद चोरायला सांगतेय. काय तिच्या डोक्यात आहे देवचं जाणे . ते कागद चोरले जातील मग ते त्या खेळण्यामुळे झालं असं भासवलं जाईल ते खेळणं अपशकुनी आहे असं मुग्धा गोडबोलेंच्या डोक्यात भरवेल . ते खेळणं परत करायला सांगेल आणि परत केलं कि मग चोरलेले पेपर्स त्या नोकरणीलाच जागेवर ठेवायला सांगेल . ते खेळणं घराबाहेर गेलं म्हणून ते पेपर्स मिळाले असं भासवायचं असेल बहुतेक. सगळेच अन्दाज .

काय पण .खरंच वर कोणी तरी लिहिलंय तस "(आईने स्वतःच्या हाताने बनवलेलं खेळणं, बाळाची शेवटची आठवण इत्यादी) सांगून इज्जतीत मागता येणार नाही का आबा? " किती तो घोळ. लेखकाला हे असं कसं सुचलं नाही ?

कि क त्याच्या माणसांसमोर गोल्फ खेळत अगदी टिपीकल व्हिलन वाटतं होता आजच्या भागात.>> हो हो! त्याने फार ताकदिने साकारलय पात्र
एक्दम पॉलिश्ड व्हिलन

आईचं कारण सांगून नक्की च परत मिळवता आलं असतं ते खेळणं.. टिपीकल मालिकांसारख नाही म्हणता म्हणता टिपीकल मालिकांसारख चं उगीच ताणत आहेत तो खेळण्याचा सीन..
रागिणीने धुरत च्या खुनाची बातमी कवर केली असती तर सांगितलं असतं.. एक प्रामाणिक आॅफिसर होता वैगरे.. ती न्युज देणारी होती तिने विलनच बनवलं धुरतला..
कुणी नोट केलयं का रागिणी ला आता सेपरेट केबिन मिळालं न्यूज चॅनेल आॅफिस मध्ये. Happy

मिठबावकर अजून जेल मध्येच आहे. तो रात्रीचं जेवण घरी करणार होता.. Lol Lol Lol
संदीप पाठकचा अभिनय मस्त.. त्याचं म्हणणं बरोबर आहे.. त्याच्या सारखा दुसरा कुणी नाहीच.. त्याला जर रागिणीला मारायला सांगितलं असतं तर ती गेलीच असती.. तो नवीन मारेकरी सगळ्या समोर जाऊन गन रोखतो तिच्या वर.!!
माखिजाला ही भारी इंप्रेस करतो तो. Happy

किती मस्त गप्पा रंगल्या आहेत . खेळण्याच्या बाबतीत रागिणी ची घाईच नडली, सर्व पटकन हवे असते तिला !
संदीप पाठक चे काम भारी. मला वाटते त्याच्या मनात अजून काही असावे . मुलींच्या प्रकरणात माखिजा होता हे त्याला माहिती आहेच . तो अजून खोलात शिरू पाहतोय माखिजाला पण वेड्यात काढले आहे .
इतरांना मारणाऱ्या माखिजा वर कोणीतरी बंदूक रोखावी आणि त्याची भीतीने गाळण उडावी, थोड्यावेळ का होईना मजा आली. Happy
धुरत चे काम करणारे आनंद अलकुंटे यांच्या फेसबुक वर बरेच छान कमेंटस आले आहे काल.

रागिणी त्या बाईला टेंडरचे पेपेर्स चोरायला सांगतेय मग डायरेक्ट ते खेळणचं का नाही सांगत आणायला

रागिणी मूर्ख आहे वाटायला लागले, हातात पैसे आहेत म्हणून धडाधड वाटत सुटलीये का? तिला खेळणे फक्त आतल्या ड्राइव्हसाठी हवेय, जे मिळाल्यावर खेळणे काही कामाचे नाही. हे खेळणे तिने दिलेय हेही अनाथालयात लिहिलेले आहे. त्यामुळे ती 5 मिनिटांसाठी खेळणे मागू शकते, त्यांना हवे असेल तर परत देऊ शकते, आईचेही सबळ कारण आहेच. हे सगळे सोडून ती चोरी, तीही एका गरीब बाईच्या हातून घडवू पाहते. ती बाई पकडली गेली तर तिची वाट लागू शकते हा विचारही तिच्या डोक्यात नाही.

कदाचित असं असेल की त्या दांपत्याला मुलगा अ‍ॅडॉप्टेड आहे हे मान्य करायचं नसेल. म्हणून अशी वाकडी वाट करत असेल.

खरतरं अनाथालय असं कुठे सांगतात की कोणाला मूल दत्तक दिलयं ?

Pages