Making of photo and status : ३. ए सागर कि लहरों!

Submitted by सचिन काळे on 22 October, 2017 - 03:29

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

https://www.maayboli.com/node/64155

Point Blur_Sep232017_113010.jpg'फेसाळणार्या लाटा, करी गुदगुल्या पदस्पर्शुनी!!!
माझी मीच राहीना, ऊठे तरंग हृदयी हर्षुनी!!!'
गोव्याच्या समुद्रकिनारी मायलेकी लाटांशी खेळताना.

Making of photo and status :
समुद्र! नुसतं नांव काढलं तरी मनात गोड खळबळ न माजणारी व्यक्ती निराळीच. आपण पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या समुद्राच्या कित्येक सुखद आठवणी आपल्या मनात कोरल्या गेलेल्या असतात. त्या सर्व उचंबळून वर येऊ लागतात. त्या समुद्राच्या किनाऱ्यावर एकामागोमाग येऊन खळकन फुटणाऱ्या लाटा. तो खाऱ्या पाण्याचा अथांग सागर. मनमोहक वाळू आणि शंखशिंपल्यांचा समुद्रकिनारा. किनाऱ्यावरची ओळीने उभी असणारी उंच उंच झाडे. आपल्या सभोवताली घोंगावणारा खारा वारा. लांब दूरवर समुद्राला स्पर्शणारे विस्तीर्ण निळे आकाश. आणि समुद्रात बुडी मारू पहाणारा सुर्यास्ताचा लालबुंद सूर्य. ही सर्व दृश्ये आपल्या मनात रुंजी घालू लागतात. आणि आपसूकच आपली पावले समुद्राकडे धाव घेऊ पहातात. मग कधी मित्रमंडळींबरोबर, तर कधी आपल्या कुटुंबाबरोबर आपण समुदकिनाऱ्याची सहल काढू पहातो.

गोव्याला सुंदर सुंदर समुद्रकिनारे आहेत. आणि प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य आहे. वरील फोटो मीसुद्धा एकेवेळी माझ्या कुटुंबाबरोबर गोव्याला समुद्रकिनारी सहलीकरिता गेलेलो असताना काढलेला आहे. आपण समुद्रकिनारी फिरतो आहोत, आणि आपण आपल्या पायाचा पाण्याला स्पर्श करणार नाही, असे होणे नाही. मी आणि मायलेकी समुद्राच्या किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटा पाहून मोहून गेलो होतो. बदलण्यास कपडे आणले नव्हते, निदान गुढघ्याभर पाण्यात तरी जाऊ म्हणून चपला काढून हातात घेतल्या आणि आम्ही तिघे पाण्यात शिरलो.

लाटांचा थंडगार स्पर्श पायांना झाल्याबरोबर अंगात एक गोड शिरशिरी उठली. पाण्याने आमच्या पायांना वेढा टाकला. लाटा पायांना स्पर्शून परत जाताना आमच्या पावलांखालची वाळू सरसर काढून घेत होत्या. त्याने आमच्या पावलांना गोड गुदगुल्या होत होत्या. मागे गेलेल्या लाटा पुन्हा पुन्हा आमच्याकडे झेपावत होत्या. लाटा आणि पायाखाली सरकणार्या वाळूचा हा खेळ निरंतर चालू होता. मायलेकी भावविभोर होऊ लागल्या. आणि आपसूकच त्यांचे मन गाऊ लागले. 'फेसाळणार्या लाटा, करी गुदगुल्या पदस्पर्शुनी!!! माझी मीच राहीना, ऊठे तरंग हृदयी हर्षुनी!!!'

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिला!
छान फोटो! आणि स्टेट्स........
कवितेच्या ओळीच अवतरल्या आहेत.. सुंदर! Happy

@ anjali_kool, इमेज कुठूनही आणि कशातूनही दिसायलाच हवी. रिफ्रेश करून पुन्हा पहा. कदाचित नेटचा स्पीड कमी पडत असेल. अगोदरच्या दोन भागांचे इमेज दिसतायत का? जमलं तर कॉम्प्युटरवर जाऊन पहा.

तरीही दिसले नाही तर इथे कळवा, मी फोटोची लिंक विपु करेन

उत्सुकता दाखवल्याबद्दल आपणांस धन्यवाद.

नाही, मला तुमच्या कुठल्याच image नाही दिसत Sad तुम्ही मागे कट्यावर टाकायचात तेव्हापण नव्हती दिसत . IE brwoser try करून बघेन.
मी कॉम्पुटरवर च बघतेय. घरी जाताना मोबाईल वर दिसतंय का बघते

@ vijaya kelkar, जागू, धन्यवाद!!

@ जागू, वरती लिंक दिलीय, त्यातही फोटो दिसत नाहीए का?

मी वाचकांना कळवू इच्छितो, की
मी टाकलेले सर्व फोटो हे अगोदर फेसबुकवर अपलोड केलेल्या फोटोच्या लिंक आहेत. आणि म्हणून कदाचित ऑफिसमध्ये फेसबुक बॅन असल्यास फोटो दिसत नाहीत. घरी गेल्यावर मोबाईलवर किंवा पीसीवर पाहिल्यास दिसू लागेल. धन्यवाद.

Pages