"रुद्रम" - झी युवा वरची नवी मालिका

Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54

कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याचा गेम नाही होणार कारण जगताप अभिमानी पण मूर्ख असला तरी धुरतबद्दल त्याला आत्मीयता आहे. आपल्या खांद्यावरून हे लोक बंदूक चालवताहेत हे लक्षात आल्यावर तो धुरतला वाचवेल. (माझी इच्छा Happy ) धुरत गेला तर अर्धी गम्मत निघून जाईल… ही लढाई जेवढी रागिणीची आहे त्यापेक्षा जास्त धुरतची आहे. रागिणी तिच्या नवऱ्याला न्याय देण्यासाठी धडपडतेय. धुरत गुन्हेगार गजाआड जावेत यासाठी धडपडतोय. त्याच्या व्यक्तिगत नातेसंबंधाना स्थान तो महत्व देत नाही.

रागिणी अजूनही अंधारात आहे! ट्यूब कधी पेटेल देव जाणे.

त्याचे स्किल पुढे नक्की कामाला येईल, त्यासाठीच उल्लेख केला असावा. आज खूप छान दिसत होता तो, नेहमी वैतागल्यासारखा वाटायचा.

त्याचे स्किल पुढे नक्की कामाला येईल, त्यासाठीच उल्लेख केला असावा. >>> अगदी अगदी, त्याला आता रोल असणार काहीतरी. रा ला मदत होईल त्याची.

ही बया सांगते की काय सातवचा खून मीच केला म्हणून. काही भरवसा नाही तिचा. रघूच्या खूनाबद्दल ईतक्या मोठ्याने ओरडून का बोलत होते दोघंं. जगताप बावळटासारखा काय सांगतो की मी रघूचा खून केला, सरपोतदारला काय काय माहिती आहे हे तरी बघायचं. वाटलं होतं तेवढं मोठं रॅकेट नाहीये हे. रागिणीला त्या शूटिंगमधून काहीतरी मिळेल बहुतेक.

रागिणी सगळं सांगते की काय धुरतला.. आणि समजा सांगितले तरी धुरत ची रिअॅक्शन काय असेल.. तो तिला सोडून देईल बहुतेक. तिच्या विरुद्ध काही करणार नाही.
जगताप सरपोतदारांना सांगून बसला सगळं.. पत्रकारांना पुरावे दिले वैगरे.. आता धुरत फोन करुन बोलवून घेतल्यावर काय होईल.!!
रागिणी ला अजूनही लक्षात नाही आलं की ती माखिजा समोरही बोलून गेली शोभा बद्दल..
सगळी मालिका एकमेकांवर विश्वास आणि अविश्वास याभोवती फिरतेय..!

सुहासचा रोल हळूहळू बाहेर येतोय. तो मदत करेल रा ला मिशन मधे पुढे कधीतरी.

उद्याचा अंदाज - जगताप धुरतला सांगतोय फोनवर की गद्दार मिळालाय, त्याचं इंटेशन चांगलं असेल पण धुरतला बोलावून नवीन किरणला धुरतचा गेम करायचा प्लॅन असावा. होपफुली जगताप चांगला वागेल आणि धुरत वाचेल.

धुरतने रागिणीला बरोबर न्यायला हवं. त्याचा जीव धोक्यात आहे.

रागिणीने सत्य सांगितलं तरी धुरत तिला काही नाही करणार कारण त्यामुळेच मेव्हण्याचे वाईट प्रताप बाहेर आलेना, उलट मदत होईल शेवटपर्यंत दोघांना एकमेकांची

वरच्या बऱ्याचश्या वाक्यांना मम. सुहास मदत करणार ,शोभाच्या पाठलागावर का कोणी ठेवले नाही ,जगताप ने धुरत ला मदत करायला हवी ,रा च्या अजून लक्षात नाही आलंय किक ला तिने सांगितलंय,धुरत चा गेम एवढ्या लवकर नको व्हायला Sad

सन्दीप पाठक किरण च्या bodyचे फोटो काढल्यानन्तर गायब च झाला आहे.
आणि २ दिवस किरण ची body घरात पडून राहिलि तरी कुणालाच कळले कसे नाही?

कोणाच्या एक लक्षात आलं का....अनुराधा परमिट रूमच्या बेसमेंट मध्ये सापडलेल्या मुलींना जेव्हा सुधारगृहातून खोटा पोलीस म्हणजे संदिप पाठक जेव्हा मारण्यासाठी घेऊन जात असतो तेव्हा त्यातली एक मुलगी शोभा ताई मारते असं त्याच्या समोर बोलते....मग हे इन्स्पेक्टर धुरातला कास काय शोभा ताई बद्दल कळलं ..त्याने दिलेल्या डायरी वर त्या मुलीने बरच काही लिहलेलं असत त्यात शोभा हे नाव देखील असत...पण त्या दिवशीच्या धुरात च्या संवादामध्ये "तेव्हाच ती मुलगी शोभा ताई मारते असं म्हणाली होती " असं होत...मला हि चूक लक्षात आली...तुम्हा कुणाच्या लक्षात आली का...कि मीच काही वेगळं समजतेय .

Pages