ब्रह्मकमळ

Submitted by मिता on 17 October, 2017 - 08:08

सर्वसाधारपणे संध्याकाळी ७ नंतर उमलणारे अतिशय मनमोहक असे हे फुल. कमळासारखे दिसणाऱ्या या फुलास सृष्टीचा निर्माता ब्रह्माचे नाव दिले गेले आहे.
आपल्याकडे घरी या फुलाचे उमलणे हे शुभ मानले जाते, काही जण रात्री या फुलाची पूजा देखील करतात. वर्षातून एकदा किंवा दोनदा यास फुले येतात..
इंग्लिश मध्ये याला 'Night blooming Cereus', 'Queen of the night', किंवा 'Lady of the night' असे पण संबोधले जाते.

IMG_20170914_161454.jpg
.
IMG_20170914_210354.jpg
.
IMG_20170915_213501.jpg
.
IMG_20170914_213144.jpg
.
IMG_20170914_213306.jpg
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान फुले. याचा वासही छान येतो.
आपल्याकडे याला ब्रम्हकमळ म्हणतात, पण हे खरं ब्रम्हकमळ नव्हे! हे एक प्रकारचं "कॅक्ट्रस" आहे. आणि हे घराजवळ असण चांगल नाही असं ऐकण्यात आल्याने, आम्ही हे कुंडीतून काढलं.

धन्यवाद..!! @morpankhis, abhinav, shobha1
शोभाताई मी तर सर्वांच्या घरी हे पाहत आलेय, अन उलट खूप शुभ मानलं जात.. त्यामुळं घरी असणं का चांगलं नाही, याची काही माहिती नाही..

शुभ की अशुभ ते माहीत नाही पण शोभा म्हणतेय त्याप्रमाणे हा कॅकटसचा प्रकार आहे. ह्याला पावसात तिन बहर तरी येतात. पण आपल्याकडे सगळेच ह्याला ब्रहमकमळ म्हणतात. खरे ब्रहमकमळ हिमालयात सापडते आणि ते तितकेसे सुंदर नसते. साधारण हिरवट रंगाचे फुल असते.

फोटो छान आहेत. पहिला जास्त आवडला.

ब्रह्मकमळ नावाने हे जर ओळखले जाते तर यालाच ब्रह्मकमळ म्हणायला का हरकत घ्यावी हे समजत नाही. हिमालयात गेलो आपण तरी ते ब्रह्मकमळ शोधता येईलच असे नाही.

आमच्या कडे हे दिवसाही फुलते. कॅकट्स चाच प्रकार आहे.
असेच पण गुलाबी रंगामुळे अजुन छान दिसणारे कॅकट्स चे पण फुलं येतात आमच्याकडे ( ह्या ७/८ वर्श्यात फक्त दोनदाच आले आहेत पण)

हो चुकून तस लिहील. मला फुलच म्हणायच होत. मी फोटो पाहीलेत वेगळ्या रंगातील कॅकटसच्या ह्या फुलांचे.

निवडुंगाला काटे असतात, म्हणून ते घरात नसलेले बरे. पण असे सांगितले तर लोक ऐकणार नाहीत. तेच निवडुंग घरात ठेवलेला अशुभ म्हटले की लोक लगेच ऐकणार.

कुठलेही झाड अशुभ असू शकते का हा विचार लोक का करू इच्छित नाही?