"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण गिरीजादेवी. मुग्धा अर्थातच विचारेल की तुम्हाला कसं कळलंं की हे तेच खेळणं आहे आणि आमच्याकडे आहे. सरळ मागितलं तर तिला काहीतरी काळंबेरं वाटेल. परत ते खेळणं त्या मुलाचं आवडतं आहे कारण टीव्हीवर तो तेच घेऊन ऊभा होता. एवढं करून त्यात ते पेन ड्राईव्ह आहे की नाही कुणास ठाऊक. असेलच नाही तर कथा पुढे कशी जाणार. परदेशी व मखिजाचा संवाद Rofl

मला सदा इतका साधा वाट्त्त नाहि- जगतापने बोलवल्यावर साधेपणाने बेसावध् राहिल व कोणतीही तयारी न करता जाईल हे पटत नाही- कीवा जगतापने त्याला आधिच सरपोतदारानी बोलाव्ल्यावर साव ध केले असेल

रागिणीने खेळणे दिलेय त्याची नोंद आहे की. त्या बेसिसवर आजारी आईला थोडा वेळ हवेय, मी संध्याकाळी येऊन परत करते हे बोलून ती घेऊन जाऊ शकते. यात कोणालाही काळेबेरे वाटण्याचा प्रश्न येत नाही. हे न करता आधी ती मुलाखत व आता टेंडर चोरी ह्या भाबगडी करताना पकडली गेली तर काळेबेरे असल्याचा संशय येईल.

एकतर धुरत गेल्याने डिप्रेशन आलेय, त्यात ही बया आचरटपणा करतेय. तिला आता डावा बघणार ह्या गेटअप मध्ये हे निश्चित. किंवा त्याने पाहावे म्हणून लेखकाने हे केले असेल.

मला वाटलेलं आता रागिणी त्या गावरान बाईचा गेटअप कधीच घेणार नाही कारण तिचं काम तर झालंय डावाकडंच. आणि डावा हात चोळत बसेल ही मिळाली नाही म्हणून.
पण आता नक्कीच त्याचा कोणी तर माणूस बघणार तिला नि पाठलाग करणार.

मला वाटलेलं आता रागिणी त्या गावरान बाईचा गेटअप कधीच घेणार नाही >> अगदी मलाही असंच वाटलेलं, पण डावाचा रोलच संपला असता त्याने. तो संपवायची लेखक्/दिग्दर्शकाची अजून इच्छा दिसत नाहिये.

जरा भरकटते आहे मालिका असं वाटलं आज. बिल्डर उगाच घुसडला आहे का ? मान्य की आबा हवाय पण फार लांबचा घास झाला हा.

आजचं जरा नाही पटलं, कालपर्यंत तर खेळणं सोडत नव्हता तो मुलगा, आज गायब तरी आठवण पण काढत नाहीये. एका दिवसात स्टोरी वाढवण्यासाठी गायब केलं.

खरंच बेअरींग मस्त पकडलंय मुक्ताने पण हे आपलं बळंच घुसडल्यासारखं वाटतंय. इतका वाकडा घास घ्यायची काय गरज आहे हे कळत नाहीये.

आणि मला एक शंका आहे, त्या ड्राइव्ह मध्ये त्या गायब झालेल्या मुलींची यादीच आहे ना? मग ती मिळाल्यावर तरी त्या मुलींपर्यंत बिना पत्याचे कसं पोचणारे ती? आता तर धुरत पण नाहीये मदतीला...

जरा भरकटते आहे मालिका असं वाटलं आज. बिल्डर उगाच घुसडला आहे का ?>> मिळत असलेला टीआरपी पाहून लांबवत तर नाहीत ना हे लोक?

त्या ड्राइव्ह मध्ये त्या गायब झालेल्या मुलींची यादीच आहे ना? मग ती मिळाल्यावर तरी त्या मुलींपर्यंत बिना पत्याचे कसं पोचणारे ती? >> त्या मूर्ती च्या मदतीने . तोच तिच्या नवऱ्याबरोबर होता ना .
मिळत असलेला टीआरपी पाहून लांबवत तर नाहीत ना हे लोक? >> मालिका संपतेय १७ नोव्हेंबर ला असं वाचल . ( तीन महिने दहा दिवस ) तेवढ्या दिवसात रागिणीचा शोध बसवणार Happy

संपतेय नक्कीच. 20 नोव्हेंबर पासून नवीन येतेय त्याजागी, देवाशप्पथ नाव बहुतेक. कालपासून वेळ दाखवतायेत.

त्या मूर्ती च्या मदतीने . तोच तिच्या नवऱ्याबरोबर होता ना .>> मला वाटतंय त्या मूर्तीला तो डेटा काढून आबामध्ये ठेवण्यापर्यंतच माहिती आहे. बाकी त्या सं पा चे पण पात्र विचित्र आहे. आयत्या वेळी त्या कि क ला दगा देणार बहुतेक.

आडनाव परदेशी म्हणून सारखं तिकडेच जायचं का .... Lol
जाम हसले या वाक्याला काल...

बाकी किक डॅशिंग आहे एकदम.... आधीपासुन च आवडायचा जेव्हा बारिक होता... Wink

अजब हो, पाठक त्यासाठीचं जॉईन झालाय असं वाटतंय, कारण त्याची बहीण हरवली आहे लहानपणी आणि हे लोक्स असे उद्योग करतायेत, त्यात आपली बहीण पण असू शकते असे त्याला वाटून तो हललाय आतून, त्याची मदत होईल ऐनवेळी रागिणीला, असं वाटतंय.

जठार आणि परदेशी झालेल्याने सॉलिड काम केलं.

आता सुहास चा रोल महत्वाचा असेल कारण कि क आणि परदेशी hackers शोधत आहेत ना, पण सुहास रागिणीसाठी काम करेल, तिला मदत करेल अशी शक्यता वाटतेय.

पाठक त्यासाठीचं जॉईन झालाय असं वाटतंय,>> तेच तर...नाहीतर इतकी रिस्क पत्करून आधी हे काम सोडलं म्हणून नंतर मेन कर्त्याधर्त्याचे पुरावे हाती आल्यावर त्याच्याकडे काम परत घ्यायला जाणे व तेही मला दुसरं कोणतंच काम येत नाही या कारणाने? इथेच खरी गोम वाटतिये मला. त्याला अजून जास्त माहिती काढायची दिसतिये कि क च्या कामांची.
<<कि क आणि परदेशी hackers शोधत आहेत ना>> तो परदेशी एकटाच उत्सुक दिसतोय हॅकर्ससाठी, कि क मिडबावकर ला परत आणायच्या विचारात आहे बहुतेक...त्या सरपोतदाराचा गेम करा यार कुणीतरी... धुरतला मारल्यापासून डोक्यात गेलाय नुसता...संताप!!!

त्या सरपोतदाराचा गेम करा यार कुणीतरी... धुरतला मारल्यापासून डोक्यात गेलाय नुसता...संताप!!! >>> Lol खरंय खरंय. इतकी जवळची कोणती मालिका गेल्या कित्येक वर्षात झालेली आठवत नाही.
पण १५-१६ दिवसात सर्व संपेल असं वाटेना. नाहीतर हा फक्त सिजन१ असायचा.
ते परदेशी परदेशी वाक्याचे फारच हसू आले. माखिजाच्या चेहर्‍यावर भाव पण मस्त होते तेव्हा.
रागिणीचे खेळणे घ्यायला उलटा हात घेणे खरच का आहे ते कळत नाही.

Pages